Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नियम आहे पण वापरायचा नाही का
नियम आहे पण वापरायचा नाही का तर काही लोकांना ती खेळाडू वृत्ती वाटत नाही. आणि मीडियापण त्या नियमाद्वारे आऊट करणाऱ्या बॉलर ला पिंजऱ्यात उभा करतेय. Ipl match बघितली नाही पण पंत ने बॅट्समन ला परत बोलावल्या वर बॉलर ची प्रतिक्रिया कांय होती ते माहिती नाही. खरं तर एक प्रकारे त्याचा हा आपमानच आहे.
मंकडींग ला अखीलाडू म्हणून
मंकडींग ला अखीलाडू म्हणून ट्रीट करणं, त्याची अपील मागे घेणं वगैरे शुद्ध फालतुगिरी आहे
काही किंवा बरेच लोकांना यात
काही किंवा बरेच लोकांना यात खिलाडूवृत्ती वाटत नाही. पण नियम आपल्या जागी आहेच. ज्याने त्याने खुशाल वापरावा. ज्याला वापरायचा नाही त्याने वापरू नये. लोकांची पर्वा कशाला करायची?
मध्यंतरी धोनी आयपीएल निवृत्तीबाबत चर्चा झाली त्यामागे सुद्धा हेच लॉजिक आहे. धोनीला खेळायचे आहे, त्याच्या संघमालकाला धोनी हवा आहे, त्याच्या कित्येक चाहत्यांना तो हवा आहे, आणि महत्त्वाचे म्हणजे अमुक तमुक वयात निवृत्ती घ्यायला हवी असा काही नियम नाही जो धोनी धाब्यावर बसवत आहे. मग काही लोकांना त्याचे खेळणे रुचत नाही याची पर्वा त्याने का करावी? जगात करोडो लोकं आहेत आणि त्यांची लाखो मते असणारच.
थ्रो जर फलंदाजाच्या अंगाला
थ्रो जर फलंदाजाच्या अंगाला लागून बॉल लांब गेला तर बरेचदा एक्स्ट्रा धाव घेतली जात नाही. जर फोर गेला तर गोष्ट वेगळी. पण जर यात फलंदाजाची चुकी नसेल तर त्यानेही दुसरी धाव धावून घ्यायला हवी. जी नियमानुसार आहे. खिलाडीवृत्ती दाखवत संघाचे एक दोन धावांचे नुकसान करायला नको असेही म्हणता येईल. पण वर्षानुवर्षे फलंदाज अशी धाव टाळत आले आहेत. अमुक तमुक नियमात आहे तर तसेच वागायला हवे असे म्हणून शकत नाही. राठीला अपील करावीशी वाटली तो आपल्या जागी बरोबर होता. पंतने देखील कर्णधार म्हणून समयसूचकता दाखवत योग्य निर्णय घेतला.
असणाऱ्या नियमाची तुलना
असणाऱ्या नियमाची तुलना नसणाऱ्या नियमा बरोबर होऊ शकत नाही.
ज्याला वापरायचा त्याने तो वापरावा पण वापरला म्हणून वापरणारा चुकीचा नाही.
पण आपल्या मना प्रमाणे नियम वापरायचं ठरवलं तर कसं होईल. म्हणजे उद्या एखाद्या कॅप्टन ला वाटलं की LBW मध्ये खिलाडू वृत्ती नाही नको तर क्रिकेट खेळण शक्य होईल का? आणि त्या बॉलर च काय?
Yes, a batsman can take a run
Yes, a batsman can take a run even if the ball hits them while they are running between the wickets, provided the action is not considered obstruction.
^^^^
हे बघा,
बरेच फलंदाज अशी धाव टाळतात आणि संघाचे नुकसान करतात.
पंतने देखील कर्णधार म्हणून
पंतने देखील कर्णधार म्हणून समयसूचकता दाखवत योग्य निर्णय घेतला.
>>
प्लीज एक्सप्लेन समयसूचकता
अन् निर्णय योग्य हे कशाचा बेसिस वर ठरवलं
जर पंत आपल्याच बॉलर च्या बाजूनी उभा रहात नसेल तर बॉलर च्या स्पिरिटवर त्याचे जे परिणाम होतील त्याचं काय??
म्हणजे उद्या एखाद्या कॅप्टन
म्हणजे उद्या एखाद्या कॅप्टन ला वाटलं की LBW मध्ये खिलाडू वृत्ती नाही नको तर क्रिकेट खेळण शक्य होईल का
>>
एक्झॅक्टली
उद्या कुणी म्हणालं की फलंदाजाला ज्या बाजूला चेंडू मारायचा होता तिकडे कॅच केला तर आऊट पण तसा न जाता तो अन् इंटेन्शनली एज लागून कॅच उडाला अन् तो पकडला तर ती अखिलाडू वृत्ती तर??
PBKS - 5/52!
PBKS - 5/52!
“ पंतने देखील कर्णधार म्हणून
“ पंतने देखील कर्णधार म्हणून समयसूचकता दाखवत योग्य निर्णय घेतला.” - अंपायरने ऑलरेडी नॉट-आऊट दिला होता. अपील मागे घेतल्यामुळे काही फरक पडला नाही.
खिलाडूवृत्तीविषयीच बोलायचं तर स्लेजिंग न करणं वगैरे मार्ग आहेत. नियम असताना सुद्धा वेगळं काही करायचं तर बॉल जेव्हा बॉलरच्या फॉलो-थ्रू मधे हाता-पायाला लागून स्टंपवर जाऊन नॉन-स्ट्रायकर रन-आऊट होतो तेव्हा अपील मागे घ्यावं (हे केवळ आर्ग्युमेंट आहे. नियमाप्रमाणे बॅट्समन आऊट असेल तर तो आऊटच असावा).
आजच्या सामन्याआधीचे भाकीत..
आजच्या सामन्याआधीचे भाकीत..
RCB जिंकेल आज
उद्या मुंबई जिंकेल
परवा मुंबई पंजाबचा बदला घेईन
तेरवा रोहीत विरुद्ध कोहली सामना रंगेल
आजचा सामना तरी खरे ठरवते असे वाटत आहे सध्या
अंपायरने ऑलरेडी नॉट-आऊट दिला
अंपायरने ऑलरेडी नॉट-आऊट दिला होता.
>>>>>
काहीही..
जेव्हा पंतने अपील मागे घेतले तेव्हा फलंदाजांनी त्याला बोलवून मारलेली मिठी पाहिली का?
वेडा आहे का तो फलंदाज? आणि वेडा आहे का पंत?
जर पंत आपल्याच बॉलर च्या
जर पंत आपल्याच बॉलर च्या बाजूनी उभा रहात नसेल तर बॉलर च्या स्पिरिटवर त्याचे जे परिणाम होतील त्याचं काय??
>>>>
जेव्हा रन घेताना फलंदाज आणि फिल्डर धक्काबुक्की होते त्यात कोणी रन आउट होते तेव्हा लगेच अपील केले जाते. नंतर कप्तानाला वाटले अपील मागे घ्यावे तर तो मागे घेतो.
डीआरएस सुद्धा कप्तानच ठरवतो.
हे दोन्ही कप्तानाला दिलेले अधिकार आहेत ते तो वापरतो.
थ्रो जर फलंदाजाच्या अंगाला
थ्रो जर फलंदाजाच्या अंगाला लागून बॉल लांब गेला तर बरेचदा एक्स्ट्रा धाव घेतली जात नाही.....
>>>>
इथे कोणाला काही सुचले वाटते नाही
“ काहीही..
“ काहीही..
जेव्हा पंतने अपील मागे घेतले तेव्हा फलंदाजांनी त्याला बोलवून मारलेली मिठी पाहिली का?” - सगळं लाईव्ह बघितलं. त्या मिठीच्या आधी बिग स्क्रीनवर ‘नॉट आऊट’ झळकलेलं पाहिलंस का पंतचं कौतुक करायच्या नादात ते पाहिलंच नाहीस. बॉलरची अॅक्शन पूर्ण झाल्यामुळे थर्ड अंपायरने नॉट आऊट दिला होता. ह्या डिसिजनविषयी आकाश चोप्राने त्याची तांत्रिकता समजावणारा व्हिडिओ पण टाकलाय सोशल मिडियावर.
जेव्हा रन घेताना फलंदाज आणि
जेव्हा रन घेताना फलंदाज आणि फिल्डर धक्काबुक्की होते त्यात
धक्काबुक्की वेगळी आणि क्रिकेटच्या नियमाप्रमाणे माकडींग करून बॉलर ने घेतलेली विकेट वेगळी. क्रिकेट स्पिरिट म्हणून आऊट नाही करायचं हे नक्की कोणाच्या डोक्यातून आलंय कांय माहिती.
पहिला तुम्ही लोक काय ते ठरवा.
पहिला तुम्ही लोक काय ते ठरवा.
एकदा म्हणत आहात की पंत ने अपील मागे घेऊन गोलंदाजाला निराश केले.
तर एकदा म्हणत आहात की त्याआधीच अंपायरने नॉट आउट दिले होते.
ते नॉट आउट दिलेले पंत आणि फलंदाज यांना समजले नाही का जे उगाच त्यांनी ड्रामा केला.
टीव्हीवर आपल्याला एखादी गोष्ट नंतर दाखवली याचा अर्थ असे नाही कि ती नंतर घडली.
जेव्हा रन घेताना फलंदाज आणि
जेव्हा रन घेताना फलंदाज आणि फिल्डर धक्काबुक्की वेगळी आहे हे माहीत आहे. मी कर्णधार नंतर अपील कसे मागे घेऊ शकतो याबाबत ते भाष्य केले आहे.
असो,
तुम्ही ते फलंदाजाला बॉल लागून एक्स्ट्रा धाव न घेणे याबद्दल बोलाल का? नियमात असून ती न घेतल्याने संघाचे नुकसान फलंदाज करतो का?
पहिला तुम्ही लोक काय ते ठरवा.
पहिला तुम्ही लोक काय ते ठरवा. >> पहिले तू पंतची समयसूचकता म्हणजे काय ते स्पष्ट कर आधी.
तुम्ही ते फलंदाजाला बॉल लागून
तुम्ही ते फलंदाजाला बॉल लागून एक्स्ट्रा धाव न घेणे याबद्दल बोलाल का? नियमात असून ती न घेतल्याने संघाचे नुकसान फलंदाज करतो का? >> हो करतो. नियमात बसत असेल तर धाव घेतली तर त्यात काहीच चुकीचे नाही नि त्याचा फायदा नाही घेतला तर संघाचे नुकसान झाले आहे.
बोल आता काय बोलतोस ते !
टीव्हीवर आपल्याला एखादी गोष्ट
टीव्हीवर आपल्याला एखादी गोष्ट नंतर दाखवली याचा अर्थ असे नाही कि ती नंतर घडली. >>
पंजाब एकदम नवशिक्यासारखे
पंजाब एकदम नवशिक्यासारखे खेळले. डिसिप्लिन्ड बॉलिंग समोर ९० मधला भारतीय संघ खेळत असे तसे खेळत होते. श्रेयस ने इंग्लंड ला का नेले नाही ह्याचे प्रूफ दिले असे म्हणायचे का ?
मुशिर खानला अजून डोमेस्टिक मधे खेळण्याची बरीच गरज आहे हे उघड झाले.
नियमात बसत असेल तर धाव घायलाच
नियमात बसत असेल तर धाव घायलाच हवी. किती तरी वेळा बघितलंय अशा धावा घेताना. नक्कीच संघाच नुकसान होईल जर धाव घेतली नाही तर.
टीव्हीवर आपल्याला एखादी गोष्ट
टीव्हीवर आपल्याला एखादी गोष्ट नंतर दाखवली याचा अर्थ असे नाही कि ती नंतर घडली. >>>> "लाईव्ह कवरेज" ह्याचा अर्थच बदलला मग !
“ पहिला तुम्ही लोक काय ते
“ पहिला तुम्ही लोक काय ते ठरवा.
एकदा म्हणत आहात की पंत ने अपील मागे घेऊन गोलंदाजाला निराश केले.” - तुझ्या सोयीने तू दोन वेगवेगळ्या व्यक्तींची विधानं एकत्र करून कांगावा करतोयस. अंपायरने नॉट-आऊट दिलं होतं हे टीव्हीवर पण दिसलं, त्यावर अर्टिकल्स पण आहेत - शोधलंस तर सापडतील. जर अंपायरने आऊट दिलं असतं तर पंतने अपील मागे घेतल्यामुळे जितेश नॉट आऊट ठरला असता.
“ पंजाब एकदम नवशिक्यासारखे
“ पंजाब एकदम नवशिक्यासारखे खेळले. ” +१
अय्यर काय करायला गेला ते कळलंच नाही.
"लाईव्ह कवरेज" ह्याचा अर्थच
"लाईव्ह कवरेज" ह्याचा अर्थच बदलला मग ! >> धोनी , रोहित नि चुम्मा फ्रेममधे असले कि ब्रॉडकास्टरमधला क्वांटम मोड जागा होऊन थेट टाईमलाईनच बदलतात असे काही जणांना वाटते.
लाईव्ह कवरेज" ह्याचा अर्थच
लाईव्ह कवरेज" ह्याचा अर्थच बदलला मग !
>>>>>>>
एकापेक्षा जास्त कॅमेरे लागले असतात. त्यापैकी तुम्हाला एका कॅमेरातले दिसते. त्याचवेळी जर दुसऱ्या कॅमेऱ्यात काही इंटरेस्टिंग असेल तर ते नंतर दाखवतात. असो..
स्क्रीनवर नॉट आउट झळकले आणि ते बघितल्यानंतर देखील पंत म्हणतोय आम्हाला अपीलच नाही करायचे. आणि फलंदाज सुद्धा आपल्याला थर्ड एम्पायरने नॉट आउट दिले आहे हे बघून सुद्धा तुझ्यामुळेच वाचलो भावा असे म्हणून पंतला मिठी मारतोय.. स्क्रिप्ट होती वाटते
पहिला अंदाज बरोबर आला
पहिला अंदाज बरोबर आला
RCB जिंकेल आज ✓
उद्या मुंबई जिंकेल
परवा मुंबई पंजाबचा बदला घेईन
तेरवा रोहीत विरुद्ध कोहली सामना रंगेल
पंतने अपील मागे घेतले म्हणून
पंतने अपील मागे घेतले म्हणून नॉट आउट असे स्क्रीनवर दाखवले असे तुला वाटत असेल तर कठीण आहे एकूण. आणि वाट्त नसेल तर नक्की तो मुद्दा काय आहे नि त्याचा ह्या वादात काय संबंध हे फक्त तुझे तुलाच माहित. अंपायरचा निर्णाय काही असला तरी अपिल मागे घेऊन पंत बॉलरला मोरली डिस्करेज करतोय एव्हढे साधे होते. परत ह्याचा पंतने त्याचा अधिकार वापरला ह्याचा काहीही संबंध नाही पण कप्तान म्हणून बॉलरप्रती त्याची एक जबाबदारी आहे ह्याचा आहे.
Pages