पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Sharadg
तुमचं मिनी गटग झालं हे वाचून छान वाटलं. मात्र एक सांगावंसं वाटतं की आधीच्या पानावर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिला आहे तो उडवून टाका. उगाच आंतरजालावर ठेवू नका. त्यात हा धागा वाहता नाही. झकासरावांनी एव्हानापर्यंत तुमचा नंबर पाहिला असावा असं वाटतं.

@rmd
खूप चांगली सूचना. पण बहुतेक आता तो प्रतिसाद बदलण्याच्या वेळेच्या पलिकडे गेला आहे.
@Sharadg ,
मी सरळ तो संपूर्ण प्रतिसाद उडवला आहे. हवे असल्यास मायबोली संपर्काची सुविधा वापरून तुम्ही त्यांना फोन कळवू शकता. तो ईमेल ने जाईल आणि कुठेही मायबोलीवर साठवला जात नाही.

काल सगळ्या भेटी आणि खूप आठवणी घेऊन सुखरुप घरी पोचलो. गेल्या आठवड्यात अजिबात निवांत वेळ मिळाला नाही. आता आज पासून हापिसचं काम परत चालू करतोय त्यामुळे वेळ मिळेल Wink

गटगला आलेल्यांपैकी मी फक्त सिम्बाला आधी प्रत्यक्ष भेटलेलो. बाकी आशुडी, झकास, किल्ली, हर्पेन, वावे, साजिरा, अनया, कृष्णा, शरदजी (हे त्यांच्या नावात जी आहे म्हणून..हो!), व्हीबी, अश्विनी'ज, तेजो. धनवंती, अनया सगळ्यांना प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी झालेल्या किंवा न झालेल्या परस्पर संवादातून, त्यांच्या लेखनशैलीवरुन, त्यांच्या लेखांवरुन, लेखांच्या विषयांवरुन, प्रतिसादांतून, एकंदर वावरातून मनात एक पुसटशी ते ठसठशीत प्रतिमा तयार झालेली होती. आंतरजालावरील सगळ्याच देवाणघेवाणीत अशी एक अदृष्यप्रतिमा तयार होतेच. आंतरजालच कशाला! पुस्तक वाचताना त्यातील व्यक्तिरेखा आपल्या मन:पटलावर आपल्या स्वतःच्या नेणिवेत आपण उभ्या करतोच की. म्हणुनच तर बर्‍याचदा पुस्तकावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर येते तेव्हा आपल्या मनातील प्रतिमेशी प्रतारणा झाल्याने आपली चिडचिडही झालेली असतेच. थांबा!! लगेच निष्कर्ष काढू नका! Wink

साजिर्‍याला मी धिप्पाड विचारवंत वगैरे असेन असं वाटलेलं म्हणून त्याने बहुतेक 'विमेन विथ अ बुक' पेंटिंग मला आणलेलं. पण प्रत्यक्षात नॉलेज, रिफायनमेंट आणि इंटलेक्च्युअल प्रावस काही दिसला नाही त्याला. मग कामाच्या जागी लाव ते पेंटिंग म्हणाला. आज लावेन आता. बघू काही फरक पडतो का ते! Wink पेंटिंग फार सुरेख आहे. आता पिकासोच्या पेंटिंगला मी सुरेख म्हणणे ह्यातच कायशी ती रिफायनमेंट नाही ते चाणाक्ष लोकांना समजलंच असेल. विनोदाचा भाग सोडा, पण इतकं भारी पेंटिंग माबोकरांनी दिल्यावर फार मस्त वाटलं. साजिरा मला जरा शिष्ठ असेल वाटलेलं. पण एकदम दिलखुलास आहे तो. भरभरुन बोलत होता. मजा आली त्याच्याशी बोलून.

आशुडी बरोबर एका गणेशोत्सवात मग परत एकदा बहुतेक मभादि मध्ये काम केलेलं. त्यालाही ५-६ वर्षे सहज झाली असतील. तिच्या एकुण लिखाणावरुन मला ती खट्याळ पण जरा पोक्त असेल वाटलेलं. Lol पण आशुडी एकदमच ही .... म्हणजे आपल्यासारखीच आहे. काय असेल नसेल मनात ते कुणाचा मुलाहिजा न ठेवता बोलुन टाकणारी! तिचा नंबर मला केश्विनी कडून मिळाला. सगळ्या अश्विन्या एकमेकींचे नंबर सेव्ह करतात पण ते 'अश्विनी' म्हणूनच सेव्ह करतात. त्यामुळे केश्विने नंबर तर दिला पण वर 'बहुतेक हाच नंबर आहे' असा डिस्क्लेमर टाकून दिला. ह्यावर उपाय म्हणून नव्या अश्विन्या '_११' आणि '_९९९' अशा आयडी घेऊन आल्या आहेत. या अंडरस्कोरने फोन नंबर सेव्ह करताना काही फरक पडला आहे का यावर संशोधन झालं पाहिजे! मग मी धाडकन त्या नंबरला हाय आशुडी असा मेसेज टाकुन दिला. बघु! रिप्लाय आला तर मी कोण ते सांगेन! नाही तर सोडून देऊ. पण बरोबर नंबर निघाला! शेवटी बरोबर नंबर निघाला हे एकदम लोकसत्ता क्लिकबेट वर्दी आहे. उगाच वरची दहा वाक्य वाचायला लावली तुम्हाला! Wink

आशु भिकबाळी आणि बायकोला नथ घेऊन आली. मला लोक म्हणू लागली भिकबाळी घाल. मला टेंशन. दोन्हीत मणी वगैरे होते. घालायला काही हरकत नाही पण चुकुन नथ घातली कानात तर? पण साजिर्‍याने ती सालंकृत जबाबदारी स्विकारली. आता लोक हसले तर फक्त मला नाही तर त्याला पण हसतील म्हणून जरा बरं वाटलं मला.
वर कोणीतरी म्हणालंय की भिकबाळी घालताना हसण्याची स्टाईल वगैरे. तर डोंबलाची स्टाईल! ८ - १० वर्षांपूर्वी मला बेल्स पाल्सी झालेला. त्यात बाकी नर्व्ह कंट्रोल आले परत पण तोंड एका बाजुने हसताना थोडं वाकडंच दिसतं. सदैव तोंड वाकडं असल्याने हल्ली मुद्दाम करायला लागत नाही आणि तीच सहजस्थिती असल्याने थोडा नर्व्हज ना आरामच पडत असणार! Wink हा एक जोक हल्ली मारता येतो. Proud

धनवंतीचा आयडी वाचलेला होता पण तिला शत्रूत टाकावं का मित्रांत ते ठरायच्या आधीच ती म्हणाली तू माबोवर जसा वाटतोस तसा प्रत्यक्षात नाहीस. झालं! आता??? 'खरा वाईट आहे का आभासी वाईट वागतो खरा ठीक आहे', यातील ती काय सांगेल आणि त्यातील कशाने जास्त बरं वाटून घ्यायचं अशा विचारात थोडा वेळ मी हँगच झालो. पण इतकी बेस्ट कॉमेंट करणारी शत्रू असुच शकत नाही! त्यामुळे तिला मित्रांच्या रकान्यात टाकले. नंतर बोलताना तिच्या विषयी समजलं. बुधवार पेठे शाळेतील मुलं, त्यांचं शिक्षण, आपल्याला असलेलं प्रिव्हलेज एकुणच ती पोटतिडकीने बोलत होती. अकु विषयी ती भरभरून बोलत होती. जे आधी अवल पण बोलत होतीच. अगदी साधी, हुषार आणि प्रचंड जेन्युईन आहे धनवंती असं मत बनलं माझं. आता माबोवर जास्त येत आणि लिहित जा!

सकाळी आल्या आल्या शरदजीं बरोबर गप्पा झालेल्या. त्यांनी भडंग, वांगी आणि शरद पवारांचं पुस्तक दिलंय. वांग्यांची भाजी झाली, आता आज दुपारी भूक लागली की भडंगचा नंबर. पुस्तका वाचलं की नक्की सांगेन कसं वाटलं. तर बोलता बोलता ते वालचंदला प्राध्यापक आहेत आणि आपला ऋन्मेश हा त्यांचा अभिषेक ... आपलं त्यांचा विद्यार्थी! असं ते म्हणाले. क्षणाचाही विलंब न करता हर्पेन लगेच म्हणाला, तुमचा काही दोष नाही त्यात! Lol

किल्लीच्या ओळख परेड बद्दल लिहिलंच मगाशी. ती आळंदीहुन मुलांची सोय करुन ती भेटायला आलेली! Happy किल्ली जशी वाटते तशीच आहे. म्हणजे कशी? तुम्हाला कशी वाटते? तशीच! Happy
झकास जरा उशिराने आला. तो झकासच आहे. बडबड्या! बरोबर सगळ्यांना चाव्या मारत होता. इथे जसा सगळ्यांची दखल घेतो तसा तिकडेही सगळ्यांशी जाऊन बोलत होता.
अनयाला मी कधी भेटलो नाहीये पण ती आई/ बाबांना भेटली आहे. Lol भावाच्या घरी पण जाऊन आलेली आहे. ती आमची गाववाली. कडोंमपा! ती खूपच ओळखीची आहे, भेटायची गरज हे फारच औपचारिक! तरंगायचे दिवस मधली, मोठं झाल्यावर आवडत्या क्षेत्रात परत नव्याने शिक्षण घेणारी (हे लेख तिच्या लेखनात दिसत नाहीयेत आत्ता चाळले तर... ), कैलास मानसरोवर करणारी आणि आता शेतकरी ह्या रोल मधली! तिला ओळखत नाही म्हणूच शकत नाही. प्रत्यक्ष भेट झाली आणि चेहरा मिळाला. तिला जशी इमॅजिन केली होती तशीच ती आहे. जरा कमी गप्पिष्ट असेल वाटलेलं. साजिराच मला वाटतं म्हणाला किती बोलते आहेस! पण काही नाही. तो काय कमी बोलत होता! तुझ्या बरोबर बोलून फार मजा आली. तू काही कमी वगैरे बोलू नकोस.
हर्पेनचं ही तसंच. त्याला ओळखतोच. आता भेटही झाली. त्याच्या लेखांतून, नर्मविनोदी शैलीतून आणि एकून वावरातून त्याला चांगलाच ओळखून आहे. त्याला भेटायचं होतंच. पुढच्यावेळी जरा शांतपणे भेटू रे आपण. ही लोकं फार गोंधळ घालतात. Proud

व्हीबी ठाण्याला होत्या असं पूर्वी वाचलेलं आठवत होतं. त्यांच्याशी शांतपणे बोलताच नाही आलं. त्या येऊ का नको येऊ विचार करुन शेवटी आल्या ते बरं झालं.
तेजोला आणि अश्विनी_९९९ ला स्पेशल धन्यवाद. Happy तेजोने आठवणीने अनेक प्रकारच्या बिया जमवून पाठवल्या आहेत. तिला काही कारणाने येता आलं नाही तर अश्विनी_९९९ बरोबर पाठवल्या. त्यात अबोली पण आहे. Happy अबोली आहे म्हटल्यावर अर्ध्या बिया भावानेच घेतल्या. आता इथे कुंड्यांत बिया लावतो. मी झाडं मारण्यात तरबेज आहे, पण यावेळी आता काळजी घेतोच कशी!
सगळ्यांबद्दल तेच लिहितोय वाटेल, पण वावेचं पण तसंच आहे. तिला ही लेखांतून ओळखतोच. सेम! तशीच आहे ती. मध्यंतरी बोलताना तिची कोकणातूनपण ओळख निघाली होती. तिच्या बहिणीने प्रकाशन सुरू केलं आहे, आणि त्यात प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक तिने दिलं. Happy त्यादिवशी वावेला जमेल न जमेल त्यामुळे दोन दिवस आधी तिला भेटलेलो. तेव्हा भरपूर गप्पा झालेल्या.
अश्विनी_११ आणि रेशम_डोर ही आवर्जुन आल्या. त्यांच्याशी फार बोलता आलं नाही. पुढच्यावेळी.
कृष्णाने सारथ्य केलं आणि घरपोच सोडलं. आणि हा कृष्ण नुसतं सारथ्य करत नाही तर जुनी रफी आणि किशोरची गाणी पण मस्त गातो Happy ते त्यांच्या घरी झालेल्या गटगं बद्दल सांगत होते.
यक्ष मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर असे सगळेच आहेत. बिपिन सांगळे लवकर गेले पण येऊन भेटून गेले.
सिम्बा पण लगेच गेला. त्याच्याशी ही फार बोलता आलंच नाही.
इतके सगळे लोक माबोमुळे भेटले. साजिर्‍याने लिहिलंय तसं ऑनलाईन ओळख, त्यांच्या वावरातून झालेली ओळख, लिखाणातून झालेली ओळख ही तर आहेच. पण याच्यापेक्षा काहीतरी जास्त आहे. भारतात असताना माबो खातं असलं तरी फार ऑनलाईन आलेलो, काही लिहिलेलं, कुणाशी कनेक्ट झालेलं मला आठवत नाही. देशाबाहेर आलो तेव्हा असं नक्की काय झालं की मायबोलीवर यावं वाटू लागलं? असं वेचून सांगता येणार नाही, आणि लिहायचा प्रयत्न केला तर ते खूपच बंदिस्त काही होईल, पण ओढ वाटू लागली. व्हल्नरेबल असताना असेल? समानशीलेषु व्यसनेषु सख्यम् असेल? रिकामा न्हावी असेल? हे सगळंच थोडं थोडं असेल बहुतेक.

एकमात्र आहे! इथले अनेक लोक न भेटता ही सख्खे ओळखीचे होते/ आहेत. आता जर त्या ओळखीला चेहरा मिळाला, हाडामासाची व्यक्ती मिळाली तर पुस्तक वाचुन मग त्यावर बनवलेला सिनेमा बघुन जसा कधीकधी 'प्रतिमा उत्कट' फील येतो. तसा आला तर? एक भिती वाटतेच. त्यात गंमतही आहेच अर्थात!

ये हुई ना बात. हा खरा वृ. पण तरी काही गोष्टींसाठी क्वश्चनेयर पाठवाय;ला पाहिजे तुला. इथं केवढी भांडणं लागतील नाही? Proud

साजिरा मला जरा शिष्ठ असेल वाटलेलं.
>>>
ये तो मेरा डॉयलॉग है! पण तू तर फार गोड निघालास Lol

यासाठीही भेटत जा मुलांनो. जिंदगी छोटी है लेकिन गोड है..

फार मस्त लिहीले आहेस! Happy

अश्विनीचे अनेकवचन प्रत्येक पॅरा मधे वेगळे आहे Happy अश्विनी'ज हे प्रभात रोडवरच्या एखाद्या माधव निवास मधे दोन तीन पिढ्या पुढच्या कोणीतरी उघडलेल्या मॉडर्न फूड रेस्टॉ कम कॅफे चे नाव वाटते Wink

त्यांनी भडंग, वांगी आणि शरद पवारांचं पुस्तक दिलंय >>> ऑक्सफोर्ड कॉमा, ऑक्सफोर्ड कॉमा! हे तिन्ही विषय एकाच पुस्तकात? Wink

त्यात बाकी नर्व्ह कंट्रोल आले परत पण तोंड एका बाजुने हसताना थोडं वाकडंच दिसतं >>> अरे हे मला माहीत नव्ह्तं. आपलं कधी बोलणं झालं होतं का लक्षात नाही. पण काही लोकांचे स्वाभाविक हावभाव असतात तसेच वाटायचे मला. २-३ वेळा प्रतेक्ष भेटलो होतो तेव्हा कधी काही ऑड जाणवले नाही.

छान लिहिलंयस, अमित. पण व्हर्चुअल मंडळींचा इतका अनुल्लेख? Happy

साजिराला भेटायलाच हवं आता. पुढच्या वेळी येताना त्याची भेट पक्की करूनच गटग ठरवायला हवं Happy

आणि ते 'शिष्ठ' हे बहिणींच्या मैत्रिंणींना किंवा भावाच्या मित्रांना म्हणलं जायचं. ते जितकं कृतक असायचं तितकंच तू म्हणलं आहेस असं समजतो. Proud

rmd, तू मला शिष्ठ वाटतेस. आता येशील तेव्हा पटकन भेट. Happy

व्हर्च्युअलांच्या अनुल्लेखासहित मस्त लिहिले आहेस अमित. लाघवी ॲलर्ट वाजले कानात. Wink Happy
बेल्स पाल्सी बद्दल वाचून थोडं वाईट वाटलं.

त्यांनी भडंग, वांगी आणि शरद पवारांचं पुस्तक दिलंय >>> ऑक्सफोर्ड कॉमा, ऑक्सफोर्ड कॉमा! हे तिन्ही विषय एकाच पुस्तकात? >>>> Lol

अरे हो की!
गेल्यागेल्याच र्म्ड आणि धनीचा कॉल आलेला बघुन जोरदार गटग होणार कल्पना आलेली. तो ठेवतो तो फा आणि अस्मिताचा कॉल आला. मी अस्मिताला ओळखलच नाही. तरी बरं दोनच दिवस आधी त्यांनी गटगचे फोटो टाकलेले. बरं ओळखलं नाही तर ते दाखवायचं तरी नाही ना, तर ओह तू अस्मिता का असं अगदीच अजागळासारखं बोलून गेलो. :डोक्याला हात: आता याची भरपाई डुगना लगान घेऊन होणारे नक्की! Wink
मग अवलचा फोन आला त्यात आशु इतकी एक्साईट झाली की फोनच पडला कोणाचा तरी. Lol मग मुग्धाचा फोन आलेला. त्यात मला काहीही ऐकू येत न्हवतं. इतका गदारोळ असुन फोन करणारे शांतपणे बोलत होते याचं नवल वाटलं मला. त्यांना काय ऐकू येत होतं कोण जाणे! Proud

वदवून घेतल्यासारखे वाटते आहे. Lol
तुझी रिॲक्शन खरंच विचित्र होती, अजागळ नसून हडळ बघितल्यासारखी वगैरे वाटली. मी इथल्या सारखंच बोलायला गेले आणि मला हे मिळाले. Lol

एखादा समोसा एखाद्यापर्यंत पोच्ला नाही तरी आशू एक्साईट होते, त्यात काय विशेष नाही. Proud

अवलचा फोन मी बघितला. फा, अस्मिता, धनी, र्म्ड, यांचे कॉल कळलेच नाहीत. काल बालवाडी भरवत्यात राव!

अरे त्यांचे कॉल तू यायच्या आधीच येऊन गेले होते.
अस्मिता Lol हडळीचं माहित नाही, पण काही धड बोललो नाही इतकं लक्षात आहे माझ्या.

अजागळ नसून हडळ बघितल्यासारखी वगैरे वाटली. मी इथल्या सारखंच बोलायला गेले आणि मला हे मिळाले >>> Lol

अमित - तू तरी फोनवर व माबोकरांच्या गराड्यात होतास. मी इन पर्सन गटग मधे अस्मिताला ऑलरेडी २-३ वेळा नावाने हाक मारून मग नंतर "हे तुझे खरे नावच आहे का" विचारले होते.

मला फा ने रालेच्या गटगत 'तुझे खरे नाव अस्मिता आहे की माबो आयडी अस्मिता आहे' विचारल्यावर मला आश्चर्यमिश्रीत राग आला होता. मी म्हटलं -आता तू हेच अंजलीला विचारशील का? मग मलाच का ? तुमचे "आयडी" आहेत म्हणून आम्ही निनावी व्हावे की काय Lol वर्षानुवर्षे बोलून तुम्ही अशा रिॲक्शन कशा देऊ शकता.

साजिरा, आपण कधीतरी व्हर्च्युअल गटग करू. Happy माझा प्रमाण मराठीचा लहेजा बोलताना सुटतो बरेचदा, अशा कृत्रिम बंधनात अडकलेला नसाल तर मी लाजतबिजत नाही. एकदा मोकळेपणा आला की मी शर्टला खरकटे हात पुसेन की काय वाटते. फा आणि अमित त्या स्टेजला आले आहेत. Lol

rmd, तू मला शिष्ठ वाटतेस. आता येशील तेव्हा पटकन भेट >>> _/\_ Happy इतकी वर्षं माझ्या फ्रेंडलिस्टला आहेस. आता एकदा तरी थोबाड खरंखरं दाखवेन म्हणते.

मला फा ने रालेच्या गटगत 'तुझे खरे नाव अस्मिता आहे की माबो आयडी अस्मिता आहे' >>> Lol तशी पद्धत आहे! इथे खरी वाटावीत अशी बेमालूम नावं घेणारी पण मंडळी असतात त्यामुळे कन्फर्म करायची सवय लागली असेल त्याला. मी फा ला दोष देणार नाही.

तुझी रिॲक्शन खरंच विचित्र होती, अजागळ नसून हडळ बघितल्यासारखी वगैरे वाटली >>> Rofl आम्ही कॉल केला तेव्हा बरी रिअ‍ॅक्शन दिली म्हणायची मग अमितने.

तुझं नशिब चांगलं हाय पोरी, माझं मात्रं दोन्ही वेळा "दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्रभर का गम हमें ईनाम दिया है" झाले. त्या गमाचे - डिंकाचे लाडू पुढच्या गटगला नेईन बांधून. Wink

त्या गमाचे - डिंकाचे लाडू पुढच्या गटगला नेईन बांधून >>> अगदी अगदी Lol
( आपल्या व्ह. गटगला माझी अशी काही रिअ‍ॅक्शन झाली नव्हती ना ते जोरात आठवते आहे आता Proud )

मी फा ला दोष देणार नाही. >>> तूचमाखमै!

त्या गमाचे - डिंकाचे लाडू पुढच्या गटगला नेईन बांधून >> Lol

पुढच्या सर्व गटगंना अस्मिताला सगळे काटे चमचे देत आहेत असे डोळ्यासमोर आले Happy

छान लिहीत आहात सगळे. इथल्या गप्पा नवर्‍याला सांगितल्यापासून त्यालाही मायबोलीवरच्या लोकांसोबत पुढच्या भारत भेटीत गटग अ‍ॅरेंज करायचं आहे. तो दिल्लीत वाढलेला. अस्खलीत पंजाबी बोलणारा, पुण्यात गटग करायचच म्हणतोय.म्हणजे कळलच असेल तुम्ही लोकांनी किती मजा केलीत ते.

माझ्याबद्दल आख्खा परिच्छेद !!!!!!
अमितव, you made my day Happy
मी त्या दिवशी सगळ्यांना प्रथमच भेटले, फक्त साजिरा ला आधी थोडा वेळ भेटले होते, आणि पार बालवाडी पासूनचे मित्र असावेत अशी मिक्स होऊन गेले.
एरवी फक्त मायबोली वर टाईप केलेल्या अक्षरावरून ओळख होती, त्यांना चेहरे, आवाज आणि personality connect झाल्यावर खूप जवळची मित्रमंडळी मिळाली असा आनंद झाला.
सगळ्यांचाच तो "एक उनाड दिवस" होता. असे खूप दिवस आपण साजरे करत राहू...

अमित, छान बैजवार वृत्तान्त! Happy

कृष्ण नुसतं सारथ्य करत नाही तर जुनी रफी आणि किशोरची गाणी पण मस्त गातो Happy>>

अरे ती गाणी गाडीतल्या म्युझिक प्लेअरवर सुरु होती. Happy

अमित , छान सविस्तर लिहिले आहेस . फक्त अश्विनी च्या आकड्यांची अदलाबदल झालीय. तेजो आणि अश्विनी_११ यांचे बिया हे joint venture होते.

Pages