Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉर्म अप ची कल्पना आवडली
वॉर्म अप ची कल्पना आवडली
हे पण आवर्जून पहा:
ख्रिस गेलने PWI ला तुडवलेले एका मॅचमध्ये ती नक्की बघा
Paul Valthaty चे पण एक शतक कमाल होते
आदित्य तरे ने राजस्थानला बाहेर काढले तो मोमेन्ट
पहिल्या मॅचमधला बाझ चा झंझावात
“ आदित्य तरे ने राजस्थानला
“ आदित्य तरे ने राजस्थानला बाहेर काढले तो मोमेन्ट” - जिगर का दर्द उपर सें कहां मालूम होता हैं
>>जिगर का दर्द
>>जिगर का दर्द
अगदी अगदी!!
खपली काढली का?
“ खपली काढली का?” अश्या
“ खपली काढली का?”
अश्या खपल्या-खपल्यांनी तर आपलं क्रिकेट-प्रेम जोपासलंय.
यंदा आयपीएल मधे बरेच नवीन बदल
यंदा आयपीएल मधे बरेच नवीन बदल आहेत. वाईड बॉलसाठी हॉक-आय चा वापर इंटरेस्टिंग आहे.
- जिगर का दर्द उपर सें कहां
- जिगर का दर्द उपर सें कहां मालूम होता हैं >> राजास्थानला फॉलो करण्यापेक्षा बंगलोरला करा तुम्ही दोघे जण
इशान किशन, पड्डीकल, कुलदीप
इशान किशन, पड्डीकल, कुलदीप सेन, मोहसिन खान, रघुवंशी , रिंकु, तिलक , रियान, नितिश ह्यांच्या साठी मेक ऑर ब्रेक आयपिल आहे. दणकून खेळले तर लिमिटेड क्रिकेटच्या मेन संघाचे दरवाजे उघडतील/ किंवा जागा पक्क्या होतील.
खुसपट पिशाच्च्यांसाठी : हि काँप्रेहेंसिव्ह लिस्ट नाही.
धन्यवाद लोकहो! आदित्य तरे ची
धन्यवाद लोकहो! आदित्य तरे ची मॅच अजिबात लक्षात नाही. शोधतो ती, आणि बाकीच्याही.
एकेकाळी इंग्लंडला वर्ल्ड कप बद्दल always the bridesmaid, but never the bride म्हणत. आयपील बद्दल आरसीबी चे तसेच आहे. यावर्षीतरी जिंकणार का? तसे १६ पैकी ९ वेळा ते पहिल्या चार मधे होते - याचा अर्थ नॉक आउट स्टेज खेळलेले दिसतात. त्यामुळे ब्राइड्समेडची व्याख्या "फायनल खेळलेले" की "नॉक आउट पर्यंत पोहोचलेले" करू त्यावर ते मुळात ब्राइड्समेड तरी झाले का हे ठरेल
एकदाही न जिंकलेल्या इतर काही टीम्सही असतील पण इतका हाइप असलेली, इतके चांगले खेळाडू असलेली व इतक्या वेळा प्लेऑफ्स पर्यंत गेलेली आणि तरीही न जिंकलेली बंगलोरच असेल बहुधा.
तसे इंग्लंडचा वर्ल्ड कप विजयही ब्राइड दोन मिनिट जरा कोठे गेली तर तेवढ्यात एका ब्राइड्समेडने चान्स मारला टाइप होता
पण ओव्हरऑल कोणत्या टीम्स सर्वात जास्त वेळा प्लेऑफ्स्/सेमी पर्यंत पोहोचल्या हे इंटरेस्टिंग आहे. चेन्नई १४ पैकी १२ वेळा, मुंबई १६/१० वेळा, बंगलोर १६/९ वेळा, कोलकाता १६/८ वेळा. हैदराबाद सनरायजर्स टीम ७ वेळा पण ते १२ पैकी सात वेळा आहे. बाकी सगळ्या कमी दिसतात. चेन्नई सर्वात कन्सिस्टंट म्हणावी लागेल.
चेन्नई प्ले ऑफच नाही तर फायनल
चेन्नई प्ले ऑफच नाही तर फायनल सुद्धा अनेक वेळा पोहोचली आहे.
निर्विवादपणे सातत्यवान संघ.
मध्ये धोनीची कप्तानी काढून जडेजाला दिली तेव्हा घोळ होऊन बाहेर पडले होते.
मुंबई त्या तुलनेत फायनल कमी वेळा पोहोचली असेल पण रोहीत शर्माच्या नेतृत्वात पाच पैकी पाच वेळा जिंकली आहे हे कमाल आहे. रोहीत शर्मा खेळाडू म्हणून डेक्कन चार्जर हैदराबाद कडून खेळला असताना सुद्धा फायनल पोहोचून जिंकलेला म्हणजे आयपीएल फायनलमध्ये पराभवाची चव त्याने अजून चाखली नाही.
चेन्नई मुंबई या दोन टीम आयपीएल इतिहासात आजवर वेगळाच दर्जा राखून आहेत.
मुंबई सध्या मॅनेजमेंट मस्ती मुळे मागे पडली असली तरी यंदा वाद निवळून एकजुटीने खेळले तर चित्र बदललेले दिसू शकते.
चेन्नईच्या यशात कप्तान धोनी इतकाच तेथील फिरकीला सहाय्य करणारी खेळपट्टी आणि त्यानुसार निवडलेली टीम यांचा मोठा वाटा आहे. तिथे ते दादा ठरतात आणि हमखास प्ले ऑफ पोहोचतात. वरचा रेकॉर्ड त्यामुळेच दिसतो.
मुंबई विरुद्ध चेन्नई सामना नेहमीच ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जातो आणि यंदा मुंबई ने कात टाकली तर काही वेगळे चित्र दिसणार नाही..
ऋषभ पंत ने लखनौ जाऊन घोळ
ऋषभ पंत ने लखनौ जाऊन घोळ घातला आहे.
त्या संघ मालकाला बिलकुल सपोर्ट करायची इच्छा नाही.
त्यामुळे पंत चमकावा आणि त्याचा संघ बरेपैकी पुढे जाऊन दारात हरावा अशी इच्छा आहे.
आदित्य तरे ची मॅच अजिबात
आदित्य तरे ची मॅच अजिबात लक्षात नाही.
>>
द्रविड नी चिडून टोपी भिरकवली होती...
मुंबई सध्या मॅनेजमेंट मस्ती
मुंबई सध्या मॅनेजमेंट मस्ती मुळे मागे पडली असली तरी यंदा वाद निवळून एकजुटीने खेळले तर चित्र बदललेले दिसू शकते. >> पांड्या प्रकरण गेल्या वर्षी झाले त्याच्या आधीच्या वर्षी मरत मरत प्लेऑफ मधे गेले होते नि त्याच्या आधी दोन वर्षे ते पण करू शकले नव्हते. गेल्या वर्षीचाच क्रमांक २०२२ मधे पण होता. मस्ती रोहितच्या सो कॉल्ड माजोरड्या फॅन्स ची होती (रोहोतने आवाहन करूनही न ऐकलेल्यांना ह्या पेक्षा सभ्य शब्दांमधे लिहिणे अशक्य आहे)
आदित्य तरे ने राजस्थानला
आदित्य तरे ने राजस्थानला बाहेर काढले तो मोमेन्ट >> सॉरी ती मॅच कोरी अँडरसनने काढून दिली होती खरी. तारेने पहिल्या बॉल ला सिक्स मारून फिनिशींङ टच दिले असे म्हणू शकतो फार तर.
चेन्नईच्या यशात कप्तान धोनी
चेन्नईच्या यशात कप्तान धोनी इतकाच तेथील फिरकीला सहाय्य करणारी खेळपट्टी आणि त्यानुसार निवडलेली टीम >> अॅग्रीड. म्हणून चेन्नईअच्या बाहेर बाद फेरी आली कि हरलेलेही आठवते.
“ राजास्थानला फॉलो
“ राजास्थानला फॉलो करण्यापेक्षा बंगलोरला करा तुम्ही दोघे जण” - दीवानोंसे यह मत पूछों, दीवानोंपे क्या गुज़री हैं
२००८ मधे द्रविडसाठी आणि २००९ मधे कुंबळेसाठी त्यांना सपोर्ट केलं होतं
“ खुसपट पिशाच्च्यांसाठी” -
“ इंग्लंडचा वर्ल्ड कप विजयही ब्राइड दोन मिनिट जरा कोठे गेली तर तेवढ्यात एका ब्राइड्समेडने चान्स मारला टाइप होता” -
पांड्या प्रकरण गेल्या वर्षी
पांड्या प्रकरण गेल्या वर्षी झाले त्याच्या आधीच्या वर्षी मरत मरत प्लेऑफ मधे गेले होते
>>>>
ती सुद्धा मॅनेजमेंट मस्तीच होती. गोलंदाजीच्या नावावर काहीही चालू होते. अर्जुन तेंडुलकर याला संघात जागा मिळणे सुद्धा काही वावगे वाटले नाही अशी परिस्थिती होती. तरी फलंदाजांनी प्ले ऑफ पोहोचवले होते. आणि असे गोलंदाज घेऊन संघाला प्ले ऑफ का नेले म्हणून रोहितचे कौतुकच होत होते. पण एक वाईट गेम आणि बाहेर जाणारच होते. ते गेले..
ती सुद्धा मॅनेजमेंट मस्तीच
ती सुद्धा मॅनेजमेंट मस्तीच होती. गोलंदाजीच्या नावावर काहीही चालू होते. >> मुंबई सहा सात वर्ष ठराविक गोलंदाजी साचा वापरते आहे. बुमरा, एक लेफ्ट आर्म सीमर, , एक कंट्रोल स्पिनर, एक लेगी नि उरलेला गरज पडेल तो. शेवटचे दोन जिंअकले तेंव्हाही हाच साचा वापरला होता. फरक हा होता कि तीन वर्षांपूर्वीच्या ऑक्शनमधे बोल्ट, जॉह्न्सन, कृणाल पांड्या, हार्दिक वगैरे बाहेर गेले नि त्यांच्या जागी तेव्हढ्याच सशक्त प्लेयर्स आले नाहित. रोहितपलीकडे जग आहे हे बघितले तर दिसेल.
. तरी फलंदाजांनी प्ले ऑफ पोहोचवले होते. आणि असे गोलंदाज घेऊन संघाला प्ले ऑफ का नेले म्हणून रोहितचे कौतुकच होत होते. >> एक तो घोडा कहो या .. वगैरे बोलायचा भयंकर मोह टाळता येत नाही.
आयपीएलमध्ये रममाण झालेले
आयपीएलमध्ये रममाण झालेले मायबोलीकर. आता तुमचे दोन महिने असेच आनंदात जावो.
फरक हा होता कि >>>>> असे
फरक हा होता कि >>>>> असे लिहून पुन्हा माझेच लिहिलेत. मुंबई संघ बदलला आणि त्याचे संतुलन गेल्यावर त्याचा सर्वात मोठा फटका त्यांच्या गोलंदाजीलाच बसला यात दुमत नसेल तर विषय तिथेच संपलाय.
गोलंदाजी कमजोर असताना संघ प्ले ऑफ जातो हि माझ्यामते कर्णधारासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. गेल्यावेळी पांड्या परत आल्याने संतुलन सुधारले पण अंतर्गत वादाचा फटका बसल्याने कामगिरी अजून घसरली.
पहिल्याच ओव्हरला डी कॉक ची
पहिल्याच ओव्हरला डी कॉक ची किती सोपी कॅच सोडली...
आयपीएल सुरू झाल्याचा फिल आला
बाई दवे,
रहाणे तसाच सुरू झाला जशी अपेक्षा होती..
४ ६ ० ६ .. हाच intent गरजेचा
रहाणे सिक्स मारून अर्धशतक
रहाणे सिक्स मारून अर्धशतक
२५ चेंडूत!
जु बा न
रहाणे जर असाच खेळत राहिला तर
रहाणे जर असाच खेळत राहिला तर केकेआरच्या सगळ्याच मॅचेस बघणं आलं ! फारच छान !!!!
आज रहाणेने मिडऑनच्या
आज रहाणेने मिडऑनच्या डोक्यावरून अलगद मारलेल्या एका फोरच्या वेळेस साहेबांची आठवण झाली. पाहा हायलाइट्समधे. तंतोतंत इमेज.
रहाणे छानच खेळला. नरेन
रहाणे छानच खेळला. नरेन गेल्यावर थोडी पार्टनरशिप बिल्ड करून मग मारायला हवं होतं. पण तो मारायच्या नादात गेला अन् बाकी कुणी जवाबदारी नी खेळलच नाही...
आता बंगलोर कुडपतंय
5 ओव्हर्स मधे 75 झाले, आता 15 मधे 100 करायचे...
*आता बंगलोर कुडपतंय* -
*आता बंगलोर कुडपतंय* - रहाणेने हाणलं, कोहलीने कुटलं !!
*आता बंगलोर कुडपतंय* -
*आता बंगलोर कुडपतंय* - रहाणेने हाणलं, कोहलीने कुटलं !!
मॅच 10 ओवर मधेच संपली.
मॅच 10 ओवर मधेच संपली.
वेलकम बॅक रहाणे. अमेझिंग कम बॅक.
सामना दहा षटकातच संपला. रहाणेच्या उत्क्रुष्ट पुनरागमनाचे स्वागत.
सामना फिक्स होता हे पदोपदी
सामना फिक्स होता हे पदोपदी जाणवत होतं.
रहाणे फलंदाजीत अपेक्षेला
रहाणे फलंदाजीत अपेक्षेला जागला.
कर्णधार म्हणून मात्र निराश केले.
सुरुवातीच्या मारझोडीला उत्तर नव्हते. वरुण चक्रवर्ती पुढे आणला पण काही डावपेच नव्हते, त्यानुसार फील्ड प्लेसमेंट नव्हती असे वाटले. पुढे मग सामना दूर गेल्यावर बंगलोरवर प्रेशर आलेच नाही..
बाय द वे, फाफ रिटायर झाला का?
बाय द वे, फाफ रिटायर झाला का? तो आणि कोहली करायचे ना ओपन?
कोहली खतरनाक भारी खेळलाय आज.
Pages