
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद
.
खास क्षण
.
.
.
अमित, खूप छान लिहिलं आहेस.
अमित, खूप छान लिहिलं आहेस. शेवटच्या पॅरा ला प्लस वन ... कधी आपल्या मनातल्या प्रतिमेचे ठोकताळे चुकतात पण तरी ही माबो आयडी ना भेटायची उत्सुकता असतेच.
किल्ली जशी आहे तशीच आहे
किल्ली जशी आहे तशीच आहे

म्हणजे समजून घ्या लोकहो
.
छान लिहिलंय अमित.
.
सर्वांशी निवांत गप्पा मारायच्या आहेत
मायबोलीकर विविध विषयात पारंगत आहेत
मला क्षितिज विस्तार पावल्यासारखं वाटतं अगदी
.
प्रतिमा आणि प्रत्यक्ष ह्यात फरक असणे किंवा नसणे ह्याचा मला फरक नाही पडत. ती एक गंमत आहे फक्त
एखाद्या आयडीची भेट घेऊन चेहरा, देहबोली, आणि मैत्र सापडणे हे जास्त महत्वाचं आहे
अमित किती छान लिहिलस.
अमित किती छान लिहिलस.
शेवटचा परिच्छेद +१
तेजोने आठवणीने अनेक
तेजोने आठवणीने अनेक प्रकारच्या बिया जमवून पाठवल्या आहेत>>> त्यातल्या काही बिया दोडक्याच्याही आहेत.
सगळ्या अश्विन्या एकमेकींचे
सगळ्या अश्विन्या एकमेकींचे नंबर सेव्ह करतात पण ते 'अश्विनी' म्हणूनच सेव्ह करतात.
ओह तू अस्मिता का असं अगदीच अजागळासारखं बोलून गेलो.
त्या गमाचे - डिंकाचे लाडू पुढच्या गटगला नेईन बांधून.
>>>>
छान मनोगत अमित.
मलाही तुझी हसण्याची स्टाईल आहे असं वाटलं होतं. तुझी ऑनलाईन पर्सनॅलिटी आणि प्रत्यक्षातला तू वेगळा वाटलास.
मस्त लिहिलंयस अमित.
मस्त लिहिलंयस अमित.
) लिहिते, पण २०१७-१८ पर्यंत मी वाचनमात्र असायचे जवळजवळ. तेव्हा इथे बऱ्यापैकी (परत क्वांटिटीने) लिहिणाऱ्या लोकांबद्दल, जसा पुस्तकं वाचून लेखकांबद्दल ओळखीचा भाव असतो, तसा असायचा, अजूनही आहे. फक्त आता त्यातला परकेपणा गेला आहे, कारण माझी इथली interaction वाढली आहे. अमितवनेही तेच लिहिलंय अर्थात. इथल्या वावरावरून काही डायमेन्शन्स समजतात, भेटल्यावर अजून काही समजतात.
दोन्ही अश्विनींशीही गप्पा झाल्या. धनवन्तीशीही झाल्या थोड्या. तिने परत परत माझ्या हत्तींबद्दलच्या कथेचा उल्लेख केला.
तिथे पहिला प्रतिसाद बहुतेक तिचाच आहे.
माबोवरचा वावर आणि प्रत्यक्षातली व्यक्ती ही जोडी जुळवताना आपल्या मनातली प्रतिमा जुळेल का/ना, अशी शंका येतेच मला.
आता मी मायबोलीवर तसं बऱ्यापैकी (म्हणजे क्वांटिटीने
अनयाने माझ्याशीही खूप गप्पा मारल्या. म्हणजे मी ऐकत होते
मी फारशा गप्पा मारत नाही जनरली, विशेषतः बऱ्याच लोकांमध्ये.
या मेन गटगच्या आधी दोन दिवस अमितला भेटले आणि नंतर दोन दिवसांनी ललिता-प्रीतिला. तिच्याशीही विविध विषयांवर (बरेचसे माबोबाह्य, कारण माझा नवराही होता सोबत) भरपूर गप्पा झाल्या. तिचीही जशी प्रतिमा मनात होती, तशीच ती आहे.
सगळ्यांचे वृत्तांत मस्त आहेत.
सगळ्यांचे वृत्तांत मस्त आहेत. अमितव मनोगत आवडले
आणखी एक...
आणखी एक...
पोटं तुडुंब भरल्यावर चहा कॉफी काय ऑर्डर करायची प्रश्नाला मी चहाला हात वर केला. बर्याच लोकांनी कॉफीला हात वर केले. एक कप म्हणजे टंपरभर कॉफी आली तर काय करा म्हणून लोकानुमते बाय टू करुन कॉफीची ऑर्डर देऊ ठरलं. चहावाल्यांना अर्धा कप ऑर्डर करू का विचारल्यावर आम्ही पाच सहा टाळक्यांनी सपशेल नकार देऊन 'पिऊ की टंपरभर' करुन कपभर येऊ द्या सांगितलं. फायनली ऑर्डर द्यायची वेळ आली तेव्हा हायफाय ठिकाण असल्याने चहा वगैरे मिळत नाही असं आम्हाला वेटरने काही न बोलता स्पष्टपणे सांगितलं. मग ती लुकवॉर्म कापीच आली सगळ्यांना. कापी मला आवडली, साखर अजिबात न्हवती, एक शॉट आणि वर फ्रॉथ घातलेला. गरम कापी वगैरेची चैन भारतातच चालते. आम्रविकेत अशीच थंड कापी पदरात पडते. पण लोकांनी नावं ठेवल्यावर मी काही बोललो नाही. वेटरला कापी थंड आहे सांगितल्यावर तो खालून वर येई पर्यंत थंड झाली अशा कायच्या काय बाता मारू लागला. अरे तू पुण्यात आहेत, एसीच्या बाहेर पडलं तर घामाच्या धारा लागत आहेत, आणि तू शिमल्याला असल्यागत खाली कापी ओतली तेव्हा हात भाजत होता आणि आता दहा पायर्या चढताना कापी गार झाली काय सांगतो आहेस!
सगळ्यांना टंपरभर कापी आली तर कोणी तरी सांडेल अशा आशेवर साजिरा गोंधळाचं वातावरण कसं कायम राहिल ते बघत होता. पण कोणीच सांडली नाही कापी. त्यानिमित्ताने चहा कॉफी सांडायचा किस्सा कुठे वाचायला मिळेल ते लोकांनी एकमेकांना सांगून खुंटा हलवुन पक्का केला.
गमाचे - डिंकाचे लाडू पुढच्या
गमाचे - डिंकाचे लाडू पुढच्या गटगला नेईन बांधून>>>
'गम का लड्डू बन गया मिठा' असे गाणे बदलावे लागेल.
कृष्णा.
मस्तच सगळे वृत्तांत, आणि इथली देवघेव. गटगचा हॅन्ग ओव्हर टिकून आहे म्हणायचा.
धनवन्ती, तू जास्त लिहिले पाहिजे याला मम. अमितने लिहिले नसते तर तुझ्या समाजकार्याची ओळख झाली नसती.
अमित फार छान लिहिलंस
अमित फार छान लिहिलंस
मला वाटलेलं तुझी style आहे तसे हसण्याची.
Palsi विषयी कधी बोलणं झालेलं आठवत नाही.
आणि लक्षातही आलं नाही.
अमितव चांगली पोस्ट, एकदम
अमितव चांगली पोस्ट, एकदम धावता दौरा केलात, डोंबिवलीत येऊन गेलात का. मला यावेळी भेट घेणं शक्य नव्हतं, लेकराची तब्येत हल्ली दोन तीन महिने फार नरम गरम असते. पुढच्या वेळी डोंबिवलीत आलात तर भेटूया.
सगळ्यांना टंपरभर कापी आली तर
सगळ्यांना टंपरभर कापी आली तर कोणी तरी सांडेल अशा आशेवर साजिरा गोंधळाचं वातावरण कसं कायम राहिल ते बघत होता. पण कोणीच सांडली नाही कापी. >>

मी तरी कॉफी सांडेल म्हणून फार अपेक्षा होती साजिरा ह्यांना
ते म्हणाले लक्षणं दिसत आहेत.
पण छे!
निराशा
डोंबिवलीला आजोबांना भेटायला
डोंबिवलीला आजोबांना भेटायला आलेलो ना. पण अगदीच धावती भेट झाली. त्यात केळकर रोड आणि शिव मार्केट दोन्ही ठिकाणची उसाची गुर्हाळं गायब झालेली दिसली आणि अगदीच हळहळ वाटली. फडके वॉचच्या इथलं तरी आहे का नाही कोण जाणे!
पुढच्यावेळी नक्की भेटू अंजू
छानच लिहिल आहे अमित.
छानच लिहिल आहे अमित.
बाकी जेवढे जण उपस्थित होते अजून तेवढ्यांचे सविस्तर वृत्तान्त आले नाहीत...
कॉफी सांडण्यासाठी तरी लवकरच
कॉफी सांडण्यासाठी तरी लवकरच भेटले पाहिजे...
अमितव, तुमच्या मुळे इतके सारे उत्साही लोकं भेटले....
Thank you...
फडके रोड म्हणजे चार
फडके रोड म्हणजे चार रस्त्याजवळ ना, आमच्यापासून चालत दहा मिनिटं, लक्ष ठेवेन आता कधी गेले तर, लहानपणी तिथे जायचो पण बंद आहे हल्ली बहुतेक, मी सोडून सर्वांचा लाडका उसाचा रस . शिवमार्केटजवळचं बरेच दिवस तिथून थोडं पुढे होतं. आता बऱ्याच ठिकाणी redevlopment सुरू आहे त्यामुळे हलली असतील.
>>>कोणी तरी सांडेल अशा आशेवर
>>>कोणी तरी सांडेल अशा आशेवर

खरच सुरेखच आहे ते. मी न्यु यॉर्कच्या संग्रहालयामध्ये, त्याच्या प्रेयसीचे पोर्ट्रेट पाहीलेले आहे. असं लेयर्ड आहे. म्हणजे अर्थाने नाही तर अॅक्च्युअली लेयर्ड आहे हाहाहा


हाहाहा
>>>>>>>आज पासून हापिसचं काम परत चालू करतोय त्यामुळे वेळ मिळेल Wink
>>>>>>>आता पिकासोच्या पेंटिंगला मी सुरेख म्हणणे ह्यातच
>>>पण चुकुन नथ घातली कानात तर
>>>मी झाडं मारण्यात तरबेज आहे,
ब्राऊन थंब आहे म्हणजे
------------------
अमित वृत्तांत बेस्ट झालाय सगळ्या वाक्यांना हसू फुटतय. असो. आता मुंबईकरांनी, पुणेकरांना नावं ठेवायची नाहीत.
व्यक्ती अ : आम्ही किनई
व्यक्ती अ : आम्ही किनई फिरायला जाऊन आलो थंड हवेच्या ठिकाणी
व्यक्ती ब : कितीजण गेला होता?
व्यक्ती अ, लाजून: आम्ही दोघे
व्यक्ती ब : अरे हे तर मिनी गटग झाले
फोटोसहित वृत्तांत येऊ द्या
.....
#गटग fever
जाताना दोगं, न येताना....
जाताना दोगं, न येताना....
मस्त लिहिले आहेस अमित!
मस्त लिहिले आहेस अमित!
किल्ली, मी बोललो ना, लक्षणं
किल्ली, मी बोललो ना, लक्षणं दिसताहेत, तर तू करूनच दाखवशील आज ना उद्या. निराश मत हो.
अमित
मस्तच सगळे वृत्तांत. देवघेव
मस्तच सगळे वृत्तांत. देवघेव आणि खूप सारी मज्जा,गप्पा miss केल्या. फुलं, बिया पोचवण्याचे काम करणाऱ्या अश्विनी ला आणि पोच दिल्याबद्दल सर्वांचे आभार. अमित रोपांच्या फोटो च्या प्रतीक्षेत.
त्यात केळकर रोड आणि शिव
त्यात केळकर रोड आणि शिव मार्केट दोन्ही ठिकाणची उसाची गुर्हाळं गायब झालेली दिसली >>> शिवमार्केटचे आहे, अर्थात मोठं दुकान नाही पण अगदी थोड्या जागेत पण करून देतात. पारस मेडिकलच्या आधी शिवमार्केट लिहिलेल्या पाटीखाली आहे (मानपाडा रोड). मी फोटो काढला नाही, उन्हातून गेले आले.
Pages