आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिल पंत बुमराह राहुल ... कुठल्याच नावात धोनी कोहली शर्मा असा दम वाटत नाही कप्तान म्हणून. ज्याची जागा संघात पक्की किंवा जो महत्वाचा खेळाडू तो कप्तान असा सीन आहे सध्या.. बाकी लखनौ गोलंदाजी युनिट सगळ्यात कमजोर आहे या स्पर्धेत. काल त्यांचा दिग्वेश राठी सुद्धा नव्हता. मला वाटलेले की गुजरात करतील सुद्धा चेस. शेवटी चार ओवर मध्ये लखनौने बाजी मारली.

आता काही दिवसा तरी गिल आणि त्यानंतर जयस्वाल हे कॅप्टन्सीचे प्रबळ दावेदार असतील असे दिसतेय.... गिल आणि गंभीर कॉम्प्लिमेंट करतील एकमेकांना असे वाटतेय!!

गिल आणि गंभीर कॉम्प्लिमेंट करतील एकमेकांना असे वाटतेय!! >> मलाही असेच वाटते. फक्त डार्क हॉर्स श्रेयस असेल. जर तो संघात असला तर गंभीर त्य्ताला प्राधान्य देईल असे वाटते. पंतबद्दल तॉ भारी इम्पल्सिव्ह वाटतो त्यामूळे त्याचे ऑफ द बुक चेंजेस बरेचदा फसतात नि गंडलेले वाटतात.

बुमराह मुंबई साठी नि भारतासाठी लिमिटेड ओव्हर मधे जबरदस्त हिट झाला त्यावरून टेस्ट अ‍ॅटॅकमधे घेतला गेला तेंव्हा गावस्कर वगळता जवळजवळ प्रत्येक पंडीताने बुमरा कसोटीसाठी अक्सा सूटेबल नाही ह्याबद्दल बरीच टीप्पणी केली होती. कंवेंशनल विस्डम बघता ते फारसे चुकीछे नव्हते. बुमराने सगळे खोटे ठरवले. त्या वीअर्ड बॉलिंङ अ‍ॅक्शनपलीकडे एक भयंकर सुपिक मेंदू आहे नि ओव्हरअ‍ॅल खेळाची समज नि गेम रीड करणे त्याला जमते हे त्याने बरेचदा दाखवून दिले आहे. इंजरी हा भाग नसता तर तो एक उत्तम कॅप्टन ठरला असता असे वाटते.

शमी टेस्ट अ‍ॅ़टॅ़ कमधे नसण्याचे चान्सेस आहेत हे एका परीने चांगलीच गोष्ट आहे. तेव्हढाच तो लिमिटेड ओव्हरसाठी सेव्ह केला जाईल नि टेस्टमधे कोणि तरी नवीन बॉलर पुढे येऊ शकेल. निव्वळ शमी असल्याने आपला टेस्ट अ‍ॅ़टॅक एकदम ब्रिलियंट होईल असे वाटत नाही.

“शमी टेस्ट अ‍ॅ़टॅ़ कमधे नसण्याचे चान्सेस आहेत हे एका परीने चांगलीच गोष्ट आहे.” - ऑस्ट्रेलिया मधला इंडियाचा परफॉर्मन्स पाहता, आणि बुमराह ची इंज्युरी प्रोन बॉडी लक्षात घेता मला वाटतं की पुढच्या एक-दोन वर्षात बुमराह-शामी च्या प्रेझेन्समधे आकाश/सिराज/प्रसिध डेव्हलप व्हावेत (हर्षित??)

मुंबई पोहोचते वाटते टॉप २ मध्ये...
किती टारगेट देतात कल्पना नाही पण जे देतील ते आता मुंबई गोलंदाजांसमोर चेस करणे अवघड आहे..

सूर्याने मात्र यंदा कमाल केली..
१४ पैकी १४ वेळा २५ धावा पार केल्या... अफाट सातत्य.. ते सुद्धा त्याच्यासारख्या हाय स्ट्राइक रेटने खेळणाऱ्या प्लेयर कडून..

मुंबई हरली आणि चौथी आली

आता मुंबईला ट्रॉफी जिंकायला गुजरात, बेंगलोर आणि पंजाब या तिघांना एकेकदा हरवावे लागणार.

आणि गंमत म्हणजे लीग मॅचेस मध्ये मुंबई या तिघांशी चार सामने खेळली आहे. (गुजरात सोबत दोन वेळा) आणि हे चारही सामने हरली आहे Happy

एक तो विचित्र स्कूप शॉट मारायचा प्रयत्न सोडला तर पंत नॉर्मल खेळला सुरूवातीला नि लगेच मोठा स्कोअर करून गेला. तो असाही एव्हढा अनऑर्थोडॉक्स आहे कि अजून विचित्र शॉट्स का खेळायला जातो देवच जाणे !

जितेश शर्मा
ब्रावो...

Q1 : PBKS X RCB
E1 : GT X MI

RCB यंदा 7 पैकी 7 अवे गेम्स जिंकले

काय खेळलाय आज जितेश शर्मा ! मयांक नि कोहली पण जबरदस्त खेळलेअस, आर सी बी नि पंजाब दोन्ही टॉप टीम म्हणून एकदम सार्थ आहेत.

आज बाहेर होतो. आताच घरी आलो.
पंतने आज थेट शतक मारले
हायलाईट निवांत बघेनच.
पण इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासाठी यापेक्षा मोठी आनंदाची बातमी नसावी!

“ काय खेळलाय आज जितेश शर्मा ! मयांक नि कोहली पण जबरदस्त खेळले” - +१

मयंकने आकाशच्या एका ओव्हरमधे मारलेले तीन सलग चौकार क्लास होते. डबल विकेटमुळे आलेलं प्रेशर एकदम निघून गेलं. जितेश आज एक स्पेशल इनिंग खेळून गेला. किंबहूना आजच्या विजयामुळे आरसीबीच्या मिडल ऑर्डरला कॉन्फिडंस येईल - विराटच्या विकेटनंतर १००+ रन्स (१२ च्या अ‍ॅव्हरेजने) करून जिंकले आहेत आज.

>>माझा अंदाज:

टॉप ३: MI, SRH, KKR
मिड टेबल: RR, Punjab, GT and CSK
बॉटम ३: RCB, DC, LSG

Submitted by स्वरुप on 19 March, 2025 - 20:30

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयपीएलने अस्मादिकांच्या अंदाजाला धोबीपछाड दिलेला आहे Wink

Feeling Good For RCB
Also Feeling Good For Priety Zinta Happy

कालची मॅच बघितली नाही पण स्कोअर अधूनमधून चेक करत होतो.... कोहली आउट झाल्यावर RCB मॅच जिंकेल असे वाटले नव्हते.... सकाळी बघितले तर जितेश शर्मा नी जिंकुन दिलेली दिसली!!

>>किंबहूना आजच्या विजयामुळे आरसीबीच्या मिडल ऑर्डरला कॉन्फिडंस येईल
अगदीच!!

सकाळी बघितले तर जितेश शर्मा नी जिंकुन दिलेली दिसली!!
>>
हायलईट्स बघ
जितेश 49 var असताना कॅच पकडला दिग्वेश च्या बोलिंग वर, त्यानी पिच वर सही वालं सेलिब्रेशन केलं.. पण नो बॉल निघाला (तो पण बॅक टो मुळे).. फ्री हिट वर जितेश नी सिक्स मारून 50 केली

त्याच ओव्हर मधे दिग्वेश नी मांकडींग पण केलं, पण थर्ड अंपायर कडे असताना पंत नी अपील मागे घेतलं

कोहली आउट झाल्यावर RCB ला 105 रन हव्या होत्या, मयंक 21 वर होता. खेळ संपला तेव्हा मयंक 41 वर नॉट आउट होता अन् जितेश 85 वर...
कमाल फोडला...

"पण थर्ड अंपायर कडे असताना पंत नी अपील मागे घेतलं" - तो तसाही नॉट-आऊट होता. दिग्वेश चा हात त्याच्या highest position च्या पुढे आला होता. मला वाटतं, त्याची अ‍ॅक्शन पूर्ण झाली, पण त्याने बॉल रिलीज नाही केला.

नॉन-स्ट्रायकर एण्डला रन-आऊट करण्यात काही खिलाडूवृत्तीची हानी होते असं मला वाटत नाही. तो नियम आहे आणि त्याप्रमाणे विकेट काढायला काही हरकत नाही. जसं स्टंपिंग च्या वेळी (किंवा इतर कुठल्याही विकेट्सच्या वेळी) कॅप्टन्स अपील मागे घेत नाहीत, तसंच ह्या बाबतीतही करायची गरज नाही. उगाचच ह्या विकेटला निगेटीव्ह कॉनोटेशन आहे.

मला वाटतं, त्याची अ‍ॅक्शन पूर्ण झाली, पण त्याने बॉल रिलीज नाही केला. >> +१
उगाचच ह्या विकेटला निगेटीव्ह कॉनोटेशन आहे. >> +१

प्लेऑफ साठी एकंदर रीप्लेसमेंट बघता॑, मुंबई नि गुजराथ ह्यांना बेसिस कव्हर करता आले नाहित असे वाटाले. टायटन्स चे साहजिक आहे - बटलरला कसे रिप्लेस करणार म्हणा. मुंबई ने नगाला नग आणले आहेत असे वाटले. काईल जेमिसन्स अनसोल्ड होता हे आश्चर्य आहे.

नॉन-स्ट्रायकर एण्डला रन-आऊट करण्यात काही खिलाडूवृत्तीची हानी होते असं मला वाटत नाही. तो नियम आहे आणि त्याप्रमाणे विकेट काढायला काही हरकत नाही. जसं स्टंपिंग च्या वेळी (किंवा इतर कुठल्याही विकेट्सच्या वेळी) कॅप्टन्स अपील मागे घेत नाहीत, तसंच ह्या बाबतीतही करायची गरज नाही. उगाचच ह्या विकेटला निगेटीव्ह कॉनोटेशन आहे.
+1

Pages