पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त झालेले दिसते गटग. विशाल बर्‍याच दिवसांनी दिसला. आणि अतरंगी बर्‍याच दिवसांनी लॅण्डवर दिसला Happy ऋतुराज या गटगकरता पुण्यात आला होता का?

टेकडीवर तो मागे वळून पाहतानाचा फोटो आहे तेथून पुढे वरती गेलात, की हा फोटो काढून थेट रेस्टॉ? Happy

फोटो छान! झकास, हर्पेन, किल्ली, अतरंगी, रेडोला ओळखलं. वृ, खादाडीचे फोटो येऊ देत....

पहिल्यांदा समीट (? Lol ) झाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ रेशम डोर ने मोठ्ठी फ्रुट अँड नट डेअरी मिल्क फोडली आणि वाटली.
नंतर टेकडी उतरून आलो की मिनी खाउगल्ली आणि विक्री केंद्र असतं. तिथे पेरू, गुळपापडी अशी खरेदी झाली.
आणि नाश्त्यासाठी आलो.
तिथे ब्रेफा बफे ला ही भली मोठी लाईन बघून ala carte ऑर्डर गेल्या सटासट.
ते येईपर्यंत मग धनवंती ने आणलेले अप्रतिम पेढे, ऋतुराजने आणलेली खास काजू कतली, रेशम ने कापलेले पेरू ह्याचा आस्वाद घेतला ( मंडळी भुकावलेली नुसती )
मसाला डोसा, मेदू वडा , इडली, उपमा, पेपर डोसा, फॅन्सी नावाचा रवा डोसा, सँडविच , फिल्टर कॉफी आणि मग सारखे सारखेमागून घेतलेले पाणी असे सर्व रिचवले.
मध्येच मल्लीने आणलेली बाकरवडी देखील खाल्ली.

ऋतुराज ने नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यातून फ्रीज मॅग्नेट्स आणलेले गिफ्ट ते दिले सगळ्यांना.

नंतर थोड्या वेळासाठी का होईना योगिता संकपाळ ने हजेरी लावली.

पावसाची हजेरी सतत होतीच.

कविन, RMD आणि धनि , अभि रीना ह्यांनी व्हिडीओ कॉल द्वारे हजेरी लावली.

त्या रेस्टॉरंट वाल्याने चार वेळा येऊन टेबल साठी विनंती केल्यावर मंडळी तिथून बाहेर आली
नंतर आईस्क्रीम खाण्याची आयडिया मल्लीने काढली.
मग सगळे परत आईस्क्रीम वर तुटून पडले.

गप्पा झाल्या, ख्याली खुशाली कळाली, किस्से देवाणघेवाण झाली, हिहीहुहुहाहा करून तुफान हसलो.
न आलेल्याना मिस केलं.
काही माबोकरांची आठवण निघाली काढली.
मग मंडळी निरोप घेत पांगली.
एकुणात मजा येतेच gtg ला.
आठवणी, किस्से गमती फार.
भेटत राहिले पाहिजे.

विशाल ला वर्तुळ पूर्ण करण्याची आठवण केली
लंपन ने सांगितले होते त्या गणेश तलाव ला पुढच्या वेळी घेउन जाईन ऋतुराजला.
शिवाय सगळी कमळं प्रकार बघायला मोशी ला जायचे next टाइम हे ही ठरले.
ऋतुराजने निग मोड ऑफ ठेवलेला.
तरी कमी ठिकाणी आढळणारे कृष्ण वड झाड दिसल्यावर आवर्जून दाखवले सगळ्यांना.
एक भली मोठी गोगलगाय ( त्यांच्यातली डायनोसॉर का म्हणेंना ) दिसली. ती कशी भारतीय गोगलगाय साठी घातक हे ही सांगितले.

Btw
आपण अगदी casually अरे तुरे करतो ती मंडळी बरीच मोठी असतात आपापल्या कार्यक्षेत्रात हे ही आज परत कळालं.

साधना, साजिरा, मृणाली, कृष्णा , वेमा
वाडेकर्स अशी बऱ्याच जणांची आठवण काढली.
सगळी नावं लक्षात देखील नाहीत.
मिसली असतील तर लिहा रे जरा आठवून आठवून.

">>ऋतुराज या गटगकरता पुण्यात आला होता का?>>"
यु मीन "secret surprise celebrity" ना?
मी अ‍ॅक्चुअली त्याच्यामुळेच कन्फ्युज झालो होतो 😂 हैदराबाद गटग मध्ये ऋतुराजने 'झकासराव' (त्याच्या सासुरवाडीच्या ठिकाणचे असल्याने) मनाने त्याला कसे जवळचे आहेत वगैरे गोष्टी सांगीतल्या होत्या. त्यात (Vishal चा Square लिहिलेल्या फोटोत) त्याने आपल्या 'वर्गा'वर छत्री धरली असल्याने तेच 'झकासराव' असावेत असा माझा (गैर)समज झाला होता 😀
अर्थात झकासराव हे त्यांच्याबद्दल जसे (ऋतुराज कडुन) ऐकले होते तसेच झकास वाटले आहेत फोटोतून 👍

अरे वा ! गटग मस्तच झाले की.
द विशाल कुलकर्णी साक्षात !!
एक वर्तुळ पूर्ण झाले हा वाकप्रचार शब्दशः अवतरला.

कृष्णा किवळ्यातल्या मुकाई चौकात पण आहे.

क्या बात है! दणक्यात झालं राव गटग!!

विशाल बगतांव हां. इथल्या इथं पर्वतीला भेटू नको. तिकडे दूर जाऊन भेट

पाहुणे आले आणि आमचं बारगळलं. पुढचं गटग नक्की मंडळी. कार्याध्यक्ष फक्त बदलू नका

सहीच झालं. मस्त मस्त फोटो, वाचते सावकाश.

विशाल आलेला का, भारीच की. तो काय पुण्यात आणि आसपासच रमतो. पनवेलला रहायला एक दोन वर्षे आलेला, जवळ आलाय म्हणता म्हणता गेला परत पुणे साईडला.

फॅन्सी नावाचा रवा डोसा>> onion spring रवा मसाला डोसा
आत दीड काजू, ओलं खोबरं आणि नेहमीचा बटाट्याचा मसाला / भाजी होती.
स्प्रिंग दिसलं नाही मला तरी Lol

फोटो मस्त
धमाल केलेली दिसतेय सगळ्यानी.

मस्तच झालं कालच गटग.
फारच धमाल आली.
पावसाळी वातावरणात दुर्गा टेकडी भ्रमंती आणि त्यानंतर खादाडी. वेळ कसा गेला कळलेच नाही. थट्टा, मस्करी, गप्पांना नुसता ऊत आला होता.
ऋतुराज या गटगकरता पुण्यात आला होता का?>>>>>> सासुरवाडीला (चिंचवड) आलो होतो. अर्थात गटग हे देखील कारण होते.
यु मीन "secret surprise celebrity" ना?>>>>> सिक्रेट सेलिब्रिटी म्हणजे आपले वर्तुळकार विशाल कुलकर्णी. त्यांना वर्तुळ पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली.
पुणेकर, पिंची कर याचबरोबर वर्चुअल हजेरी पण लावली काही माबोकरांनी.
झकासरावांनी गटग सारांश दिलाच आहे.
सविस्तर वृत्तांत लिहितो नंतर.

Wow मस्त झालं की गटग..
झकासराव वृत्तांत छान लिहिलंय...
माझी पण आठवण काढलीत. थँक्यू थँक्यू..
किल्ली फोटो मस्त..

गप्पांच्या ओघात
सूर्यकिरण ( सुकी ) , घारूआण्णा , स्वाती26, सई, दक्षिणा, दिनेशदा, मंजुडी, यो रॉक, इंद्रधनुष्य, चिमुरी, लंपन , मुग्धाकेदार ह्यांचीही आठवण काढलेली असे आठवतंय

IMG-20250727-WA0051.jpgIMG-20250727-WA0054.jpg
शर्मा काकांकडे गेलो होतो ब्रेफा आणि गप्पा झाल्या नंतर
तिकडचे काही photo

सविस्तर वृत्तांत लिहितो नंतर.>>> लिही जरा बैजवार!

टेकडीवर तो मागे वळून पाहतानाचा फोटो आहे तेथून पुढे वरती गेलात, की हा फोटो काढून थेट रेस्टॉ? Happy>>>>>>>

सगळे चला भुकावले असतील आणि खादाडीला जायची वेळ झाली म्हणून मागे वळून पहात असावेत, पुन्हा एवढे उतरून जायचे आणि मग हॉटेल.

सूर्यकिरण ( सुकी ) , घारूआण्णा , स्वाती26, सई, दक्षिणा, दिनेशदा, मंजुडी, यो रॉक, इंद्रधनुष्य, चिमुरी, लंपन , मुग्धाकेदार ह्यांचीही आठवण काढलेली असे आठवतंय>>>>>>>
हॉटेलच्या नावाने माझी उणीव भरून काढली आणि माझ्या आयडीचा वारंवार उल्लेख झाला. त्यामुळे वेगळी आठवण नकोच काढायला. Proud

अरे व्वा , जोरदार झालंय गटग . दुर्गा टेकडी ला कधी गेले नाही त्यामुळे यायची खूप इच्छा होती . पण घरी ज्येष्ठ नागरिकांची पडझड झाल्याने जमले नाही . परत ठरले तर जरूर येईन

मला आत्ता कळतंय गटग झालं ते..आज almost एक महिन्याने मी निवांत आलीये मायबोलीवर... मिसल मी...मला यायचं होत .. anyways next time... मस्त आलेत फोटो..

दुर्गा टेकडीवरचा रस्त्याचा हिरवागार फोटो मस्त आहे!

ऋतुराज अँफिबियन गटगकर आहे. पुणे, मुंबई, ठाणे सगळ्या गटगना आवर्जून हजेरी लावतो. असा व्यासंग करण्याची माझी इच्छा आहे!

Pages