पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली Happy
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर

..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.

.
सेल्फि १
IMG-20250518-WA0011.jpg
.
सेल्फि २
IMG-20250518-WA0025.jpg
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा Happy
IMG-20250518-WA0014.jpg
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद Happy
IMG-20250518-WA0032.jpg
.
खास क्षण
IMG-20250518-WA0083.jpg
.
IMG-20250518-WA0071.jpg
.
IMG-20250518-WA0085.jpg
.
IMG-20250518-WA0034.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॲा ?

मुंबई आणि वक्तशीरपणा?

दर वविला मुंबई ची बस लेट निघते व पोचते. पायलटला पण तीच अवस्था.

पुणेकर वेळेत निघतात आणि पोचतात.

पुणेकर वेळेत निघतात आणि पोचतात>>
किंवा पुणेकर जेव्हा पोचतात तिच खरी पोचायची वेळ असते असे म्हणूयात...

दर वविला मुंबई ची बस लेट निघते व पोचते.>>>>
जाऊ द्या ववि संयोजक.
ते वविच ठिकाण आम्हाला दूर आहे.
स्थानिक गटग बद्दल बोलतोय आपण.

नमस्कार मंडळी

वा ! खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून .
पण लौकर निघाल्यामुळे काही जण मिस झाले असतील
त्यासाठी क्षमा

काही ओळखीचे
काही नवीन
काही आय डी मागचे चेहरे नव्याने कळतात
ती मजा

किल्ली - लाडू
शरद - वांगी
तेजो - फुलं

आणि काय काय ? ...

असो

मजा करा लोक हो

वृ येऊ द्या विथ फोटो

धन्यवाद

मीही धनवंती कृपेने व्हर्चुअल हजेरी लावली. पण मी काय बोलत होते ढम्म कळलं नाही त्यांना Lol नुसता गदारोळ चालू होता Happy
पण सगळ्यांशी खाणाखुणा करून ओळख परेड मात्र झाली Happy

सगळं सविस्तर येऊ द्यात.
फोटो, खाण पिणं, भेटी...
वृत्तान्त लिहा लवकर
प्रत्येकी एक वृत्तान्त हवाच हवा..

मस्त झाले गटग , ठिकाण ही छान होते .
तेजो , तुझी फुले आणि बिया इच्छित स्थळी सुपूर्त केली आहेत. काळजी नसावी.
काही नवीन आणि काही जुने जाणते चेहरे भेटले.
झकास ने आणलेले पेढे , मी नेलेली बर्फी , अनया ने आणलेल्या कैऱ्या , शरद यांनी आणलेली कृष्णाकाठची वांगी , भडंग , किल्ली ने आणलेला माऊलींच्या प्रसादाचा लाडू , गोडबोले यांनी आणलेली नागपुरी संत्रा बर्फी , अजून एक बर्फी ( कोणी आणली कळले नाही) याचा आस्वाद घेत गप्पा झाल्या. RMD, धनि , अस्मिता, फारेंड यांच्याशी virtual भेटणे झाले. साजिरा यांनी आणलेले चित्र ही सुरेख होते.
एकूणच मजा आली.

वरच्या लिस्ट मध्ये हे पण add करा
अनया च्या शेतातील मोठे मोठे आंबे
शरदकाका सांगली भडंग
मधुर संत्र बर्फी
साजिरा पिकासो चे चित्र
आणि अजून बरेच काही...

पोचले घरी

सर्वांना धन्यवाद
विशेषतः शरद g
इतक्या लांबून आले
खूपच भारी वाटलं.
.
डिटेल्स येतीलच.
सध्या एवढं च

What a grand GTG yaar!

बऱ्याच दिवसांनी वृत्तान्त लिहिण्याचा मोह होतोय. वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न करतो. वृत्त सापडलं की लगेच इथं टाकतो. Proud

साजिरा please
वाट पाहतोय आम्ही सगळे तुमच्या लिखाणाची!
तुमचा वृ आला की मग मी additions देणार.
.
तोपर्यंत आजची ३ proven संशोधने सांगते.
१. अमित ह्यांचा आवाज फरहान अख्तर सारखा आहे
२. साजिरा हे दिसायला
सागर कारंडे + अक्षय खन्ना + वैभव मांगले
असे आहेत
३. पुरुष खूप गप्पा मारतात, त्यामाने आम्ही मुली काहीच नाही!
(यक्ष वाचताय ना)
३.१ किल्ली अत्यंत शांत आहे स्वभावाने
(ह्या मुद्द्यावर विद्वान लोकांमध्ये मतभेद आहेत )

प्रज्ञाने सगळ्यांशी बोलता येईल, म्हणून आठवणीने व्हिडिओ कॉल केला,‌पण नेटवर्क अगदीच वाईट होतं. त्यामुळे बोलता आलं नाही.
प्रज्ञा, सॉरी

अक्षय खन्ना आजवर ऐकत आलो होतो. कारंडे आणि मांगले आता नवीन add झाले. Proud

किल्ली, तुझ्यात अट्टल मायबोलीकर असण्याचे ट्रेट्स दिसताहेत. कमऑन यू कॅन डू इट Lol

मायबोली टाइम मशीन आहे हा माझा सिद्धांत पुन्हा एकदा सिद्ध झाला. यावेळी नक्की लिहीन Happy

साजिराजी, तुम्ही चित्रपटाबद्दल खूप तपशिलाने पण गांभीर्याने लिहीता.
इतर विषयांवरही. खूप तोलून मापून असतं.
तुमच्या वृ ची प्रतिक्षा.

Pages