Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही त्या जोफ्रा आर्चर
तुम्ही त्या जोफ्रा आर्चर वेळचा लिलाव पाहिलेला का >> तुम्ही त्या वेळी एकूण चार संघ आर्चरला घेण्यासाठी कसे हिरिरीने बिडींग करत होते हे पाहिलेले का ? संगक्कारा तर सरळ बोलला होता ( जी माईक मोमेंट झाली होती) कि आर्चर नि बुमरा एका संघाकडे जाता कामा नयेत. आर्चर त्या वेळी जसा फॉर्म मधे होता ते बघता त्यात चुकीचे काहीहि नव्हते. हाईंड साईट मधे दोष देणे सोपे असते हो. आणि तरीही ह्या वेळीही त्याच्यावर परत बिडींग झाले हे लक्षात घ्या. रायता बाजूला ठेवा नि कोशिंबीर खा.
“ फेफ फॅन क्ल्ब उघडायचा का ?
“ फेफ फॅन क्ल्ब उघडायचा का ? ” -
स्वरूप, कालची तुझी रॉयल्स-हैद्राबाद सामन्याविषयी पोस्ट वाचली. अगदी पोटतोडकीनं लिहिली होतीस. होपफुली, रॉयल्स लवकर गाडी रुळावर आणतील.
काल ऋषभ ने लहान लहान चुका
काल ऋषभ ने लहान लहान चुका करुन हातातील मॅच दिल्ली ला बहाल केली... आणि दिल्ली ने शेवटपर्यंत लढत दिली... मजा आली
तुम्ही त्या वेळी एकूण चार संघ
तुम्ही त्या वेळी एकूण चार संघ आर्चरला घेण्यासाठी कसे हिरिरीने बिडींग करत होते हे पाहिलेले का ?
>>>>>>
अरे वा चार संघ मागे लागले होते.. ते सुद्धा हिरीरीने..
मग २० करोड ला गेला असावा...
पण गूगल केले तर का फक्त ८ करोड दाखवत आहे
काल लास्ट ओव्हरला स्टंपिंग
काल लास्ट ओव्हरला स्टंपिंग चान्स हुकला तेव्हा चुम्माची एक्टिंग बघितलीत काय?
स्वतःची चूक झाकावी म्हणून LBW अपील करायला लागला जोरात. जसं काय lbw आउट आहे म्हणून मी स्टंपिंग सोडली.
रिव्ह्यू पण घेतला. आम्ही बघणारे आणि खेळणारे येडे वाटलो याला. मला वाटलं मॅच संपल्यावर गोयंका त्याला खरोखरच्या चुम्मा देतोय की काय.
https://www.instagram.com/reel/DHl8uUIzjZV/?igsh=MXEwMDhxejYwNW41MQ==
पण गूगल केले तर का फक्त ८
पण गूगल केले तर का फक्त ८ करोड दाखवत आहे >> सर त्याच गूगल मधे त्याच्या इंजरीबद्दल कंसर्न होता हे नाहि वाचलेत का ? तरीही बिडींग झाले होते. ह्याच साठी म्हणालो होतो कि केवळ रोहित ची कप्तान पदावरून हकालपट्टी झाली त्यामूळे तुम्ही मस्ती मस्ती करत पिंगा घालत होता नि आहात. यंदा रॉयल्स चा सी ई ओ काय म्हणाला होता ते पण गूगलून बघा. टॉवेल मधल्या गांगूलीला नुसते बघून त्याचे विचार ओळखणार्या महात्म्याला हे सांगावे लागते हे आमचे दुर्दैव !
सर त्याच गूगल मधे त्याच्या
सर त्याच गूगल मधे त्याच्या इंजरीबद्दल कंसर्न होता हे नाहि वाचलेत का ?
>>>>
मग तर आणखी मस्ती..
रेस मध्ये लंगड्या घोड्यावर पैसे लावण्यासारखे झाले हे
दिल्लीची मॅच मस्त झाली.
दिल्लीची मॅच मस्त झाली. हैदराबाद-राजस्थानची इतकी बोअर झाली की हायलाइट्स सुद्धा पूर्ण पाहिले नाहीत. आशुतोष शर्माचे हिटिंग मस्त होते. त्याचा स्टान्सच आता बॅट घुमवायला तयार असल्यासारखाच होता. तो केवळ कालच्या सिच्युएशनमुळे होता की कायम तसाच असेल माहीत नाही. एखादा चांगला बोलर लगेच वर्क आउट करेल त्याला नाहीतर. बॅटवर खाली झुकून आता सिक्स मारतोच अशा पवित्र्यातच उभा होता तो काल जेव्हा पाहिले तेव्हा. पण त्याने मारले ते शॉट्स जबरी होते हे खरे.
तो शेवटच्या ओव्हरमधला एलबीडब्ल्यू अगदी क्लोज वाटत होता. बहुधा त्याच ओव्हरमधे एक मिसफिल्ड झाले, त्याने आशुतोष पुन्हा स्ट्राइकवर आला. अर्थात जिंकले तेव्हा अजून ३-४ बॉल बाकी होते, त्यामुळे त्याला स्ट्राइक मिळालाच असता.
फाफ डुप्लेसी व कोहलीची ओपनिंग इतकी चांगली होत असताना फाफ बंगलोर मधून बाहेर कसा गेला?
रेस मध्ये लंगड्या घोड्यावर
रेस मध्ये लंगड्या घोड्यावर पैसे लावण्यासारखे झाले हे >> थोडी दूरदृष्टी लागते त्यासाठी सर. टॉवेल मधल्या गांगूलीला नुसते बघून त्याचे विचार ओळखण्याएव्हढे सोपे नाही ते
. परत कंसर्न असणे म्हणजे १००% खात्री नाही हे शेंबड्या पोरालाही कळणारी गोष्ट आहे. मेगा ऑक्शन तीन वर्षांनी होत असते तेंव्हा तीन वर्षांसाठी टीम बिल्ड करण्याकडे कल असतो. म्हणून तुम्ही तिथे अंबानीकडे नाहि आहात.
बॅटवर खाली झुकून आता सिक्स
बॅटवर खाली झुकून आता सिक्स मारतोच अशा पवित्र्यातच उभा होता तो काल जेव्हा पाहिले तेव्हा. पण त्याने मारले ते शॉट्स जबरी होते हे खरे. >> हो . गेल्या वर्षीही तो असाच खेळत होता तेंव्हा हँड आय को ऑर्डीनेशन जमतय तोवर धुमाकूळ घालेल. शशांक नि आशुतोष सुटले होते आठवतेय का ?
फाफ डुप्लेसी व कोहलीची ओपनिंग इतकी चांगली होत असताना फाफ बंगलोर मधून बाहेर कसा गेला? >> बंगलोर पूर्ण रीव्हँप मोड मधे होते.
तेवटिया जास्त चेंडू खेळला
तेवटिया जास्त चेंडू खेळला असता तर निकाल वेगळा असता. त्याने जो एक सिक्स इकडून तिकडे खेचला लाजवाब. बाकी तो रदरफोर्ड नेहरासारखाच बावळट दिसतोय चेहऱ्याने.
>>फाफ बंगलोर मधून बाहेर कसा
>>फाफ बंगलोर मधून बाहेर कसा गेला?
मॅनेजमेंटची मस्ती
स्वरुप
स्वरुप
https://www.espncricinfo.com/records/trophy/batting-most-ducks-career/in... ह्यातली तिसरी एंट्री पाहा. मला अपेक्षित नव्हते. गेल्या वर्षी नंतर अॅप्रोअच मधे बदल झाल्यामूळे झाले असते तर समजू शकलो असतो पण आधीच्या अॅप्रोअच शी कंसिस्टंट वाटत नाहि . मूळात असे झाल्याचे उदाहरणही पटकन आठवत नाहि. ओपनर असल्यामूळे सस्प्टीबिलिटी अधिक असल्यामूळे असावे.
>>होपफुली, रॉयल्स लवकर गाडी
>>होपफुली, रॉयल्स लवकर गाडी रुळावर आणतील.
घोडामैदान उद्याच आहे!!
आशुतोष शर्मा मागच्या सीझनमध्ये अगदी फिनिश लाईनला जाऊन अडखळायचा... काल मात्र जिंकून दिलेच त्याने
अक्षर पटेल आउट झाल्यावर मी मॅच बंद केली होती.... सकाळी उठल्या वर कळले की काय कमाल मॅच झाली ते!!
आजची पण मस्त चालली होती मॅच.... बटलर आणि रदरफोर्डने जरा लवकर गिअर बदलायला पाहिजे होता पण त्यांची लोअर ऑर्डर अननुभूवी असल्यामुळे ते जरा जपून खेळले असावेत!!
शेवटची ओव्हर सुरू होताना,
शेवटची ओव्हर सुरू होताना, गुजराथच्या हातात ७ विकेट्स होत्या. (२७ रन्स खूप होते हा भाग क्षणभर बाजूला ठेवू - किंवा मुळातच इतके रहायला नको होते असं म्हणू). इतक्या विकेट्स हातात असताना मॅच हारल्याचं उदाहरण विरळा असावं. व्याशक चा स्पेल गेम-चेंजर ठरला.
राजस्थान रॉयल गाडी रुळावर असो
राजस्थान रॉयल गाडी रुळावर असो की बाहेर, ते एक संघ म्हणून कागदावर कितीही चांगले असले तरी त्यांच्यात ट्रॉफी जिंकायची धमक नाही. हे मी दरवर्षी म्हणतो आणि दरवर्षी ते लौकिकाला जागतात. यावेळी सुद्धा तेच करणार. कारण क्रिकेट कागदावर नाही तर मैदानावर खेळले जाते.
बाई दवे, तो आर्चर त्यांच्या संघात सुद्धा होता, आणि त्याच्या प्राईमला होता.
काही फ्रेंचाईजी बद्दल तशी जणू खात्रीच वाटते की हे ट्रॉफी जिंकायला येतच नाहीत. लखनौ आणि दिल्ली ही दोन नावे सुद्धा त्यातलीच.
आणि हो, पंजाब सुद्धा त्यातलीच.
यंदा अय्यर आहे. बघू काय वेगळे होते का..
अन्यथा मी हे तीन चार संघ स्पर्धेत पकडतच नाही.
काही लोकांना ऑस्ट्रेलिया
काही लोकांना ऑस्ट्रेलिया आवडते काही लोकांना न्यूझीलंड!!
काही लोकांना फक्त आकडेवारी आणि हारजीत यात इंटरेस्ट असतो तर काही लोक त्यापलीकडे जाऊन प्रोसेस, कल्चर, नवोदितांना संधी, प्रयोगशीलता वगैरे बघतात!!
काही लोक आपल्या आवडत्या खेळाडूला कॅप्टन केले नाही म्हणून संघ हरावा अशी आस धरतात तर काही लोक रिटेन्शन पटले नाही, संघनिवड आवडली नाही, संघाने खेळताना माती खाल्ली तर चार शिव्या देतील पण आपला संघ जिंकावा अशीच मनोमन प्राथर्ना करतील.
राजस्थान संघाकडे विजिगिषु वृत्ती नाही हें मीही बऱ्याचडा म्हंटलेले आहे, किंबहुना त्यामुळेच ते काहीवेळा मिडटेबल अडखळले आहेत. पण ते जसे आहेत तसें आपल्याला आवडतात
“ हे मी दरवर्षी म्हणतो आणि
“ हे मी दरवर्षी म्हणतो आणि दरवर्षी ते लौकिकाला जागतात.” - मग झालं तर. विषयच संपला. सरांनी एकदा आकाशवाणी केल्यावर त्या टीम्स ना जिंकायचं असलं तरी ते जिंकणार नाहीत. वाल्मिकीच्या शब्दाखातर प्रत्यक्ष परमेश्वराला मानवी अवतार घेऊन रामायण घडवावं लागलं होतं असं मानतात. इथे सरांच्या शब्दाखातर पूरी कायनात ‘त्या’ तीन-चार संघांना आयपीएल हारून दाखवणार.
इथे कुठल्या संघाबद्दल किंवा
इथे कुठल्या संघाबद्दल किंवा खेळाडू बद्दल मत व्यक्त करताना ते कोणाचे आवडते तर नाही ना किंवा भावना तर नाही ना दुखावल्या जाणार याची काळजी घ्यावी लागणार वाटते
राजस्थान संघाकडे विजिगिषु वृत्ती नाही यावर एकमत आहे इथेच विषय संपला.
दिल्ली, लखनौ, पंजाब वगैरे संघांचा उल्लेख सुद्धा याच अनुषंगाने केला होता.
विजिगीषु वृत्ती खूप महत्वाची आहे. क्रिकेट हा एक खेळ आहे. यात हारजीत महत्व राखते. नाहीतर लोकांच्या आवडीचे आणि लोकप्रिय खेळाडूच पन्नास वर्षापर्यंत खेळवा आणि आनंद लुटा असे होईल.
८३ चित्रपटात कपिलच्या तोंडी असे बरेच संवाद होते. दोन सामने जिंकून तो खुश होणाऱ्यातला नव्हता. तो वर्ल्डकप खेळायला आला होता तर वर्ल्डकप जिंकणे हेच त्याचे टारगेट होते. आणि म्हणून तो जिंकला. मने जिंकून खुश राहिला असता तर आपल्याला पहिला वर्ल्डकप जिंकायला धोनी यायची वाट बघावी लागली असती.
नव्वदीच्या दशकात अश्याच विजिगीषु वृत्तीचा अभाव निर्माण झालेला. भारत परदेशात जाऊन हरला, ठीक आहे, चालायचेच, फलाण्या ढमक्याचे शतक झाले आम्ही खुश.
शारजामध्ये आमच्या बालपणीची सर्वात अविस्मरणीय आठवण आली. सचिनने एकहाती फायनल पोहोचले. सचिनने एकहाती फायनल जिंकवले.. थोडक्यात खुश होणारे आम्ही याने तर सातवे असमान पार गेलो..
पण आज मागे वळून पाहताना लक्षात येते की पहिल्या सामन्यात सचिन बाद झाल्यावर टारगेट काही अशक्यप्राय नव्हते. पण आपण नंतर प्रयत्नच केला नाही. जणू आठ नऊ विकेट पडल्या आहेत अश्या पद्धतीने औपचारिकता असल्यासारखा तो सामना संपवला.
दादाने पुन्हा ती विजिगीषु वृत्ती भारतीय संघात आणायचा प्रयत्न केला. त्यातून धोनी युवराज सारखे खेळाडू पुढे आले. २०११ ला त्याचे परिणाम दिसले.
आज मागे वळून पाहताना कोणत्या खेळाडूने किती क्लासिकल शॉट मारले, किंवा किती शतके मारली या गोष्टी नाही तर अश्या विजयाच्या आठवणीच पिढ्यानपिढ्या आनंद देतात हे लक्षात येते. अडलेड, कलकत्ता, गाबा.. १९८३.. २००७.. २०११..
मी फार आयपीएल सामने पहात नाही
मी फार आयपीएल सामने पहात नाही ( मुख्य कारण , वयामुळे डोळ्यावर ताण कमी करणे हितकारक ). पण काल श्रेयस अय्यरच्या पंजाबचा खेळ खूप आवडला. लक्ष ठेवलं पाहिजे ह्या संघावर.
अहो, त्या आयपीएल मध्ये जर एवढ्या सिक्सरच मारत असतात, तर त्या अडवायला क्षेत्ररक्षक असे खालीच कां उभे करतात ? नारळ - सुपारीच्या झाडांवर ठेवायचे ना त्यांना !!!
गल्ली क्रिकेटमध्ये असे कुठे
गल्ली क्रिकेटमध्ये असे कुठे टेकाडावर चढलेले, जास्त हलायचा स्कोप नसलेले, कॅचिंग पोझिशन फिल्डर असतात
* गल्ली क्रिकेटमध्ये असे कुठे
* गल्ली क्रिकेटमध्ये असे कुठे टेकाडावर चढलेले, ... फिल्डर असतात * - जवळच्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यांवर, गटारात शॉट मारला तर बाद, इ. इ. गल्ली खेळाला योग्य व आवश्यक असे नियम असतातच ना तिथेही ! ( एका वाडीत तर समोरच्या पहिल्या मजल्यावर शॉट मारला तर 2 रन्स, तिसऱ्या मजयावर चौकार , पण दुसऱ्या मजल्यावर शॉट गेला तर मात्र बाद असा नियम होता ; कारणं, तिथे एक भांडखोर, कटकटी बाई रहात असे !! )
“ इथे कुठल्या संघाबद्दल किंवा
“ इथे कुठल्या संघाबद्दल किंवा खेळाडू बद्दल मत व्यक्त करताना ते कोणाचे आवडते तर नाही ना किंवा भावना तर नाही ना दुखावल्या जाणार याची काळजी घ्यावी लागणार वाटते” - ज्जेब्बात!! मु. पो. पेडगाव! इथे सगळेच आपली मतं मांडायला येतात - पण आपणच सर्वज्ञ असल्याचा आव न आणता. असो.
राजस्थानची अतिशय साधारण
राजस्थानची अतिशय साधारण बॅटींग..... एकाचा पण कनेक्ट होत नाहीये!!
मुळात पहिल्या बॅटींगला दुबे प्ले्यिंग ११ मध्ये का नव्हता? आता सब वाया घालवला ना??
अनाकलनीय टॅक्टिक्स!!
“ राजस्थानची अतिशय साधारण
“ राजस्थानची अतिशय साधारण बॅटींग” - +१ केकेआर ने पीच मस्त रीड केलंय असं वाटतंय.
मी काय म्हणतो, राजस्थान
मी काय म्हणतो, राजस्थान रॉयल्स ने फिली आयपीएल अनपेक्षित रित्या जिंकलेली ना ? उगाच का मोडकळीत काढताय ? चेन्नई इतकीच कंसिस्टंट टीम आहे ती. शेवटची हर्डल क्रॉस करताना पडताहेत पण बहुतेक वेळा त्यांछा संघ अननुभवी आहे. यंग प्लेयर्स ना संधी अधिक देतात त्यामूळे अडखळणे अगदीच अनपेक्षित नसावे.
पण काल श्रेयस अय्यरच्या पंजाबचा खेळ खूप आवडला. लक्ष ठेवलं पाहिजे ह्या संघावर. >> भाऊ त्याआधी प्रियांक आर्यचे शॉट्स बघितलेले नाहित का ? काय मस्त टायमिंगवर खेळलेले पंचेस होते. नकळत दाद निघून गेली. अय्यर भारतीय टीमच्या टी २० चा दरवाजा काढून आत बसणार आहे.
“ यंग प्लेयर्स ना संधी अधिक
“ यंग प्लेयर्स ना संधी अधिक देतात त्यामूळे अडखळणे अगदीच अनपेक्षित नसावे.” - हे खरंय. (यंग डे ज मधला) रहाणे, संजू, यशस्वी, जुरेल, पराग (ह्याविषयी अजून मत-मतांतरं आहेत) असे अनेक यंगस्टर्स रॉयल्सकडून त्यांच्या सुरूवातीच्या काळात खेळले आहेत.
प्रियंक आणि अय्यर काल जबरदस्त खेळले. परवा आशुतोषचे पण शॉट्स प्रेक्षणीय होते. मला त्याचा पहिली लेटकटची बाऊंड्री फारच आवडली.
चेन्नई इतकीच कंसिस्टंट टीम
चेन्नई इतकीच कंसिस्टंट टीम आहे ती
>>
आता चेन्नई मधे धोनी असण्याचं भारूड येणार बघ...
अन्यथा मी हे तीन चार संघ
अन्यथा मी हे तीन चार संघ स्पर्धेत पकडतच नाही.
>>
What about RCB???
असामिजी, श्रेयस अय्यरच्या
असामिजी, श्रेयस अय्यरच्या संघाचं कौतुक केलं. मला आणखी आवडलं तें श्रेयसचं शतक ( 97 नाबाद ) सहज शक्य असूनही त्याने धांवसंख्या वाढवण्याला प्राधान्य दिलं ! अर्थात, बहुतेक नवीन खेळाडू निसंशय प्रतिभावान आहेत. डावरा स्पिन गोलंदाज साई मला खूप प्रॉमिसिंग वाटला.
Pages