Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पांड्या मुंबईत येणारच्या अफवा
पांड्या मुंबईत येणारच्या अफवा असतानाच बातम्या आलेल्या की त्यानं अट ठेवली म्हणून.
Indian express मध्येही छापून आलं होत.
ते मी दिलेले उदाहरण आहे की
ते मी दिलेले उदाहरण आहे की तुमचा निकष लावता सचिनने सुद्धा आपली लीगसी घालवली आहे असे करून... पण कदाचित ते तुम्हाला मान्य होणार नाही >> परत मी जे म्हटले नाही किंवा ज्याचा माझ्या पोस्ट मधे उल्लेखही नाही ते परत परत बोल्ड करून लिहिणे , खास सचिनचा उल्लेख करून देणे हे फक्त तुझ्या मनाचे खेळ आहेत. माझा मुद्दा फक्त धोनीच्या लीगसीबद्दलच होता नि आहे. हा प्रश्न विचारणारा मी इथे एकटाच नाही हे दिसते आहे. बाहेर भरपूर माजी खेळाडू ह्याबद्दल बोलले आहेत (मला हेही मान्य आहे कि माजी खेळाडू सकट सगळ्यांपेक्षा तुझे ज्ञान अगाढ आहे) . इथे निव्वळ धोनी नाव आल्यामूळे तू सटकलायस हे सहज कळते आहे
अर्जुन किंवा सचिन तेंडूलकरच्या लीगसीबद्दल तुला शंका असेल तर तू जरुर विचारू शकतो. माझे त्यावर पास करण्याव्यतिरिक्त काहिही प्रतिक्रिया नाही. पण ते वापरून धोनीच्या लीगसी वर परीणाम होणे ह्याचा बचाव करणे म्हणजे - तू वकिल असतास तर एखाद्या खुन्याचा बचाव करण्यासाठी, दुसर्या खुन्याला शिक्क्षा दिली नाही म्हणून ह्यालाही देता येणार नाही असा धन्य बचाव करणे झाले (ते ऐकून जजने तुझ्या अशिलाच्या हाती स्वतःलाच गळफास लावून घेतला असता
- इथे तुझ्याशी वाद घालणार्यांचे तेच होत असते म्हणा
)
"बाकी आयपीएल अनुल्लेख करू नकाच. त्यातील परफॉर्मन्स जरूर बघा. पण धोनी संघात आहे त्याचा याच्याशी काही संबंध नाही. आयपीएल मध्ये कित्येक देशांचे निवृत्त खेळाडू खेळतातच. जगभरातल्या सर्व लीग मध्ये खेळतात. हेच फ्रॅंचायजी क्रिकेट आहे! " - ह्या सबगोलांकार विधानांचा धोनीबद्दल मी लिहिल्याशी काय संबंध हे फक्त तुझ्याच डोक्यातच स्पष्ट असेल. मी कुठेही धोनीचा त्याच्याशी संबंध असल्याचे लिहिले नाहिये. पोस्ट परत वाचावी. अर्थ कळत नाहीये हे उघड दिसत आहे. त्यात फार काही नवीन नाही , धोनी, चुम्मा, शर्मा हि तीन नावे आली की नकारात्मक काही लिहिणे तुला झेपत नाही त्यामूळे हे स्वाभाविक आहे.
आणि म्हणूनच त्याचे करिअर
आणि म्हणूनच त्याचे करिअर लांबवणे जास्त अनाकलनीय वाटतेय >> चोक्कस स्वरुप !
पांड्या मुंबईत येणारच्या अफवा
पांड्या मुंबईत येणारच्या अफवा असतानाच बातम्या आलेल्या की त्यानं अट ठेवली म्हणून.
Indian express मध्येही छापून आलं होत. >> त्यांना इंग्लिश फारसे कळत नाही (असे तेच म्हणालेत) त्यामूळे ते Indian express वाचत असण्याची शक्यता शून्य आहे. सर स्वतः आंघोळ करून टॉवेल लावून बाहेर येऊन टी.व्ही.वर बघितल्याशिवाय अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत.
मग पांड्याने ह्याचा अंबानी
मग पांड्याने ह्याचा अंबानी समोर कॅप्टन बनवण्याची अट कशी काय ठेवली? मुळात शर्मा चा अपमान झाला हे त्याच्या फॅन्स नेच ठरवलं होत. >> मुंबई जवळजवळ प्रत्येक सामन्यामधे रोहित ला फिल्डींगच्या वेळी कटाक्षाने बाहेर ठेवतेय. काल कॅच सोडल्यावर लगेच परत बाहेर बोलावले. हा रोहितचा सरळसरळ उपमर्द नाहि होत का त्याच्या फॅन्स्च्या मते हे कसे काय ते कोण जाणे !
पांड्या मुंबईत येणारच्या अफवा
पांड्या मुंबईत येणारच्या अफवा असतानाच बातम्या आलेल्या की त्यानं अट ठेवली म्हणून.
Indian express मध्येही छापून आलं होत.
>>>>>
अफवा असताना हे तुम्हीच म्हणालात आता मी आणखी काय बोलणार
काल कॅच सोडल्यावर लगेच परत
काल कॅच सोडल्यावर लगेच परत बाहेर बोलावले..
>>>>
जेव्हा सबस्टिट्यूट आला तेव्हा बाहेर बोलावले.
इतके क्रिकेट तुम्हाला खरेच कळत नाही की उगाच रोहितला टारगेट करायचे म्हणून बोलायचे
धोनी च्या परफॉर्मन्स ची तुलना
धोनी च्या परफॉर्मन्स ची तुलना करताना अर्जुन तेंडुलकर च्या परफॉर्मन्स चं उदाहरण द्यावं लागतंय हेच काय कमी आहे??
धोनी नी ही वाचलं तर उरलेल्या मॅचेस ही न खेळता किट शमी (बॉलर नाही, वनस्पती) च्या झाडावर टांगून ठेवेल...
धोनी, चुम्मा, शर्मा हि तीन
धोनी, चुम्मा, शर्मा हि तीन नावे आली की नकारात्मक काही लिहिणे तुला झेपत नाही
>>>>
चुकीचे लिहाल तर नक्कीच खोडून काढेन
कारण त्यांचा चाहता आहे मी
धोनी च्या परफॉर्मन्स ची तुलना
धोनी च्या परफॉर्मन्स ची तुलना करताना अर्जुन तेंडुलकर च्या परफॉर्मन्स चं उदाहरण द्यावं लागतंय हेच काय कमी आहे??
>>>>>
खरेच मुद्दा कळला नाही का?
तुलना परफॉर्मन्सची नाही तर फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये संघात जागा परफॉर्मन्स व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या आधारावर मिळते यावर आहे.
चुकीचे लिहाल तर नक्कीच खोडून
चुकीचे लिहाल तर नक्कीच खोडून काढेन
>>
या तिघांबाबत काहीही नकारात्मक हे चूकच या पावित्र्यात असतोस तू
चाहता नाही, अंधभक्त म्हण...
अर्जुन किंवा सचिन
अर्जुन किंवा सचिन तेंडूलकरच्या लीगसीबद्दल तुला शंका असेल तर तू जरुर विचारू शकतो. माझे त्यावर पास करण्याव्यतिरिक्त काहिही प्रतिक्रिया नाही.
>>>>
मला बिलकुल शंका नाहीये. कारण माझ्यानुसार हे फ्रेंचाईजी क्रिकेट आहे आणि इथे असे चालणारच.
पण उलट तुमचा निकष लावता त्यावर शंका उपस्थित होत आहे. पण अर्थात तुमचा टारगेट धोनी आहे हे उघड आहे त्यामुळे तुम्ही हा निकष आणखी कोणाला लावणार नाही हे माहीत आहे
चाहता नाही, अंधभक्त म्हण...
चाहता नाही, अंधभक्त म्हण...
>>>>
आपण ते चाहते आणि समोरचे ते अंधभक्त
तुलना परफॉर्मन्सची नाही तर
तुलना परफॉर्मन्सची नाही तर फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये संघात जागा परफॉर्मन्स व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या आधारावर मिळते यावर आहे.
>>
खरेच मुद्दा कळला नाही का?
की अंगावर शेकायला लागल्यावर नेहमीप्रमाणे सोयिस्कर रित्या पेडगाव ची वाट धरतो आहेस?
जेव्हा सबस्टिट्यूट आला तेव्हा
जेव्हा सबस्टिट्यूट आला तेव्हा बाहेर बोलावले.
कॅच सोडला म्हणून एका ओव्हरनंतर लगेच सब केले. सब केले म्हणून बाहेर गेला. कार्यकारणभाव वगैरे समजून घेत जा कधी तरी. रच्याकाने - जवळजवळ प्रत्येक सामन्यामधे फिल्डींगला बाहेर ठेवलय - हा केव्हढा उपमर्द हा मुद्दा होता तो राहिलाच सर. 
इतके क्रिकेट तुम्हाला खरेच कळत नाही की उगाच रोहितला टारगेट करायचे म्हणून बोलायचे >>
ओके असो
अंगावर शेकायला लागल्यावर नेहमीप्रमाणे सोयिस्कर रित्या पेडगाव ची वाट धरतो आहेस?
>>>
ओके
असो
जवळजवळ प्रत्येक सामन्यामधे
जवळजवळ प्रत्येक सामन्यामधे फिल्डींगला बाहेर ठेवलय - हा केव्हढा उपमर्द हा मुद्दा होता तो राहिलाच सर. Wink
>>>>>
प्रत्येक सामना बॅटिंग करून आराम करतोय म्हणून फिल जेलस
तुम्ही हा निकष आणखी कोणाला
तुम्ही हा निकष आणखी कोणाला लावणार नाही हे माहीत आहे
>>
परफॉर्मन्स होत नसताना, वय झालेलं असताना, गोचीडा सारखा अजून कोण चिकटून बसला आहे ते सांग
आपण त्यालाही हाच निकष लाऊ...
परफॉर्मन्स होत नसताना, वय
परफॉर्मन्स होत नसताना, वय झालेलं असताना, गोचीडा सारखा अजून कोण चिकटून बसला आहे ते सांग
आपण त्यालाही हाच निकष लाऊ...
>>>>
वर उदाहरण दिले ना एक...
डीझर्व करत नसताना वशिलामुळे संघात असलेला..
कारण फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे.. मालक ठरवतील...
आपल्याला उठाठेव कशाला
पण उलट तुमचा निकष लावता
पण उलट तुमचा निकष लावता त्यावर शंका उपस्थित होत आहे. पण अर्थात तुमचा टारगेट धोनी आहे हे उघड आहे >> आता धोनीबद्दल लिहिताना धोनीचे नाव न घेता कसे लिहायचे बुवा ? रंपा. घेत नाहीस असे म्हणतोस त्याची शंका येतेय आता
परफॉर्मन्स होत नसताना, वय
परफॉर्मन्स होत नसताना, वय झालेलं असताना, गोचीडा सारखा अजून कोण चिकटून बसला आहे ते सांग
आपण त्यालाही हाच निकष लाऊ...
>>>>
वर उदाहरण दिले ना एक...
तुलना परफॉर्मन्सची नाही
>>
एक पे रहेना
या तो घोडा बोलना या चतुर बोलना
एक वरच आहे.
एक वरच आहे.
मुद्दा कळत नसेल किंवा कळून विरोधच करायचा असेल तर सोडून देऊ
सचिन नाव घेऊन भावना दुखावल्या याबद्दल क्षमस्व आणि शुभरात्री!
मुद्दा नसेल काळात किंवा कळून
मुद्दा नसेल काळात किंवा कळून विरोधच करायचा असेल तर सोडून देऊ.
>>
लुक हू इज टॉकिंग
प्रत्येक सामना बॅटिंग करून
प्रत्येक सामना बॅटिंग करून आराम करतोय म्हणून फिल जेलस >> नक्कीच रंपा. ईफेक्ट
- जेलस चा अर्थ कळतो का ? मी जेलस व्हायला सामना खेळत आहे का ? काल ५ बॉल बॅटींग केली नि १८ ओव्हर्स बाहेर होता नि मग फिल्डींगला आलेला. चौथ्या किंवा पाचव्या सामन्यामधे कॅच ड्रॉप केला. पुढच्या ओव्हर नंतर सब केले गेले. दोन सामन्यापूर्वी हर्श भोगले ने त्याला विचारलेले ह्याबद्दल तेंव्हा मला मैदानात पूर्ण वेळ राहायला आवडेल असे म्हणाला होता. सर स्वतःच्या श्रद्धास्थानावर तरी विश्वास ठेवा कि.
१० ओवर १३९ हवे होते
१० ओवर १३९ हवे होते
५ ओवर ६८-० आले
अजून ५ ओवर ७१ हवेत
फोर सिक्स फोर...
फोर सिक्स फोर...
शाहरुख... बदाम बदाम बदाम
या नावातच जादू आहे
२० बॉल ४८ झाले
अपेक्षेपेक्षा चांगले खेळले
अपेक्षेपेक्षा चांगले खेळले टायटन्स ! अहमदाबादचे पिच फायनलला असणे टायटन्सना अॅडवांटेज दिल्यासारखे होत नाहि का ? पहिल्या दोन मधे असणे मधल्या विश्रांतीसाठी यंदा अधिकच जरुरी झालेय. कोण हे स्क्येडूलिंग करतात देव जाणे !
तो अर्शद खान नि नेहरा दोघांचेही लँडींग किती सारखे आहे. दोघेही असेच पडलेत.
चुम्मा विजय...
चुम्मा विजय...
रबाडाला मारलेले शेवटचे दोन सिक्स निर्णायक ठरतात की काय असे वाटलेले.. पण ४ ओवर ५४ नंतर लढलेच नाहीत.
चुम्माचा दुसरा सिक्स मात्र मस्त जबरदस्त होता.. नो लूक!
गेल्या दोन मॅचेसमधे पंतची
गेल्या दोन मॅचेसमधे पंतची कॅप्टन्सी बघता तो इंडियाच्या कॅप्टन्सी रेसमधे असेल ही अंधश्रद्धा वाटते. अत्यंत अनाकलनीय बॉलिंग चेंजेस, गल्ली क्रिकेटप्रमाणे बॉल फॉलो करणारी फिल्ड प्लेसिंग्ज पाहिल्यावर लखनौ केवळ कॅप्टन्सीच्या जीवावर सुद्धा हारली असती असं वाटलं.
Pant is not captaincy
Pant is not captaincy material for sure
Pages