Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सी एस के फॅन म्हणजे डोक्याला
सी एस के फॅन म्हणजे डोक्याला वैताग >> हे तू बोलावेस ? विंक
>>>>>
मी मुंबई सपोर्टर आहे.
धोणी आवडता खेळाडू आहे.
पण थालाभक्त म्हणून जी जमात आहे ती त्रासदायक आहे. रायडू त्यांचे नेतृत्त्व करतो.
कोहलीला बाद करून चुकी केली
कोहलीला बाद करून चुकी केली पंजाबने
कोहली आज परत ट्रॉल होणार 43
कोहली आज परत ट्रॉल होणार 43(34) >> त्याने खेळलेल्या पहिल्या बॉलपासून तो सिंगल्सवर भर देत होता. म्हणून कोहली ने एक साईड धरून ठेवायची नि इतरांनी दुसर्या साईडने सुटायचे असा प्लॅन असावा असे वाटले.
स्लो शॉर्ट बॉलस्पेक्षा फुलर बॉलसवर विकेट गेल्या हे आर सीबीसाठी चांगले लक्षण दिसत नाही - हेझलवूड अॅफेक्ट कमी होईल का ?
धोणी आवडता खेळाडू आहे.
पण थालाभक्त म्हणून जी जमात आहे ती त्रासदायक आहे. >> तुझ्या अशा पोस्ट्स वाचून मला भलभलत्या शंका येतात रे
१९० झाले आहेत
१९० झाले आहेत
समोरच्यांना बनवायचे आहेत.
बेंगलोर गोलंदाजी चागली आहे यंदा. क्लोज होणार सामना.
हेझलवूड आहेच. तो सुयश शर्मा सुद्धा गेल्यावेळी पंजाबला समजत नव्हता.
अय्यर गेला
अय्यर गेला
शेपर्ड ला वेळेवर आणला
अय्यर त्याच्या विरुद्ध 3 बॉल मधे 0 करून दोनदा गेलाय
पण थालाभक्त म्हणून जी जमात
पण थालाभक्त म्हणून जी जमात आहे ती त्रासदायक आहे. रायडू त्यांचे नेतृत्त्व करतो.
>>
लुक हू इज टॉकिंग
अनुष्काच्या खळ्या बघायची
अनुष्काच्या खळ्या बघायची तयारी करायची का ?
कृणाल पंड्या.... कम्माल स्पेल
कृणाल पंड्या.... कम्माल स्पेल!!
स्टोईनीस टीकायला हवा होता..
स्टोईनीस टीकायला हवा होता.. लास्ट ओवर ठरार हवा होता..
जेवायला जातो...
जेवायला जातो...
कोहलीचे आयपीएल जिंकल्यावर सेलिब्रेशन बघणे म्हणजे शिक्षा आहे.
त्याने शांत राहून सुखद धक्का द्यावा..
रडतोय कोहली.. डोळ्यांत पाणी
रडतोय कोहली.. डोळ्यांत पाणी मोमेन्ट
ई साला कप नम दे...
ई साला कप नम दु...
हेडन ने तुझ्या पर्सनल
हेडन ने तुझ्या पर्सनल माईलस्टोनवर बोल सांगितल्यावर दोन वाक्ये बोवान ज्या तर्हेने कोहलीने परत विषय फॅन, टीम नि सपोर्ट स्टाफ वर नेला ते जबरदस्त होते. अॅबेला मैदानात आणणे मस्त वाटले. हेझलवूडला पहिल्यांदाच इमोशनल झालेले पाहिले इतक्या वर्षांमधे.
पांड्या कडे चार ट्रॉफी झाल्या नि त्यातल्या दोन त्याच्या फायनल मधल्या परफॉर्नम्न्सवर आहेत ! वॉव !
अय्यर बद्दल वाईट वाटले. पंजाब कडे मस्त देशी लोकांचा कोअर झाला आहे. एक स्ट्राँग टीम झालेली आहे.
आरसीबी ला जिंकताना पाहणं हा
आरसीबी ला जिंकताना पाहणं हा एक इमोशनल अनुभव होता. विशेषतः शेवटच्या ओव्हरमधे कोहलीचे पाणावलेले डोळे बघून २००८ पासूनच्या (द्रविड, कुंबळे, एबी, गेल पासून कोहली, पाटीदार, जितेशपर्यंत) आरसीबी चा काळ डोळ्यासमोरून सरकत गेला. विको डिझर्व्ह करत होता हा कप! ‘ए साला कप नामदु‘!!!
Least matches Taken by
Least matches Taken by Captain to win
1 IPL Trophy
13 - Rohit/Patidar
15 - Warne/Hardik
24 - Gilchrist
33 - Warner
43 - Dhoni
47 - Gambhir
70 - Shreyas
2 IPL Trophies
44 - Rohit
59 - Dhoni
79 - Gambhir
3 IPL Trophies
75 - Rohit
159 - Dhoni
4 IPL Trophies
104 - Rohit
204 - Dhoni
5 IPL Trophies
116 - Rohit
226 - Dhoni
अभिनंदन, आरसीबी व बॅड लक
अभिनंदन, आरसीबी व बॅड लक पंजाब !!!!
*Least matches Taken by Captain to win* - क्रिकेटच्या अंनदाशी किंवा क्रिकेटची समज वाढण्याशी खरंच कांहीं हातभार आहे का असल्या आकडेवारीचा ? बहुतेक, मींच कालबाह्य झालो आहे क्रिकेट क्षेत्रात !!
आनंदाशी संबंध नक्कीच आहे.
आनंदाशी संबंध नक्कीच आहे.
५ ट्रॉफी मिळवणारे खेळाडू माझ्या आवडीचे आहेत याचा मला आनंद आहे
काही चुक आहे का या आंनदात?
काही चुक आहे का या आंनदात? >
काही चुक आहे का या आंनदात? >>> मग स्वत:चा आनंद स्वत: साजरा कर ना.. इथे सगळे सांगतात निरर्थक आकडेवारी टाकू नका, तरीही मुद्दाम टाकत रहाण्यात काय पॉईंट आहे ? आणि मुळात आत्ता ते खेळाडू जिंकलेले नसताता स्वतःचं टुमणं वाजवत बसण्यापेक्षा जिंकलेल्यांचं आणि फायनलला गेलेल्यांचं मनापासून कौतूक केलं तर कोणाचं फॅन असणं कमीही होत नाही.
यांच्या अपयशाचे आकडे बरे
यांच्या अपयशाचे आकडे बरे चालतात.
आणि कोण किती ट्रॉफी जिंकला हे आकडे निरर्थक आहेत?
..
जिंकलेल्यांचं आणि फायनलला गेलेल्यांचं मनापासून कौतूक केलं तर कोणाचं फॅन असणं कमीही होत नाही.
>>>>
म्हणजे तुम्हाला कळले च नाही.
वरचे आकडे पाटीदार मूळे च आले आहेत. पाहिले नाव वाचा
तुम्ही रोहीत धोणी वाचले आणि तलवार उपसली
यांच्या अपयशाचे आकडे बरे
यांच्या अपयशाचे आकडे बरे चालतात. >>>> कोणी मुद्दाम अपयशाची आकडेवारी देत नाही. तुझ्या तोंड फाटेस्तोवर स्तुतीला उत्तर म्हणून ती येते. लोकं ट्रॅपमध्ये अडकतात. आजची फायनल झाल्यानंतर कोणी रोहीत, धोनी, पंत ह्यांच्या यशापयशाबद्दल कोणी काहीही बोललं नव्हतं. तरी तू खाजवून खरूज काढतोयस. पूर्वी खरोखरच इथे चांगल्या चर्चा व्हायच्या.. हे भक्तीरसाचं आणि आकडेवारीचं तण फार वाढतय हल्ली.
वरचे आकडे पाटीदार मूळे च आले
वरचे आकडे पाटीदार मूळे च आले आहेत. >>> मग फक्त पाटीदारबद्दल बोलून थांबायचं होतं. हेतू एव्हडा स्वच्छ होता का खरच ?
काय थांबायचे होते? फॉरवर्डेड
काय थांबायचे होते? फॉरवर्डेड पोस्ट आहे. पाटीदार पहिल्या फटक्यात जिंकला त्यावरून बनवली कोणीतरी. मी फिरवली.
अजून एक
कृणाल पांड्या कौतुक
दोन आयपीएल फायनल सामनावीर मिळवणारा एकमेव खेळाडू कृणाल पांड्या
तीन वेगळ्या संघान फायनल नेणाराया अय्यरचे कौतुक सुद्धा केले आहेच.
purple cap प्रसिद्ध कृष्णा
purple cap प्रसिद्ध कृष्णा
Orange cap साई सुदर्शन
Most valuable player सूर्यकुमार यादव
तीन भारतीय खेळाडू
दोन इंग्लन्ड दौऱ्यावर जात आहेत
एक भारतीय 20 संघाचा कर्णधार आहे
भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी आनंदाची गोष्ट!
याला निरर्थक आकडेवारी म्हणा किंवा अचेेव्हमेंट. .. आनंद आहे.. कौतुक आहे
आणि हे पुरस्कार मिळायच्या आधीही इथे करून झाले आहे. पुरस्कार ही त्याची पावती.
फॉरवर्डे पोस्ट
फॉरवर्डे पोस्ट
बहुतांश मुद्दे पटले
इंग्लिश आहे म्हणून खाली भाषांतर
How did MI lose after scoring 203?
Firstly, 203 was not a par score for MI. The MI batsmen played safe. They were 142-2 at 13.4 overs when Surya got out. In next 6 overs MI scored just 62 runs. They never went for the calculated slog. Basically, they were 25-30 runs short by the end of the innings.
Secondly, the slaughter of Bumrah for 20 runs in his first over by Jos Inglis, flattened their confidence.
Thirdly, Rohit Sharma sat in the dugout for the entire PBKS innings. I have never seen a worse decision made in an IPL semi-final than this. It was just plain ridiculous to see a Captain who has won India CT and T20WC was cooling his heels in the dugout in a crunch match.
Fourth, Hardik was never in control of the game. At every 5 overs, PBKS was at par with the MI score. He underbowled himself and Santner with 2 overs each, and bowlers like Recce Topley, playing his first match of 2025, and Ashwini Kumar playing his first IPL, were made to bowl to the marauding Shreyas Iyer who hit them for 7 sixes. Between them the two bowlers gave away 95 runs.
Fifth, MI not only let go Nehal Wadhera in 2025 auction, they let him off by dropping a crucial catch when he was on 17, and PBKS was 98/3 in 10th over. He took PBKS to 156/3 in 15.3 overs to almost seal the match.
Basically MI lost their head. They never looked like they were fighting hard for a place in the final. They were merely sailing through the match until they realised that they are losing the game. On the other hand, every batsman in PBKS believed they will take their team to the final. Right from the time the first ball was bowled. They stayed in the hunt until the possessed Shreyas Iyer decided to go berserk and finish the match with one over to spare.
Stats show that MI committed a silent harakiri to lose the game and a place in the final.
#mumbaiindians #mumbai #punjabkings #punjab #PBKSvsMI #hardikpandya #rohitsharma #shreyasiyer #jaspritbumrah #JonnyBairstow
203 धावा काढल्यानंतरही MI चा पराभव कसा झाला?
प्रथम, 203 ही MI साठी सरासरी धावसंख्या नव्हती. MI च्या फलंदाजांनी सुरक्षित खेळ केला. सूर्यकुमार बाद झाला तेव्हा 13.4 षटकांत त्यांचा स्कोर 142-2 होता. पुढील 6 षटकांत MI ने केवळ 62 धावा केल्या. त्यांनी कधीही विचारपूर्वक आक्रमक फलंदाजी केली नाही. मुळात, डावाच्या अखेरीस त्यांच्या 25-30 धावा कमी होत्या.
दुसरे म्हणजे, जस Inglis ने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या षटकात 20 धावा वसूल केल्या, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डगमगला.
तिसरे म्हणजे, रोहित शर्मा संपूर्ण PBKS च्या डावात डगआऊटमध्ये बसला होता. IPL सेमीफायनलमध्ये यापेक्षा वाईट निर्णय मी कधीच पाहिला नाही. ज्या कर्णधाराने भारताला CT आणि T20WC जिंकून दिले, तो महत्त्वाच्या सामन्यात डगआऊटमध्ये बसून होता, हे हास्यास्पद होते.
चौथे म्हणजे, हार्दिकचे सामन्यावर नियंत्रण नव्हते. प्रत्येक 5 षटकांच्या अखेरीस, PBKS चा स्कोर MI च्या बरोबरीचा होता. त्याने स्वतःला आणि सँटनरला प्रत्येकी 2 षटके कमी दिली, आणि Reece Topley (ज्याने 2025 चा पहिला सामना खेळला) आणि अश्विनी कुमार (ज्याने पहिला IPL सामना खेळला) यांसारख्या गोलंदाजांना श्रेयस अय्यरविरुद्ध गोलंदाजी करण्यास भाग पाडले, ज्याने त्यांना 7 षटकार मारले. या दोन गोलंदाजांनी मिळून 95 धावा दिल्या.
पाचवे म्हणजे, MI ने 2025 च्या लिलावात Nehal Wadhera ला तर सोडलेच, पण 17 धावांवर असताना त्याचा महत्त्वाचा झेलही सोडला, त्यावेळी PBKS चा स्कोर 10 षटकांत 98/3 होता. त्याने PBKS ला 15.3 षटकांत 156/3 पर्यंत पोहोचवले आणि जवळपास सामना जिंकला.
एकंदरीत, MI ने आपला आत्मविश्वास गमावला. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत असे कधीच वाटले नाही. ते केवळ सामना पार करत होते, पण नंतर त्यांना समजले की ते सामना हरत आहेत. दुसरीकडे, PBKS मधील प्रत्येक फलंदाजाला विश्वास होता की ते आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन जातील. पहिल्या चेंडूपासूनच त्यांनी संघर्ष चालू ठेवला. Shreyas Iyer ने आक्रमक खेळ करत एक षटक शिल्लक असताना सामना जिंकला.
आकडेवारी दर्शवते की MI ने अंतिम फेरीतील स्थान गमावण्यासाठी शांतपणे 'हाराकिरी' केली.
मला जाणवलेली अजून एक गोष्ट,
मला जाणवलेली अजून एक गोष्ट,
जयवर्धनने बाहेरून सल्ले देत होता, जे की चुकीचं आहे. नक्की कोणती ओव्हर आठवत नाही पण त्याने लंबू साठी हातवारे केले की पांड्या reece topley ला बॉलिंग ला आणले. दुसरं म्हणजे, santner चा कोटा पूर्ण करायला पाहिजे होता. त्यानं टाकलेल्या २ ओव्हर्स कांय वाईट नव्हत्या.
बाहेरून सल्ले देणे तर चालूच
बाहेरून सल्ले देणे तर चालूच राहते .. त्यात काय चुकीचे वाटत नाही.. तसेही तो टोपलीचा सल्ला अंगाशी आला
सेन्टेनरला बॉलिंग न देणे चूकच होते .. त्याला विकेट सुद्धा आली असती पण बाउंडरीचा फिल्डर पुढे लावलेला
काल बेंगलोरणे कृणाल वर विश्वास दाखवला.. आणि यांनी सेंटेनर वर अविश्वास.. निकाल समोर आहे.
READ: Stampede in RCB Victory
दुःखद बातमी
RCB victory turns tragic top developments: 8 dead in Chinnaswamy stampede in Bengaluru; child among victims, over 40 injured
मी कालच बोललो होतो यांच्या
मी कालच बोललो होतो यांच्या हातात ट्रॉफी म्हणजे माकडाच्या हातात मशाल.
Pages