ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असदुद्दिन ओवैसी यांची एरवीची भुमिका काहीही असो त्यांनी ऑप सिंदूर दरम्यान उल्लेखनीय स्टॅंड घेतला आहे. हिंदू मुस्लिम को एक्झिस्ट करू शकत नाहीत या असीम मुनीरच्या पहलगामपूर्व वक्तव्याला त्यामुळे डायरेक्ट कॉंट्रॅडिक्ट करता येते. त्यामुळे त्यांना डेलिगेशनचा भाग करणे ही चांगली गोष्ट आहे. ओवैसी यांनाही याचा राजकिय फायदा मिळेल.

सुप्रिया सुळे, कन्निमोळी यांची वर्णी राजकिय क्लाऊट राखून असलेल्या घराण्यांशी संबंधित, इंग्रजी बोलू शकणाऱ्या व संसदीय वर्तन व वक्तव्य असलेल्या विरोधी पक्षातील महिला खासदार म्हणून लागली असू शकते.

विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असलेले डेलिगेशन हे काही भारतातले पहिलेच उदाहरण नाही. नरसिंह राव सरकारनेही युनोमध्ये भारतिय मुस्लिमांच्या मानवी हक्कांसदर्भात पाकिस्तानने आणलेला प्रस्ताव रोखण्यासाठी विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली सलमान खुर्शिद , इराणमधले तत्कालिन राजदूत हमीद अन्सारी, फारुख अब्दुल्ला, ब्रजेश मिश्रा यांचे डेलिगेशन पाठवले होते. त्यांनी इराण व मध्य पूर्व अरब देशांत उत्तम मोर्चेबांधणी करून प्रस्ताव चर्चेलाच येऊ दिला नाही.

ओमर अब्दुल्ला यांनीही जबाबदार भूमिका घेतली आहे. सीझफायरनंतर ते तातडीने तंगधारसारख्या सीमेवरील प्रदेशात गेले होते. तसेच पाकिस्तानी आक्षेपामुळे बंद पडलेला तुलबुल प्रोजेक्ट सिंधू पाणी वाटप करार थांबवल्याचा फायदा घेऊन सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मेहबुबा मुफ्तींनी मात्र नेहमीप्रमाणे पाकिस्तान धार्जिणी भुमिका घेतली आहे.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने लष्करी कारवाईचा विचार केला होता का ? का केली नाही, याबद्दल तेव्हाचे परराष्ट्र सचिव आणि नंतर मुख्य सुरक्षा सल्लागार झालेले शिवशंकर मेनन यांनी लिहिलं आहे.
त्यांच्या पुस्तकातला अंश आहे. पूर्ण लेख वाचण्यासारखा आणि आताच्या परिस्थितीत रेलेव्हंट आहे. दहशतवादी हल्ल्याला आम्ही उत्तर दिलं, ते उत्तर दिसेल असं होतं हे परदेशातील भारताची छबी जपण्यासाठी आणि भारतीयांच्य भावनिक जखमांवर फुंकर घाल ण्यासाठी गरजेचं होतं. लष्कर ए तोयबाच्या मुरिदके मधल्या मुख्यालयावर उघड आणि त्यांचे प्रायोजक आय एस आयवर छुपी कारवाई करावी, असे तेव्हा त्यांचे मत होते.

पण पुढे गेल्यावर शांतपणे विचार करताना आणि चित्र स्पष्ट झाल्यावर लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय योग्य होता, असं त्यांचं मत झालं.
भारताने लष्करी कारवाई केली असती, तर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ला झाला हा मुद्दा धूसर झाला असता आणि हे भारत पाक संघर्षातलं आणखी एक प्रकरण ठरलं असतं. (ऑपरेशन सिंदूर नंतर नेमकं तेच झालंय. ट्रंपची वक्तव्ये पहा. )

Faced with a dispute between two traditional rivals, the world’s default response is to call for peace and to split the blame and credit 50:50 in the name of fairness or even-handedness. This was just what the Pakistan Army wanted . २००८ मध्येही दोन अण्वस्त्रधारी देश हा मुद्दा आला होता.
पाकिस्तानवर हल्ला केला असता, तर पाकिस्तानी जनमत पाक आर्मीच्या मागे एकवटलं असतं. भारताशी युद्ध हे पाक आर्मीला हवंच असतं.
लष्करच्या तळांवर हल्ला केल्याने त्यांचं काही फार मोठं नुकसान होत नाही.

भारताने काय साध्य केलं? दहश तवादी हल्ला पाकिस्तान मधून झाला, हे पाकिस्तानने मान्य केलं. काही संघटनांवर तोंडदेखली का होईना बंदी घातली. या मुद्द्यावर पाकि स्तानला एकटं पाडण्यात भारताला यश आलं आणि सौदी अरेबिया व इतर अरब देशांचाही पाठिंबा मिळाला.

पुढे जाऊन शिवशंकर मेनन हेही म्हणतात की पुन्हा पाकिस्तानमधून असा दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला लष्करी प्रत्युत्तर देणं अपरिहार्य असेल. २००८ ची लष्करी कारवाई टाळ ण्याची स्थिती पुन्हा कधीही नसेल.
---
उरी नंतर आपण सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामानंतर बालाकोटवर हल्ला केला. पहलगामनंतर ऑपरेशन सिंदूर.
हा खेळ असाच चालणार. बाला कोटनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलं. आता अधिक मोठ्या प्रमाणात दिलं.

राजीव गांधींनीही संयुक्त राष्ट्रांत पाठवायच्या शिष्टमंडळात वाजपेयींचा समावेश केला होता. ते निमित्त साधून त्यांना न्यु यॉर्कमध्ये किडनीच्या आजारावर उपचार करून घ्या, असं सांगितलं होतं.

तसेच पाकिस्तानी आक्षेपामुळे बंद पडलेला तुलबुल प्रोजेक्ट सिंधू पाणी वाटप करार थांबवल्याचा फायदा घेऊन सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. >>> ह्या कारणावरून मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला ह्यांच्यात खुले आम् शाब्दिक हाणामारी झाली होती.

मेहबुबा मुफ्ती पक्की amphibian आहे.
----

उरी नंतर आपण सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामानंतर बालाकोटवर हल्ला केला. पहलगामनंतर ऑपरेशन सिंदूर.
हा खेळ असाच चालणार. सध्या >>> Until they stop attempting to bleed us on our soil.

म्हणजे भारतात हिंदु-मुस्लिम एकता आहे (= देश सेक्युलर आहे), भारतात महिलांना महत्वाचं स्थान आहे हे दाखवणं आंतरराष्ट्रीय ऑप्टिक्ससाठी महत्वाचं आहे तर.. मग जे ऑप्टिक्ससाठी महत्वाचं आहे त्याच गोष्टीं विरूद्ध जनमत का तयार केलं जातंय इतकी वर्षं? सिक्युलर, फुर्रोगामी, फेमिनाझी या शिव्या बनवणं, देणं का सुरू केलं गेलं? हे शब्द हिरीरीने वापरणारे जे लोक आहेत ते देशभक्त म्हणायचे की देशद्रोही? या शिव्या म्हणून वापरणार्या लोकांचे जे लाखो फाॅलोअर आहेत सोमिवर ते देशभक्त की देशद्रोही? तसंच लोकशाही, सेक्युलरिजम, फेमिनिझम या पाश्चात्य कल्पना आहेत व त्यांना आम्ही किंमत देत नाही म्हणणारे जे नेते आहेत ते देशभक्त म्हणायचे की देशद्रोही ? कारण मागच्या 20 दिवसात ह्या गोष्टी भारताची बलस्थानं म्हणून दाखवली जात आहेत..

भारतात सरकारवर टीका केलेली चालते, याचं पाकीस्तानला नवल वाटलं असेल, असं विक्रम मिस्री म्हणाले. हे त्यांनी स्वत:च्या मनचं सांगितलं असावं. त्यांच्यावर भगवी टोळधाड तुटून पडल्यावर त्यांच्या लेझर आय बॉसने त्याबद्दल काही म्हटलं का?

International Defence Review, Jane's Defense weekly मधे काही आले असेल तर अपडेट करा.
मिलिटरी रिव्ह्यू मधे उशिरा येतं.

मोदींची ऑपरेशन सिंदूर प्रचाररथयात्रा गुजरातेत सुरू झाली. त्यातले कादरखानी संवाद ऐकले तर विकुंच्या ज्या विधानावरून इथे गदारोळ घालण्यात आला, ते अगदीच काही वावगं नाही, असं वाटू लागलं आहे.

कादरखानी संवाद>> बिन्गो!! अगदी हेच्च मनात आलेलं Proud

मध्यावधी घेण्याची शक्यता वाटते का?म्हणजे एनडिए च्या कुबड्या पण नकोत

>कादरखानी संवाद

अगदी हीच उपमा सुचलेली !

माझ्या विधानावर मी अजूनही ठाम आहे. नेहेमीप्रमाणे रोड शो, मोदींनी आपलाच फोटो लावलेल्या पुष्प सुशोभित गाडीतून लोकांना हात करणे, मोदी मोदी असे किंचाळणारे लोक्स वगैरे सुरू झाले आहे. Things are back to Normal.

विकुंच्या 'त्या' विधानाला अनुमोदन.

साधं सरळमार्गी आयुष्य जगणार्‍या कुणालाही मानवी हत्यांचा आनंद होणार नाही. (चुकून आनंद व्यक्त केला तर आपल्या हातून 'पाप' होईल- हीही भावना नेणीवेत कुठेतरी असते का? तर ते बघावं लागेल. सामान्य भारतीयांच्या मनात डोक्यात पाप-पुण्याच्या भावना सदोदितच असतात. ते चुकीचं आहे का? काय केल्यावर आपण कोणत्या पापाचं क्षालन झाल्याचं समजतो? गाईला चारा, पक्ष्यांना दाणे, कुत्र्यामांजरांना दुध-पोळी इथ्पासून सोल्युशन्स सुरू होतात. तर तोही वेगळाच विषय. असो)

मुख्य मुद्दा वेगळाच आहे. कुठच्याही मार्गाने आपल्या प्रिय नेत्याचा, म्हणजे देवाच्या अवताराचा फायदा झाला की आनंद होणारे लोक आहेत. कशाने फायदा झाला हे अजिबात न बघणारे रेम्याडोक्याचे भक्त मी अनेक पाहिले आहेत. (इथं असे लोक नसावेत अशी आशा-अपेक्षा आहे.) कशाने फायदा झाला हे डोळ्यांत तेल घालून बघणारेही असतील. आता या दोन टोकाच्या स्पेक्ट्रममध्ये कुणीतरी असतील की नाही? यातलेही काही सोयीस्कर 'नरोवा कुंजरोवा' असतील. या अख्ख्या स्पेक्ट्रममध्ये इथलं कुणीच नाही, हे शपथेने, खात्रीपुर्वक कसं सांगणार?

त्या विधानात 'काही मायबोलीकरांना आनंद झाला' असं काही नव्हतं. आनंद होणारे लोक बाहेरही असतील. मी पाहिले आहेत, त्यामुळे त्यांचं प्रमाण काहीतरी असावंच- हे मी खात्रीने सांगू शकतो.

आता असा दुखवटा किती दिवस पाळणार हेही असेलच. पण इतक्या अशा हत्या झाल्यानंतरचे हे असे रोड शो आणि जल्लोष विचित्र वाटतात. ती गाडी लग्नाच्या वरातीत असल्यासारखी फुलांनी सजवली आहे. त्यावर शेजारी शेजारी अनेक असे एकाच व्यक्तीचे अनेक फोटो लावले आहेत. हे अश्लील आहे अक्षरशः.

आणि हा त्या 'ऑपरेशन सिंदूर'चा जल्लोष असेल तर मग बरेच प्रश्न विचारावे लागतील.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी विदेशी चॅनेल्सना दिलेल्या मुलाखतींनंतर भक्तगण त्यांचे गोडवे गाणे बंद करतीय याची शक्यता नाही. कारण आपल्या न्युज चॅनेल्सनी जयशंकरने युरोप को दिया करारा जवाब अशा हेडलाइन्स घेऊन मुलाखतीचे अंश दाखवले.

# where was US in all this?

इकडच्या मेनस्ट्रीम मिडिया मधे आता भारत - पाक प्रश्नाला काहीही कव्हरेज नाही. तो चॅप्टर पहिल्या २- अडीच दिवसांनंतर बंद झाला.
ते जयशंकर काय म्हटले, किंवा इवन शशी थरुरांची ऑफिशियल भेट, त्यांचे भाषण वगैरेही काही दिसले नाही.

शेवटी काहीतरी करून, सगळ्यांनी जमा होऊन, ते विधान, ते निरीक्षण योग्यच आहे हे सिद्ध करून दाखवले

Proud

दुनिया एकीकडे अन हे एकीकडे

दुनिया एकीकडे अन हे एकीकडे
>>>
दुनिया कुठे आहे याचा काय संबंध? विवेक आणि बुद्धी गहाण ठेवता काय तुम्ही कुठचंही मत बनवताना?

तुम्ही स्वतःला कवी गझलकार समजत असल्याने जगातला सर्वोकृष्ट कवींपैकी एक, म्हणजे तुकारामाचं ‘मानियेले नाही बहुमता’ हे वाचलं ऐकलं असेलच. नाही म्हणालात तरी मला नवल वाटणार नाही.

हे असे रोड शो आणि जल्लोष विचित्र वाटतात. ती गाडी लग्नाच्या वरातीत असल्यासारखी फुलांनी सजवली आहे. त्यावर शेजारी शेजारी अनेक असे एकाच व्यक्तीचे अनेक फोटो लावले आहेत. हे अश्लील आहे अक्षरशः. >>> +११ !
मी नेहमी भारतातल्या बातम्या क्लोजली फॉलो करत नाही , हेडलाइन्स पहाते फक्त बहुधा, त्यामुळे त्या वरातीचा फार संदर्भ लागला नाही पण इतका मोठा जल्लोष बघून तेच मनात आले, जरा टोन डाउन करायला हवा होता. अजून महिना ही जेमतेम झाला आहे पहलगाम घटनेला.

>>>
तुम्ही स्वतःला कवी गझलकार समजत असल्याने जगातला सर्वोकृष्ट कवींपैकी एक, म्हणजे तुकारामाचं ‘मानियेले नाही बहुमता’ हे वाचलं ऐकलं असेलच. नाही म्हणालात तरी मला नवल वाटणार नाही.

इतक्या पोटतिडकीने गेली अनेक वर्षे का व्यक्तिगत आकस असल्याप्रमाणे लिहिता?

फक्त आणि फक्त तुमचेच विचार अनुसरणीय व अनुकरणीय ठरावेत हा सामान्यांनी अयशस्वी ठरवलेला अट्टहास कशाला?

जरा कुठून झापडं काढून टाकायची एनर्जी मिळाली तर बघा. कदाचित कळेलही- विवेक आणि बुद्धी गहाण ठेवणं किंवा ठेवावी लागणं ही मूळ समस्या आहे.

मोदी राहुल यांच्याविरोधात काहीही बोला पण आपल्या मायबोलीकरांवर व्यक्तिगत हल्ले करू नयेत असं मला वाटतं त्या दोघांपेक्षा मायबोलीकर आपल्या जास्त जवळचे आहेत. मोदी राहुल कधी कुठल्या गटगला येणार नाहीत पण आपण कधीतरी कुठल्या गटगत भेटू तेव्हा विनाकारण मी याला भलतंच बोललो होतो हा पश्चाताप मनात नको. बाकी तुमची मर्जी.

साजिरा,

तुमच्या अत्युच्च भाषास्तरावर पोचणे शक्य नाही.

हा धागा तुम्हाला लखलाभ! Happy

बोकलत, तुम्ही शांत व्हा. इतकं काही झालेलं नाही. आम्ही दोघे पुण्यात आहोत. इथं असं चालतं. Proud
शिवाय आम्ही वाहत्या धाग्यांवर गप्पा मारल्यात, एकमेकांच्या जाहीर मुलाखतीही घेतल्यात. जुने मायबोलीकर आहोत. थोडे वाद नको घालायला?

फक्त आणि फक्त तुमचेच विचार अनुसरणीय व अनुकरणीय ठरावेत हा सामान्यांनी अयशस्वी ठरवलेला अट्टहास कशाला>>>
आहा. तेच तर.

Pages