आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ लक्षात आले नाही. अय्यरच्या इनिंगमूळे भारावलेलो होतो. Happy क्लीयर थिंकिंग नि क्रिस्प शॉट्स होते एकदम.

चेन्नई मधे धोनी असण्याचं भारूड >> फ्लेमिंग-धोनी काँबो एकाच पद्धतीने विचार करते त्यामूळे उद्या धोनी नसला तरी मोडस ऑपरेंडी तीच राहील चेन्नईची असे मला वाटते.

राजस्थानची कन्सिस्टन्सी चेन्नई इतकीच आहे हे विधान पटले.

फक्त चेन्नई फायनल पोहोचण्याची कन्सिस्टन्सी दाखवते आणि राजस्थान न पोहोचण्याची इतकाच काय तो फरक Happy

डावरा स्पिन गोलंदाज साई मला खूप प्रॉमिसिंग वाटला.
>>>>>
आहेच तो.. शॉर्टर फॉरमॅट असो किंवा डोमेस्टिक लॉन्गर फॉर्मेट, त्याचा परफॉर्मन्स भारीच आहे.. काटा किर्र गोलंदाज आहे..
डावखुरे ऑर्थोडॉक्स गोलंदाजांमध्ये सध्या खूप कॉम्पिटिशन आहे, तिथे फलंदाजी जमणारे बाजी मारतात अशी स्थिती आहे.

हेटमायर ला मागील मॅच मधे आणि आज पण काही जमत तर नव्हतंच पण पोट जरा जास्तच सुटलंय त्यामुळे मर्यादा येतेय फटक्यांवर

*डावखुरे ऑर्थोडॉक्स गोलंदाजांमध्ये सध्या खूप कॉम्पिटिशन आहे, तिथे फलंदाजी जमणारे बाजी मारतात अशी स्थिती आहे.* - + 1 ! रवी शास्त्री ऑस्ट्रेलियात ऑडी जिंकून आल्यापासून अधिकच झालंय हे . बेदी मात्र निव्वळ गोलंदाजीवर संघात होता व कर्णधारही झाला !

हैदराबादचीच शिकार झाली आज...
या पिचवर असे गोलंदाज घेऊन सुटलेल्या हेडला एक जीवदान देऊन हैदराबादला २०० आत रोखणे कमाल आहे

हा व्हिडिओ बघा.

लास्ट ओवरच्या चौथ्या चेंडूवर स्टोइनिस च्या शॉटवर कोहली दुसरा रन धावला नाही कारण तो ९८ धावांवर होता..
आणि मग त्याने शतक केले.

https://www.facebook.com/share/r/19BsiPNCZb/

कोणाकडे काही स्पष्टीकरण आहे का यावर सुद्धा?? Happy

कोणाकडे काही स्पष्टीकरण आहे का यावर सुद्धा?? >> ही मॅच रोहित नि धोनी मॅच बघायला आले होते . ते दोघेही साईट स्क्रीनच्या वरच्या पॅव्हेलियन मधे बसलेले होते. पहिला रन झाल्यावर कोह लीचे शतक झाले हे बघून रोहितने खुष होऊन टाळ्या वाजवाय्ला सुरूवात केली. कोहलीच्या लक्षात हा गैर सझालाला म्हणून कोहलीने त्याला हात केलेला दिसतो बघा. तेंव्हाच धोनी ने स्टायरीसला 'तू जरा शांत राहा. लोक इथे कोहलीला बघायला आले आहेत, तुला नाही असा इशारा केला. म्हणून स्टायरीस वैफल्याने हसताना दिसतो बघा. त्या गडबडीमधे दुसरा रन राहूनच गेला. कोहली ने शॉट मारला तेंव्हाच मी जस्ट आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आलो होतो नि टी.व्ही.वर पाहिले होते. मी खूप लहान होतो पण एव्हढ्या महान खेळाडूंच्या कामगिरीमूळे माझ्या मनात एकदम ठासून राहिले आहे हे सगळॅ. ह्या सगळ्यांचे नुसते हावभाव बघून मी त्यांचे काय सुरू आहे ते ओळखले. सरांचा वरदहस्त आहे माझ्यावर म्हटले !

शंभरच्या जवळ आलेल्या खेळाडूने शेवटच्या ओव्हरमधे नुकत्याच आलेल्या खेळाडू पेक्षा स्वतःकडे स्ट्राईक ठेवला म्हणून ठपका ठेवताय सर ? २०१९ मधली क्लीप जाऊन शोधलीत ! धन्य आहात !

पुरण चांगल जमलय.
काल भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला. Happy
नाही म्हणल तरी टी२० मधे देखण्या "क्लास" शॉटसची टेस्ट (जमिनीलगत नजाकतीत मारलेलेले लेट कट, कव्हर ड्राईव, ग्लान्स, फ्लिक) पेक्षा वेगळी अशी ओळख तयार होतीय.
म्हणजे रिवर्स स्वीप, अप्पर कट, कव्हर्सच्या वर मारलेल्या सिक्स. आ वासून पहात रहावे असे फटके.
बॉलर्स आणि कॅप्टन्स सुद्धा नविन नविन टॅक्टिक्स शोधून काढतात. विकेट घेण्यासाठी केलेले माईंड गेम्स कधी कधी कळले तर खूप मजा येते. वाह क्या बात है.
अर्थातच टी२० चे एक वेगळे शास्त्र निर्माण झालय. आणि समाजातील इतर गोष्टींप्रमाणे वर्ल्ड हॅज बिकम फ्लॅट.

असामी २०१९ चा व्हिडिओ शोधायला नाही गेलो. २०१९ आहे हे माहीत देखील नाही. दिवसाला पन्नास रीळ बघतो त्यात ४५ क्रिकेटच्या येतात. त्यात दिसली ही तर शेअर केली. पण मला वाटते वर्ष कुठले याने फरक पडत नसावा.

अर्थात यात मी कोहलीला दोष देत नाहीये. कोणाला द्यायचा झाल्यास तो आधी आपल्या येथील सुपरस्टार कल्चरला द्यावा लागेल आणि त्याची जबाबदारी त्या सर्व क्रिकेटप्रेमीनवर जाईल ज्यांना आपल्या आवडीच्या खेळाडूने शतक केले की हुकले याची जास्त पडली असते. आणि हे आजचे नाही तर पार नव्वदीपासून बघत आलो आहे. कधी काळी मी सुद्धा अश्याच विचारांचा होतो.

आणि हो तो समोरचा खेळाडू स्टोइनिस होता, ८ बॉल १७ .. दोन धावले असते तर १८.. दोन फोर एक सिक्स.. मारून खेळत होता.

पण असो,

ही कॉमेन्ट्री वाचा.. यात सीन क्लिअर केलाय ज्यांनी लिहिले आहे त्यांनी. कारण स्पष्टच लिहिले आहे. आणि हे लिहिणारे लोक नि:पक्ष असतात असा आजवरचा अनुभव. अन्यथा टीव्हीवरचे सारे समालोचक लाल करणारे असतात, जे करत नाहीत त्यांना हाकलले जाते Sad

IMG_20250328_084853.jpg

*ज्यांना आपल्या आवडीच्या खेळाडूने शतक केले की हुकले याची जास्त ...* -
क्रिकेटमध्ये फार पूर्वीपासून शतक हे मानचिन्ह मानलं जातं व सामन्याच्या निर्णयावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेत फलंदाजाने शतक करण्याचा प्रयत्न करणं व सहकाऱ्यांनी त्याला त्यासाठी साथ देणं, हे योग्य व खेळाशी सुसंगत आहे. फालतू आकडेवारीचा उदो उदो करणं व शतक ही जणू फालतुगिरी आहे असा पवित्रा घेणं मला तरी हास्यास्पद वाटतं.

सामन्याच्या निर्णयावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेत फलंदाजाने शतक करण्याचा प्रयत्न करणं
>>>>

हो बरोबर, जेव्हा सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो तेव्हाही एखादा फलंदाज आपल्या शतकासाठी गेला हे आढळते तेव्हाच त्यावर टीका करतो.

सचिनच्या शंभराव्या शतकावेळी देखील सामन्याच्या निकालावर परिणाम झाला होता. आपण बांगलादेश सोबत हरलो होतो.
पण आपण सचिनला देव बनवून ठेवले असल्याने हे सर्वच जण मान्य करणार नाहीत.

कोहलीबाबत सुद्धा हेच झाले आहे.

अशांवर टिप्पणी केली की यांचे चाहते जळके लाकूड घेऊन हल्ला करतात. आपल्याला यांचे द्वेष्टे ठरवून मोकळे होतात. यांचे ईतर पराक्रम मोजून दाखवतात. देशासाठी एवढे खेळले आहेत तर एखादे शतक स्वतःसाठी केले तर काय बिघडले असे म्हणतात.. पण शेवटी तो अमुकतमुक सामना आपण 5-10 धावांनी जिंकलोच ना म्हणून युक्तीवाद करतात. हरल्यावर दुसरे तेवढे तरी खेळले का म्हणून वाद घालतात... आणि बरेच काही.

*पण आपण सचिनला देव बनवून ठेवले असल्याने हे सर्वच जण मान्य करणार नाहीत.* हा उपरोध अनाठायी आहे. '' शतक " ही संकल्पना क्रिकेट एवढीच जुनी आहे व अधिकाधिक महत्त्वाची होत गेली आहे. कोणत्याही फलंदाजाला ( व त्याच्या चाहत्यांना ) त्याचं अप्रूप असणं स्वाभाविक आहे. प्रत्येक फलंदाजाला (सेहवाग अपवाद ) म्हणूनच कमी अधिक प्रमाणात नव्वदीचा दबाव जाणवतो. विरुद्ध संघ देखील हे जाणून गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतात. त्यामुळे, शंभर हा क्रिकेटमध्ये नुसताच एक आकडा नसून, खेळाचा महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. दबावाखाली फिल्डार कडून साधा झेलही सुटतो व त्यामुळे सामना हातचा जावू शकतो. तो दबाव जसा क्रिकेटचा अस्सल भाग आहे तसंच शतकाजवळ आल्यावर फलंदाजकडून होणाऱ्या चुकाही आहेत. झेल सुटणं ही गंभीर चूक आहे तशाच त्याही सदोष चुका आहेतच. मात्र त्या चुकांना वेगळे निकष लावून स्वार्थीपणाचा शिक्का मारणं मला साफ चुकीचं वाटतं.

गल्लत होत आहे.
वैयक्तिक शतकाचे प्रेशर आणि नर्वस नाईंटी याबद्दल मी बोलत नाहीये.. तो मनुष्य स्वभाव आहे, ते होतेच. म्हणून विरोधी कप्तान सुद्धा याला संधी समजून तसे डावपेच आखतो.

मी म्हणत आहे ते संघहिताचा विचार डावलून आपले शतक कसे होईल याला प्राधान्य देणे. आणि त्या नादात संघाचा स्कोर कमी होणे
जे वरील दोन उदाहरणात होते.

गल्लत माझी होत नाहीय.
धांवांचं लक्ष्य, आवश्यक धांवगती इ संघ हिताच्या गोष्टींचं भान राखून 90+ वैयक्तिक धांवा केल्यावर जर जमलंच तर शतकही पदरात पाडून घ्यावं असं वाटणं म्हणजे संघहित आडवं मारणं असा अर्थ होत नाही. ती तारेवरची कसरत कधी दुर्दैवाने नाही जमली , तर ते बॅड लक . पण त्यामुळे त्या फलंदाजाला स्वार्थी म्हणणं हे अन्यायकारकच ठरतं, यावर मी ठाम आहे!

“ अशांवर टिप्पणी केली की यांचे चाहते जळके लाकूड घेऊन हल्ला करतात. आपल्याला यांचे द्वेष्टे ठरवून मोकळे होतात. यांचे ईतर पराक्रम मोजून दाखवतात” कोण कोणास म्हणाले Rofl

जमलंच तर शतकही पदरात पाडून घ्यावं असं वाटणं म्हणजे संघहित आडवं मारणं असा अर्थ होत नाही
>>>>>>

पण वरच्या दोन्ही उदाहरणात संघहिताला फटका बसला आहे हे मान्य नाही का?

सगळे शतक शतक करताहेत त्यावरून आठवलं मी लहानपणी शेतात क्रिकेट खेळायचो तेव्हा दोन चार शतक मी पण मारले होते.

कोण कोणास म्हणाले >> Lol - खरय !

पण त्यामुळे त्या फलंदाजाला स्वार्थी म्हणणं हे अन्यायकारकच ठरतं, यावर मी ठाम आहे! >> +1००%

निव्वळ त्या सामन्यापुरते बघायचे तरी दोनशे चे करणे हा नॉर्म तेंव्हा झाला होता का ह्याचे उत्तर शोधले कि लक्षात येईल. त्याधीच्या तीन ओव्हर्स मधे कोहली किती अँप्ड अप खेळत होता हे बघितले तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवणे खटकतय का ? स्वतःच्या बॅटींग अ‍ॅबिलिटीवर जबरदस्त विश्वास - तू करशील ते मी त्यापेक्षा १००% पटीने जास्त चांगले करेन - ह्या तत्वावर कोहली आयुष्यभर खेळत आला आहे त्याने संघापेक्षा निव्वळ शतकासाठी हे केले असेल ? मुद्दा खेळाडूंच्या स्वार्थीपणाचाच असता तर कोहलीचे उदाहरण देणे ह्यासारखा मूर्खपणा नसावा. ही व्यक्ती 'प्रतिस्पर्ध्याची प्रत्येक विकेट इंवॉल्व्ह्ड बॉलर-फिल्डरपेक्षाही जास्त इंटेंसिटी ने एंजॉय करते , ती व्यक्ती -सामन्याचा निकाल काहीही लागो, माझे शतक मह्त्वाचे आहे - अशी भूमिका घेईन अशी शंका येऊ शकते कोणाच्या मनात येऊन शकते ह्याचे आश्चर्य वाटते. तीच कदाचित अजून दोन पावले पुढची गोष्ट सचिनची ! काही खेळाडूंचा ओव्हरऑल वावर, त्यांचे खेळ नि देशाकडे असलेले डेडीकेशन बघता 'संघहित दुय्यम' असा विचार ते करत असतील असे सुचवणे आपल्या विचारांच्या करंटेपणाचे लक्षण आहे असे खुशाल समजावे नि निरर्थक आकडेवारी शोधण्यामधे वेळ वाया घालवावा.

आज सुद्धा धोनीने जबरदस्त डम्पिंग केली..
विकेट किपर मधील सुपर हिरो आहे हा..

4.6 Fast-handed stumping attempt from Dhoni, sent upstairs. Didn't look like Salt lifted his toe in real time. But let's see. Replay shows the front foot was on the line as he missed the on-the-up cover drive off the length ball angling away outside off. The toe didn't lift much but it did hover, the ball was on top of fifth stump, Dhoni didn't have to move his knees, which is when his superpower is unleashed. The time between the ball being caught and swooshed onto the stumps might be 0.10 seconds or fewer, remarkable reflexes and Salt - who probably didn't lift his foot even a centimetre - has to walk back for a good, but brief, 32. 45/1

धोनी चे चाहते कोण कोण आहेत... मॅच जिंकवता येणार नाही तर ९ नंबर वर खेळायला येणार.
सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग ला वय वाढलंय म्हणून खेळायला जमत नाही म्हणणारेच....

धोनीचा सी एस के मधला रोल कीपर नि मेंटॉर एव्हढाच उरला आहे का ? बॅटस्मन म्हणून तो शेवटच्या २-३ ओव्हर्स मधेच येणार , थोडीफार गदा फिरवणार, लागले मटके तर लागले असे धरायचे का ? तसेच असेल तर त्यालाच सब म्हणून का वापरत नाही ? आज अश्विन पंधराव्या ओव्हरमधे आला जेंव्हा आस्किंग रन रेट जवळजवळ सोळा सतराचा होता. मार्जिन कमी करायला तरी त्याच्याआधी धोनीने येणे जरुरी होते असे वाटले.

आर्ग्युमेंटला प्रत्त्युत्तर देता आले नाही हे लक्षात आल हं सर. आता ह्या बाफावर विशिष्ट प्रसंगीच लिहिणारे दोन तीन आयडी इथे काही तरी लिहायला येतील . Lol

अर्थातच टी२० चे एक वेगळे शास्त्र निर्माण झालय. आणि समाजातील इतर गोष्टींप्रमाणे वर्ल्ड हॅज बिकम फ्लॅट. >> येस विक्रम. पॉवर हिटींग, सतत आक्रमक बॅटींग करणे, विकेट टेकिंग बॉलर्सना लिमिटेड ओव्हर्स मधे प्राधान्य , खेळाडूंचे फ्री लान्सींग करण्याला प्राधान्य हे पण अ‍ॅड करा टी २- च्या देणग्यांमधे. एक एको सिस्टीम तयार झालीये.

आजच धोनीने केलेल stumping जबरदस्त. >> सलग दोन सामन्यांमधे असे जबरदस्त स्टंपिंग केलय.

Pages