पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा, अफाट की हो! मस्त, मजा आली वाचून. Happy
किल्ली, जोरात. किती सव्यापसव्य करून तू सगळं जुळवून आणलंस. व्हर्च्युअलांनाही व्यवस्थित पोच दिलीस व सगळं व्यवस्थित केलेस. याबद्दल कौतुक. Happy

मला बऱ्याच जणांना ओळखता आलं व बऱ्याच जणांनी मलाही ओळखलं याची एक मजा. फोटो छान आलेत. अनयाला मागे का उभे केले आहे ..! Happy रेशम डोर, येत जा आता नियमितपणे. Happy मी VB, वावेला थोड्या प्रयत्नात, हर्पेन, अमित, अनया, किल्ली , साजिरा, आशुडी, झकासराव यांना सहज ओळखले. कृष्णा, सिंबा, यक्ष, शरदजी, बिपीन सांगळे, महिंद्र गोडबोले यांची आता ओळख झाली. Happy

व्हर्चुअली अजून कोणकोण येणार होतं याबद्दल अजिबात कल्पना नव्हती पण छान जुळून आलेलं दिसतंय. फोनवरून व्यवस्थित बोलताही आले नसते व दूरून आलेली लोक असताना किल्लीला फोन घेऊन किती वेळ फिरवत ठेवणार असे वाटले, त्यामुळे अघळपघळ गप्पा मारता आल्या नाहीत. अर्थात जेवढी ओळख करून घेता आली त्यानेही मस्त वाटले. Happy ह्यासाठी किल्लीला एक मोठे थॅंक्यू. Happy

वृ कम क्षणचित्रे कम अवांतर पाल्हाळ :
***

कार्याध्यक्षांचं कौतुक करून घेतो. हे ग्लेन्स ठिकाण अजून पाहिलंच नव्हतं. आपण करत असलेला दंगा पाहता हे सर्वोत्तम ठिकाण आहे. लोकेशन परफेक्ट आणि अँबियंस भारी आहे. हॅट्स ऑफ टू किल्ली आणि हर्पेन.
*
दुनिया किती छोटी असते. आम्ही मायबोलीवर सामाजिक उपक्रमातून बुधवार पेठेतल्या मुलांना शिकवायचा उपक्रम राबवला होता, त्यातले ३ लोक गटगला होते. अजून एक बाहेरगावी असल्याने आले नाहीत. फार मस्त भारी वाटलं. (अकुची फार आठवण आली, कारण तीच आम्हा सगळ्यांना दिद्गर्शन करत होती. फार गोड मुलगी होती यार.)
*
मी आलोच मुळात नव्या मायबोलीवर, म्हणजे २००८ ला. पण जुनी मायबोली मी उकरून उकरून वाचली आहे. तिथंही काही अगाध धागे आणि प्रतिसाद अर्थातच आहेत. इतक्या वर्षानंतरही 'यक्ष' माझ्या लक्षात राहिला (गेली अनेक वर्षं तो अ‍ॅक्टिवच नाही, किंवा रोमात आहे), त्याला तसं सांगितलंही.
*
कृष्णाजींना बघितलं आणि ते जुनं गड-वाडा, लिंब्याचा तर्‍हेवाईकपणा (आम्ही अजूनही अधुनमधून फेसबुकावर एकमेकांवर क्षेपणास्त्रं डागत असतो. लिंब्या इज दॅट स्वीट, यू नो) आणि मी नवखा असतानाचा तो एकुणच काळ आठवला. इट्स अ फेवरिट वेबसिरीज. कभीभी पीछे जाके देख लो. मी म्हणलो ना, माबो टाईम मशिन आहे.
*
शरद यांना भेटून छान वाटलं. टण्याच्या लग्नाला आम्ही वर्‍हाड बनून पुण्या मुंबईतून मिरजेला गेलो होतो, ते आठवलं. (येताना मी, अरभाट, आशू, मीनू- अशा अनेक लोकांनी तिथून खास कृष्णाकाठची वांगी आणलेली ही आठवण. नीरजा सोबत होती, संदीप सावंतला वगैरे भेटलो - ही दुसरी. अशा अनेक.) असे प्रसंग विरळा. म्हणूनच ते प्रिंट होतात. शरद, कोल्हापुरात गटग भरवा, आम्ही येऊ.
*
अनेक वर्षं मी नेमाने मायबोली वाचतो आहे. 'हा' आयडी पुण्यात असावा, आणि आपण त्याच्यासोबत गटग, बुधवार, शा.र. इ. करावं असे वाटण्यासारखे काही आयडी (त्यांतले काही अर्थात डुआयडीही असतील. आय डोंट माईंड. डुआयडीवरचं प्रेम आणि माझा इतिहास कसा आणि का लपवायचा, नाही का :फिदी:) मायबोलीवर काही आहेत, त्यातला अमित. अगदी खरं सांगायचं तर ठाणे गटग मध्ये निरु किंवा अनिरुद्ध जो होता, तो मला अमितव वाटला होता. नंतर कळलं, हा ऑनलाईनवाल्या वावरापेक्षा फारच स्कॉलर दिसतोय. म्हणजे असेलही, त्यालाही काही हरकत नाही. पण 'वुमन रीडींग अ बूक' चं पेंटिंग परफेक्ट गिफ्ट झालं, याचं समाधान. अमित, तुझ्या लायब्ररीत, स्टडी टेबल वगैरे वर लाव ते.
*
अमितने 'डावीकडून वर या' असं धाग्यावर लिहिल्यावर याने स्ट्रॅटेजिकली पोझिशन घेऊन ठिकाण ठरवलं का काय असं वाटलं. म्हणजे रिक्षाच्या पाठी असतं ना, 'होय हिंदूच'. तसं काहीतरी. पण तो सध्यातरी निष्पाप निघाला. पण तरीही याचा अर्थ तो डावा नाही, असा होत नाही. ते बघू नंतर.
*
सध्या फार लिहित नसलो तरी वाचत बर्‍यापैकी असतो. एकतर ऋण आहेत, आणि माबोसोबत ती असोशी अजून शिल्लक आहे. किल्लीसारखे आयडी पटकन दिसतात, लक्षात येतात. लिहिणं, बोलणं, वागणं- हिची सगळीच स्टाईल भारी आहे. तिला कार्याध्यक्ष घोषित करा. बघा सगळी गटगं दणक्यात होतात की नाही. मधल्या काही वर्षांचा अनुशेष भरून निघेल.
*
मायबोलीवर अंदाजे साडेआठ हजार 'अश्विनी', आणि त्याच्या निम्म्या 'वर्षा' आहेत. (आतातरी इचार करा मुलांची नावं ठेवतांना). त्यातल्या काही आज आल्या. त्यातल्या आशूडीला झकासाने दिग्गज म्हटल्याने ती लाजली आणि चिडलीही. वय असं सहज कोण दाखवेल, नाही का.
*
झकास इज काईंड ऑफ माय जॉन्र. त्याला मी कधीही भेटलेलो नसतानाही तो कसा दिसतो, वागतो, हे माझ्या मनात पक्कं होतं, अँड यू नो, तसाच निघाला तो! (हा काळ किती होता? तब्बल १५ वर्षं). मायबोली एक प्लॅनेट आहे, आणि सारे प्लॅनेटवासीय माझे बांधव आहेत.
*
टण्या, तू कधी झकासाला भेटलास, बघितलास काय? तो तुझा भाऊ (फारतर चुलतभाऊ म्हण) दिसतो. Proud
*
ती रेशमडोर किती गोड आहे. Proud (या आयडीची काय कथा आहे, बायदवे?) बालवाडी खूप आवाज करून थकल्यावर एक मोमेंट असा आला, की सगळे थकून अचानक शांत झाले. तर ही कानावर हात ठेऊन भिऊन ओरडली, 'अरेSSSS का शांत झालेत सगळे??!!' आणि बघा म्हणजे, सगळे जणू या सिग्नलची वाट बघत होते. पुन्हा त्याच जोमाने आणि जोरात गदारोळ सुरू झाला!
*
अनया किती बोलते! पण तिने बोलत राहावं असं वाटतं. तळेगाव गटग फिक्स. शेतातल्या कैर्‍या म्हणजे काय राव. ही माझ्या जवळच राहते आणि इतक्या वर्षांनी भेटली. नोट करून ठेवा रे.
*
सिंबा, भूल गया सब कुच्छ, याद नही तुझे अब कुछ. बुधवारला तरी ये रे. डाव्या आघाडीचा लोड अशाने अमितसारख्यांवर प्डतो बघ. Proud
*
हर्पेन, काय लिहू? अनेक भारीतले मायबोलीकर जवळचे मित्र झलेत, त्यातला तू एक. कितीही दिवस नाही भेटलो, तरी आपण कालच भेटलो- हे नक्की!
*

आता काय?
अजून लिहितोय थांबा. नाही सुचलं आठवलं, तर मग मात्र नाईलाज आहे. Proud

हेही मस्त लिहिलंय साजिरा. Happy
आम्ही जरा लवकर कॉल केला होता म्हणून तुमचे दर्शन हुकले. ते 'वुमन विथ अ बुक' पेंटिंग, त्या बद्दलची माहिती व ते देण्यामागचा विचार आवडला. सगळी माहिती भक्तिभावाने वाचून झाल्यावर शेवटी "alternatively be an abstract self-portrait" हे दिसल्याने "मग एवढं वाचवून का घेतलं" अशी भावना मनात आली हेही माबोकर म्हणून गप न बसता लिहितेय. Happy

फा, कोकोनट सुद्धा एक लोकप्रिय -दिग्गज झाला आहे आता, तेही न लिहिताच. Happy
कोकोनट आहे का विचारल्यावर तिने नारळ दाखवला असता तर तिला गटगमधूनही नारळ मिळाला असता. >>> Lol
व्हर्च्युअल वेटिंग लिस्ट गटगही केले. >>> Lol धाग्यावरील अवांतर गप्पांइतकेच सिरियस आहे ते, वेळ वाया नको जायला टिवल्याबावल्यांचा.

साजिरा, दोन्ही वृ झकास झाले आहेत Lol

आम्ही थोडा लवकर कॉल केला होता. तेव्हा ४-५ टाळकीच आली होती त्यामुळे दंगा कमी होता. पण त्यामुळे तुझी भेट झाली नाही. आपण शेपरेट व्हर्च्युअल गटग करूया Proud

पुढच्या वेळी आम्ही येऊ तेव्हा नक्की नक्की भेटूया.

फोटोज् बघूनच खूप भारी वाटलंय.
भिकबाळीची आयडिया कोणाची? Happy
पेंटिंग आणि त्याची माहिती छान.
अमित खूप श्रीमंत होऊन परत येतोय पुण्याहून Happy

अरे काय चाललं आहे? लोकांची फोटोवरून ओळख न सांगता त्यांच्याबद्दल लिहिलं तर कसं समजणार कोणाबद्दल बोलता आहात ते?

फार मस्त मजा केलीली दिसतेय..
साजिरा, दोन्ही वृ झकास झाले आहेत>>> +१
किल्लिचाही वृ पण मस्त..
सगळ्यानी जरा ओळख करुन द्या फोटोत कोण कोण आहेत त्याची

फोटोंवर टेक्स्ट लिहिण्याचे app ने फोटोंवरच नावे द्यावीत म्हणजे ओळखायला सोपे पडेल. प्रतिसाद शोधून नावे पहावी लागतात.

किल्ली मस्त वृ. अगदी सगळं डोळ्यासमोर आलं
साजिरा पहिला अन दुसरा दोन्ही भारी . नो डावं उजवं Wink
चित्रही सुंदर
मजा येतेय सगले वृ वाचताना

भिकबाळीसाठी कान टोचलेला होता का 'क्लिप ऑन' प्रकार आहे. चापाची भिकबाळी वगैरे? फोटो पाहून नीट कळत नाहीये व आम्हाला चौकशाच फार. Happy

पहिल्या फोटोत., सेल्फी १ मध्ये, पुढून पाठीमागे
मधुर गोडबोले
आशुडी, किल्ली, रेशिम_डोर
साजिरा, अश्विनी११, व्हीबी
अश्विनी९९९, हर्पेन, झकासराव
वावे, धनवंती, कृष्णा
यक्ष, अनया, अमितव
अगदी काटेकोर रांगेत लोक नाहीत. पण थोडी डोकी चालवलीत तर अशी त्या डोक्यांची नावं आहेत.

आणि शेवटून दुसऱ्या फोटोत...
किल्ल्याच्या मागे उभे... बिपीन सांगळे
कृष्णा आणि साजिऱ्याच्या मागे सिम्बा
उजवीकडे.. आशुडी आणि रेशीम_डोर यांच्या मागे sharadg
बाकी नावं पाहिल्या फोटोत आली आहेत.

माधव निवासचे रुपांतर Glens Bakehous मध्ये केल्याचा आज त्या मालकाला अभिमान वाटला असेल. एवढ्या मोठ्या संख्येने मायबोलीकरांनी गटग तिथे आयोजित केल्याचे पाहून.

ठाणे गटग नंतर पुणे गटग चे पडघम वाजू लागले होते. इथल जेवढं चट मंगणी पट ब्याह अस झालं होतं तिथलं तितकंच सगळं रीतसर झालं. असो.
वर्चुअल गटग आयडिया पण मस्त. मला त्याबाबत उशिरा माहीत झाले. हळहळ+ FOMO.
जागा मस्तच आहे आणि मुख्य म्हणजे गटग साठी उत्तम. सर्व आयोजनासाठी किल्ली आणि हर्पेनदा ला धन्यवाद.
सर्व ओळखीचे आणि अनोळखी आयडी पाहून छान वाटले.
साजिरा, साहित्यिक वृत्तान्त आवडला अगदी.
कॅनडातल्या लाडघरला मामाकडे कधी जातो असे त्याला झाले होते.>>>> फुटलो
वुमन विथ अ बुक पेंटिंगची आयडिया आणि माहिती मस्त.

अवांतर पाल्हाळ पण मस्त लिहिलंय.
यक्ष
तुमचं गटग मनोगत पण मस्त आहे.
किल्लीचा वृत्तान्त मस्त आहे. एकदम चित्रदर्शी. पुढचे भाग येऊदेत.
बाय द वे कोणी एक सरदारही होता का गटगला?>>>> सगळे सर दारात उभे असलेला एक फोटो आहे की.

अगदी काटेकोर रांगेत लोक नाहीत. पण थोडी डोकी चालवलीत तर अशी त्या डोक्यांची नावं आहेत.>>>>> सोमवार सकाळी डोकी चालवता येत नाहीत.
दुसरं, हे वाचून वर स्क्रोल करा परत खाली या परत वर. दमलो.

❝ पहिल्या फोटोत.. पुढून पाठीमागे
मधुर गोडबोले
आशुडी, किल्ली, रेशिम_डोर
साजिरा, अश्विनी११, व्हीबी
अश्विनी९९९, हर्पेन, झकासराव
वावे, धनवंती, कृष्णा
यक्ष, अनया, अमितव
अगदी काटेकोर रांगेत लोक नाहीत. पण थोडी डोकी चालवलीत तर अशी त्या डोक्यांची नावं आहेत.
नवीन Submitted by अमित ❞

आता लावा डोकं 🙂

साजिरा ,मस्त लिहितोयस. डावीकडून वर या >> Lol
क्षण शब्दचित्र पुढे चालू :

अकुची आठवण अपरिहार्य होती. पत्रिकेत वर श्री गजानन प्रसन्न, अमुक प्रसन्न तसं गप्पांना सुरुवात करताना लिंबू टिंबू, झक्की, रॉबिनहूड अशा कुठं कुठे समुद्रापार, डोंगर दऱ्यात वसलेल्या माबो कुलदेवतांचे स्मरण केले गेले. उगाच कुणाचा कोप नको.

सगळे जण वाडा वाडा करत होते आणि मी आठवत होते की गेली हजारो वर्ष १६११ चे दार अजून कुरकुरले ही नाही तर एवढे आयडी आत शिरले कुठून? तेव्हा झकासरावने सांगितले की हा आधुनिक वाडा आहे, तुला वाटतो तो शनिवारवाडा नाही. हत्तीना पण नामोहरम करणारे ते टोकदार शब्दांचे खिळे लांबूनच दिसत असतील लोकांना, कोणी फिरकत नाही तिकडे बघून जीव भांड्यात पडला. न वापरलेल्या जागेचे भाडे पुढल्या gtg मधे अजय यांना द्यावे लागेल बहुतेक.

सर्वांना भेटल्या भेटल्या कळले की नुकतेच rmd आणि तिचे धनी, फा येऊन गेले. मग तर मला माबो नक्कीच टाईम मशीन वाटले. आम्ही घरून इथे पोचेपर्यंत इथली पृथ्वी इतक्या वेळा फिरली? आता हे व्हिडीओ कॉल वर gtg चे नवीनच निघाले पुन्हा. लोक फार हुशार आहेत असं दाखवतात हल्ली. राबिट मधे बरबटलेल्या कुलकर्ण्या सारखं सगळं कसं जिथल्या तिथं! ऑटोमॅटिक. Proud

अमितव ला आयडी ची कथा उगाचच विचारली साजिऱ्या ने. त्यात काय कथा आहे, अमित वर्तक. पण तरी म्हणे अमितव म्हणजे अमित व अमुक असे होते का? मी म्हटले नाही, ब्रेक अप झाल्या नंतर दुःखात चूर होऊन त्याने आयडी घेतला आहे, अमितव कुणी नाही. काळाच्या पुढे पाहणारा आहे तो, टॅटू पुसायचे फॅड हल्ली आले आहे. Lol

अमितची आणि माझी ओळख २०१४ १५ च्या मभादि का गणेशोत्सव संयोजनातली. ती लक्षात ठेवून त्याने माझा नंबर मिळवून मला संपर्क केला आणि भेटायची इच्छा दाखवली. म्हणून एक छोटीशी भेट आपुलकीची अर्थाने मी त्याला आणि त्याच्या बायकोला भिकबाळी आणि नथ भेट दिली. तेवढेच तिकडे महाराष्ट्र मंडळात फ्लॉन्ट करायला. Happy

कालच्या gtg मधे आत्म परीक्षणाचा एक क्षण आला तो म्हणजे, नेहमीच्या व्यक्तींची छान अशी ओळख करून देता आली नाही. अश्विनी११ ने मला विचारले साजिरा सिनेमा बद्दल फार छान लिहितात पण मला त्यांची फारशी माहिती नाही. मी फारच तोडक्या मोडक्या प्रकारे त्याची ओळख करून दिली. आणि शेवटी म्हटले तू त्याच्या प्रोफाईल मध्ये जाऊन बघ किती विविध गोष्टीत त्याची मुशाफिरी आहे. पण तो किडा घरी येई पर्यंत डोक्यात राहिला. आपल्या स्वत: ची, घरच्यांची पण एक चार पाच वाक्यात मुद्देसूद अशी छान ओळख आपल्याला करून देता यायला पाहिजे. मराठीच्या पुस्तकात लेखक परिचय असायचा आणि मग धडा कविता सुरू व्हायची तसं. काढेन आता लिहून.

इथे अमित आणि साजिरा मध्ये काहीतरी युद्ध आणि तहाच्या अटी अशी बोलणी झाली होती. त्यामुळे आम्ही गेल्या गेल्या साजिऱ्याने त्याला सांगून टाकले तहाचे पांढरे निशाण घेऊनच आलोय. आता पुढे बोलू. Lol

<<तोपर्यंत आम्ही एक व्हर्च्युअल वेटिंग लिस्ट गटगही केले. >> अरे मस्त. एखादे व्हर्च्युअल गटगही वर्षातून एकदा वगैरे करायला हवे.

किल्लीचे पुढिल भाग, साजिरा आशुडी यांचे वृतांत मस्त आहेत.

नमस्कार. मी. डॉ. शरद. आधी पहिली दहा एक नावे पाहिल्यानंतर, मी पण यावे असे वाटू लागले होते. पण नेर् पुसेगाव येथे त्याच दिवशी पत्नी व मुलीसह जायचे होते. आणि ती एकटीने कार घेवून कधीच लांब गेली न्हवती. त्यामुळे शनिवार सकाळ पर्यंत निर्णय होत नव्हता. शेवटी ती आणि मुलगी दोघीच कार घेवून जातील आणि माझी एवढी इच्छा आहे तर मी पुण्याला बस किंवा ब्ला ब्ला कारने पुण्याला जावे असे ठरले.

मग काही तरी आठवण भेट सर्वांसाठी घ्यावी असे वाटले. सांगलीत शनिवारचा मोठा आठवडी बाजार असतो, तिथून सर्वांसाठी पाच किलो सांगलीची खासियत असलेली कृष्णाकाठची वांगी घेतली. सांगली भडांगासाठी सुद्धा फेमस आहेच. डॉन, गोरे, भोरे, अंबा, काटकर, कपाले हे ऑप्शन्स होते. 20 लहान आणि एक थोडा मोठा पॅक असे सर्वांना आणि अमितव यांना देण्यासाठी घेतले.
अमितव यांना अजून काही तरी वैयक्तिक भेट घ्यावी असे मनात होते म्हणून मा. शरद पवारांचे आत्मचरित्र, "लोक माझे सांगाती", जे माझ्याकडे होते आणि माझे वाचून झाले होते, ते बरोबर घेवून आलो.
अमितव सर, ते पुस्तक पूर्ण नवे कोरे नाही याची नोंद घ्यावी.

सगळे झाल्यावर साडे चारला निघून रात्री दहा वाजता सिंहगड रोडला घरी पोहोचलो.

सकाळी सहाला प्रभात फेरी झाल्यावर साडे सातलाच मी कधी साडे आठ वाजणार आणि कधी मी निघणार अशा अवस्थेत बसून राहिलो. थेट रिक्षा केली आणि आपल्या ठिकाणी सगळ्यात आधी, म्हणजे मी पल्लवी (किल्ली) नावाने आमचे आरक्षण आहे असे सांगितले, तेव्हा ते म्हणाले की आम्ही आत्ता दुकानाच्या फळ्या उघडतो आहोत, थोडे बसून शान घ्या. आणि मग सगळे भेटले. बाकी थोड्या वेळाने.

मी यावे की न यावे अशी द्विधा मनस्थिती होती, त्याला दोन कारणे होती. काल आपण मला पाहिलेच. माझ्या 2020 मधील मुख कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर माझ्या चेहेर्यात काहीसे वैगुण्य निर्माण झालेले आहे. शिवाय माझ्या बोलण्यात सुद्धा थोडी कमी स्पष्ट पणा आहे. याचा एक न्यूनगंड मनात होता.
अर्थात माझे कामच शिकवणे म्हंजे बोलणे हे आहे, पण थोडा वेळ माझ्याबरोबर राहिल्या नंतर माझे बोलणे समजते अशी खात्री होती.
पण याचा काहीही परिणाम मला आपल्या भेटीत जाणवला नाही, याबद्दल सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

ताजा कलम:@मृणाली समद. मी सांगलीत आलो आहे. मोकळाच आहे. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा 7020323671 या क्रमांकावर लघु संदेश, दूरध्वनी किंवा कायप्पा संदेश पाठवाल तर आपण भेटीचे नियोजन करू.
सांगली मिरजेत जर अजून कुणी असतील तरी मला संपर्क करा. एक मिनी मेळावा होऊन जाईल

पनीर पफ होतं ते
दोन आकारात
एक लंब गोल आणि एक चौरस

किल्ल्ली, साजिरा, अमित, शरदजी छान वृत्तान्त!

कालचा गटग भारी!

संपूर्ण श्रेय किल्लीच्या उत्साहाला, हार्पेन ह्यांच्या यथोचित सहाय्याला आणि अर्थात गटग विशेष उत्सवमुर्ती अमितव यांना.
कालच्या उपस्थितांतील झकासला बर्‍याचदा साजिराला आणि आशुडीला वविमुळे २-३ वेळा. हर्पेन, किल्ली आणि अश्विनी ह्यांना धनि-रमड गटगत पहिल्यांदा भेटलेलो. बाकी सर्वांना प्रथमच भेटलो. माबोचा गटग हा उत्साहा मुळे 'उत्सव' होतो हे नेहमीच प्रत्ययास येते त्याचे प्रत्यंतर कालही आले. कधीही न भेटलेले आणि माबोवरही फारसे कधी संभाषण नसलेले लोकही नेहमीचे मैत्र असल्यागत एकमेकाशी बोलतात व्यक्त होतात हे खरोखर मायबोलीवरच होते. आयडी मागचे चेहरे जेंव्हा समोर येतात तेंव्हाही आपले अंदाज बरोबर की चुकीचे हे देखिल प्रांजळपणे सांगितले जाते.
कालच्या गटग मध्ये किल्ली सर्वांत दूरून आली हे वाक्य पुर्ण व्हायच्या आत शरदजी हे थेट सांगलीहून केवळ गटग साठी पुण्यात धडकले हे सर्वांनाच जाणवले. त्यांनी मोठ्ठी पिशवीभर कृष्णेकाठची वांगी आणि सांगली विशेष भडंग वाणगी दाखल प्रत्येकाला भरपूर पुरतील एवढे आणलेले. त्यात धारवाडी पेढे, नागपुरी संत्रा बर्फी, आणि स्वादिष्ट खमंग कुंदा, साजिराने आणलेली पिकासोच्या चित्राची फ्रेम, अमिसाठी स्पेशल पुणेरी भिकबाळी. ही वर्णने आधीच वर झालीत जास्त पाल्हाळ लावत नाही.
अस्मिता आणि फारेण्ड ह्यांच्याशी सातासमुद्रापार साक्षात संभाषण हाही एक गटग विशेष भाग.

खाद्य पदार्थांची रेलचेल म्हणजे अक्षरशः भारतीय सैन्याने पाकिस्तानवर महिन्याच्या सुरुवातीला नसेल केला एवढा मारा होत होता शेवटी ग्लेनवाल्या त्या उदरभेदी तोफखान्या सोबत तह करून उर्वरित दारुगोळा सोबत बांधून दे आम्ही घरी जावून आम्हीच आमच्यावर वर्षाव करवितो पण इथे नको असे म्हणायची पाळी आली.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तेजो जातीने हजर नसल्या तरी त्यांनी पाठविलेल्या फुलांनी गटग सुगंधीत केला.
अनया ह्यांनी सर्वांना राजापुरी की काय असे म्हणत कैर्‍या वाटल्या.

जाताना अमितवला भुसारी कॉलनीत सोडायची जबाबदारी घेतल्याचे पाहून अरे कृष्णाने सारथ्य स्विकारले की असे कुणीतरी कुजबुजले.

विसु : पुढील वेळी मोठा स्क्रीन व कॅमेरा असलेला हॉल बघावा म्हणजे जगाच्या कानाकोपर्‍यातील माबोकर्स गटगत हजेरी लावू शकतील. Happy

चुभुद्याघ्या!!

Pages