
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद
.
खास क्षण
.
.
.
पण मला भेटून आणि मागच्या
पण मला भेटून आणि मागच्या गटगच्या फोटोत असूनदेखिल नाही ओळखले ना ते महत्वाचे! <<
हो. हो. हेच महत्वाचे..
पण एक सांगू. याबाबतीत मी किल्लीचाच नमुना आहे.
घटना माझ्या लक्षात रहातात पण चेहेरे नाहीत..
म्हणून तर सांगते dp लावा
म्हणून तर सांगते dp लावा

संपर्कात राहा
रच्याकणे,
आवाज नाही विसरत मी एकदा ऐकला कुणाचा की.
Call करून खबरबात घ्यावी, येतेस का पाणीपुरी खायला असे विचारावे वगैरे वगैरे
अश्विनी ११ला सुद्धा भेटले होते तरी विसरले होते.
तुम्ही एकटेच नाही आहात कृष्णा, nothing personal
यादी मोठी आहे.
यादी मोठी आहे.
किल्लीने ती आधी भेटलेल्या सगळ्यांनाच ओळखायला नकार दिला.
ओळखायला नकार दिला.>> तो फक्त
ओळखायला नकार दिला.>> तो फक्त तुम्हांला

.
बाकीच्यांना मुळात ओळखलंच नव्हतं
किल्लीने बराच मजेदार गोंधळ
किल्लीने बराच मजेदार गोंधळ घातलेला दिसतोय.
पण नांदेडच्या मुली माणसं जोडण्यात कुणालाच ऐकत नाहीत. आयोजन कसलं मस्त केलं आहे गटगचं. 
कृष्णा, तुमचा वृत्तांतही मस्त. वर पोच द्यायची राहून गेले होते.
धनवन्ती, फोटो पाहिला. कधी अनयाला कधी तुला मागे उभे केले आहे. पण आता बहुतेक जण लक्षात राहतील असे वाटतेय.
तेजोची फुलेही बघून आले, मस्त.
साजिरा, 'व्हल्नरेबल'- परिच्छेदासाठी अनुमोदन.
पुढे सुरू आठवेल तसे.
पुढे सुरू आठवेल तसे.

मी लेट पोहचल्याने आधी जे सिम्बा, बिपीन सांगळे येउन गेले त्यांची माझी गाठभेट नाही झाली. आवडले असते. पण हुकले थोडक्यात.
Virtual मध्ये फॉरेनर मंडळींचा कॉल देखील मिस झाला.
पण इतर व्हिडीओ कॉल मध्ये मी पाहिले, ऐकण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला फक्त. मुग्धा केदार, अवल, प्रज्ञा9 ह्यांना फक्त तोंड हलवताना पाहिले
अवल ने किल्लीला ओळखले काहीतरी हातवारे करून आणि मग डंब शेराजचा नमुना सादर झाला. आधी किल्ली, मग तिथेच रेशमडोर होती तिने एकदम भारी acting करून दाखवली रेशम दोर अशी
अवलचे नशीब जोरात होते म्हणून फक्त ह्या 2 आयडीत हा खेळ थांबला
लांबलचक टेबल असलं की आपोआप इकडचा तिकडचा बाजूचा मधला असे गट पडतात आणि तुफानी गप्पा सुरु होतात. मग एकदम मंडई फिल. समोरच्याच ऐकायला फार कान जवळ नेवून ऐकायला लागायचं. आणि मोठयाने बोलायचं.


माझ्या बाजूला आम्ही लेटलतीफ होतो.
मी , धनवंती, मधुर/ महिंद्र , यक्ष, कृष्णा इकडे तिकडे असे कुंपणावर असल्यासारखे.
मी मधुर आणि धनवंती मेकॅनिकल इंजिनियर निघालो आणि मग सुखदुःख शेअर केले.
यक्ष सिव्हिल मधून आयटी प्लॅटफॉर्म वर गेलेले.
त्यात मध्येच मधुर ने नागपूर वर्धा उल्लेख केला आणि यक्ष ह्यांचे कान टवकारले. ते ही नागपूरचे.
मग विदर्भातील गप्पांचा अनुशेष भरून निघाला.
कृष्णाला खूप वेळा भेटलोय.
हसतमुख आणि प्रेमळ आहे तसाच.
हे असे थोडा वेळ झाल्यावर मग मंडळी इकडून तिकडे तिकडून इकडे शफल होत होत गोलाकार जमली.
कोण बसलंय कोण उभा आहे वै वै
एकमेकांशी 4 वाक्य तरी बोलत बोलत अजून ओळखी वाढवत होते सगळेजण.
खाण्याचे पदार्थ एकामागोमाग एक येतच होते.
मध्येच येउन किल्ली सगळ्यांना अजून खायचं आहे असे आग्रहाचे प्रोत्साहन देत होती.
पास्ता , lasagnya, पॅटिस , पिझ्झा असे कॅनडा वरून आलेल्या अमित ला खाउ घातले.
अमित उत्सवमूर्ती असल्याने त्याच्याकडेही सगळ्यांचे लक्ष होतेच. त्याला साजिराने पुणे ठाणे असे काहीतरी विचारलेलं तर त्याने पॉलिटिकल करेक्ट उत्तर दिले.
त्याला भेट दिलेली भिकबाळी आणि पेंटिंग फार छान आहे.
शरद मध्येच केव्हा गेले ते कळालं नाही मला.


भरपूर गप्पा झाल्या.
मग पंगतीत ना वाढलेलं मात्र अजूनही ऑर्डर शिल्लक असलेलं सर्व पार्सल साठी गेले. चहा कॉफी काउन्ट झाला आणि सगळयांना कॉफीच आली.
तिथून आपापले समान, मिळालेलं गिफ्ट, वाणवळा वै घेउन खाली ग्लेन च्या आवारात आलो आणि तिथे परत गप्पाची मैफिल.
मग ज्याला जसे निघायचे होते तसे निरोप घेत एकेकजण निघत गेले.
पार्किंग मध्ये आलो.
उत्सवमूर्ती ना कृष्णा सोडतो म्हणालेला.
त्यावर किल्ली म्हणाली वाह! कृष्णाचे सारथ्य आहे आज तर
आम्हीही दुचाकीवर बॅगा ठेवून त्यालाच चावी लावलेली ठेवून परत गप्पा मारत उभे राहिलो.
Harpen, मी, यक्ष, मधूर, किल्ली.
परत गप्पा मैफिल जमली.
Gtg धागा काढल्याने लोकसंख्या वाढली ह्यावर एकमत झाले. वेगवेगळे विषय निघत गप्पा सुरूच होत्या.
त्यात अजून कोण कोण येतो म्हणाले पण काही अडचणी मुळे आले नाहीत ह्याचा आढावा झाला.
आशुचाम्पची आठवण निघाली.
मी आणि harpen ने म्हणजे ओडिन चा बाबा रे असेही सांगितले. Harpen ने एक चांगला मुद्दा मांडला.
व्हाटसप मुळे ठराविक लोकं भेटत असतात पण मग नवीन लोकांना यायला भेटायला gtg कसे बेस्ट असे काहीसे.
तिथेच मधुर ने त्याचे ताडोबा मधले वाघाचे काढलेले फोटो दाखवले. ताडोबाला एक gtg करूया असे ठरले मग.
हळूहळू आता घरी निघण्याचे वेध.
निरोप घेउन निघालो.
किल्लीला रस्ता दाखवत मागे पूढे करत आम्ही दोघे सिग्नल आला की आपापल्या दुचाकीवरून गप्पा मारत होतो
योग्य ठिकाणी पोहचलो आणि मग बाय बाय करून मी जुना मुंबई पुणे हायवे पकडला आणि किल्ली संगमवाडी च्या दिशेने .
फार वर्षांनी माबोचे असे जास्त संख्या असलेले gtg झाले असावे आणि त्यात मी ही होतो.
वाडयावर गप्पा मारणारी बरीच मंडळी भेटली.
बरे वाटले.
कालच सगळी मंडळी भेटलेली आणि आज गप्पा पुढे सुरू इतक्या सहजतेने गप्पा होतात पहिल्यांदा भेटत असूनही हे माबोचे वैशिष्ट्य आहे.
कुणाचा उल्लेख केला नसेल तर फक्त लक्षात नाहीत सगळ्या गोष्टी म्हणून.
अजूनही आठवेल तसे लिहिणार आहेच मी.
अगं, फोटोतली माणसे आणि नावे
अगं, फोटोतली माणसे आणि नावे इतकी मागे पुढे झालीत की ते jigsaw puzzle झालेय..
आता माझा वृ..
आता माझा वृ..
माझे हे पहिले गट ग. पण मायबोली वर अतीचशय नियमित हजेरी लावत असल्यामुळे सगळे एकदम ओळखीचे वाटत होते. थोडी उशीरा पोहोचले. त्यामुळे आधी ची गंमत चुकली. संयोजकांनी माझी विनंती लक्षात घेतली आणि मेट्रो स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर स्थान ठरवले याचे विशेष आभार..
गेले तर नुसता कल्ला.. धुडगूस... जि प शाळेतील इयत्ता ८ फ च्या वर्गात शिक्षक नसल्याची कळा होती. ..
पुढचे वर वाचून घ्या...
मस्त वॄ झकास! किमान २-३
मस्त वॄ झकास! किमान २-३ लोकांचे वृ वाचायचे राहिले आहेत. मागे जाऊन वाचणार आहे.
लांबलचक टेबल असलं की आपोआप इकडचा तिकडचा बाजूचा मधला असे गट पडतात आणि तुफानी गप्पा सुरु होतात. मग एकदम मंडई फिल >>>
टोटली. पण तुम्ही मधेच जागा स्वॅप करत नाही का? इकडच्याने उठून तिकडे जायचे वगैरे? नाहीतर मग तू म्हणतो तसे दोन तीन गट पडतात.
रेशमडोर होती तिने एकदम भारी acting करून दाखवली रेशम दोर अशी >>>
हे कसे दाखवले?
त्यावर किल्ली म्हणाली वाह! कृष्णाचे सारथ्य आहे आज तर >>>
हे भारी आहे. अमितचे नाव आता "आज का अर्जुन" ठेवायला पाहिजे माबोवर.
किल्लीला रस्ता दाखवत मागे पूढे करत आम्ही दोघे सिग्नल आला की आपापल्या दुचाकीवरून गप्पा मारत होतो >>>
म्हणजे तुमचे तर आणखी एक धावते मिनि-गटग होते
पण बाय बाय करताना खात्री केलीत ना की तुम्हीच होतात? नाहीतर डेक्कनलाच चुकामूक झाली व पुढे बरेच अंतर बाजूची व्यक्ती झकास व किल्ली आहे असे समजून तुम्ही दोघे भलत्याच लोकांशी गप्पा मारत गेलात असे काहीतरी होईल
पुण्यातील ट्रॅफिक मधे व हेल्मेट्स मुळे हे अगदीच अशक्य नाही.
योग्य ठिकाणी पोहचलो आणि मग बाय बाय करून मी जुना मुंबई पुणे हायवे पकडला आणि किल्ली संगमवाडी च्या दिशेने . >>>
झकास यस काय पटापट खाणाखुणा
झकास
यस काय पटापट खाणाखुणा करून सांगितलं.
मी तुम्हालाही झकास म्हणून हाताची खूण करून ओळखलेलं
आज का अर्जुन
आज का अर्जुन

बाजूची व्यक्ती झकास व किल्ली आहे असे समजून तुम्ही दोघे भलत्याच लोकांशी गप्पा मारत गेलात
>>>
आमच्या गटगला तर मी पांढरा टीशर्ट म्हणजे झकास असं लक्षात ठेवलं होतं
बायदवे, त्या ओळखवाल्या फोटोतली माणसं खाली नावं लिहिली आहेत त्यापेक्षा जास्त वाटली. कोणाचं नाव राहिलंय का?
आमच्या गटगला तर मी पांढरा
आमच्या गटगला तर मी पांढरा टीशर्ट म्हणजे झकास असं लक्षात ठेवलं होतं..
मीही असं करते आणि मग गोंधळ होतो
दुसरा एक प्लॅन आधीच ठरलेला
दुसरा एक प्लॅन आधीच ठरलेला असल्याने जमले नाही.... तरी त्यातून वेळ काढून छोटीसी चक्कर टाकण्याचा विचार होता पण जमेल याची खात्री नसल्याने इकडे लिहले नव्हते.... आणि जमले नाहीच!!
फोटो वृत्तांत बघून एकूण धम्माल केलेली दिसतीय!!
अमितला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
मीही असं करते आणि मग गोंधळ
मीही असं करते आणि मग गोंधळ होतो Lol>>>>
इतके चेहरे दुर्लक्षणीय असतात तर!
अमितला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अमितला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!>>>
अरे वा अमितचा बड्डे आज!!
अमित, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
उत्सवमूर्ती
उत्सवमूर्ती
मायदेशातील पाहूणे मायबोलीकर
माबो जोडो अभियान यशस्वी पार पाडून भिकबाळी धारणकर्ते अमित ह्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
फा
फा

लिहिलंय की वर
मग मध्येच इकडचे लोक तिकडे असं1 करत करत सगळे गोलाकार जमा झाले असे
हेल्मेट घालून इतरांसोबत गप्पा
नाही नाही
वेगवेगळ्या Gtg निमित्त 2 ते 3 वेळा भेटल्याने तो गोंधळ काय नाही झाला
नवख्या व्यक्ती सोबत नक्कीच असे होण्याचे चान्सेस आहेत
मी रेशमडोर आणि अश्विनी 999 मध्ये नक्की गोंधळलो असतो
पण जायच्या आधी आयडी खात्री करून घेतली
अवल हो हो हाताची खुण आठवली.
धनवंती लिहा पटापट
रेशमडोर वृ कुठंय?
साजिरा अमित आशुडी गप्पा दुरून बघणे ( ऐकू येत नसल्याने ) मजा होती.
विशेषतः साजिरा हातवारे चेहरा बॉडी लँग्वेज सगळ्यातून बोलतो. अमितची हसण्याची एक वेगळी शैली आहे.
ओठ डाव्या बाजूला ओढून छान हसतो.
तेजो ने अमितसाठी बिया पाठवलेल्या होत्या बऱ्याच फुलझाडांच्या असे आठवतंय.
>>>>विशेषतः साजिरा हातवारे
>>>>विशेषतः साजिरा हातवारे चेहरा बॉडी लँग्वेज सगळ्यातून बोलतो.
हाहाहा
>>>>>अमितची हसण्याची एक वेगळी शैली आहे.
ओठ डाव्या बाजूला ओढून छान हसतो.
होय पेंटिंगवाल्या फोटोत नोटिस केलेली आहे.
>>>>>>>मला नवल वाटतय एसच कसे
>>>>>>>मला नवल वाटतय एसच कसे आले सर्व. एस (एक्का) म्हणजे आरंभ, सुरुवात. पण खूपच पोझिटिव्ह कार्डस आहेत.
हे माझे टॅरॉट रीडींग.
झाले की नाही शुभस्य शीघ्रम. यानंतर पुण्यात किती गटगं झाली सांगा पाहू. निदान व्हर्च्युअल गटगंची सुरुवात तर झालीच.
.
.
>>>>>>>काहीतरी न्युझ मिळणार. किंवा सर्प्राईझ असू शकते.
व्हर्च्युअल गटग हे सर्प्राईझ होते, याबद्दल दुमत नसावे.
तेव्हा मला आता टॅरॉट रिंडींग बिझनेसचा श्रीगणेशा करावयास हरकत नाही
तेजोनी किती सुंदर सुगंधी फुले
तेजोनी किती सुंदर सुगंधी फुले पाठवलेली आहेत. वाह!
साजिरा हातवारे चेहरा बॉडी
साजिरा हातवारे चेहरा बॉडी लँग्वेज सगळ्यातून बोलतो
>>
'वेडसरपणाची झाक दिसते' असं लिहिलं असतं तरी चाललं असतं
साजिरा
साजिरा
नाही रे वेडसर नाही
Emotive पर्सनॅलिटी असे काहीसे म्हणतात बघ
Emotive पर्सनॅलिटी असे काहीसे
Emotive पर्सनॅलिटी असे काहीसे म्हणतात बघ>> स्टिकर्स चांगले बनतील
आणि emojis सुद्धा
असं म्हणायचंय का झकासराव???
उद्या मी आणि mrunali समद
उद्या मी आणि mrunali समद भेटणार आहोत, तिच्या माहेरी.
ऑह वॉव केव्हा? भारतिय
ऑह वॉव केव्हा? भारतिय वेळेप्रमाणे किती वाजता?
ईमोजी नाही हां.
ईमोजी नाही हां.
शरदजी हो मला मृणाली बोलली होती तसे.
मी उद्या कोपुला यायला निघणार आहे पण उशिरा.
5 दिवस तरी आहे तिथे.
Pages