पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानभुली, सामो व इतर,
अमितला भेट दिलेलं पाब्लो पिकासोने १९३२ साली काढलेलं सुप्रसिद्ध पेंटिंग 'वुमन विथ अ बुक' आहे. थोडी माहिती :
*Woman with a Book* (1932)- Woman with a Book is one of Picasso's most famous portraits of his beloved Marie-Thérèse Walter, balancing sensuality and constraint by enclosing exuberant, thickly applied colour in a network of sinuous black lines. The piece is a tribute to Jean-Auguste-Dominique Ingres, a Neoclassical master of line whose work Picasso admired since he was a child. Picasso tapped into the sexuality hidden beneath Ingres's picture of bourgeois propriety by resting his model's head on her palm and replaced Madame Moitessier's fan with the fluttering pages of a book. The tranquil profile reflected in a mirror at right in Picasso's picture is also Neoclassical in style, although it could alternatively be an abstract self-portrait.

Perfect साजिरा style प्रतिसाद.
पु भा प्र Happy
धमाल Lol
तुमच्यातला सागर कारंडे तिकडेच स्किट सुरु करेल अशी एक चांगली आशा मनात होती Light 1
मनावर घ्या Happy

साजिरा, मनापासून धन्यवाद या माहितीसाठी.
वृ च्या आधीचा साहित्यिक वृ धमाल आहे.
मूव्हर्स & शेकर्श मधे शेसु मेन शो च्या आधी त्याच्या विलक्षण विनोदबुद्धी आणि निरीक्षणाने मन जिंकतो तसा वातावरण निर्मिती चा प्रकार आहे.
शो अभी बाकी है..

( आता लॅपटॉप दुरूस्त होईपर्यंत मोबाईल वरून जमेल तसं)

किल्लीचा वृ २:
.
दिवस रविवार १८ मे
आजि सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे..
सर्व प्राणीमात्र देवाचे अंश आहेत, मग माबोकर कसे अपवाद असतील. तेच माझ्यासाठी हरी रूप, त्यांना पाहण्यासाठी asthetic look(ह्याला रमा आई तू रेनबो princess दिसतेस असं म्हणाली) करून माउली प्रसाद (बुंदी चे लाडू ) एका आजीबाई type पिशवीत भरून high heels घालून कार ची किल्ली फिरवत मी निघाले.
Parking मध्ये येऊन १० मिनिटे गाडी पुसली.
White शर्ट घालून धुळ पुसणे हे एक skill आहे, white मळू न देता अर्थात. Resume मध्ये आणि linked in वर add करणार आहे. Gen ai ला विचारते तो भारी शब्दांत सांगेल कसं लिहायचं.. तर तर असो ते.
मग मस्तपैकी map लावला spotify सुरु केलं.
पण गाडीची स्क्रीन ऑन च होईना (screenshots घेऊन केलेल्या पापांचा परिणाम तर नसेल ना अशी एक शंका मनाला चाटून गेली.. हे प्रकरण काय आहे ते पुढच्या gtg ला सांगेन किंवा बळी ठरलेल्यांना विचारा )
. मग म्हटलं जाऊ देत स्क्रीन, किल्ली फिरवली तर गाडीच ऑन होईना.
मग दिवा पेटला, गाडीचा नाही किल्लीचा!
म्हणजे माझ्या मेंदूचा हो Happy
Battery down झाली होती.
कर्मा! कधी नव्हते ते पार्किंग मिळणार होती, पावसात न भिजता छान गाणी ऐकत जायचा प्लॅन होता. पण नशीब च गरीब आपलं.
मग घरी जाऊन परत दुचाकीची किल्ली आणली, हेल्मेट रेनकोट घेऊन आले.
मग काय केलं?
दुचाकी पुसली Lol
ओढणी विसरले होते, sungalsses आणले पण लावले नाही.
कार ची किल्ली होती माझ्याकडे मग कार मध्ये backup ओढणी होती. ती कामाला आली. बांधली डोक्याला. जॅकेट चढवलं. हेल्मेट चढवलं आणि निघाले. धूम धूम करत.
पेट्रोल भरलं.
थोडं अंतर पुढे आले आणि signal वर पायात ठेवलेली पर्स मागे आली म्हणून गाडी थांबवली.
तर अहो आश्चर्य, फोन वाजत होता.
मधुर भंडारकर, नाही महिंद्र गोडबोले ह्यांचा call आला होता.
(हे वरचं सगळं का लिहितेय ह्याचं कारण कळेल आता)
ते गोड न बोलता म्हणाले किती वाजता actually पोचायचं आहे आणि मी कुठे आहे?
मी म्हणाले रस्त्यात.
तर थोडं अजून गोड न बोलता ते साडेनऊ ला पोचतील असं ठरलं.
संत्रा बर्फी मात्र गोड आणली होती.
बाकी पुढे येईलच.
.
मग चालली किल्ली पुढे आणि विश्रांतवाडी ला काय झालं. पहिल्या ओळीत जे लिहिलं ते
बरसे अमृताचा घनु.
आपण कलियुगात असल्यामुळे आणि माझं नाव अमृता नसल्याने पाण्याचा पाऊस पडत होता. मग जरा थांबून रेनकोट वगैरे चढवून स्वतःला पॅक केला.
ह्या परिस्थिती त visibility कमी होते आणि संथ गतीने ज्युपिटर नावाची scooty संगमवाडी पर्यंत पोचली.
मग तिकडे व्हाट्सअप वर स्वतः चं status कळवून आणि फोन ला सुरक्षित करून glen bakehouse च्या दिशेने स्वारी निघाली.
तिकडे गारवारे च्या मेट्रो पुलाच्या खालून उजवीकडे वाळा आपलं वळ असं map म्हणत होता. पण signal दिवा prohibited म्हणत होता.. पुढच्या चौकात पण तेच पण ह्यावेळी घेतलं माबोचं नाव आणि मारला right turn. मग ते सुप्रसिद्ध गल्ली नंबर ८सापडलं आणि मेरी मंजिल सुद्धा!
दुचाकी पार्क करायला कोपऱ्यात गेले होते तर तिकडे एक व्यक्ती माझ्याकडे ओळखीचं बघत होते पण ते हसले नाहीत.
कुठे बरं पाहिलंय ह्यांना, ते काही आठवत नव्हतं..त्यांनी त्यांची कार बहुधा bluish grey कलरची होती लावली आणि माझ्या मागोमागच कॅफेत शिरले.
वरती पोचल्यावर कळलं की मी मजबूत माती खाल्लीय आणि प्रत्यक्ष कृष्णा ह्यांना ओळखलं नाही आधी वाडेश्वर ला भेटून सुद्धा!
हरी समोर असूनही दर्शन घेतले नाही अशी अवस्था!
.
तर हे सगळं लिहिण्याचं कारण, मला पोचायला उशीर झाला, त्याची कारणे Happy

साजिरा Lol

आता वृ येउदेत
अमित तू लिहिणार आहेस Happy

हे आत्ता सगळं वरवर वाचलं आहे पण मस्त झालेले दिसत आहे गटग. काल मी ही व्हर्च्युअली थोडा वेळ येउन गेलो. किल्लीशी संपर्क होत नव्हता तोपर्यंत आम्ही एक व्हर्च्युअल वेटिंग लिस्ट गटगही केले. त्यावेळेस आणखी लोक व्हर्च्युअल वेटिंग लिस्ट मधे आहेत हे माहीत नव्हते, नाहीतर ते ही गटग मोठे झाले असते Happy

तो संपर्क का होत नव्हता हे आता वरचा किल्लीचा वृ-२ वाचून समजले. इतक्या करामती करून भारतीय स्टॅण्डर्ड टाइमप्रमाणे तरीही वेळेत पोहोचल्याबद्दल किल्लीला टोटल रिस्पेक्ट! Happy आणि हे गटग आयोजित केल्याबद्दलही धन्यवाद.

बाय द वे मी "थोडा वेळ येईन" म्हंटले ते "माझ्या बिझी स्केज्यूल शेड्यूलमधून...." मुळे वगैरे नव्हते. आरामात टीव्ही पाहात होतो व नंतरही तासभर पाहिला. पण इतके सगळे लोक तेथे जमले आहेत, त्यांना एकमेकांशी बोलण्यापेक्षा व्हिडीओवाल्यांचा पाहुणचार करत बसावे लागू नये म्हणून सर्वांना हाय करून मग लॉग ऑफ झालो Happy

अस्मिताला कोकोनट दाखवायला सांगणे हे आयडेण्टिटी प्रूफ होते बहुतेक Happy म्हणजे तीच नक्की अस्मिता आहे हे कन्फर्म करायला. कोकोनट आहे का विचारल्यावर तिने नारळ दाखवला असता तर तिला गटगमधूनही नारळ मिळाला असता.

ज्यांना आधी भेटलो आहे त्यांना एकत्रित "(मागे बघितले तेव्हापासून) काही फरक पडला नाही तुमच्यात" Happy बाकीच्यांना प्रतेक्ष कधीतरी भेटूच.

हर्पेन - चॉकोलेट्सचे लक्षात आहे. अमित -तुझ्या फोनवर एक मिस्ड कॉल दिसेल. तो मीच पार्टी क्रॅश करण्याच्या प्रयत्नातला होता. वावे - मागच्या वेळेस गटग हुकले पण यावेळेस निदान व्हर्च्युअल झाले Happy सिम्बाला भेटलेलो नाही पण ओळखतो. तो फार वेळ थांबला नाही का? रेशम_डोर - या निमित्ताने तुम्ही बर्‍याच दिवसांनी माबोवर दिसलात. आता येत जा परत. साजिर्‍याचा बहुलेखकीय वृ वाचतो आता. तो व आशू_डी दिसल्याने जुन्या पुपुच्या गटगांचे कनेक्शन एस्टॅब्लिश झाले. कृष्णाला मी बर्‍याच दिवसांनी पाहिल्याने ओळखले नाही. शरदजी सर्वात लांबून सर्वात लौकर आल्याने त्यांना टोटल रिस्पेक्ट! बिपिनसांगळेंच्या कथा आवडतात. त्यांनाही व्हर्च्युअली भेटून छान वाटले. व्हीबी, दोन्ही आश्विनी व यक्ष यांना बहुतेक पहिल्यांदाच भेटलो. नंतर आलेल्यांत अजूनही काही ओळखीचे नाहीत.

बाय द वे कोणी एक सरदारही होता का गटगला? सर्वात खालचा फोटो Wink

माझा व्हर्च्युअल वृ हा प्रत्यक्षातील लोकांच्या वृ पेक्षा मोठा आहे असे न होऊ देणे ही तुमची जबाबदारी आहे लोकहो!

साजिरा यांची साहित्यिक पोस्ट जबरदस्त. बखरकारांच्या वक्तव्यावरती खो खो हसले.

किल्लीचा वॄ खुसखुशीत.
पेंटींग मधे पुस्तक व सेन्श्युआलिटी नोट केलेलि होती. पिकासोच वाटलेला. पण बोलले नव्हते म्हटलं कोण्या भारतिय पेंटरने काढलेले असायचे आणि नक्कल केलेली असायची. आपण तसे बोललो तर पापड मोडायचा Happy

>>>> high heels घालून कार ची किल्ली फिरवत मी निघाले.
ओय होय!!! स्टायलिश मिस Happy किती सुंदर गं. मलाही हे असच आवडतं.

साजिरा यांचा साहित्यिक वृ झकास..
किल्ली मस्त लिहिले आहेस.
९.२० च्या मुहूर्ताचा खुलासा येऊ द्या आता.

सरदारही होता का >> Lol
माधव नामक इमारतीत ग्लेन नावाची खानावळ असू शकते तर काहीही ( पुणेरी सरदार) शक्य आहे.

>>>>सरदारही होता का
Lol

>>>>माधव नामक इमारतीत ग्लेन नावाची खानावळ असू शकते तर काहीही ( पुणेरी सरदार) शक्य आहे.
मेले Lol

निळ्या ड्रेसमध्ये एविता आहेत का? मला वाटते. एविता यांची लेखनशैली मला आवडते.
ब्राऊन शर्ट व स्कर्ट - रेशम डोर?
खास क्षण चित्रातील साजिरा व अमित यांच्या मागे अश्विनी११?
लाल शर्ट & पँट - अश्विनी ९९?

मागील पानावरील किल्लीचा वृ१ आणि साजिराचा अनेकांच्या दृष्टिकोनातील वृ इथपर्यंत वाचले. धमाल सुरू झाली आहे Lol
पुढचे अजून वाचायचे आहे.

सगळे चुकले Proud

अहो कार्याध्यक्ष, तुम्हीच ओळख करून द्या इथं क्रमाने सार्‍यांची

फा, लाँग टाईम नो सी..
आणि rmd चा फोन कधी आलेला? प्रज्ञा, अस्मिता यांचेही कळले नाहीत. केवढी बालवाडी भरवली माबोलेकरांनी

बालवाडी? बालवाडी??? खंडेराव अहो काय हे?! तुम्ही जु जा आहात म्हणून काय उरलेल्यांना असं म्हणतात? Proud

मी रत्नागिरीतून निघून पावसला पोहोचले होते. तिथे मलापण रेंज नीट मिळत नव्हती आणि अनयाचाच फक्त नंबर होता त्यामुळे दुसर्‍या कोणालाच मला फोन नाही करता आला.

किल्लीचा वृ ३:
वरती पोचले, एक छानशी asthetic पर्स, लाडू भरलेली कापडी पिशवी(जी नंतर वांगी आणि इतर भेटी घरी घेऊन जायला कामाला आली, tip : always carry पिशवी गटगला जाताना, एखादी extra न्यावी इतरांना देता येते, माणसाने स्वतः चा फक्त विचार करू नये.), हेल्मेट वगैरे घेऊन.
हे सगळं इथे ठेवू की तिथे ठेवू चाललं होतं. शेवटी ठेवलं एका कोपऱ्यात.
मला लगेच entry ला टाळ्या आणि standing ovation मिळालं.
हे किल्ली धागाकर्ती असून उशिरा आली म्हणून sarsastic अभिवादन आहे की खरंच कौतुक अशा संभ्रमात असताना माझ्यासाठी खुर्ची वगैरे काढून देण्यात आली.
ट डो पा moment पार!
मग प्रेमच असावं असं समजून स्थानापन्न होतंच होते की पुढचा बॉम्ब पडला.
ओळखा पाहू गेम आणि राज्य माझ्यावर.
चार दिवस आरशात पाहिलं नाही तर स्वतःला विसरणारी मी तिकडे माबोकर आणि id ह्यांच्या जोड्या कशी जुळवणार होते. तरी sharad g ह्यांनी आधीच त्यांचं नाव सांगून टाकलं आणि मला हुश्श झालं एकदम relax.
एक प्रश्न सुटला पण हर्पेन कसलेले परीक्षक होते तिकडे.
सगळे ओळख म्हणे क्रमवार.
दोन तीन क्लू घेऊन यक्ष ओळखले, सिम्बा ओळखले आणि बाकी कुणालाच नाही ओळखू शकले.
अश्विनी ११ ला आधी भेटले होते तिला सुद्धा नाही, vb चे photo पाहिलेले तिलाही नाही ओळखले.
मग सर्वांनी काय बावळट पोरगी असे मनात म्हणत ओळख करून दिली.
हर्पेन ना ओळखत नाही म्हटलं तर त्यांनी लगेच आगाऊ विशेषण बहाल केले मला, असे करतात का कधी....
तरी मध्ये अस्मिता आणि फा ह्यांचे miss झालेले msgs बघून त्यांना video call लावला होता, तिकडे थोडा वेळ बोललो.
(अस्मिता गोड मुलगी आहे, आणि आणि फा ४०कप चहा करत असतील असे वाटत नाही, फारफार तर ते एखाद्या कपंनीचे (note अनुस्वार) vp किंवा बँक मॅनेजर वाटतात. प्रत्यक्ष भेटून आणखी चर्चा केली पाहिजे दोडके तर असतीलच सोबतीला Wink )
पण ओळखा पाहू मधून सुटका होत नव्हती Happy
इतक्यात.
इतक्यात.
Hi मी साजिरा असे म्हणत साजिरा ह्यांचे आगमन झाले आणि मी वाचले बाई एकदाची.

>>>>>मग सर्वांनी काय बावळट पोरगी असे मनात म्हणत ओळख करून दिली.
काहीतरी बोलू नको Lol Lol हसवुन मारशील.

व्हर्च्युअल गटग, व्हिडिओ कॉल वगैरे... जोरदारच की!

फोटोंमध्ये बरेच चेहरे अनोळखी आहेत. जोड्या जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

साजिरा, साहित्यिक वृत्तांत अत्यंत भारी!
किल्ली, तुझी कमाल आहे. एवढी धावपळ करून आलीस याबद्दल साष्टांग नमस्कार.
मी हजेरी लावलेलं हे पहिलंच ऑफिशियल माबो गटग. खूप मजा आली. बहुतेक सर्वांना मी पहिल्यांदाच भेटले.
यावेळच्या पुणे भेटीत माझी भरपूर आप्तेष्ट-मित्रमैत्रिणींशी (माबो आणि माबोबाह्य) गाठभेट व्हावी असा एकंदरीत योग दिसतोय.

अरेच्या, सगळ्यांची ओळख कधी करून देणार आहात?
शरद, खरच खूप कौतुक वाटलं तुमच. एक गटगसाठी तुम्ही केवढा वेळ आणि एनर्जी दिलीत.

साजिरा Lol साहित्यिक वृ जोरदार एकदम. यक्षाचा पॅरा फार आवडला. पण आनंदात असलेला ग्लेन बेकाहौस वाला शेवटी आनंदात राहिला का नाही तेवढं सांगून सोडा.
किल्ली, अगदी आळंदीची पालखीच निघाली आहे विसावा घेत घेत, क्रमवार वृत्तांत वाचून वाटले. पण एवढ्या सकाळी गाडी हाकत येणे तेही पावसात यासाठी तुला नमस्कार!
फा, आपला फोन हुकला. आम्ही नंतर पोचलो पण फोन म्हणजे सिंहाची गुहा झाली होती. फक्त आत जाणारे आवाज जात होते बाहेर येणारे ऐकूच येत नव्हते Lol
शरदजी, तुमच्याशी जास्त बोलणे झाले नाही, पण सांगलीहून तुम्ही आलात यामुळेच आम्ही थक्क झालो होतो. आणि किती काय काय आणले होते! कमाल.

Pages