आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्दिक नी कॅप्टनशिप चांगली केली, बोलिंग changes आणि फील्ड प्लेसमेंट चांगली होती, रोहित मैदानात नव्हता, म्हणजे रोहित ने केली असे म्हणता येणार नाही असे वाटते

हार्दिक कर्णधार चांगला आहे. गुजरातमध्ये असताना जिंकला आहे. म्हणजे सिद्ध करून झाले आहे.

मुंबईचे प्रॉब्लेम वेगळे होते गेल्या सीजनला. जे कांड झाले होते त्यामुळे संघभावना गंडली होती. यंदा त्यांचा संघ चांगला आहे. संघभावना परत आली तर पुन्हा चमकदार कामगिरी करू शकतात.

अर्थात हार्दिक कर्णधार म्हणून चांगला असला तरी लीडर म्हणून अटीट्युड तितका चांगला नाही. त्यामुळे भारतीय 20 संघाच्या कर्णधारपदी देखील त्याला डावलून सूर्याला संधी दिली. मलाही त्यामुळे तो भारताच्या कर्णधारपदी नको आहे. आयपीएल मध्ये हवा तो गोंधळ घाला. सुदैवाने भारताचा कर्णधार म्हणून सूर्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

त्यामुळे भारतीय 20 संघाच्या कर्णधारपदी देखील त्याला डावलून सूर्याला संधी दिली. >> गंभीर, आगरकर ह्यांनी ह्या स्विचचे कारण हार्दिकच्या इंजरी कंसर्न्मूळे असू शकणारी असंभाव्यता असे पब्लिकली सांगीतले होते. त्यांना कोणीतरी १००% अव्हलेबल राहील असा कप्तान हवा होता. बुमरा १००% फिट राहील ह्याची खात्री असती तर सूर्याच्या जागी तो असता. नेक्स्ट बेस्ट फिट सूर्या ऑब्व्हियस आहे. त्याची खरी कसोटी सेना मधे लागणार आहे. त्याचा स्वतःचा फॉर्‍म तोपर्यंत रीकव्हर होईल अशी आशा धरूया.

गंभीर, आगरकर ह्यांनी ह्या स्विचचे कारण हार्दिकच्या इंजरी कंसर्न्मूळे असू शकणारी असंभाव्यता असे पब्लिकली सांगीतले होते.
>>>>

मी त्यांच्या जागी असतो तरी हेच सांगितले असते Happy

अश्या खेळपट्टीवर सूर्याला रोखणे अवघडच.. नऊ चेंडू खेळला, त्यातही त्याने ती चुणूक दाखवली.
मुंबईचा दमदार विजय..
कालच्या चेन्नई पराभवावर अजून मीठ चोळले गेले असेल..
पॉइंट टेबल मध्ये मुंबई चेन्नईच्या वर गेली.

मलाही त्यामुळे तो भारताच्या कर्णधारपदी नको आहे.”
मी त्यांच्या जागी असतो तरी हेच सांगितले असते”

मायबोलीचा ‘आय’ (I) स्पेशलिस्ट!! Lol

* मायबोलीचा ‘आय’ (I) स्पेशलिस्ट * - पण मायबोलीकर नियमितपणे त्यांना 'आय कर ' लावतात व ते तो नियमितपणे भरतातही !!! Wink

आय आणि माय हे शब्द इंग्रजी भाषेत स्वतःसाठी वापरले जात असले तरी मराठीत आईसाठी वापरले जातात.
आपली संस्कृती खरेच महान आहे पण आपल्यालाच त्याची कदर नाही.

असो,
मुंबई आणि चेन्नई या दोन्हीत आई आहे म्हणून हे दोन संघ माझे फेवरेट आहेत.

“नियमितपणे त्यांना 'आय कर ' लावतात” - Lol

“मुंबई आणि चेन्नई या दोन्हीत आई आहे म्हणून हे दोन संघ माझे फेवरेट आहेत.” - तशी ती (I) अजून ६ संघात आहे. त्यांनाही आपलं म्हणा साSSSSSSSर.

आज रेडीफवर रायुडूचेच धोनी नि त्याच्या फॅन्स बद्दल मांडलेले विचार अजून काही जणांनी मांडलेले पाहिले. बहुधा धोनीचा शेवटचा सीझन असे दिसतेय.

धोनीचा लास्ट सीजन आहे म्हणून चाहत्यांना भावनिक करतात आणि पैसा कमावतात... त्यामुळे काही खात्री देता येत नाही.

* कबूल केल्याप्रमाणे. * - मस्त ! माझं व्यंचि तर खूपच बोलकं व परफेक्ट ! टपल्या खाऊन डोकं आकुंचन पावलेलं व कान सतत पिरगळून घेतल्याने गायब !!! Wink

*बहुधा धोनीचा शेवटचा सीझन असे दिसतेय.* -

दोष तुझा नाही , तसा त्या धोमीचाही नाहीं; पण ज्यांना ज्यांना जिथे कुठे ट्रम्प कार्ड समजलं जातं, त्यांचे दिवस भरलेत हे खरं !!!IMG_20250402_212606.jpg

आज हैद्राबादची कसोटी आहे खरी. डिसापॉईंटींग बॉलिंग नि रिंकु नि व्यंकटेश ला फूल मार्क्स. रिंकू बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे त्यामूळे खेळला कि मस्त वाटते. तो ज्या क्रमांकावर खेळतो तिथे कंसिस्टंसी दाखवणे खडतर नि थँकलेस आहे ह्या जाणीवेचा फायदा त्याला मिळत राहावा.

पहिल्या मॅचला बलाढ्य वाटलेली हैद्राबादची फलंदाजी ह्यात बहुदा राजस्थानच्या ढिसाळ गोलंदाजीचाच मोठ्ठा हात होता Wink

हैदराबाद फलंदाजी मजबूतच आहे.
पण फेल जायची कारणे ईतर सुद्धा असतात. फॉर्म मध्ये नसणे किंवा प्रत्येकाला त्याचा रोल डिफाइन नसणे, प्लान बी किंवा सी नसणे..

“ पहिल्या मॅचला बलाढ्य वाटलेली हैद्राबादची फलंदाजी ह्यात बहुदा राजस्थानच्या ढिसाळ गोलंदाजीचाच मोठ्ठा हात होता” - हैद्राबादचा प्रवास पहिल्या मॅच नंतर विरूद्ध दिशेनं झाला (तो न होवो, पण) तसा राजस्थानचा पण ‘विरूद्ध’ दिशेनं व्हावा ही आशा! Wink Happy

आज केकेआर मस्तच खेळले. केकेआर च्या ‘आर’ चा दिवस होता आज. रहाणे, रघुवंशी, रिंकू, अय्यर, वरूण, अरोरा - एकदम भरभरून परफॉर्म करून गेले.

ह्या सीझनला मॅच संपल्यानंतर खेळाडू विरोधी संघातल्या खेळाडूंबरोबर नेहमीपेक्षा जरा जास्तच गप्पा मारताना; मैदानावर रेंगाळताना दिसतायत का? म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण सगळेच जण करतायत त्यामुळे ठरवून केल्यासारखे वाटतेय!!

>>तसा राजस्थानचा पण ‘विरूद्ध’ दिशेनं व्हावा ही आशा! Wink Happy
हो ना!! तशी लक्षणे दिसलीयत मागच्या मॅचला पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय!!

पंजाब व कोलकत्ता अजून तरी विशेष चमक दाखवताहेत. बघू, आगे आगे होता है क्या !!
*त्यामुळे ठरवून केल्यासारखे वाटतेय!!* - आयपीएल हा तर ' शो बिझ ' आहेच आहे !!! Wink

परवा पंजाब लखनौ मॅच नंतर गोएंका चांगला हसत हसत बोलताना दिसला. कुणाशी बोलतोय ते पाहिलं तर अय्यर होता... Wink

रच्याकने,
अय्यर ची बॅट स्पॉन्सरशिप संजीव गोएंका च्या भावाच्या कंपनीकडे आहे
(गोएंका भाऊ वेग वेगळे बिझनेस ग्रूप सांभाळतात)

ह्या सीझनला मॅच संपल्यानंतर खेळाडू विरोधी संघातल्या खेळाडूंबरोबर नेहमीपेक्षा जरा जास्तच गप्पा मारताना; मैदानावर रेंगाळताना दिसतायत का? >> पार्ट्यांपेक्षा हे बरंय Happy

कुणाशी बोलतोय ते पाहिलं तर अय्यर होता... >> तीन वर्षे गोएंकाची सुटका नाहीये पण Happy

मॅच संपल्यानंतर विरोधी संघातल्या खेळाडू बरोबर बोलायचं हे जवळ जवळ सगळ्या IPL ला होतेय. ह्यात काय ठरवायचं. मॅच संपल्यानंतर काय स्टॅम्प घेऊन भांडण करायला पाहिजे का? का हरवल म्हणून.

>> हे जवळ जवळ सगळ्या IPL ला होतेय.
ह्यावेळी जरा जास्तच होतय!! किंवा त्याला जास्त कव्हरेंज मिळतंय!!
वाईट आहे असं कुणीही म्हंटलेलं नाही उलट चांगलच आहे पण अचानक सगळीच एकदम गुणी बालके झाल्यामुळे आश्चर्य वाटले बाकी काही नाही!!

Pages