आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहीत शर्मा ग्रेट यासाठी आहे कारण तो सहा आयपीएल फायनल खेळला आहे आणि सहाच्या सहा जिंकला आहे >> अरे पण वरच तू म्हणालेलास ना देशासाठीची कामगिरीच मोठी वगैरे ? त्यांनाच तू मानतोस वगैरे ? कारण वर्ल्ड कप फायनल मधे रोहित शर्माचा रेकॉर्ड ०-१ असा आहे, टेस्ट चँपियनशिप मधे ०-२. टी-२० मधे २-०. मला सॉलिडच कंफ्युजन होतेय आता - कि रोहित ग्रेट आहे कि नाही ?

असामी,
आकडे आणा.. पण योग्य आणा Happy

टेस्ट चॅम्पियनशिप तो एक वेळीच कर्णधार होता.
पहिल्यांदा कोहली होता. तसेही कसोटी कर्णधार म्हणून मी कधी रोहितचे कौतुक केले नाहीच.
आणि वनडे बद्दल बोलताना चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा खाऊन टाकलीत.

ओके, आता हे बघा.

ट्वेण्टी ट्वेंटी मध्ये रोहीत शर्मा कर्णधार म्हणून
५ आयपीएल फायनल
१ चॅम्पियन लीग फायनल
१ वर्ल्डकप फायनल
१ आशिया कप फायनल

एकूण ८ फायनल खेळला आहे.
८ पैकी ८ जिंकला आहे.

आणि हे अदभुत आहे Happy

तसेच हे कमीत कमी टूर्नामेंट खेळून जिंकला आहे.
असे नाही की कधीतरीच एखाद्या फायनलला गेला आहे.

याउपर त्याचा इंटरनॅशनल मधील विनिंग रेकॉर्ड सुद्धा जगात सर्वाधिक आहे.
तो निर्विवादपणे या फॉरमॅटचा बादशहा किंग सुलतान राजा आहे.

वन डे फॉरमॅट
२ फायनल खेळला आहे
१ जिंकला आहे.

टेस्ट फॉरमॅट
१ फायनल खेळला आहे.
ती हरला आहे पण तसेही त्याला मी कसोटी कर्णधार म्हणून भारी मानत नाही हे इथे बरेचदा लिहिले आहे.

प्रश्न रोहित शर्मा, ऋषभ पंत वगैरे प्लेयर्सच्या यशाचा, किंवा प्लेयर म्हणून त्यांच्या कामगिरीचा नसून त्याच्या पडद्यामागून “और तुम्हारे भक्तजनोंमें हमसें बढकर कौन” ह्या न्यूसन्स चा आहे. त्यामुळे कुठल्याच मॅचवर, इनिंगवर, स्पेलवर ऑब्जेक्टीव्ह चर्चा न होता, पुन्हा पुन्हा ते गुर्हाळ ‘मला पहा आणि फुलं वाहा‘ वर येत रहातं.

फिक्सिंग झाली. एवढी पण सरळ सरळ फिक्सिंग नको करायला हवी होती. ही आयपीएल मला आता wwf सारखी वाटायला लागले. सगळं पहिल्यापासून फिक्स.

मुंबई आज सुद्धा राडा घालत आहे.
अश्यावेळी कसे शांत बसू शकते कोणी...
क्रिकेट आहे की शास्त्रीय संगीताची महफिल

"तुम्ही करतात ते कौतुक, आणि आम्ही करतो ती भक्ती" - कसा फाटा फोडला परत!!!! शाब्बास!!!! मु. पो. पेडगाव!!

हायलायटेड पार्ट 'भक्त' नसून 'हमसे बढकर कौन' होता.

आकडे आणा.. पण योग्य आणा >> मुद्दे आणा पण योग्य आणा. पुढचे सगळे निरुपण व्यर्थ आहे बुवा. - "रोहित शर्मा, ऋषभ पंत वगैरे प्लेयर्सच्या यशाचा, किंवा प्लेयर म्हणून त्यांच्या कामगिरीचा नसून त्याच्या पडद्यामागून “और तुम्हारे भक्तजनोंमें हमसें बढकर कौन” ह्या न्यूसन्स चा आहे." ह्या बाफाच्या हेडींग मधे टाका नि दर वेळी इथे आल्यावर हे वाचून मग पोस्ट करू नका Wink देव तुमचे भले करेल.

अश्यावेळी कसे शांत बसू शकते कोणी... >> आम्ही कंफ्यूज्ड आहोत कि बॉलिंङ च्या यशाबद्दल रोहित चे कौतुक कसे करायचे ? कदाचित तो ड्रेसिंङ रूम मधे बसून कठपुतळ्यासारखे बॉलर्स चे हात हलवत असावा का ? सर थोडी आकडेवारीयेऊ दे कि रोहित ड्रेसिंङ रूममधे बसल्यावर मुंबई सामने कसे जिंकतात नि तेच देशासाठी कसे होते वगैरे. मग त्यावरूनच कसे १०२३ साली अमक्या बाफाच्या ५६१ व्या पोस्ट मधे हे कसे आधीच लिहिले होते हे पण ओघाने लिहिल्यासारखे दाखवत येईल.

मी कुठे म्हणालो रोहितचे कौतुक करा..
मुंबई राडा घालत आहे त्याबद्दल..

उनाडकट याला कव्हर वरून काय क्लासिक सिक्स मारला ते पाहिला का...
त्याबद्दल कौतुक जरूर करणार मात्र.
स्पेशल टॅलेंट आहे माणसात.. फलंदाजी सोपी आणि नेत्रसुखद एकाच वेळी करतो.

ट्वेंटी वर्ल्डकप फायनल
वन डे वर्ल्डकप फायनल
चॅम्पियन ट्रॉफी फायनल
आयपीएल फायनल

या प्रत्येकात सिक्स मारलेला एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे रोहीत शर्मा

असे आताच आकाश चोप्रा कॉमेन्ट्री मध्ये म्हणाला..

मी कुठे म्हणालो रोहितचे कौतुक करा..
मुंबई राडा घालत आहे त्याबद्दल.. >> त्यांनी हिटमॅनला हाकलल्यापासून मंडळ मुंबईला किम्मत देत नाही. एकच ध्यास , एकच श्वास , एकच हाक, एकच निवास - फक्त रोहित !!
|| बोलावा रोहित, पाहावा रोहित ||

मीतर म्हणतो बिसीसीआय ने आय्सीसी ला सांगून नियमांमधे बदल करून घ्यावा, अकरा बॅटसमन ऐवजी रोहित ला दोनदा बॅटींग द्यावी. बस्स और क्या चाहिये ! अकरा वेळा द्यावी असे म्हणणार होतो. कारण दिल मांगे मोअर. पण रोहित दोन मधेच सगळे संपवून टाकेल ह्याची खात्री आहे.

इंग्लिश बोर्ड जसे सर किताब देते तसा बिसिसीआय ने 'रोहित' हा किताब द्यायला हवा. रोहित सुनिल गावस्कर, रोहित सचिन तेंडूलकर, रोहित कपिल देव, रोहित विराट कोहली ! अहाहा !

ROHIT SHARMA HAS SCORED CONSECUTIVE FIFTIES IN THE IPL AFTER 9 LONG YEARS.

- The Hitman peaking at the age of 38.

रोहीत जेव्हा बाद होऊन परतत होता तेव्हा हार्दिक त्याची पाठ बराच वेळ थोपटत होता. ज्यात एका प्रकाराची कृतज्ञता दिसली.
गेले काही सामने रोहीतची बॉडीलैंग्वेज बघून छान वाटत आहे.

मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
आता उद्या राजस्थान ने बंगळूरला हरवावे म्हणजे ते मागेच राहतील.
तर उद्या आपण सारे मिळून राजस्थानला सपोर्ट करूया Happy

खरंतर इकडे चर्चा कमी होतेय आयपीएल चि... ज्याच्या साठी धागा सुरु केला आहे त्या बद्दल न बोलता दुसरच गुऱ्हाळ चालू आहे. मायबोली वर एके काळी इतके छान लेख असायचे आणि आता... कोणी कितीही डोक आपटले तरी साध्य काही होणार नाही पण रिकामा वेळ वाया जातो आहे...

आजच्या गेममधला रोहितच्या खेळीचा मला आवडलेला भाग म्हणजे त्याने अ‍ॅक्सलेरेटेड सुरूवात हे जोखड (गरज नसल्यामूळेही असेल) सैल केले. बॉल्स मेरीटवर खेळला नि प्रीमेडीटेटेड हॉइक्स विशेषतः हर्षल विरुद्ध ज्याच्या बॉलिंग स्टाईलला अधिक अनुकूल असलेले पिच होते - ते टाळले. असा रोहित जास्त डेंजरस असतो.

ट्रेंट बोल्ट ला मॅन ऑफ द मॅच देणे मनापासून आवडले. हैद्राबादमधे त्यांच्या विरुद्ध बॉलर ते घेऊन जाते ही आयरनी आहे Happy

"हैद्राबादमधे त्यांच्या विरुद्ध बॉलर ते घेऊन जाते ही आयरनी आहे" - खरं आहे. स्ट्राँग बॉलंग अ‍ॅटॅक्स पैकी एक हैद्राबाद चा आहे. मागच्या वर्षीच्या यशात ट्रॅव्हिशेक इतकाच वाटा त्यांच्या बॉलर्स चा होता.

"असे आताच आकाश चोप्रा कॉमेन्ट्री मध्ये म्हणाला." - आणि प्राज्ञ परिक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली Lol

वैभव सूर्यवंशी ला अजून मेइन स्ट्रीम मधे यायला बराच वेळ आहे असे आजची इनिंग बघून वाटले. बॉलर, पिच कसलाही विचार न करता तेच तेच शॉट्स ट्राय करणे फारसे आशादायक वाटले नाही. सचिन बरोबर तुलना तर फारच अस्थायी वाटली. समोर जैस्वाल दृष्ट लागल्यासारखा खेळत असताना त्यातून काहीच शिकत नाहीये असे वाटले.

छोटू आज सुनिल नारायण सारखा खेळत होता. यू मिस आय हिट मध्ये जाणारच होता.

जयस्वाल सुद्धा पॉवर प्लेमध्ये सुरुवातीला हवेतच खेळत होता. मारत होता. पण आश्वासक वाटत नव्हते. आणि ते वाटू लागला तेव्हा नेमका बाद झाला.

आता सामना नेहमीसारखा क्लोज होईल असे वाटते.

“ सचिन बरोबर तुलना तर फारच अस्थायी वाटली. ” - सचिन सारखा खेळाडू अक्षरशः विरळा आहे रे. खेळातलं स्किल थोडावेळ बाजूला ठेवलं तरी खेळाची, परिस्थितीची समज, खेळ कंट्रोल करण्याची क्षमता, स्वतःच्या समकालीन आणि नंतरच्या ३ पिढ्यांवरचा प्रभाव ह्या सगळ्या गोष्टी एकाच खेळाडूकडे असणं फार रेअर आहे.

चला अपेक्षेप्रमाणे राजस्थान लौकिकाला जागली.
अंदाजाला क्रिकेट नॉलेज ची जोड असेल तर ते चुकायची शक्यता कमी होते Happy

हेझलवूड
पहिले १० बॉल २६-०
पुढचे १४ बॉल ७-४

अंदाजाला क्रिकेट नॉलेज ची जोड असेल तर ते चुकायची शक्यता कमी होते >> Happy कमीत कमी आज जुरेल ने जवळ आणले ह्याचाच आनंद. जुरेलचा आजचा हेझलवूडसमोरचा खेळ बघून स्टार्क समोर तो का खेळू शकला नसावा हे स्पष्ट झाले असावे का ? राजस्थान फारच टॉप हेवी झाले आहे नि संजू नसणे भारीच नडतेय. (आय नो धिस मे साऊंड ऑड) कोणीही शेवटपर्यंत खेळतच नाहिये.

खेळाची, परिस्थितीची समज, खेळ कंट्रोल करण्याची क्षमता, स्वतःच्या समकालीन आणि नंतरच्या ३ पिढ्यांवरचा प्रभाव ह्या सगळ्या गोष्टी एकाच खेळाडूकडे असणं फार रेअर आहे. >> +१५७२ . त्यात हे पण अ‍ॅड कर कि असंख्य अवाजवी अपेक्षांचे ओझे डोक्यावर ठेवून सातत्याने चांगले खेळणे. (लारा किंवा पॉंटींग सारख्या अतूट प्रतिभावंत खेळाडूंच्या कारकिर्दीमधे आलेले मेंटल ब्लॉक बघितले कि हे अधिक दिसते.) वडलांचे दिवस संपायच्या आत देशासाठी खेळायला जाणारा खेळाडू स्वतःच्या शतकासाठी स्लो खेळला असे चिरकूट आरोप पाहिल्यानंतर हे अधिकच जाणवले आहे.

"कोणीही शेवटपर्यंत खेळतच नाहिये." - गेम क्लोज करायची कला विसरून गेल्यासारखं खेळलेत राजस्थान यंदा. होपफुली, पुढच्या वर्षी ते काही इंपॅक्टफुल प्लेयर्स उचलतील ट्रेडिंग विंडो मधे.

"असंख्य अवाजवी अपेक्षांचे ओझे डोक्यावर ठेवून सातत्याने चांगले खेळणे. " - ह्याला +२ मिलियन्स!!! एक सहज विचार करून बघ (त्याच्या मूव्हीत आहे हे) - २२ व्या वर्षी तो १९९६ चा वर्ल्डकप खेळला आणि त्या सेमी-फायनलला (कलकत्त्यात) भारताला फायनल ला नेण्याचं ओझं त्याच्याच खांद्यावर होतं. त्या एका फेटफुल रन-आऊटने सगळं चित्र बदललं. ह्याच विषयावर महत्वाचं - हॅपी बर्थडे सचिन!!!

Pages