पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा यांचा साहित्यिक वृत्तान्त (हा शब्द बरोबर लिहिलाय का?) आणि किल्लीचे वृत्तांत आवडले. नीट सेल्फी काढून नावे लिहिल्याबद्दल धन्यवाद. तरीही sharadg आणि evita कुठे आहेत हे समजले नाही. पावसाळी वातावरणात शुभ्र पांढरा टी शर्ट न मळवता घालून येणाऱ्या किल्लीची कमाल आहे.
आणि बाप्तिस्मा अस्मिताला द्यायचा होता ना? मग अमितवला भिकबाळी घालून त्याचा का पुपु केला?
पेंटिंग सुरेख आहे.

सर्वांना भेटून आनंद झाला. किल्ली, हर्पेन ह्या दोघांना मनापासून धन्यवाद.
मी फार बोलते, ह्या वाक्याची नोंद घेतली आहे. पुढच्या वेळी कमी बोलायचं लक्षात ठेवीन.
व्हेन्यू, मेन्यू सगळं एक नंबर होतं. (कॉफी सोडून)

Sharadg एवढे सगळे करून आणि एवढे सगळे घेऊन गटगला गेलात हे खरंच कौतुकास्पद आहे. Happy

>>तरीही sharadg आणि evita कुठे आहेत हे समजले नाही.>> "सर्वात लवकर पोचलेले सभासद" या फोटो मधील डावीकडून पहिले.

धन्यवाद मंडळी
कॉफी चा feedback दिलाय त्यांना
ते सॉरी वगैरे म्हणाले
पूर्वीचं पुणं राहिलं नाही.
ग्राहकाला सॉरी?
ह्याला काय अर्थ आहे.
.
किल्लीचा वृ ४:
तर साजिरा आले आणि त्यानंतर राहिलेले सगळे एकेक करून नाव सांगतच आले आणि काहींनी नाही सांगितली तरी पुन्हा ओळखायला लावतील म्हणून सटकले मी.
मग सेल्फीत दिसतोय त्या आतल्या भागातल्या table कडे गेलो.
पुन्हा पिशव्या हेम्लेट वगैरे इकडे तिकडे करत खुर्ची पकडून ठेवली.
मध्यभागी बसले म्हणजे सगळ्यांना बोलतात येईल असं वाटलं.
पण असं काही नव्हतं.
खूप जण असले की गट होतात आणि कोण काय बोलतंय काही कळत नाही गोंधळ होतो.
प्रत्येकाचं एकमेकांशी काही काही उत्साहात बोलणं सुरु होतं.
मीही hi hello करत फिरत होते, पण जाम भूक लागली होती.
जरा थोडे सल्ले घेतले आणि ऑर्डर दिली.
पुन्हा असं वाटलं की इतकी भूक लागलीये भरपूर खायचं आहे
आणि २० लोकांचं गणित डोक्यात ठाम होतं.
दणादण ऑर्डर वाढवली सगळ्यांना पुरायला हवं कमी नको पडायला.
त्यात लगेच येईल म्हणून पनीर पफ आणतो अशी आणखी एक addition तिथल्या सर्वर ने केली, भुकेली मी हो म्हणून बसले.
नाश्ता आला, आणि येतंच राहिला सर्वांची पोटे भरली, फारच कमी जेवतात बाई लोक हल्ली.
आमच्याकाळी एका माणसाने ताटभर जिलब्या रिचावल्या आहेत.
पण ह्यांना पिझ्झे खाल्लं की आता बास आता, बास झालं.
आहार आणि बदलती जीवन शैली दुसरं काय!
तर मुलांनो भुकेल्या पोटी, रविवारी सकाळी खाण्याची ऑर्डर द्यायला मला बसवू नका.
तसं केलंत तर ह्यावेळी झालं त्या देशस्थी बाण्याने नाश्ता आणि lunch दोन्हीची सोय होईल!
.
पोटात जरा पडलं आणि मग मला बरं वाटलं. इकडे तिकडे फिरून सर्वांना बोलायचा संवादात शिरायचा प्रयत्न करत होते.
बसून राहून काही होत नाही कारण संख्या जास्त होती आणि मला सगळ्यांना प्रत्यक्ष भेटलोय तर किमान एक दोन वाक्य तरी बोलायची होतीच Happy
.
.
(आशुडी ला ओळखलं नव्हतंच मी, तिला हळूच कोपऱ्यात नाव विचारून घेतलं, आता नाही विसरणार पण काल भेटले त्यांच्या चेहऱ्यांना तरी, फोटो चा अभ्यास केला आहे.. पण memory refresh करायला वरचेवर भेटा किंवा संपर्कात रहा)
बरेच विषय झाले.
साजिरा लिहीत आहेत, इतर सर्वजण सुद्धा लिहितील.
माझे खाण्याच्या नादात काही miss झाले ऐकू नाही आलं Wink
चहा कॉफी कितीजण पिणार वगैरे मोजण्यात आलं.
चहा नव्हताच तिथे!
मग कॉफी मागवली गेली.
ती थंड होती हे आलंय वरती Happy
पण बरी होती, विषापेक्षा तरी.
(किल्ली ने ठरवलेलं cafe म्हणून चहा नाही असं कुणीतरी म्हणलंच तरी, होतं लक्ष माझं बरं का )
.
वरती झालेले विषय सोडून अजून काही आठवत नाही आता.
मग सेल्फ्या झाल्या.
महिंद्र गोडबोले ह्यांचा फोन चांगला आहे, मुळात ते सेल्फी उत्तम काढतात असं लक्षात आलं.
मग त्यांनाच कामाला लावण्यात आलं Happy
खाली आलो तिकडे थोड्या गप्पा, थोड्या सेल्फ्या.
एक एक जण bye करून निरोप घेत होता.
.
शेवटी parking मध्ये एखादा तास पुन्हा गप्पा झाल्या.
हर्पेन, यक्ष, गोडबोले, मी आणि झकासराव.
विविध विषय झाले. यक्ष ह्यांनी काही नविन ideas मांडल्या.
Wild life चे, वाघाचे अप्रतिम photos पाहिले.
(Photographer कोण सांगा बघू)
त्या चांगल्याच रंगल्या होत्या.
शेवटी bye झालंच जड मनाने.
शेवटी भांडारकर रस्ता कसा दिसतो बघूया म्हणत मी आणि झकासराव आपापल्या दुचाकीवर निघालो आणि जिथे वाकडेवाडी पर्यंत एकत्र गेलो आणि मग आपापल्या घरी.
.
झालं
Happy
पुणे गटग वृ माझ्याकडून लिहून संपला

वा, वा! मस्तं झालेलं दिसतंय गटग!!

किल्ली, मराठवाड्यातल्या माणसाचा ( बाईचाही ) हात खाऊ घालण्यात कोणीच पकडू शकत नाही हे सिद्ध केलंत परत... सढळ आणि भरपूर आग्रह असतो.

चहा नव्हता तर "फा" ला करायचा की फोन परत... व्हर्चुअली पाजलाच असता.

हर्पेन ह्यांना आर्यनमॅन सिरीजमुळे ओळखले... झकासराव, किल्ली ह्यांचा फोटो आधि बघितलाय त्यामुळे ओळखायला आलेत...

ज्या प्रमाणात लोकं आली होती गटग ला त्या प्रमाणात वृत्तान्त फारच कमी आले आहेत. लवकर लवकर लिहा सगळ्यांनी. एनीवेस खूप मज्जा केलेली दिसत आहे सर्वानी.

वृ क क्ष चि क अ पा
***

तर त्या महिंद्र / महेंद्र / मधुर गोडबोल्यांचा फोन चांगला आहेत, कारण माझा जरा गोरा फोटो आलाय. तेही तसे गोडच आहेत. तसे तर हेही गोड, तेही गोड, सारेच गोड. जावदे, नानालाच शोभतं ते नाही का.
*
तर गंमत अशी, की आयडी आठवत नाही, असं म्हणणारे हे पहिलेच आयडी. (फार सुरुवातीला एकदा आम्ही आयडीचा पासवर्ड साक्षात अ‍ॅडमिनलाच विचारलेला, तर ते असो.) यावरून आठवलं की रॉबिनहूड येणार म्हणाले होते, पण ते आले नाहीत. यांची एक निराळीच कथा. रिटायर झालात, माबोवर नका लिहू, निदान गटगला तरी या, गप्पा मारा म्हणलं, की 'माझा आयडी मला आधी परत करा'चा लकडा त्यांचा सुरू होतो. आता या सरांनी एकदा आगाऊपणा करून स्वतःचा 'रॉबिनहूड' आयडी उडवून घेतला. खरंतर डझनभर तरी डुआयडी घेतले असतील या महाशयांनी, अजून एक घ्यायला काय हरकत आहे? तर म्हणे नाही, माझ्या ओरिजिनल आयडीला प्रतिष्ठेचं, आयडेंटिटीचं आणि अमुक वर्षं जुनं वगैरे असल्याचं लेबल आहे, तर ह्योच आयडी पायजे. यांना हे आयडीच नसलेले महेंद्र मायबोलीकर दाखवले पाहिजेत.
*
धनवंतीशी गप्पा झाल्या. जुन्या सार्वजनिक उपक्रमातल्या शाळेत शिकवायला जायचो स्वयंसेवक म्हणून- त्या आठवणींना उजाळा मिळाला. दर शनिवारी ही चिंचवडहून यायची शिकवायला म्हणजे बघा. दुसर्‍या अश्विनीला मी भेटलोय आधी, पण कधी कुठे ते आठवेना. फुलं तिनेच आणलेली ना? व्हीबी आणि वावे पहिल्यांदाच भेटल्या. ती व्हीबी किती शांत आहे (पण तरी सगळ्यांची हवा लागून बरीच बोलली असेल म्हणा). वावेच्या पोस्ट्स वाचत असतो, हे तिला आवर्जून सांगितलं. यासाठी गटगला यायचं असतं. आणखी तिसरीवाली अश्विनी एमआयटीला आहे, आधी भेटली असती तर फायदा करवून घेतला असता काहीतरी. यासाठी पण गटगला यायचं असतं मुलांनो.
*
आशुडीच्या घरी मुंज होती, आणि लोकांना तिने समारंभात भिकबाळी आणि नथणीचा प्रतिआहेर दिला तसा अमितसाठीही आवर्जून आणला. मी ती अमितच्या कानात घातली, तोच तो खास क्षण. पुणेरी पगडी मला वाटतं एकदा अजयला दिलेली (की समीरला?). भिकबाळी- हे आणखीच ऑथेंटिक झालं.
*
ग्लेन्सचा अँबियंस पाहून इथं मल्टिस्पाईस सारखा गदारोळ करता येणार नाही, असं वाटलं होतं. पण धडाडीच्या लेकरांनी तो खोटा पाडला. तीनेक तासात हा गोंधळ साईन वेव्हजसारखा खालीवर होत होता. अधुनमधून शांतता प्रस्थापित झाली रे झाली, की लगेच नव्या दमाने साईन वेव्ह पुन्हा वर जाई. टिपेला पोचल्यावर शेजारच्याचं बोलणंही ऐकू येत नव्हतं पण तरी येत्या २-३ महिन्याचं आजच बोलून घ्यायचं ठरवल्यागत सगळे हिरिरीने बोलत होतं. आश्चर्य म्हणजे समोरचे माना डोलावत हातवारेही करत होते. व्हिडिओ काढायला हवा होता, म्हणजे हे आश्चर्य सगळ्यांना दाखवता आलं असतं.
*
इतकी वर्षं झाली. फेसबुक आणि व्हॉट्सप आलं. गुगल मीट आणि व्हिडिओ कॉल आले. पण नव्या जुन्या मायबोलीकरांना भेटण्याची असोशी तशीच आहे. हे बहुतेक सगळ्याचं होत असणार. कारणं अनेक असतात. आपण व्हल्नरेबल असण्याच्या काळात मायबोलीवर आधार सापडलेला असतो. आपण गुड फॉर नथिंग आहोत असं वाटत असण्याच्या काळात मायबोलीवर कशावरून तरी अ‍ॅप्रिसिएशन मिळालेलं असतं. आपण काहीतरी चांगलं लिहू, बोलू, करू, दाखवू शकतो हा विश्वास इथं कधीतरी मिळालेला असतो. अडचणीच्या आणि निराशेच्या काळात इथं माया-ओलावा मिळालेला असतो. पराभव सोसण्याच्या काळात इथल्या कुणीतरी बळ दिलेलं असतं. कशात काही अर्थ नाही असं वाटतानाच इथल्या पोश्टी, इथले लोक आपल्या गालांवर हसू फुलवून जातात.
हे ऋण असतं. आपण ते व्यक्त करावं, इतकंच.
**

साजिरा, किल्ली आणि सर्वांचे वृत्तांत मस्त आहेत.
(साजिरा यांच्या सारखं लिहायला कधी जमायचं!)
शरजजी काही दिसले नाहीत फोटोत.
मस्त झाले गटग.
व्याकरणतज्ञांना प्रश्न : गटकले च्या चालीवर गटगले म्हणता येईल का?

साजिरा आठवेल तसे छान लिहितोयस रे.

मी देखील सकाळी छान उन बघून दुचाकी घेउन कामं उरकत गेलो. आणि नाशिक फाट्याला अडकलो पावसात.
तरी दहा ते पंधरा मिनिटात उघडला पाउस.

शरद ह्यांना salute
सांगलीवरून खास gtg साठी आले.
त्यांची तब्येत रिकव्हरी झालेय तरीही त्यांना इतका प्रवास करून येणे, गाडी चालवणे ह्यात त्यांची माबोविषयी आत्मीयता जाणवली.
येताना कृष्णाकाठची वांगी, सांगली फेमस कपाले भडंग घेउन आले सर्वांसाठी. Happy

नवीन जुने आयडी त्यामागची माणसं बघून फार आनंद झाला.
कल्ला तर जोरदार झाला.
समोरचा काय बोलतोय हे लक्ष देउन ऐकावं लागत होतं.
शेतीचे updates देणारी अनया थोडी लेट आली कारण शेतमाल विकून आली.
हातात मावत नाही अशी भली मोठ्ठी कैरी प्रत्येकाला दिली तिने.
वावे च्या bird फोटोग्राफी विषयी बोललो तिला.
3 ते 4 जण तिथेच फॅन त्या फोटोग्राफीचे.
वावे एकदम कमालीची नम्र आणि अतिशय साधी सरळ मुलगी. तिचे COEP कनेक्शन देखील किल्लीने सांगितले गप्पा मारताना म्हणून कळालं, ती तर त्यात काय फार मोठं नाही अशा प्रकारे तो विषय बाजूला करत बोलली.

महिंद्रा उर्फ मधूर गोडबोले - वल्ली माणूस आहे
आयडी आठवत नाही पण united 21 च्या वविला गेला होता.
तेव्हाची काही माबोकारांची त्याची दोस्ती.
येउ की नको करत आला आणि आल्याबद्दल त्याला आनंदच झालाय हे जाणवलं.

साजिरा एका बाजूने पाहिला असता अक्षय खन्ना दिसतो असे मी म्हणत होतो तर किल्लीने वैभव मांगले असे वाटतेय सांगितले तर अश्विनी 11 आणि 999 पैकी कोणीतरी सागर कारंडे असेही सांगितले.
आम्हाला तिघांना एकमेकांचे मत पटलेच.
अर्थात हे तेव्हा साजिराला माहीत नव्हते बोलणं Lol

@ अस्मिता , अमितला पुण्याचा बाप्तिस्मा देतानाचा फोटो तर पाहिलाच आहेस तू Lol

सगळ्यांच्या सोबत थोडे थोडे तरी बोलणे झाले.
पेढे, बर्फी , कलाकंद असा बराच खाउ होता.

आशुडी , साजिरा आल्याने gtg ला जुन्याजाणत्या लोकांची मोहोर लागली असे वाटले.

बर्याच SG रोड पुपु ड्युड्स ची आठवण काढली.
मयुरेश k तुझीही विशेष आठवण काढली रे.
कार्याध्यक्ष!

रॉबिनहूड येणार होते असे कळालं पण आले नाहीत.
त्यांची आठवण निघाली की झक्की आणि मागोमाग लिंबूटिंबु ची आठवण साहजिकच.

VB म्हणाली मला एकदा सगळ्यांना पाहायचं होतं.
तिचा भ्रमनिरास झाला नसावा अशी अपेक्षा. Lol
मी म्हणालो देखील अरेच्या! ही देखील 2 पायाची माणसं असे तर नाही ना झाले.

धनवंती ही आमच्याच चिंचवड एरिया मधील.
तिने दुर्गा टेकडी निगडी gtg चा आग्रह धरला glens gtg सुरू असतानाच.
साजिरा येतो म्हणालाय
VB देखील कात्रज वरून येणारच म्हणाल्या आहेत.
VB आणि मी देखील कोपु त्यामुळे त्याविषयी देखील बोलणं झालं.
साजिराने टण्या तुझा भाउ दिसतो कधी भेटलास का विचारलेलं मला.
पण आजवर माझी आणि त्याची भेट नाही झाली. त्याचे लेखन आवडते. वानु विषयी लिहिलेलं आठवतंय.
( माझ्या घरात वपु आणि पुलं ह्यांची पुस्तकं आहेत हे त्याला कळेल म्हणून भेटलो नसावा मी Lol )

अजूनही लिहिणार आहेच.
वेळ मिळेल तसे लिहीत जाईन.

झकासा, ते अक्षय खन्ना ऐकून बरं वाटायचं आजवर. (कुणाला वाटणार नाही?) पण आता भिती वाटते. लोक औरंगजेब म्हणून बहिष्कार टाकतील, किंवा बोलायलाच येणार नाहीत का काय, असं वाटतं. Proud काळ तर मोठा कठीण आला.

कैसी है ये रुत की जिसमे
(दिल चाहता है)
ह्या गाण्यावर रील बनवा तुम्ही साजिरा.
नदीकिनारी बसून.
.
मग लोकं confuse होतील.

वृत्तान्त वाचतोय. धमाल केलीत आणि ती पोचतेय. कधी नाटका च्या प्रयोगाचं वर्णन - धावते समालोचन वाचतोय का असं वाटतंय.
साजिर्‍याने लेखकांच्या लेखण्या पळवून लिहिलेल्या वृत्तान्तांनी बहार आली. शाम मनोहर मी बर्‍यापैकी वाचलेत, त्यामुळे त्यांचं तर चपखल जमलंय , हे कळलं. त्यालाही लिहायला निमित्त द्यावं लागतं, असं दिसतं.

अमितच्या चेहर्‍यावरचे भाव डिकोड करता येत नाहीत. कधी वाटतं, अगदी भारावून गेलाय. तर कधी त्याला - या सगळ्याला मी निमित्तमात्र आहे ( का ? उत्सवमूर्ती ना मी?) असा प्रश्न पडलाय , पण विचारायची हिंमत होत नाही, विचारलं तरी ऐकणार कोण असा एक उपप्रश्न पडलाय, असं वाटतं.

एवढे लोक आलेत , तर धागा दोन हजारी व्हायला हवा. बाकीच्या सगळ्यांनीही लिहा सविस्तर वृत्तान्त.

लोक औरंगजेब म्हणून बहिष्कार टाकतील, किंवा बोलायलाच येणार नाहीत का काय>>

संतोष जुवेकर (किंवा तत्सम) जर मित्र नसेल तर काळजी नसावी..

साजिरा Lol

भरत , तुमची आठवण काढली सगळ्यांनी.
आयडी मागचा कल्पना केलेला व्यक्ती आणि प्रत्यक्ष ह्यात किती सुखद फरक असा उल्लेख केलेला.

या सगळ्याला मी निमित्तमात्र आहे ( का ? उत्सवमूर्ती ना मी?
>>>
अगदी अगदी. बिचारा अनेकदा आपोआपच कोपर्‍यात गेला. Proud पण ही तशी परंपराच आहे. इतर जाऊद्या, पण अजय गटगलाही असं आपोआप झाल्याचं आठवतं. फक्त अजय साक्षात वेबमास्तर असल्याने त्याचा चेहेरा अजिचबात डिकोड करता येत नाही. Lol

फक्त बुधवारला येणारेही मायबोलीकर आहेत. त्यांना आपला आयडी, मायबोली, तिथले लोक, चर्चा आणि लिखाण यांशी काही देणंघेणं नाही. Proud

ती रेशमडोर कुठे पळाली. तिला पकडून आणा आणि वृ लिहायला सांगा. तू लिहिणार आहेस, असा दम दिल्यावर तिने चेहेरा झाकून घेतला. आता हेही वृ मध्ये लिहिन असं सांगितल्यावर म्हणालेली ती- लिहिन म्हणून.

वा वा! मजा केलेली दिसते! Happy
साजिर्‍या, बहारदार वृत्तांत! Lol

>>> भरत , तुमची आठवण काढली सगळ्यांनी. आयडी मागचा कल्पना केलेला व्यक्ती आणि प्रत्यक्ष ह्यात किती सुखद फरक असा उल्लेख केलेला.
भरतचा आयडी इतका डेन्जर आहे?! Proud

ए इथे जेवढं कौतुक केलंय त्या जागेचे तसे त्यांना review किंवा रेटिंग पण द्या रे. तो मुलगा बिचारा फार आशेने आला होता सांगायला. Happy

अमित जसा वाटला होता तसा नाहीय असं धनवांती ने म्हटल्या बरोबर बिग बॉस मधले मोशन का स्पीच सेन्सर कॅमेरे मान फिरवतात तशा गर्रकन माना तिकडे फिरल्या आणि क्षणभर शांतता.
मग कसा आहे अमित?
नाही नाही, आधी हे सांग कसा वाटला होता अमित?
- तसं नाही म्हणजे.. त्याच्या पोस्ट्स, पुस्तक वाचन यावरून तो एकदम पोक्त माणूस असेल असं वाटलं होतं ..
म्हणजे, मी बालिश वाटतोय का तुला? Lol

मला झकास ने जुने जाणते म्हटल्यावर मी छे छे, मी कुठली जुनी. मी तर नसतेच इथे, मला कुणी ओळखत पण नसेल आता वगैरे झाकपाक करत होते.. तेवढ्यात मुग्धा केदार चा कॉल आला. म्हटले अभी हो जाएगा फैसला. म्हणून तिला विचारले, तू मला ओळखतेस का, मी आशूडी. तर तिने तोंडभरून हो! म्हणून माझा पचका केला. Proud

त्यानंतर ववि बद्दल पण आठवणी जाग्या झाल्या. आम्ही नव्या लोकांना, खूप धमाल असते, जाऊन तर बघा! म्हणत जुन्या जाणत्यांचे कर्तव्य पार पाडलेले आहे.

अमित कडे सगळ्यांनी दिलेल्या भेटींचा ढीग जमा झाला होता. आजवर एवढ्या प्रेमाच्या भेटी कुणालाही मिळाल्या नसतील, हे पण जुने जाणत्याच्या खुर्चीवर बसून मी नमूद करू इच्छिते. आणि याचे कारणही त्याला सांगितले - यामागे त्याची सर्वांना भेटण्याची इच्छा, योग्य व्यक्तींना गाठून हा घाट घालण्याचे प्रयत्न आणि अर्थातच मायबोलीवरचा लोक संपर्क हे सर्व आहे. उगाच कोण कुणाला भेटायला येत नाही आणि भेटीही देत नाही. Happy
ज्यांना जमत असून, इच्छा असून केवळ अवघडलेपणाने मागे खेचले त्यांनी पुढच्या gtg ला नक्की या. वय, देश, कर्तृत्व या पलीकडे जाऊन फक्त भाषेच्या प्रेमापोटी जुळलेले हे जगावेगळे बंध असेच दृढ होत राहोत! थँक्यू वेबमास्तर!

धमाल झालेले दिसते गटग!! व्हेन्यू पण कूल दिसतोय एकदम! अमित ची मज्जाय. काय काय गिफ्टा मिळाल्यात!
साजिराचा मोड युक्त वृत्तान्त भारी Happy अक्षय खन्ना + सागर कारंडे , फरहान अख्तर, वगैरे वाचून Lol

साजिरा , झकास , किल्ली सगळ्यांनी खूप छान लिहिले आहे .
झकास , दुर्गा टेकडी गटग ठरले तर जरूर सांगा . मीही येईन . अजून पर्यंत गेले नाहीये .

शरद, तुमचं विशेष कौतुक! इतक्या लांबून तुम्ही केवळ गटग साठी आलात. हॅट्स ऑफ खरंच! त्यानिमित्ताने तुमच्याशी ओळख झाली याबद्दल आम्हालाही छान वाटलं Happy

>>>
इतकी वर्षं झाली. फेसबुक आणि व्हॉट्सप आलं. गुगल मीट आणि व्हिडिओ कॉल आले. पण नव्या जुन्या मायबोलीकरांना भेटण्याची असोशी तशीच आहे. हे बहुतेक सगळ्याचं होत असणार. कारणं अनेक असतात. आपण व्हल्नरेबल असण्याच्या काळात मायबोलीवर आधार सापडलेला असतो. आपण गुड फॉर नथिंग आहोत असं वाटत असण्याच्या काळात मायबोलीवर कशावरून तरी अ‍ॅप्रिसिएशन मिळालेलं असतं. आपण काहीतरी चांगलं लिहू, बोलू, करू, दाखवू शकतो हा विश्वास इथं कधीतरी मिळालेला असतो. अडचणीच्या आणि निराशेच्या काळात इथं माया-ओलावा मिळालेला असतो. पराभव सोसण्याच्या काळात इथल्या कुणीतरी बळ दिलेलं असतं. कशात काही अर्थ नाही असं वाटतानाच इथल्या पोश्टी, इथले लोक आपल्या गालांवर हसू फुलवून जातात.
हे ऋण असतं. आपण ते व्यक्त करावं, इतकंच.
>>> १०१% करेक्ट, साजिरा. बरोब्बर मांडलं आहेस शब्दांत. ( आता इथे मला पुन्हा शब्दान्त/शब्दांत वगैरे भरत लिहितील असं वाटायला लागलं Proud )

अनुस्वारांचे नियम ब्रह्मचर्यापेक्षा कडक आहेत असे नुकतेच लक्षात आले, त्यामुळे भरतना घाबरत रहावे लागणार आहे. Wink

वाचणारे सगळं, जोक पोटात मावत नव्हता. Happy

Pages