
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद
.
खास क्षण
.
.
.
श्रीकृष्णा असे संबोधनात्मक
श्रीकृष्णा असे संबोधनात्मक नाव आहे रेस्टॉ चे? कन्नड आहे का?>>>>>

कन्नड आहे का माहीत नाही. पाटी इंग्रजीत होती. Krishna.
वसंतराव, वृतान्त छान!>>>> नाव आवडले
किल्ली,
छान लिहिलंय. पुढचं लिही की.
अहो फा, मी तेच सांगत होते
अहो फा, मी तेच सांगत होते ट्रेन बघायची तर एवढी मेहनत करून टेकडी चढायची काय गरज आहे, रमा ॐ सुद्धा attract होणार नाहीत ट्रेन बघायला तर आपले माबोकर view छान आहे म्हणून वरती घेऊन गेले मला. धनवंती मॅडम कौतुक करताना थकत नव्हत्या टेकडी चा इतिहास भूगोल किती झाडे कोणते प्राणी पक्षी वगैरे सगळं कळलं


परत येताना पायऱ्या उतरून आलो.
एके ठिकाणी मोठी गोगलगाय दाखवत होता ऋतुराज, मी आणि रेशम पुढे गेलो होतो.
ती गोगलगाय बघायला मागे चढून जा आणि परत उतरा त्यापेक्षा कंटाळा करून आम्ही फोटोत बघतो म्हणून पुढे गेलो
दुर्गादेवी चे दर्शन घेतले.
मुलांना आणायला हवे होते असं सारखं वाटत होतं.
ऋतुराज चे जपान चे अनुभव, तिथली खादाडी आणि न खादाडी, वगैरे विविध गप्पा सुरु होत्याच, रेशम पाने फुले गोळा करत होती, मध्येच कुणालातरी अळू ची पाने दिसली, नशीब चला वड्या करु म्हणून कुणी घेतली नाहीत. मुलांना कुठेही हात न लावता घरी चला म्हणून आपण नेतो इकडे तिकडे तसं करत आणावं लागत होतं तरी रेशम ने कडुनिंबाची पाने घेतलीच.
मग त्यातली काही asthetic पाने केसात माळून वनदेवी चा feel देत मॅडम टेकडी उतरत होत्या. रस्त्यात बदक वगैरे कशाकडे माझं interst नव्हता, भूक लागली होती, पायाथ्याशी पोचलो.
तिकडे मस्त खाऊची दुकाने होती,, मला आणि रेशमला तिकडेच आप्पे खायची इच्छा झालेली, पण कुणी ऐकलं नाही आणि श्रीकृष्ण रेस्टॉरंट ला घेऊन गेले. तिकडे table धरून ठेवला होताच मंडळींनी. मनोज, हर्पेन, श्रेयस आलेले होते.
आता मी काय उठत नसते सांगून मी बसून घेतलं, पेरू, खाऊ चं वाटप सुरु झालं. रेशम ने सुरी मागवून मस्त सगळ्यांना फोडी करून दिल्या पेरूच्या. ऑर्डरी गेल्या.
नाश्ता होईपर्यंत काय घडलं ते काय आठवत नाहीये, माझं लक्ष खाण्यात होतं
Video कॉल्स झाले, परत गप्पा, थट्टा मस्करी आणि मजा!.
छान अशी filter coffee घेतली आणि तृप्त होऊन आम्ही तिथून निघालो.
मस्तच किल्ली !
मस्तच किल्ली !

गाडीचे आणि गटगचे वाकडे, संयोजक आणि मोटिव्हेटर, आप्पे, कडुलिंबाची पाने व वनदेवी,
धनवन्ती
गोगलगाय बघायला मागे चढून जा
गोगलगाय बघायला मागे चढून जा आणि परत उतरा त्यापेक्षा कंटाळा करून आम्ही फोटोत बघतो म्हणून पुढे गेलो Lol>>>>>> बरं झालं आली नाहीस. गोगलगाईला complex येईल एवढे भरभर तू चालतेस
नशीब चला वड्या करु म्हणून कुणी घेतली नाहीत.>>>>> मी घेतली असती पण तुम्ही सगळ्यांनी इतका "नको. नको घ्यायला" करत इतका सौजन्यपणा दाखवला की मलाच कसेसे झाले.
सौजन्यपणा >>
सौजन्यपणा >>
मस्त वृत्तांत.
किल्ली जेन झी आहे का?
दोन्ही व्रुतात भारी आहेत.
दोन्ही व्रुतात भारी आहेत.
Pages