Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“ तसेच असेल तर त्यालाच सब
“ तसेच असेल तर त्यालाच सब म्हणून का वापरत नाही ? ” - सहमत! धोनीच्या फॅन्ससाठी (ब्रँड व्हॅल्यूसाठी??
) त्याला शेवटी १०-१२ बॉल्स मधे २-३ सिक्सेस मारायला द्यायच्या ह्यापेक्षा त्याला सब करणे किंवा त्याहीपेक्षा थिंकटँकचा भाग करून घेणे जास्त योग्य वाटतं.
ब्रँड व्हॅल्यूसाठी? >>
ब्रँड व्हॅल्यूसाठी? >>
जोकस अपार्ट, रायुडूची धोनी नि सीस्के बद्दल मुलाखत वाचली का ? त्याने मुख्य मुद्दा हा मांडलाय कि सी एस के ने धोनी च्या पलीकडे काही बिल्ड करायचा प्रयत्नच केला नाही. जाडेजा एक्स्पेरिमेंटनंतर धोनीच्या भोवतीच सगळे केंद्रित ठेवलय. त्यामूळे फॅन्स बेस्ड ही संघापेक्षा धोनीच्या भोवती बिल्ड झालाय. आजही त्याच्या आधी बॅटींगला येणारे प्लेयर्स लवकर बाद होऊन धोनी मैदानात उतरावा ह्याची फॅन्स वाट बघत असतात. जेंव्हा केंव्हा धोनी रीटायर होईल तेंव्हा त्या परीणाम एकंदर लोकप्रियतेवर होणार.
आर्ग्युमेंटला प्रत्त्युत्तर
आर्ग्युमेंटला प्रत्त्युत्तर देता आले नाही हे लक्षात आल हं सर.
>>>
कसले आर्ग्युमेंट
पर्सनल अटॅक पलीकडे काय होते तुमच्या पोस्टमध्ये जे त्याला उत्तर द्यावे.
धोनी देशाच्या संघात जागा
धोनी देशाच्या संघात जागा अडवून नाहीये.
ही फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे.
इथे मालक ठरवतो कोणाला घ्यायचे कोणाला नाही. आणि त्या खेळाडूचा त्याला काय फायदा आहे.
इतकी साधी गोष्ट समजून सुद्धा धोनीच्या निवडीवर चर्चा चालू आहे कमाल आहे
ज्या अर्थी त्याला घेतात याचा अर्थ त्याचा तसाच फायदा आहे.
आणि हो,
ब्रँड व्हॅल्यू हेच उत्तर आहे. थट्टेचा स्वरूपात का होईना तुम्ही ते स्वतः दिले आहे
मॅच बघताना थोडी कॉमेंट्री सुद्धा ऐकत जा...
हिंदी ऐकाल तर अजून धमाल येईल..
नुसते धोनी धोनी चालू असते..
आणि देशभरात कुठेही जा.. पिवळा महासागर लोटला असतो..
तो फलंदाजीला येतो तेव्हा आवाजाची पातळी किती आहे याचे नवीन नवीन रेकॉर्ड दाखवले जातात
अरे हो तुम्हाला आकडे नको असतात.. पण ती क्रेझ तर दिसून येते ना..
सचिन, धोनी आणि रोहित शर्मा या तिघांसाठीच ती क्रेझ अनुभवता येते.. जे खरेच आकड्यांच्या पलीकडे आहे
किंबहुना आयपीएलची हीच मजा आहे..
फॅन वॉर..
क्रिकेट म्हणून हे नकली आहे..
रटाळ होते असे वाटू लागले की इथे स्क्रिप्ट लिहिल्या जातात..
जसे त्यादिवशी रन आउट आणि धोनी मैदानात !
आज धोनीने शेवटच्या दोन ओवर
आज धोनीने शेवटच्या दोन ओवर बॅट फिरवायला सुरुवात करता गोलंदाज पुन्हा तश्याच दबावात आले होते जसे नेहमी येतात.
धोनी फलंदाजीत मोठ्या खेळींचे योगदान देऊ शकत नाही, पण फिनिशिंग धमाके तो आजही करू शकतो असे बघून तरी वाटले. पण आज सुरुवातीच्या फलंदाजांनी फारच नांगी टाकली. वरच्यानी थोडा खेचला असता सामना तर मजा आली असती.
आणि दोन्ही सामन्यात त्याने जे स्टंपिंग केले आहे त्याला तोड नाही.. अजूनही कोणी तसे करत नाहीये.
तो मैदानावर असताना कर्णधार म्हणून त्याचा अनुभव यालाही दुसरा पर्याय नाही... चेन्नईतच काय जगात नाही.
थोडीफार गदा फिरवणार, लागले
थोडीफार गदा फिरवणार, लागले मटके तर लागले असे धरायचे का?
>>>>>>
धोनी आंधळ्यासारखी गदा नाही फिरवत. अक्कल हुशारीने खेळतो.
तसेच असेल तर त्यालाच सब म्हणून का वापरत नाही?
>>>>>
सब म्हणून कसे वापरणार त्याला?
तो तुमचा कीपर आहे, तो तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना हवाच आहे.
कसले आर्ग्युमेंट >> सर दोन
कसले आर्ग्युमेंट >> सर दोन मिडिया रील्स कमी बघून आम्हा बापड्यांचे पोस्ट पूर्ण वाचायचे कष्ट घेतले तर सापडेल.
सब म्हणून कसे वापरणार त्याला?
तो तुमचा कीपर आहे, तो तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना हवाच आहे. >> जर मी चुकत नसेल तर टॉस झाल्यावर टीम नि ५ प्रोबेबल सब द्यायचे असतात. जर प्रथम बॉलिंग असेल तर धोनीला कीपर म्हणून आता ठेवा नि दुसर्या इनिंग्मधे सब म्हणून त्याच्या कागी शेवटी ८-१० ओव्हर्स खेळेल असा फिनिशर आणणे. आधी बॅटींग असेल तर धोनी आधी बाहेर राहील नि एका बॅटस्मनच्या जागी कीपर म्हणून आत येईल. जर तो २-३ ओव्हर्स्च बॅटींग करणार असेल तर व्हॅल्यू अॅडिशन आहे का बॅटस्मन म्हणून ?
ही फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे.
ही फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे.
इथे मालक ठरवतो कोणाला घ्यायचे कोणाला नाही. आणि त्या खेळाडूचा त्याला काय फायदा आहे. >> इथे मी अतिशय विनम्रपणे मुंबई इंडियन्सनी जी अंबानीच्या मालकीची टीम आहे त्यांनी रोहित च्या जागी पांड्याला कप्तान म्हणून आणल्यावर आपण जे वक्तव्य केले होते त्याची पुसटशी आठवण करून घ्यावी अशी विनंती करतो.
भुवनेश्वर आणि यश... दोघांची
भुवनेश्वर आणि यश... दोघांची एक एक ओवर बाकी असताना कृणाल शेवटची ओवर का तर धोनी ला एक दोन षटकार मारता येतील. कारण धोनी समर्थक आहेत चेन्नई समर्थक नाहीत. संघ गेला खड्ड्यात व्यक्ती पुजा... पण हेच सचिन बद्दल केलं तर पोट दुखायंच...
असो... सचिन, रोहित किंवा विराट यांनी आजपर्यंत मॅच जिंकणार तर नाही म्हणून ९ नंबरवर खेळायला आले नाही...
कधी कधी ओनर्सची गणिते कळत
कधी कधी ओनर्सची गणिते कळत नाहीत. शार्दूलला कुणीच कस घेतल नव्हत?. श्रेयसला केकेआर नी का नाही रिटेन केल? रहाणे आधी कसा सगळ्यांकडूनच आउट ऑफ फेवर झाला आणि मग एकदम कॅप्टन. उडानकट सगळ्यात महाग का झाला होता?.
कर म्हणजे ही चुकलेली गणिते असतात.
असामी, खरच टी २० ने काय दिले याची यादी खूप मोठी होइल. आधी मटके वाटणारे शॉटस, फ्लूक वाटणारे झेल, अशक्य वाटणारे चेसेस आता अगदीच आश्चर्य न वाटणारे कॉमन झालेत. पण अजूनही मलिंगा यॉर्कर कॉमन नाहीये, की बॅटस्मन सुधारलेत?. एक मात्र नक्की अनकॅपड भारतीय वीशीतले खेळाडू भीड चेपल्यामुळेमोठुया नावाची भिती न घेता निडर पणे खेळत आहेत हे नक्की.म्हणून म्हणतो cricket world has become flat due to T20 and specially IPL.
दुसर्या इनिंग्मधे सब म्हणून
दुसर्या इनिंग्मधे सब म्हणून त्याच्या जागी शेवटी ८-१० ओव्हर्स खेळेल असा फिनिशर आणणे
>>>>>>>
धोनीच्या जागी का आणायचा?
तो अकराव्या फलंदाजाच्या जागी येणार...
काही चुकत असेल तर करेक्ट करा.
भुवनेश्वर आणि यश... दोघांची
भुवनेश्वर आणि यश... दोघांची एक एक ओवर बाकी असताना कृणाल शेवटची ओवर का तर धोनी ला एक दोन षटकार मारता येतील.
>>>>>>>
म्हणजे स्क्रिप्ट लिहिली जाते. ज्यात प्रतिस्पर्धी संघ कर्णधार देखील सामील असतो असे म्हणायचे आहे का? इथे कोणाला हे मान्य होत नाही.
मुंबई इंडियन्सनी जी
मुंबई इंडियन्सनी जी अंबानीच्या मालकीची टीम आहे त्यांनी रोहित च्या जागी पांड्याला कप्तान म्हणून आणल्यावर
>>>>>
या अपेक्षित पोस्टची वाटच बघत होतो.
या केसमध्ये चेन्नई मॅनेजमेंट धोनीचा सन्मान करत आहे.
त्या केस मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माचा अपमान झाला होता. एखाद्या भारतीय खेळाडूला अशी वागणूक मिळाल्यावर क्रिकेट प्रेमी म्हणून आवाज उठवला नाही तर उद्या हे संघमालक आपलीच मनमानी करतील.
शंका तर येणारच... कारण
शंका तर येणारच... कारण जास्तीत जास्त रन्स ने जिंकून रन रेट वाढणार आणि प्रतिस्पर्ध्यांचा कमी होणार ना... क्रिकेट हे खेळ भावनेने खेळाव या मताचा आहे मी...
“ इथे मालक ठरवतो कोणाला
“ इथे मालक ठरवतो कोणाला घ्यायचे कोणाला नाही. आणि त्या खेळाडूचा त्याला काय फायदा आहे.
इतकी साधी गोष्ट समजून सुद्धा” - हे जर मान्य असेल, तर
“ क्रिकेट प्रेमी म्हणून आवाज उठवला नाही तर उद्या हे संघमालक आपलीच मनमानी करतील.” - ह्या वाक्याला काहीही अर्थ उरत नाही.
एखाद्या भारतीय खेळाडूला अशी
एखाद्या भारतीय खेळाडूला अशी वागणूक मिळाल्यावर क्रिकेट प्रेमी म्हणून आवाज उठवला नाही तर उद्या हे संघमालक आपलीच मनमानी करतील
>>
त्यांनी पैसे मोजून टीम घेतलीये
तू आवाज उठवणारा कोण??
बघायचं तर बघ नायतर नको बघू...
त्यांना काहीही फरक पडत नाही
बघायचं तर बघ नायतर नको बघू...
बघायचं तर बघ नायतर नको बघू...
त्यांना काहीही फरक पडत नाही
>>>>
बॉस हा व्यवसाय आहे.
आणि यात मी ग्राहक राजा आहे.
मराठी लोकांना धंदा जमत नाही याचे हे एक कारण...
हा अटीट्युड.. पाहिजे तर घ्या नाहीतर पुढे जा..
रोहित शर्मा ला जर वाईट वागणूक
रोहित शर्मा ला जर वाईट वागणूक मिळाली असेल तर त्याने मुंबईची टीम सोडायला पाहिजे होती. अपमानास्पद वागणूक सहन कशाला करतोय तो. बाकी कोणत्याही टीम ने त्याला विकत घेतला असता.
घुमीव घुमीव..... निस्ता घुमीव
घुमीव घुमीव..... निस्ता घुमीव
बॉस हा व्यवसाय आहे.
बॉस हा व्यवसाय आहे.
आणि यात मी ग्राहक राजा आहे.
मराठी लोकांना धंदा जमत नाही याचे हे एक कारण...
हा अटीट्युड.. पाहिजे तर घ्या नाहीतर पुढे जा..
>>
मग, बदलला का अंबानी नी कॅप्टन ग्राहक राजा च्या हुकुमावरून??? अंबानी मराठी पण नाही, त्यानीही फाट्यावर च मारलं आहे, म्हणजे त्याला पण धंदा जमत नाही म्हणणार का??
उगा काहीही पोस्ट...
मग, बदलला का अंबानी नी कॅप्टन
मग, बदलला का अंबानी नी कॅप्टन ग्राहक राजा च्या हुकुमावरून???
>>>>>>
सन्मान मिळवला आम्ही
सन्मान मिळवला आम्ही >>
सन्मान मिळवला आम्ही >> ग्राहक राजा आयपीएल चा मेन रेव्हेन्यू येतो broadcasting and streaming rights मधून तिकिट विक्रीमधून नाही. आजच्या जमान्यामधे योग्य पी आर फर्म वापरून लोकांना हवे तसे वळवता येते. (पांड्याबाबत केले गेलेले पुरेसे बोलके उदाहरण आहे) त्यामूळे ग्राहक राजा टीम इंडायरेक्टली ओन करतो ह्याबद्दल फक्त - दिलो को बेहलाने के लिये येह खयाल अच्छा है गालीब एव्हढेच म्हणता येईल.
आणी सन्मान कसला कपाळचा ? पांड्ञाच कप्तान आहे अजून तेच बोंबलणारे लोक मॅचला जातायेत.
दिलो को बेहलाने के लिये येह
दिलो को बेहलाने के लिये येह खयाल अच्छा है गालीब एव्हढेच म्हणता येईल.
आणी सन्मान कसला कपाळचा ? पांड्ञाच कप्तान आहे अजून तेच बोंबलणारे लोक मॅचला जातायेत.
>>
+१
ग्राहक राजा आयपीएल चा मेन
ग्राहक राजा आयपीएल चा मेन रेव्हेन्यू येतो broadcasting and streaming rights मधून तिकिट विक्रीमधून नाही.
>>>>>
अरे वाह, म्हणजे मीच ग्राहक राजा झालो. मी सुद्धा आयपीएल सामना स्टेडीयमवर जाऊन नाही तर ओट्टीटी वरच बघतो सामना.
आणी सन्मान कसला कपाळचा ?
आणी सन्मान कसला कपाळचा ?
>>>>>>
यावर पानभर पोस्ट लिहिता येईल.
पण मॉरल ऑफ द ईस्टोरी
अंबानीच्या सन्मानाचा कचरा झाला या एकूणच प्रकरणात.
आणि रोहीत शर्मा दोन वर्ल्डकप जिंकलेला कर्णधार झाला.
“ एखाद्या भारतीय खेळाडूला अशी
“ एखाद्या भारतीय खेळाडूला अशी वागणूक मिळाल्यावर क्रिकेट प्रेमी म्हणून आवाज उठवला नाही तर” - भारतीय का क्रिकेट प्रेमी?? क्रिकेट प्रेमी ला खेळाडूचा सन्मान जपताना त्याचं राष्ट्रीयत्व का महत्वाचं वाटावं?
“ सन्मान मिळवला आम्ही” -
ह्या वाक्याचं संदर्भासहीत स्पष्टीकरण हवंय खरं तर!! माबो च्या वॉल ऑफ फेम वर जायच्या दर्जाचं वाक्य आहे.
“ घुमीव घुमीव..... निस्ता घुमीव” -
“ अंबानीच्या सन्मानाचा कचरा
“ अंबानीच्या सन्मानाचा कचरा झाला या एकूणच प्रकरणात.
आणि रोहीत शर्मा दोन वर्ल्डकप जिंकलेला कर्णधार झाला.”
दुसरं वाक्य (अंशतः) खरंय आणि त्याचा पहिल्या वाक्याशी काहीही संबंध नाहीये. मुळात पहिल्या वाक्याला काही अर्थच नाहीये. अंबानीच्या सन्मानाचा कचरा झाला म्हणजे काय झालं? आणि जे काही झालं असं तुला वाटतंय त्याचा इंडियन टीमने एक वर्ल्डकप आणि एक चँपियन्स ट्रॉफी जिंकण्याचा काय संबंध?
अंबानीच्या सन्मानाचा कचरा
अंबानीच्या सन्मानाचा कचरा झाला या एकूणच प्रकरणात. >> अंबानी अजूनही ती टीम ओव्न करतो आहे. अजूनही मार्की टीम समजली जाते. रोहित शर्मा त्याच संघामधे आहे - कर्णधार म्हणून नाही. पांड्याच कर्णधार आहे. रोहितने कप जिंकल्यावर पांड्या स्पेशल उल्लेख वानखेडेवर केला. सूर्या, बुमरा, पांड्या नि रोहितच्या भाईचार्याचे व्हिडियो नि स्ट्रोरीज सोशल मिडियामधे एम आय च्या मिडीयाने फिरवल्या आहेत. स्टेडीयम हाऊसफूल आहेत. (गेल्या वर्षीही होते) फालतू खेळूनही पहिल्या मॅच मधे लोक नाचत होते. अगदी १६-० हरले तरी अंबानीच टीम ओन करणार नि त्यांना हवे ते करणार आहेत. रोहीत शर्मा दोन वर्ल्डकप (टेक्निकली एक चँपियन ट्रॉफी होती) जिंकला ते भारतीय कर्णधार म्हणून नि पांड्याही त्याच टीमचा अविभाज्य भाग होता. आयपील चे ब्रॉडकास्ट राईट्स अजूनही अंबानीकडेच आहेत. डिस्ने नि जियो एकत्र झालेत. 'जियो' भाई 'जियो' ! नक्की कचरा झाला ह्याची खात्री आहे तुला ? असा मी असामी सारखे कडक शब्दाचा अर्थ आता नरम झाला आहे तसे कचराचा अर्थ आता बदलला आहे कि का ?
अंबानीच्या सन्मानाचा कचरा
अंबानीच्या सन्मानाचा कचरा झाला या एकूणच प्रकरणात.
आणि रोहीत शर्मा दोन वर्ल्डकप जिंकलेला कर्णधार झाला.
>>
पण ते कप भारतीय संघानी जिंकले
फ्रॅंचाईजी नी नाही
कितीही मोठी पोस्ट लिहा. सत्य
कितीही मोठी पोस्ट लिहा. सत्य बदलत नाही.
पांड्याला नाहक जास्तीचा मनस्ताप सहन करावा लागला कारण मैदानावर दिसणारा चेहरा तो होता.
पण अंबानी समूहाची घमेंड क्रिकेटप्रेमींनी उतरवली ज्यांना वाटत होते की ते काहीही मनमानी निर्णय घेणार आणि क्रिकेटप्रेमी चालवून घेतील.
पी आर पी आर कितीही म्हणा, पण मुंबईचा राजा रोहीत शर्मा अश्या गर्जना ज्या भारतभरात ऐकू येत होत्या ती पब्लिक काही राजकीय पक्षांच्या सभेला पैसे देऊन लोकं आणतात तसली नव्हती. उलट खिशातले पैसे खर्च करून आले होते.
आणि गंमत म्हणजे तेव्हा शर्मा आयसीसी ट्रॉफी देखील जिंकला नव्हता... आता दोन ट्रॉफी सर्व सामने जिंकत मिळवायचा विक्रम केल्यावर तर त्याचे कद तेव्हाच्या तुलनेत किती मोठे झाले आहे की ते सर्वांना माहीत आहेच.
मुंबईचा राजा आता भारताचा राजा झाला आहे. आणि तो वागला देखील तसाच. या प्रकरणात पांड्याचा गेलेला आत्मविश्वास त्याने पांड्यावर विश्वास टाकून त्याला मिळवून दिला. २०-२० वर्ल्ड्कप फायनल सामन्यात फायनल ओवरमध्ये विश्वासाने त्याच्याच हातात चेंडू सोपवून त्याने दाखवून दिले तो लीडर आणि माणूस म्हणून किती भारी आहे.
जे त्याच्या बद्दल ईतर खेळाडूंच्या तोंडून ऐकतो तेच तो मैदानावर दाखवून देतो.
आकड्यांच्या पलीकडे क्रिकेट असते हे खरेच आहे. पण क्रिकेटींग स्किलच्या पलीकडे सुद्धा हा खेळ असतो. जिथे तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात हे बघितले जाते. आणि तिथे तो नेहमी मने जिंकून जातो
Pages