खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ >> भारी आहे. मुलाला इतके खाऊ आणून दिल्याबद्दल घरून ओरडा बसला नाही का ? Proud

जुई ची शेवपुरी मस्त दिसते आहे !

धनि हो, ओरडा पडला. मुलाची आई आणि माझी आई दोघींकडून पडला. पण मुलाच्या आनंदापुढे कमी वाटला. पहिल्यांदा त्याला कुठल्या सुपर मार्केटमध्ये नेले होते. त्यामुळे जे हवे ते बिनधास्त बकेटमध्ये टाकायचा आनंद लुटत होता. त्याच्यासाठी हे बकेट लिस्ट पूर्ण व्हायच्या आनंदासारखेच झाले.

जे हवे ते बिनधास्त बकेटमध्ये टाकायचा आनंद लुटत होता. त्याच्यासाठी हे बकेट लिस्ट पूर्ण व्हायच्या आनंदासारखेच झाले. >>> Happy हे आवडलं.

धनि हो, ओरडा पडला >> Lol

पहिल्यांदा त्याला कुठल्या सुपर मार्केटमध्ये नेले होते. त्यामुळे जे हवे ते बिनधास्त बकेटमध्ये टाकायचा आनंद लुटत होता >> हे खरंच भारी आहे.
अगदी लिटरली "kid in a candy store" झाले त्याचे Happy

जे हवे ते बिनधास्त बकेटमध्ये टाकायचा आनंद लुटत होता. त्याच्यासाठी हे बकेट लिस्ट पूर्ण व्हायच्या आनंदासारखेच झाले. >> ऋ तू किती चांगला बाबा आहेस, तुझ्या मुलांबद्दल लिहिलेल्या पोस्टी वाचून नेहमीच असं वाटतं आज लिहितेय एवढंच.
घ्या सगळ्यांनी ...

ऋ, माम सामो धन्यवाद.
केशर आंबा घातला आहे . त्याचा रंग हापूस (कोकणात आम्ही बोलीभाषेत हापूस न म्हणता आपुस म्हणतो ) पेक्षा ही भारी असतो. नावासारखाच केशरी... ह्या वेळेला नीट फोटो काढला नाही, डब्यात भरल्यावर वाटलं फोटो काढू या , पुन्हा बशीत वगैरे मांडायचा कंटाळा आला, तसाच डब्याचाच काढला फोटो.

हेमाताई, नारळाच्या वड्या सुरेख!

आपकी नारीयलबडी देखी, बहुत हसीन है| इन्हे कभी मुह में मत डालियेगा, घुल जाएगी | (पण हे शक्य नाहीये Happy )

रच्याकने तो केशराचा रंग आहे का आंब्याचा?

जबरदस्त...
ममो तुमचं सर्वच करणं निगुतीचे असते. >>१०००

ह्या वेळेला नीट फोटो काढला नाही, डब्यात भरल्यावर वाटलं फोटो काढू या , पुन्हा बशीत वगैरे मांडायचा कंटाळा आला, तसाच डब्याचाच काढला फोटो.>>> ममो ! तुमच्या पदार्थाच म्हणजे "जातिच्या सुन्दराला..." टाइप आहे, वेगळ प्लेटिन्ग केलत तर ए प्लस बाकी ते तसेही ए वन आहेतच..

सर्वांना मनापासून धन्यवाद... वड्यांचं कौतुक वाचून खरच खूप छान वाटलं.
पिहू १४, अग नॉर्मल नारळाच्या वड्याच आहेत. अडीच कप डेसिकेटेड कोकोनट, एक कप साखर, एक कप दूध, तीन चमचे डेअरी व्हाईट पावडर आणि एक आंब्याचा गाळून घेतलेला रस. एकत्र करून आटवल . गोळा होत आल्यावर एक चमचा तूप घातलं, दोन मिनिटांनी गॅस बंद केला आणि ढवळत राहिले, पाच मिनिटांनी बटर पेपरवर वड्या थापल्या. वर पिस्त्याचे बारीक कप भूरभूरवले आणि वरून लाटणं फिरवलं त्यामुळे ते नीट बसले. साधारण गार झाल्यावर वड्या कापल्या. वड्या कापताना सुरी खराब झाली तर नीट पुसून घ्यायची म्हणजे नीट वड्या कापता येतात. बटर पेपर मुळे निघाल्या पटकन वड्या.

वड्या कापताना प्रथम लांबी रुंदीत दोन्हीकडे मध्यात कट द्यायचा आणि मग दोन्ही बाजूला कट द्यायचे म्हणजे वड्या सारख्या आकाराच्या कापल्या जातात.

केशर आंब्यामुळे रंग एकदम भारी आला आहे. केशर वगैरे काही घातलं नाहीये. पण आंबा कमी असेल तरी फिकट पिवळा रंग ही सुंदर दिसेल. आंब्याच्या प्रमाणात साखर कमी जास्त करा.

ममो, पत्ता द्या तुमचा. वड्यांचा डबा रिकामा व्हायच्या आत तिकडे यायलाच हवं Proud
कातिल दिसतायत वड्या!!

मनीमोहोर, तुम्ही शेयरलेले साबुदाणा वडे बघितल्यापासूनच खाण्याची तीव्र इच्छा होती.

आज योग आला.

वड्यांच्या कौतुकासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
अनिंद्य , मस्तच झालेत साबुदाणा वडे.. आणि हिरवीगार चटणी सुंदर दिसतेय.

फार तामझाम नाही. साधेसेच जेवण. कोलंबी आणि चपाती. नंतर भातावर याचीच चटणी. फोटोत कोलंबी झाकली जाऊ नये म्हणून वाटीत आधी जास्त घेतली नाही

IMG-20250505-WA0010.jpg

अनिंद्य,
Mr, Mrs and Junior साबुदाणा वडे मस्तच.
चटणीचा रंग मस्त आलाय.
ऋन्मेष,
कोळंबी जबरी दिसतेय.
मला सी फूडमध्ये सगळ्यात जास्त कोळंबी आवडते.
सकाळी सकाळी इथे यायचं म्हणजे काळजावर दगड ठेवावा लागतो

Pages