
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद
.
खास क्षण
.
.
.
तो अमितला भिकबाळी घालतानाचा
तो अमितला भिकबाळी घालतानाचा जो फोटो आहे त्यात आधी मला साजिरा अमितच्या केसांत पिन लावून काही माळतोय की काय असं वाटलं होतं क्षणभर
खालचा भिकबाळीचा उल्लेख वाचून उलगडा झाला. अमितच्या चेहर्यावर पण अगदी लाजरे भाव आहेत 
अगं, तू एडिटून जरासंधाने
अगं, तू एडिटून भीमाने जरासंधाचे दोन तुकडे करून लांब फेकल्यासारखे केलेस पोस्टीला मधेच माझी पोस्ट आली आणि. अजून एक जोक पोटात मावत नव्हता.
ठाणे गटगत लाघवी, पुणे गटगत लाजरा -
आपण कुणाशी खेळणार नाहीतर.
अजून चांगले गुण येण्याच्या आत परत आणा त्याला कुणीतरी.
अजून चांगले गुण येण्याच्या आत
अजून चांगले गुण येण्याच्या आत परत आणा त्याला कुणीतरी. Proud आपण कुणाशी खेळणार नाहीतर.
हो बघ ना! बिघडला अमित भारतात जाऊन.
>>>
अगं वरच्या पोस्टीत कौतुक आणि टोमणा एकत्र झाल्याने गडबड होत होती म्हणून जरासंध मोड

भीमाचे दोन तुकडे
अगं मी चुकून उलट लिहिले होते.
अगं मी चुकून उलट लिहिले होते.
छान धमाल गटग
छान धमाल गटग
फोटो आणि venue मस्त
शरद यांचे खरेच कौतुक. तुम्ही
शरद यांचे खरेच कौतुक. तुम्ही गटगसाठी एवढी दगदग करून खाऊ घेऊन लांबवर आलात. /\
साजिरा, किल्ली व झकासराव भारी झाले गटग व वृत्तांतही धमाल आहेत.

अमित, लवकर लिही बाबा. बायका
अमित, लवकर लिही बाबा. बायका बघ काय काय बोलायल्यात.
अरे वा मस्त फोटो आणि वृत्तांत
अरे वा मस्त फोटो आणि वृत्तांत
साजिरा, आशुडी, अनया, हर्पेन ही ओळखीची मंडळी दिसली. एकदम पिढी बदलल्यासारखं वाटलं!
शरद तुम्ही आणि मी डिसेम्बर
शरद तुम्ही आणि मी डिसेम्बर महिन्यात सांगली मिरजेला गटग करू. मला इथे स्टारबक्स महाग वाटते पण आता सांगलीत पण सुरू झाले आहे म्हणजे तिथल्या लोकांना स्वस्त वाटते बहुतेक. तेव्हा तिथेच भेटू. नाहीतर तो वालचंदच्या बाहेर गाडी लावायचा तो बुर्जी पाव वाल्याकडे
नक्की या सांगलीत टवणे सर.
नक्की या सांगलीत टवणे सर.
आनंदरावची गाडी अंड्यासाठी आणि मंजुची पोहे आणि भजी साठी.
किल्ली, वृत्तान्त मस्त. अगदी
किल्ली, वृत्तान्त मस्त. अगदी सगळं समोर उभं राहील.
झकासराव, मस्त लिहिलं आहे. आणखी लिहा.
साजिरा, छान लिहिल आहे.
शेवटचा परिच्छेद हृद्य. वाचून अगदी अगदी झालं...
बाकी सगळ्यांचे नवीन प्रतिसाद पण मस्त आहेत.
भरत म्हणतात तसं धागा दोन हजारावर जायला हवा. २० जणांचे २० वृत्तान्त यायला हवेतच.
अनुस्वारांचे नियम ब्रह्मचर्यापेक्षा कडक आहेत असे नुकतेच लक्षात आले>>>>> दोन्ही पाळण/ पाळणं महाकठीण
शरदजी, तुम्हाला दंडवत. एवढ्या लांबून गटग साठी आलात.
अंड्यासाठी आणि पोहे भजी साठी सांगली गटग ला यावं वाटतंय.
शरदजी..नंबर नोट केला.
शरदजी..नंबर नोट केला..सांगलीला आले कि करते संपर्क..
मी आता पुण्यात आहे, काल आले..काल मी झकासराव, आबा,मल्लीनाथ आम्ही भेटलो..मीनी गटग..
सर्वांनीच गटग चर्चेत भाग घेऊन
सर्वांनीच गटग चर्चेत भाग घेऊन भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात!
वरील चर्चेतील जुने-जाणते ह्या शब्द प्रयोगामागील भावना आपापली समजुन घ्यावी.
हीच ती कॉफी
हीच ती कॉफी
नमस्कार!
नमस्कार!
धागा वगैरे काढून पुण्याचं गटग असल्याने मला जरा कानकोंडंच वाटत होतं. गटगच्या दिवशी सकाळी मेट्रोने आलो. मेट्रो चांगली बांधली आहे. फक्त स्टेशनांवर नावं लिहायची वेळ आली आणि बजेट संपलेलं दिसतंय. कुठल्याही (मी प्रवास केलेल्या) स्टेशनवर मेट्रो मध्ये बसलेल्या स्थितीत दिसेल अशा ठिकाणी नावच लिहिलेलं नाही. आतले डिस्प्ले आणि उद्घोषणा चालू असतील तर ठीक. नाही तर आम्ही मुंबईकर पुणेकरांना हे डेक्कन नाही वगैरे सांगत होतो.
पाचेक मिनिटं उशीरच झाला. आधी आत जाऊन विचारलं तर किल्ली आणि पल्लवी दोन्ही नावांनी सांगून त्या लोकांच्या चेहर्यावरची माशी उडेना. म्हणजे मी फक्त पल्लवी हेच नाव सांगितलं. किल्ली सांगायला काय मी इतका हा नाही. पण दोन नावांनी सांगुनही समजलं नाही म्हटलं की भारदस्त पणा येतो ना.. मग मी हाडाच्या पुणेकराप्रमाणे इथे रोजच येतो अशा थाटात सरळ मागे गेलो. तिकडे थोडी टेबलं दिसली आणि वर जाणारा एक सोपान होता. बघू जीवनोन्नती झाली तर म्हणून वर चढू लागलो तर शरद दिसलेच. त्याना भेटून ओळख करुन घेतली तोवर हर्पेन, मागोमाग बिपिन सांगळे आणि अश्विनी११ आल्या. आम्ही चांगले आत एसी मध्ये बसलेलो होतो ते न पाहवुन बिपीन म्हणाले चला जरा मोकळ्या हवेत बाहेर बसू. इतकं उकडत असताना पावसाळी मातीचा सुगंध वगैरे घेत निसर्गाच्या बाजुला आंब्याचं चांगलं झाडही होतं तिथे... तिकडे खुर्च्या टाकून बसलो. तोवर कृष्णा आणि मागोमाग किल्ली आलेच. इतका वेळ खेळीमिळीत ओळखी आणि गप्पांचा ट्रॅक हर्पेनने लगेच बदलला आणि किल्लीला सगळ्यांना ओळखायला सांगितलं. किल्लीने कधी न भेटलेल्या यक्षंना ओ़ळखणे, काही महिन्यांपूर्वी भेटलेला कृष्णांना पार्किंगमध्ये आणि मग वर येऊनही न ओळखणे असे जादुचे प्रयोग चालू केले. तोवर सिम्बा आला, अश्विनी९९९ आली. त्यांनी आल्याआल्या नाव सांगून टाकल्याने किल्लीचा जीव व्हिज्युअली भांड्यात पडलेला दिसत होता. आता कोरम भरलेला आणि वेटरच्या आतल्या येरझारा फारच वाढलेल्या बघुन आम्ही सगळे आत गेलो. जरा आतल्या गार हवेत त्या मोकळ्या हवेपेक्षा जरा जास्त बरं वाटू लागलं.
.... क्रमशः
सलग वेळ मिळत नाहीये... तो कधी मिळेल आणि कधी लिहिन पेक्षा क्रमशः:च लिहितो... सॉरी!
अरे वाह. छान गटग झालेले
अरे वाह. छान गटग झालेले वाचतोय. मी एकदाच 10-12 वर्षांपूर्वी उपस्थित राहिलो होतो. आशुडि आणि साजिरा इतर पुणेकर मान्यवरांसह होते तेंव्हा.
हा वृतांत वाचूनच बरे वाटले.
साजिरा मस्त बहुरूपी लेखन. रच्याकने बुधवार चालतो आम्हाला.
सगळे वाचून मायबोलीचा थोडक्यात धावता आढावा ही झाला. सगळे जिथल्या तिथे आहे हे समाधान वाटले.
हर्पेनजींशी पूर्वी एकदा बोलणे झाले होते.
पुढील पुण्यातील गटग नक्की येणार. (तेथे असेन तर, सध्या नाहीये).
साजिरा माबो बद्दल सहमत.
अमित, जीवनोन्नती होण्यासाठी
अमित, जीवनोन्नती होण्यासाठी सहा सोपान लागतात. इथे एकच होता.
जीवनोन्नती झाली की नाही?
जीवनोन्नती झाली की नाही?
@साजिरा....
@साजिरा....
आपण व्हल्नरेबल असण्याच्या काळात मायबोलीवर आधार सापडलेला असतो. आपण गुड फॉर नथिंग आहोत असं वाटत असण्याच्या काळात मायबोलीवर कशावरून तरी अॅप्रिसिएशन मिळालेलं असतं. आपण काहीतरी चांगलं लिहू, बोलू, करू, दाखवू शकतो हा विश्वास इथं कधीतरी मिळालेला असतो. अडचणीच्या आणि निराशेच्या काळात इथं माया-ओलावा मिळालेला असतो. पराभव सोसण्याच्या काळात इथल्या कुणीतरी बळ दिलेलं असतं. कशात काही अर्थ नाही असं वाटतानाच इथल्या पोश्टी, इथले लोक आपल्या गालांवर हसू फुलवून जातात.
हे ऋण असतं. आपण ते व्यक्त करावं, इतकंच.
हे फारच पटलेलं आहे...खूप छान लिहिता तुम्ही...
अरे वाह. छान गटग झालेले
..दोनदा झाले असल्याने खोडून टाकले.
आशुडी
आशुडी
न भेटता लोकं ओळखतात म्हणजे किती चांगलंय.
माबो गाजवलेल्या लोकांनाच हे भाग्य
अमित
जादूचे प्रयोग
Sharadg जी...
Sharadg जी...
आपण सप्रेम दिलेली वांगी काल खाण्यात आली आहेत
आवडण्यात आली आहेत...पुन्हा घ्यायला 'सांगलीला' येइन म्हणतो.
एकदम आमच्या 'गोंदेगाव च्या काटेरी वांग्यांची आठवण झाली'. आई अप्रतीम भाजी व भरित करायची.....
अरे हो! अनयानी दिलेल्या कैरिचा 'तक्कु' करायचा होता पण जर ती गोड असेल तर 'मेथांबा' करण्यात येइल. (म्हणजे 'इकडूनच' करणे होइल..मी फक्त कौतुक करणेमात्र).
बाकी खाऊ आणी ताजी टवटवीत फुलेही अप्रतीम..
सगळ्यांचेच प्रतिसाद मस्त...
Ashwini_९९९ मनातले लिहिलेत..
अनया ची कैरी खूप गोड आहे.
अनया ची कैरी खूप गोड आहे. त्याचे पन्हे pulp करून ठेवला. आता ४ महिने तरी नक्की टिकेल, संपला नाही तर
ती कैरी फार आंबट नाहीये.
ती कैरी फार आंबट नाहीये. त्यामुळे पन्हं, मेथांबा, साखरांबा चांगला होतो.
शरदजी
शरदजी
भरली वांगी भाजी झाली घरी.
छानच झाली.
अनया , ती कैरी किसून त्याचा chhunda बनलाय
अजून टेस्ट केला नाही पण छान असणार ह्याची खात्री आहे.
>>>>जादूचे प्रयोग
>>>>जादूचे प्रयोग

>>>>जीवोन्नती
>>>न पहावुन
एकदम भारी झालाय गटग! मस्त
एकदम भारी झालाय गटग! मस्त फोटो आणि वृत्तांत!
वर जाणारा एक सोपान होता. बघू
वर जाणारा एक सोपान होता. बघू जीवनोन्नती झाली तर म्हणून वर चढू लागलो >>>
किल्ली सांगायला काय मी इतका हा नाही >>>
त्यांनी आल्याआल्या नाव सांगून टाकल्याने किल्लीचा जीव व्हिज्युअली भांड्यात पडलेला दिसत होता >>>
मस्त सुरूवात अमित. "सुरूवात" लिहीले आहे मुद्दाम, पुढे लिहावेस म्हणून.
वांगी रेस्टॉ मधेही कृष्णाच्या बाजूला ठेवली असती तर तेथेही त्यांना "कृष्णा"काठचीच म्हणता आले असते
तेजोने पाठवलेली फुले मोगरा
तेजोने पाठवलेली फुले




मोगरा
.
वांगी रेस्टॉ मधेही कृष्णाच्या बाजूला ठेवली असती तर तेथेही त्यांना "कृष्णा"काठचीच म्हणता आले असते>>>
अमित ह्यांना पण ओळखले होते की मी
Pages