
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली 
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा 

.
सर्वात लवकर पोचलेले सभासद 

.
खास क्षण
.
.
.
व्हर्च्युअल हजेरी (धनी, rmd,
व्हर्च्युअल हजेरी (धनी, rmd, अवल, मुग्धा, फा, अस्मिता) - या सरप्राईझ म्हणता याव्यात. तसेच साजिरा यांनी हजेरी लावणे हे सुद्धा. तेव्हा रीडींग बरोबर निघाले.
तेजोने बिया व फुले दिलेली दिसतायत. किती गोड.
सांगलीचे भडंग प्रसिद्ध आहेतच. ती सुद्धा अनवट भेट आहे.
नागपूरच्या संत्र्यांची बर्फी - अरे वा!
साजिरा यांनी आणलेले चित्र पहाण्याची अनिवार उत्सुकता आहे. कारण कलेमधील रस. लवकर फोटो येऊ द्यात त्या चित्राचासुद्धा.
---------------------
लोक हो आधी प्रचि टाका आणि मग काय ते खाडाखोडी करत वृ लिहीत बसा.
---------------
आणि हो व्हर्च्युअल भेट देणार्यांनीही जमल्यास आपापले अनुभव व पर्सेप्शन्स लिहा.
पुण्यातलेच माबोकर अधुनमधून
पुण्यातलेच माबोकर अधुनमधून भेटतच असतील ना टेकड्यांवर.
आजच्या गटगला गेलेल्या
आजच्या गटगला गेलेल्या माबोकरांनो,
मस्त दणक्यात झालेलं दिसतंय गटग. भारीच !
चला, येऊद्यात तुमचे फोटोसहीत वृत्तांन्त.
टेकड्यांवर भेटणं वेगळं.
टेकड्यांवर भेटणं वेगळं. त्यावर एक वेगळं ललित होईल.
गटग वेगळं. प्रोटोकॉल असतो. सगळं रीतीने होत असतं.
वरती हजेरी पूर्ण झाली आहे.
वरती हजेरी पूर्ण झाली आहे.
Virtual सकट
.
कुणी राहिलं असल्यास सांगा
सगळं कसं सिस्टिमॅटिक येईल
.
Photos लावलेत
अजून काही आहेत.
रिया नाही आली का?
रिया नाही आली का?
.
ओह ओके वाचले. शी डिन्ट कम फॉर गटग.
व्हर्चुअलांची हजेरी लावा की
व्हर्चुअलांची हजेरी लावा की बाई
अस्मिता सोबत coconut chi पण
अस्मिता सोबत coconut chi पण हजेरी होती.
भारीच २० माबोकर. फारा
भारीच २० माबोकर. फारा दिवसांनी असं मोठं गटग झालं न. अमित बघ तुझा पायगुण
>>>अमित बघ तुझा पायगुण Happy
>>>अमित बघ तुझा पायगुण Happy
होय अमित व किल्ली (संयोजिका बाई) यांचे विशेष अभिनंदन. अमित यांचे पीपल मॅग्नेट म्हणुन तर किल्लीचे काम, उत्साह आणि उत्तम उरक.
आमचं पुणं असल्याने आम्हीही काही भुईनळे, भुईचक्रे उडवुन वातावरणनिर्मिती केलेली. हे विसरु नका.
नमस्कार मायबोलीकर!
नमस्कार मायबोलीकर!
आजचा माझा पहिलाच गटग मस्त व आठवणीत राहण्यासारखा झाला. पोटभर गप्पा झाल्या..
हर्पेन व किल्ली ने मला आल्या - आल्या आतल्या गोटात सामील करून घेतल्याने व बाकी सर्व उपस्थितांनी पटकन संवाद साधल्याने नव्या सुनेसारखी नवलाई वाटली नाही की बांवरायला झाले नाही...एकदम माहेरी आल्याचे feel झाले.
गप्पा काय...खादाडी काय..मस्त कॉफी काय...काय ते मस्त ठिकाण...काय ते पावसाळी वातावरण ....('काय ती झाडी...काय ते डोंगर...काय ती गुवाहाटी'...ह्या चालीवर वाचावे!) सर्व मस्त मस्तच! आयोजकांना धन्यवाद.
भेटलेल्या (प्रत्यक्ष व फोन वर) सर्व माबो करांना मनःपूर्वक धन्यवाद!
किल्ली च्या comments वर प्रतिसाद :
क्र. १ ते २ मान्य!
क्र. ३. पुरुष खूप गप्पा मारतात, त्यामाने आम्ही मुली काहीच नाही!
(यक्ष वाचताय ना)
३.१ किल्ली अत्यंत शांत आहे स्वभावाने
(ह्या मुद्द्यावर विद्वान लोकांमध्ये मतभेद आहेत )
क्र. ३ व ३.१ ह्यावर मायबोली संसदेमध्ये चर्चा व्हावी वा एखादी वेगळी मायबोली SIT स्थापन करावी अशी मागणी करून खाली बसतो!
>>>> नव्या सुनेसारखी नवलाई
>>>> नव्या सुनेसारखी नवलाई
हाहाहा
अण्णा, कर जोडुन इनंती करते तेवढं (करांन्ना ) लिहू नका. इथे परत करांना की करान्ना अशी रणधुमाळी सुरु होइल
- अण्णा म्हटल्याचा राग धरु नका यक्ष.
आई शप्पत किल्ली काय गोड
आई शप्पत किल्ले काय गोड दिसतेयस तू.
चित्र फारच आवडले आणि हो साजिरा यांच्या लेखनासारखेच ते लेयर्ड, कॉम्प्लेक्स आणि सुंदर वाटले. सामान्य सनराईझ/ सनसेट नाही याचा आनंद जाहला.
छान सुरवात केलीत यक्ष.
छान सुरवात केलीत यक्ष.
लगेच सुधारणा केली. धन्यवाद!
लगेच सुधारणा केली. धन्यवाद!
अहो साक्षात भिमसेनजींना 'अण्णा' म्ह्यणायचे....'अण्णांचे' स्वर्गीय सूर त्यांचे समोर प्रत्यक्ष श्रवण करण्याचे अहोभाग्य लाभले...अजून काय हवे!
आजचा 'कच्चा लिंबु' असल्याने
आजचा 'कच्चा लिंबु' असल्याने यादीत अजून नांव नाहीय बहुतेक...?!
असो मला प्रवासात सामावून तर घेतले...तेवढे भरपूर आहे...
अहो यक्ष मी लिहिलं होतं
अहो यक्ष मी लिहिलं होतं
Save नसेल झालं
आता चूक सुधारली आहे
धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल
.
सामो धन्यवाद
.
साजिरा कृपा असू द्यात
.
अवल आळंदीला या लाडू काय जेवणच मिळेल
मिसलं मी.
मिसलं मी.
छान झालच असेल. आता वृं येवु द्या.
वा वा वा !
वा वा वा !
अतिशय चांगले झालेले आहे. फोटो पण छान.
अभिनंदन !
साजिऱ्याला ओळखले. बाकीच्यांची
साजिऱ्याला ओळखले. बाकीच्यांची नावे लिहा फोटोनुसार प्लीज
साजिऱ्या, अंत नको पाहू लवकर
साजिऱ्या, नको पाहूस अंत लवकर लिही वृतांत
यक्ष, छान सुरुवात
काल सगळ्यांना बघून मस्त वाटले
काल सगळ्यांना बघून मस्त वाटले. फा ला मी ऐनवेळी विचारले आणि तोही 'थोडा वेळ होईन जॉईन' म्हणाला.
अमितने शॉक बसल्यारखा पण बसलाय हे कळू नये असा चेहरा केल्यासारखे वाटले. 'ही अस्मिता, खरंच?' अगदी तोंडओळख झाली तोवर हर्पेननी मला कोकोनट आहे का, दाखव त्याला म्हटले. त्यामुळे वर रेशम_डोर म्हणतेय तसं त्याचीही व्हर्च्युअल हजेरी होती. जे उशिरा आले, त्यांचे दर्शन झाले नाही, आमचेही रात्रीचे साडेअकरा बारा झाल्याने ओझरती भेट घ्यावी लागली. तुम्हाला सगळ्यांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
साजिरा, येऊ दे वृत्तांत/ वृत्तान्त!
फोटो मस्त आले आहेत. अमितचा आवाज फरहान अख्तर सारखा आहे? त्याला सात खून माफ. 
आज धमाल गटग झाले. सगळे नवे
आज धमाल गटग झाले. सगळे नवे चेहरे होते माझ्यासाठी एक दोन आयडी सोडता. सर्वांशी ओळख झाल्याने छान वाटले.
Glen's Bakehouse आपल्या gtg साठी एकदम योग्य ठिकाण आहे. कुणाला आपला आवाजाचा त्रास नाही आणि दुसऱ्यांचे तु क नाहीत. एक स्वतंत्र खोलीच एका बंगल्याची मिळाली होती. फार छान जागा, किल्ली.
खाद्यप्रकार पण सर्व उत्तम. आता आपण जास्त ऑर्डर केले हा काय त्यांचा दोष नव्हे! फक्कड चहा मिळाला नाही मिळमिळीत कॉफी होती हा मात्र त्यांचा गुन्हाच.
अनेकांनी येताना काय काय खाऊ आणला होता, हे एक नवेच सुरू झालेले दिसते gtg ला. आजवर अमेरिकेहून येणाऱ्यांनी फक्त चॉकलेट किंवा झिप लॉकच्या पिशव्या आणायच्या या समजुतीत वावरणारे आयडी आम्ही. पण हे ही घडले नाही. म्हणजे जुने झालो, जाणते नाही असे म्हणायला वाव आहे, काय अमित?
लिहा वृत्तांत लवकर चला!
मस्तच झालं गटग... खूप जण आले
मस्तच झालं गटग... खूप जण आले होते, काहीना ओळखलं, काहीना नाही. तर ओळख परेड होऊन जाऊ दे ...
Sharadg खास सांगली हून आले होते, खूप वाटलं
वर्चुअल हजेरीची कल्पना आवडली आहे.
अमित ह्याने मायबोली टी शर्ट घातला होता हे फारच अपील झाले. भिकबाळी भारी दिसतेय.
आता सविस्तर वृतांत वाचण्याच्या प्रतिक्षेत.
उत्तम नियोजनासाठी किल्लीचं खास कौतुक.
अरे वा वा
अरे वा वा
मस्त फोटो टाकलेस अन आमची उपस्थितीही लिहिलीस. तुला एक झप्पी. आणि आळंदीला यायचच आहे. जरूर भेटेन थांकु
वृ यायला सुरुवात झाली. मस्त लिहिताय सगळे.
किल्ली खूप खूप आभार
गटगसाठी ठिकाणही फार सुंदर शोधलयस. एकदम चपखल माबो गटगला. शाब्बास.
सगळे फार मस्त दिसताय.
साजिरा, चित्र खिळवून ठेवणारं
साजिरा, चित्र खिळवून ठेवणारं आहे.
या चित्राचा अर्थ प्लीज सांगण्यात यावा. बाकीच्या छायाचित्राबद्दल नंतर..
हर्पेन यांना पटकन ओळखलं. सायकलिस्ट !
फारच छान झालं गटग. अमित आणि
फारच छान झालं गटग. अमित आणि किल्लीला ओळखलं. साजिरा आणि शरदना रेफरन्सवरून ओळखलं. होपफुली कोणितरी सगळ्यांची ओळख करून देईल.
किल्लीने फारच छान अॅरेंज केलं आहे. जागापण फोटोवरून आवडली. अमित, तुझ्यामुळे कितीतरी मायबोलिकरांना एकत्र आणलेस.
गटग साठी ठिकाण हर्पेन ह्यांनी
गटग साठी ठिकाण हर्पेन ह्यांनी शोधले आहे.
त्यांचे मार्गदर्शन होतेच सगळीकडे.
धन्यवाद मंडळी
.
किल्लीचा वृ १:
ह्यात जे आठवतंय तसं लिहिते.
अमित भारतात येणार असे कळले आणि ठाणे गटग लगेच झाले सुद्धा!
धागा काढून आधी ढोल वाजवले (आज हा शब्द मला नवीनच कळला ).



मुंबईकर फारच quick व उत्साही असतात नेहमीच गटगच्या बाबतीत, म्हणून त्या प्रेरणेने व आपण कुठे कमी राहायला नको अशा जिद्दीने
सर्व उत्साही मंडळींनी किती छान प्रतिसाद दिलात.
देशातल्या व देशाबाहेरच्या, पुण्यातल्या व पुण्याबाहेरच्या सर्वांचे त्यासाठी खूप आभार
आधी च्या अंदाजाने cafe कथा ठरवलं होतं, तिथलं खाणं चांगलं असतं आणि हाकलत नाहीत म्हणून.
पण नंतर आपली list वाढली, कथा पुरणार नाही म्हणून जरा चर्चा करुं glens bakehouse ठरवलं.
Prebooking करायची ही idea पण हर्पेन ह्यांची, ते insta वर ऍक्टिव्ह असतात बरं का.
तिकडून त्यांनी व मी separate ly, cafe शी संपर्क साधला.
पण मला नंबर मिळाला
घोगऱ्या बसलेल्या आवाजात booking केलं call वर, ते म्हणाले तुम्हांला dedicated space देऊ वरती!
म्हटलं हे एक बरं झालं.
Cafe च्या reels बघत काय खायचं ह्याची स्वप्ने मी रंगवत होते.
खरंच asthetic cafe आहे.
एक तरी solo फोटो किंवा गेलाबाजार रील तरी करायला हवी होती.
पण हे घरी आल्यावर सुचलं.
.
बरं मग कुठे होते मी हा आठवलं, गटग ला या या असं जमेल तितक्या लोकांना आग्रह करत होते. जे नाही आले त्यांनी वाईट वाटून घ्या, u missed सगळी मजा
कालपर्यंत असं भारी वाटत होतं ना की कुठला तरी सण येणारे, शनिवारचा उपास पण जरा जास्तच कड्डक केला मी
रात्रीपर्यंत धागा बघत होते.
सकाळी जाग यायला पाहिजे अशी धास्ती पण वाटत होती नाहीतरी रविवारी सकाळी उठून बाहेर जायचं म्हणजे, पण ह्यावेळी कोट असल्यामुळे जावं लागणारच होतं.
छान लिहिते आहेस किल्ली
छान लिहिते आहेस किल्ली नेहमीप्रमाणेच. पुढील वृ ची वाट बघते.
गटगला प्रत्यक्ष आणि
गटगला प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल हजेरी लावणार्यांव्यतिरिक्त इतरही काही लोक होते. त्यांचे वृ :
***
भालचंद्र (नेमाड्यांचे) :
अजून आता किती गटग शिल्लक आहेत असा विचार करत अमित ग्लेन्सच्या डाव्या बाजूने वर चढला. हा गटग नावाचा प्राणी अमरबिमर आहे का काय? म्हणजे असं की सूर्य जळून खाक झाला किंवा पृथ्वी थिजून बर्फाचा दगड झाली तरी मायबोली ग्रह तसाच हट्टाने मागे राहणारच, आणि मग ही गटग होणार म्हणजे होणारच. अमर गटग मार्ट! जिना चढताना त्याच्या लक्षात आलं- गटगं अशी कमी करता अथवा वाढवता येत नाहीत. ती आपली आपण आपोआपच पुढ्यात वाढून ठेवलेली असतात. ही गटगं कधी ना कधी कुठे तरी येऊन आपला खुंटा करून आपल्याला गाठतीलच. त्यापेक्षा आपणच खुंटा बनून त्यांच्या पुढ्यात जाऊन उभं राहावं हे खरं.
नारायण (धारपांचे) :
ग्लेन्सच्याही आधी वर असलेलं शंभर वर्षांपुर्वीचं 'माधव निवास' नाव त्याला पटकन दिसलं, आणि आपलं नाव 'यक्ष' असल्याची नव्याने जाणीव त्याला झाली. ही कसली तरी खूण होती. कुणीतरी काहीतरी त्याला कुण्याकाळी घडून गेलेल्या गोष्टी नव्याने पटवण्याचा, आठवून देण्याचा प्रयत्न करत आहे, असं यक्षाला वाटून गेलं. वर जायचा जिना त्याला दिसत होता खरा, पण या भिंतींतून अपण सहज पलीकडे जाऊ शकू अशी विचित्र जाणीव त्याला झाली. भिंतींचा रंग त्याला अचानक शेवाळी असल्यागत भासला, आणि कसले तरी आदिम गंध येऊ लागले. ती दुमजली इमारत हलतेय आणि भिंती एकमेकांत मिसळताहेत, असं दृष्य समोर आलं. यातलं नक्की खरं काय- हा विचार करतानाच त्याला अनेकांचा राक्षसी हसण्याचा आवाज ऐकू आला. त्या संभ्रमावस्थेत तो वर गेला तेव्हा तीन-चारच चुकार लोक त्याला दिसले, आणि तो आणखीच हादरला. पण हे काहीच नव्हतं. प्रवेश करताना कानावर आदळल्याचे भासलेले राक्षसी हसण्याचे आवाज वर गेल्यानंतर तासा-दीडतासाने त्याने प्रत्यक्ष ऐकले, आणि समोर पाहिले तेव्हा ती वेळ खरंखुरं हादरण्याची होती..
नारायण (पुलंचा) :
हे लोक काय ठरवतात नि नक्की करतात काय काय याचा यांना तरी पत्ता असतो की नाही देव जाणे. आता हे टेबल खाण्यासाठी ठेवलं आहे, आणि बशा-चमच्या-वाट्यांसाठी यांनी जागाच ठेवलेली नाही. टिश्यू पेपरवर कृष्णाकाठची वांगी, केकच्या ताटलीत कैर्या, आणि नागपूरची संत्रा बर्फी काट्या-चमच्याने खाल्ली होती काय कधी तुमच्या.. अहो, अहो, ताई इतक्या मोठ्या ताटात ती भिकबाळी ठेवताय????? हरवली म्हणजे शंख करत याल नारायणाच्या नावाने! आणि अहो ते अमितराव आहेत, म्हणजे पुरूष झाले की नाही. ती नथ ठेवा त्या पिशवीत त्यांच्या मंडळींसाठी. आता हे पवारांचं पुस्तक इथं कुणी आणलं? थांबा मी करतो जागा.. अहो अहो ते भडंग काय आता मंगल प्रसंगी खाणारात ताई. सांगलीचं असलं म्हणून काय झालं? काय म्हणता- सांगलीच्या खास आठवणी आहेत? असूदे असूदे. कळलं. इतका खर्च करून यजमानांनी भोजनावळी घातल्या त्याचा तरी मान राखा. काय म्हणताय- वृत्तान्त लिहू? आणि ही ढीगाने कामं पडलीत ती कोण करणार. तुम्ही लिहा हो वृत्तान्त बित्तांत. धन्य आहे!!
श्याम (मनोहरांचे) :
ग्लेन बेकरीवाला म्हणाला खूप लोक येणारेत.
आनंदात असलेला ग्लेन बेकरीवाला कामात गढून गेला. आनंदात असलेल्या ग्लेन बेकरीवाल्याला खूप लोक आहेत इतकेच माहिती होते. आनंदात असलेल्या ग्लेन बेकरीवाल्याने राखीव ताटल्या चमचे वाट्या काढल्या. आनंदात असलेला ग्लेन बेकरीवाला स्फुरण पावला. आनंदात असलेल्या ग्लेन बेकरीवाल्याला आता आपण आनंदात येऊन लिहू शकू असे वाटू लागले. आनंदात असलेल्या ग्लेन बेकरीवाल्याने अनेक गोष्टी आठवून पाहिल्या. थोड्या आठवल्या. बर्याच नाही आठवल्या. आनंदात असलेल्या ग्लेन बेकरीवाल्याला तरीही आठवल्या त्या बर्याच आहेत असे वाटू लागले. आनंदात असलेला ग्लेन बेकरीवाला त्या गोष्टींची संगती लावू लागला तेव्हा त्याला बरेच प्रश्न पडले. आनंदात असलेल्या ग्लेन बेकरीवाल्याच्या दारात जेव्हा खरोखर खूप लोक आले तेव्हा ते प्रश्न तसेच पडून राहिले. आनंदात असलेल्या ग्लेन बेकरीवाल्याला आता या आनंदाचे नक्की काय आणि कसे करावे ते कळेना. खूप लोकांचे राक्षसी हसण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले तेव्हा आनंदात असलेला ग्लेन बेकरीवाला शून्य पावला.
श्याम (साने गुरुजींचा) :
'आले का रे सगळे?'
'हो गुरुजी. तुम्ही सुरू करा', कोपर्यात बसलेला अमित म्हणाला. शेजारच्या कंदिलाची वात त्याने मोठी केली तेव्हा त्याला विचित्र नावे धारण केलेले खूप लोक जमले आहेत असे दिसले. हे लोक नेहेमी अंधारात राहतात भुतांसारखे, आणि उजेड दिसला की यांना फसफसून येते. यामुळेच कदाचित गुरुजी कंदिलाची वात फार मोठी करू देत नसत. त्याला वाटले- गुरुजींना आधीच बरे नाही. आवाज मंदावला आहे. चेहेरा म्लान झाला आहे आणि शरीर थकल्यागत दिसते आहे. पण गुरुजी गोष्टींचा हट्ट सोडत नाहीत. अमित स्वतः गटग करून थकला होता. आता ही सारी कधी संपतात आणि कॅनडातल्या लाडघरला मामाकडे कधी जातो असे त्याला झाले होते. अळणी मीठ, कांदेपाक, श्यामच्या पोहण्याची गोष्ट, रामरक्षेची गोष्ट अशा पुष्कळ गोष्टी झाल्या होत्या. अजून काय काय बाकी असेल बरें? असो, सुटका नाही, असा विचार करून तो कानातली भिकबाळी चाचपत गोष्ट ऐकू लागला.
वपु (काळ्यांचे) :
हे गटग जमवता जमवता आयुष्याची अनेक कुलुपं आपण उघडत आहोत असा किल्लीला भास झाला. या ग्रहाची कुलुपं या मायबोलीकरांना कुणी उघडून दिली असतील? पण सृष्टीत बॅलन्स हा असतो हे मान्य केलंच पाहिजे. हे इतके मायबोलीकर आहेत म्हणूनच दुसर्या बाजूला बरेच सज्जन लोकही या जगात आहेत. नियंत्याच्या अशा अद्भूत करणीचा विचार करत ती ग्लेनच्या पायर्या चढली. इतके सव्यापसव्य करून तरी हे लोक येणार आहेत की नाहीत? खूप विचार करून तिने मान झटकली. या ग्रहावर येणं न येणं हे तरी आपल्या हातात असतं का? त्या मानाने हे काहीच नाही. ग्लेनच्या किचनमधून येणार्या पदार्थांचा वास तिने नाकात भरून घेतला, आणि तिला प्राणवायू मिळाल्यासारखं वाटलं. तिला वाटून गेलं- किती सहज असतं आपण हा असा श्वास घेणं, आणि किती अवघड असतं प्रत्येक श्वासाचा असा गंध, रंग, चव आणि अर्थ समजून घेणं!
भाऊसाहेब (बखरीतले) :
गनिमास काव्याने मारावे ही येक योजना, आणि हास्याने मारावे ही दुसरी. माबोलेकरांनी दुसरी योजिता, ग्लेनचा वरचा मजला हवेत उडोन गेला आणि भडभुंजे लाह्या भाजितात तसा विद्युल्लतापात होवोनि गरवारे विद्युतयान स्टेशन धुळीस मिळाले..
बास बास.. धिस इज नेव्हर एंडिंग.
आता वृत्तांत लिहिन.
Pages