Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Pant's run of scores in IPL
Pant's run of scores in IPL 2025: 0, 15, 2, 2, 21, 63, 3, 0, 4, 18,
काय बोलताय, सर?
धोनीचा शेवटचा सामना ? हा
धोनीचा शेवटचा सामना ? हा प्रश्न विचारून परत वेताळ झाडाला जाऊन लटकला
प्रामाणिकपणे धोनीची बॅटींग अजिबात बघवत नाही आता. सगळ्या सुंदर आठवणींची माती झालीये.
काय बोलताय, सर?
काय बोलताय, सर?
>>>
त्याच्या शेवटच्या दोन तीन इनिंग मी पाहिल्या नाहीत. त्याची खेळायची इच्छाच नाही असे दिसते. . लिलावात गोयंका कडे गेला तेव्हाच मी म्हटलेले उगाच गेला. याआधी धोनी आणि राहुलबाबत त्याचे वागणे कसे होते ते आपण पाहिले होतेच. तो डोक्यात जाणारा संघमालक आहे. बहुधा पुढच्यावेळी तो नसेल लखनौ सोबत आणि तसेच झालेले उत्तम.
सध्या मी पंत ला आयपीएल मध्ये फॉलो करणे सोडले आहे. लवकरच त्याला देशासाठी खेळताना बघूया.. तेव्हा बोलूया.. त्याचा फॉर्म खरेच गेलाय की आणखी काही कारण हे लवकरच समजेल.
सगळ्या सुंदर आठवणींची माती
सगळ्या सुंदर आठवणींची माती झालीये.
>>>>
धोनीला पैशासाठी आयपीएल खेळवणे चालू आहे हे उघड आहे. आणि हे पैसे काही नुसते धोनीला कमवायचे नाही तर त्याच्या जीवावर सर्वांनाच कमवायचे आहेत.. तर त्यावरून आधीच्या सुंदर आठवणीची कशाला माती करत आहात.
देशाकडून खेळण्याआधी गोयंकाने
देशाकडून खेळण्याआधी गोयंकाने त्याचं अपहरण करून काही बरं वाईट करायला नको म्हणजे झालं.
मृत्यूच्या जबड्यातून टाळी
मृत्यूच्या जबड्यातून टाळी देऊन परत आलाय तो.. त्याचे कोण काय बरेवाईट करणार
फायनली जिंकले रॉयल्स चेस करून
फायनली जिंकले रॉयल्स चेस करून! हुश्श!! वैभव आज खूप मॅच्युरिटीने खेळला हे बघून बरं वाटलं.
वैभव आज खूप मॅच्युरिटीने
वैभव आज खूप मॅच्युरिटीने खेळला हे बघून बरं वाटलं. >> एकदमच जबरदस्त ! पहिल्या तीन चार ओव्हर्स हारडली खेळला पन स्ट्राईक रेट काय होता बघितला कि खर टॅलंट् आहे असे वाटायला लागतेय.
गेला! रोहित ५ वर!.
गेला! रोहित ५ वर!.
पांड्या ३!!
आता वैभव, म्हात्रे, सुदर्शन यांच्याकडे लक्ष द्यायचे.
आता वैभव, म्हात्रे, सुदर्शन
आता वैभव, म्हात्रे, सुदर्शन यांच्याकडे लक्ष द्यायचे. >> झक्की जागे व्हा. आज कोणीच खेळत नाहियेत ह्यातले
रोहित - स्मार्ट लेफ्ट आर्म सीमर saga continues.
आणि हे पैसे काही नुसते धोनीला कमवायचे नाही तर त्याच्या जीवावर सर्वांनाच कमवायचे आहेत.. तर त्यावरून आधीच्या सुंदर आठवणीची कशाला माती करत आहात. >> ह्यातल्या शेवटच्या वाक्यातल्या प्रश्नाचे उत्तर त्याच वाक्याच्या सुरूवातीच्या भागात आहेत. आय्पील हे देशासाठी खेळले जात नाहि हे मान्य करूनही त्याच आयपीलच्या जीवावर बिसीसीआय ची मिजास चालते हे दिसते. देशासाठी निवडला जाणारा संघ ( बिसीसीआय ही प्रायव्हेट बॉडी आहे हा भाग बाजूला ठेवूया) आयपील च्या कामगिरीच्या जोरावर निवडला जातो हे स्पष्ट दिसते आहे त्यामूळे मी तरी आयपील ला अनुल्लेखित करू शकत नाही. एखाद्या प्लेयरमूळे फ्रँचाईजी एव्हढी तुंबलेली पाहिली नव्हती. कसलाही सक्सेशन प्लॅन करता येत नाही. कोच प्लेयरला अॅकोमोडेट करण्यासाठी अनाकलनीय कारणे देत कोलांट्या मारतो. फ्रँचाईजी पैशाच्या मागे लागलेली असणे समजू शकतो पण धोनीला स्वतःच्या लीगसीची काहीच पडलेली नाही ह्याचे दु:ख होतेय. धोनीला पैशाची कमी असेल असे वाटत नाही.
अहो, आजसाठी नाही, एकूणच
अहो, आजसाठी नाही, एकूणच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी! आता वैभव, म्हात्रे, सुदर्शन यांच्याकडे लक्ष द्यायचे.
ंमुंबई - शेवटच्या १२ चेंदून
ंमुंबई - शेवटच्या १२ चेंडूत ४७ धावा!! जाम महागात पडणार दिल्लीला.
“ धोनीला स्वतःच्या लीगसीची
“ धोनीला स्वतःच्या लीगसीची काहीच पडलेली नाही ह्याचे दु:ख होतेय.” +१ अगदीच माती केलीय स्वत:च्या करियरमधल्या सोनेरी क्षणांची.
देशासाठी निवडला जाणारा संघ
देशासाठी निवडला जाणारा संघ आयपील च्या कामगिरीच्या जोरावर निवडला जातो हे स्पष्ट दिसते आहे
>>>>>
म्हणून आयपीएल फ्रॅंचाईजींनी ते लक्षात घेऊन आपले संघ निवडायचे म्हणता की काय
धोनीला स्वतःच्या लीगसीची
धोनीला स्वतःच्या लीगसीची काहीच पडलेली नाही ह्याचे दु:ख होतेय. धोनीला पैशाची कमी असेल असे वाटत नाही.
>>>>>>
बरोबर, त्याला पैशाची कमी नाहीच आहे.
धोनी स्वतः पैशासाठी करत नाहीये तर दुसऱ्यांना पैसे कमावून देत आहे.
फरक लक्षात येतोय का बघा. तो परोपकार करतो आहे अगदीच असे म्हणायचे नाहीये. पण त्याने खेळत राहावे यात पैसा असेल तर इतरांचे सुद्धा त्यावर दबाव असतील.
आणि हो धोनीच्या लेगसीला काही होत नाही.
असे होत असते तर,
आपला वशिला वापरून अर्जुन तेंडुलकरला मुंबईत खेळवणाऱ्या सचिन तेंडुलकरची लेगसी सुद्धा संपुष्टात आली म्हणायची का..
तेव्हा नाही का त्या जागी एखादा डिझर्व करणारा खेळाडू येऊ शकतो असे तुम्हाला वाटत.
तो तर कोणाला पैसे सुद्धा कमवून देत नाहीये.
किंबहुना त्या बदल्यात सचिन तेंडुलकर नावाची ब्रँड व्हॅल्यू मुंबई संघाला मिळत आहे असे म्हणून शकतो. .
फ्रॅंचाईजी क्रिकेटला तसेच बघा...
किंवा मग सर्वांना सेम निकष लावा..
मुंबईचा पाऊस मॅच संपायची वाट
मुंबईचा पाऊस मॅच संपायची वाट पाहत होता का?
अंबानींनी पावसालाही सामील केले दिसतेय.
चेन्नई च्या मालकाला कोणी
चेन्नई च्या मालकाला कोणी आडवलंय का धोनी ला हाकलायला?
कदाचित धोनी खेळतही असेल पैस्यासाठी. त्यात एवढं विशेष कांय आहे. जाहिराती पण काय समाज सेवा म्हणून करत नाही.
पण आपलं IPL करीयर लांबवून धोनी बऱ्याच क्रिकेट प्रेमिच्या मनातून मात्र उतरला आहे हे नक्की.
पण धोनी प्रेमी लोकांना कदाचित तो अजून १० वर्ष खेळलेलाही आवडू शकेल. त्याची त्याची मर्जी. चुकीची असली तरी ही आपल्यात होतेच व्याक्ती पूजा. आजच श्रीकांत ने धोनी ला IPL सोडण्याचा सल्ला दिलाय.
5 ओवर नंतर कधीही पाऊस पडला
5 ओवर नंतर कधीही पाऊस पडला असता तरी मुंबईचा विजय पक्का होत. पूर्ण सामना मुंबई पुढे होती.
मुंबई प्ले ऑफ सीट पक्की होती.
गुजरात यंदा फायनल पक्की आहे.
सोबत कोण खेळते हे बघावे लागेल..
मुंबई गुजरात बघायला मजा येईल..
योगायोगाने आम्ही आज घरी कौन
योगायोगाने आम्ही आज घरी कौन प्रवीण तांबे पिक्चर बघत होतो. मॅच आधी पाहिला.. ब्रेक मध्ये थोडा पाहिला.. आणि मॅच संपल्यावर आता पिक्चर सुद्धा संपवला..
मुलीनेच लावला होता. मी तिला आता शेवटी त्याचे चाळीशी नंतरचे पराक्रम सांगत होतो.. तुलनेला रोहीत कोहली धोनी यांची वये घेत होतो
म्हणून आयपीएल फ्रॅंचाईजींनी
म्हणून आयपीएल फ्रॅंचाईजींनी ते लक्षात घेऊन आपले संघ निवडायचे म्हणता की काय >> पूर्ण वाक्य हे आहे " देशासाठी निवडला जाणारा संघ ( बिसीसीआय ही प्रायव्हेट बॉडी आहे हा भाग बाजूला ठेवूया) आयपील च्या कामगिरीच्या जोरावर निवडला जातो हे स्पष्ट दिसते आहे त्यामूळे मी तरी आयपील ला अनुल्लेखित करू शकत नाही." एव्हढे साधे मराठी कळत नसेल तर विचार, परत वेगळ्या भाषेत लिहीन.
किंवा मग सर्वांना सेम निकष लावा.. >> सर्वात पहिली गोष्ट माझ्या पोस्ट मधे अर्जुन तेंडुलकर किंवा सचिन तेंडूलकरचा उल्लेख कुठे आहे ते दाखव.
Pages