क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो आठवतेय का?
गेला ट्वेंटी वर्ल्डकप हरल्यानंतर यंदाचा २०२४ चा ट्वेंटी वर्ल्डकप सुरू होण्याआधी भारताचा ट्वेन्टी-२० एप्रोच गंडलेला आहे म्हणून इथे घमासान चर्चा चालायची...

या वर्षी भारताने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला Happy

IMG-20241117-WA0006.jpg

26 T20Is. 24 wins. Attacking, modern-day T20 cricket.

India have truly embraced the format in 2024

*India have truly embraced the format in 2024*. - खरंय, पण ' टी 20 ' च्या मगरमिठीत कसोटी व एक दिवसीय क्रिकेटचा जीव तर गुदमरणार नाहीं ना !! Wink

>>पण ' टी 20 ' च्या मगरमिठीत कसोटी व एक दिवसीय क्रिकेटचा जीव तर गुदमरणार नाहीं ना !! Wink
वेगळ्या टीम, वेगळे कोच, वेगळा ॲप्रोच ठेवला तर कशाला कुणाचा जीव गुदमरतोय!!
पण आपल्याला all format players चे फॅसिनेशन असते ना!!

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाचे मार्गदर्शक आदर्णीय गौतम गंभीर यांनी फटकेबाजी सुरू केली आहे. त्यांना भारतीय खेळाडूंकडून मैदानातही तशीच साथ मिळो.

*पण आपल्याला all format players चे फॅसिनेशन असते ना!!* _
मला वाटतं, प्रश्न फक्त आपल्यालाच कसलं फॅसिनेशन असतं एवढाच मर्यादित नाही. प्रतिभावान खेळाडूंनाही स्वतःला सर्व प्रकारात सिद्ध करून दाखवण्याची ईर्षा असणं स्वाभाविक आहे व तिचा मान राखणं हेही योग्यच असावं.
( पुजारासारखे एकाच प्रकारात लक्ष केंद्रित करणारे खेळाडू अपवादात्मक ) .पण खेळाडूना अशी संधी देताना त्या त्या क्रिकेट प्रकारात सांघिक कामगिरी खालावणार नाही, ही काळजी संबंधित निवडणूक समिती, प्रशिक्षक यांनी घ्यायला हवी.

गेला ट्वेंटी वर्ल्डकप हरल्यानंतर यंदाचा २०२४ चा ट्वेंटी वर्ल्डकप सुरू होण्याआधी भारताचा ट्वेन्टी-२० एप्रोच गंडलेला आहे म्हणून इथे घमासान चर्चा चालायची... >> आणि दोन वर्ल्ड कपमधला अ‍ॅप्रोच सारखाच होता ?

पण खेळाडूना अशी संधी देताना त्या त्या क्रिकेट प्रकारात सांघिक कामगिरी खालावणार नाही, ही काळजी संबंधित निवडणूक समिती, प्रशिक्षक यांनी घ्यायला हवी. >> इंग्लंड नि ऑस्ट्रेलिय ह्यांनी पूर्ण वेगळॅ संघ हा प्रयोग करून पाहिला नि शेवटी हायब्रीड संघ हा अ‍ॅप्रोअच ठेवला आहे असे लक्षात येते. आपणही त्याच दिशेने जाऊ असे वाटते. पण टी २० चा अ‍ॅप्रोच टेस्ट मधे नाहि आणला गेला तरी याचा इंपॅक्ट नक्कीच जाणवत आहे नि तो अधिकच वाढत राहील ह्याबद्दल मला शंका वाटत नाही.

आणि दोन वर्ल्ड कपमधला अ‍ॅप्रोच सारखाच होता?
>>>

नव्हता.
मी सुद्धा भारताच्या ट्वेंटी-ट्वेंटी एप्रोच वर टिकाच करत होतो.
ती टीका आपल्या जागी योग्यच होती. मी सुद्धा त्याच गटात होतो.

माझा इथे मुद्दा त्या टीकेला चूक ठरवणे नाही तर आपण या वर्षात कशी कात टाकली हे कौतुक करणे आहे Happy

तर कसोटीबाबत सुद्धा जरा संयम बाळगूया.. नवीन संघबांधणी होत आहे. एकदा ही सिनिअर बॅच गेली की मला वाटते सर्व फॉरमॅट वेगवेगळे संघ राहतील. हट्टाने इथला स्टार खेळाडू तिथे घुसवणार नाहीत.

*याचा इंपॅक्ट नक्कीच जाणवत आहे नि तो अधिकच वाढत राहील ह्याबद्दल मला शंका वाटत नाही.* _ मान्य. पण तो इंपॅक्ट कसोटीमध्ये किमान हानिकारक व प्रसंगोचित खूप लाभदायक होणं हे त्या खेळाडूच्या कुवतीवर अवलंबून असतं. ( ऑस्ट्रेलियात पंत, सुंदर व कं. कसोटीतच हा इंपॅक्ट वापरून चमकले होते ). प्रत्येक देशाकडे असे खास खेळाडू असतातच. ते अचूक शोधून वापरणं हे खरं कसब आहे. तीन प्रकारांसाठी तीन वेगवेगळ्या टीम is too simplistic , more harmful than helpfull solution, असं मला वाटतं.

*हट्टाने इथला स्टार खेळाडू तिथे घुसवणार नाहीत.* हट्ट म्हणून नाही, पण नीट पारख करून योग्य खेळाडूंचा असा उपयोग करून घेण्यातच शहाणपणा आहे.

पण तो इंपॅक्ट कसोटीमध्ये किमान हानिकारक व प्रसंगोचित खूप लाभदायक होणं हे त्या खेळाडूच्या कुवतीवर अवलंबून असतं. >> बरोबर आहे फक्त तुम्ही "किमान हानिकारक व प्रसंगोचित" हे जे अ‍ॅड केले आहे ते कितपत होत राहील ह्याबद्दल खरच शंका वाटते. रणजी मधे कंसिस्टंट कामगिरी करणार्‍यांना नि आयपील मधे कंसिस्टंट कामगिरी करणार्‍यांना टेस्ट संघामधे दिल्या जाणार्‍या संधी कडे बघता शंका चुकीची आहे असे म्हणू शकतो का ? आयपील हानीकारक आहे असे मी सुचवत नसून आपले संघनिवडीचे फिल्टर्स कितपत योग्य आहेत ह्याबद्दल शंका आहे. मीही हायब्रीड टीम हाच आपला कल राहील असे म्हणातोय.

आपण या वर्षात कशी कात टाकली हे कौतुक करणे आहे >> मी थोडा धीर धरेन असे म्हणतोय. आपण घेतलेला आक्रमक अ‍ॅप्रोअच हा प्रथम बॅटींग करताना दणकून चालला आहे पण चेस करताना काय होते आहे ह्याबद्दल अजून क्लॅरीटी नाहि आहे. सँपल अजून मोठे झाले कि दिशा कळेल.

Indian T20I Batters in 2024

1) India struck a boundary every 4.68 balls this year, their best-ever ratio

2) and six every 12.19 balls, another best.

3) India scored 200-plus totals nine times, three times in the series against South Africa, thereby breaking the record for the most in a calendar year, previously held by Birmingham Bears (2022), India (2023), and Japan (2024) with seven each.

4) Men in Blue batters scored centuries in almost every series in 2024, a stark contrast to their conservative approach of the years gone by. With seven centuries -- three by Sanju Samson, two by Tilak Varma, and one each by Rohit Sharma and Abhishek Sharma -- India set a record for the most team centuries in a calendar year in T20Is.

5) India's overall runs-per-over (RPO) this year stood at 9.55, their highest ever and the second-highest by a men's T20I team in a calendar year (minimum 15 matches), only behind Australia's 9.72 in 2024.

6) Individually, Sanju Samson flourished as an opener, scoring three centuries, the first-ever by any player. He was India's top run-getter in T20Is in 2024 with 436 runs in 12 innings, averaging 43.60 with a strike rate of over 180.

7) During the fifth T20I in Johannesburg, Samson and Tilak Varma scored centuries in the same innings, marking the first instance of such a milestone for a Test-playing nation in a T20I.

8) India's top five batters collectively struck at 135.08 in their first 10 balls this year, the highest-ever for the team and the third-highest for any side with a minimum of 15 matches.

9) Eleven Indian batters scored 200-plus runs this year, with eight maintaining strike rates above 150. Among them were Tilak (306 runs at a strike rate of 187.73), Samson (436 runs, 180.16), and Yashasvi Jaiswal (293 runs, 172.35). Remarkably, five of these batters also averaged over 40.

अ‍ॅडमिन / वेबमास्तर - मायबोली या मराठी संकेतस्थळावर इतका इंग्रजी मजकूर बघून तुम्हांला कसं वाटतंय?

रोहितला मुलगा झाल्याने ठरवले तर पहिल्या कसोटीत तो येऊ शकतो.
अर्थात सराव कितपत गरजेचा आहे त्याला याची कल्पना नाही.
जर पुरेसा सराव मिळणार नसेल तर येऊ नये, जर मिळणार असेल तर जरूर यावे.
देशाचा विचार करून निर्णय घ्यावा.

भारतातले सगळे सोशल मिडिया रोहित कसा मुलाच्या जन्माच्या वेळीही ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी सराव करत आहे असे सांगतो आहे. तसेही तिथे गेलेल्यांनी काय असा मोठा सराव केला आहे ? अ संघातून ज्यांनी केला त्यातला रोहितच्या स्लॉटचा प्लेयर तर खेळवणार नाहि आहोत. मग रोहित जेंव्हा येईल तेंव्हा तोच बरा कि.

पड्डीकल नि जुरेल ला पहिल्या कसोटीमधे खेळवले जाणार असे वाचले. साई ने काय पाप केले होते ? तो तमिळनाडूसाठी मधे ओपन पण करत होता. ईश्वरन चालणार नसेल तर राहुल ला त्याच्या नावडत्या ठिकाणी ठेवण्यापेक्षा साईला चान्स द्यायचा ना ?

इंडिया सीमेंट धोनीला सोडणार अशी बातमी आहे. अल्ट्रा टेक ने इंडिया सीमेंट ला टेकओवर केले आहे त्याचा परिणाम. गुजरात लॉबी?

इंडिया ने नाणे फेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. अश्विनच्या ऐवजी वाशिंगटन सुंदर. नितीश रेड्डी आणि जुरेल आत. KL राहुल opening.
सर, सेपरेट धागा काढा.

राहुल, पडीकल, राणा, रेड्डी, जुरेल..
आणि जयस्वाल देखील ऑस्ट्रेलियात नवखाच..
एकूण संघ पाहता तसे टेन्शनच आहे.

40 _ 3 !!!

67-5
पंत, आता तुमच्यावर मदार सगळी!!

*बॅडलक फॉर राहुल* +१ !
खेळाडूंचा फोकस नाहीं, सगळं लक्ष महाराष्ट्रातल्या निकालांकडे !! Wink

*सेशन आणि आजचा पूर्ण दिवस खेळातील का* _
भारताच्या संघाला गृहीत धरणार नाहीं, असं म्हटलंय ना ऑसीजपैकी कुणीतरी ?

*भारतीय क्रिकेट रसिकांनीच हे म्हटले पाहिजे* _. खरं तर भारतीय संघानेच हे म्हटलं पाहिजे व तसं खेळलं पाहिजे !! Wink

ऑस्ट्रेलिया 31-4
दोन गँगस्टर आहेत आपल्या टीम मध्ये..
एक पंत आणि दुसरा बूम बूम!!
हेच आहेत जे ऑस्ट्रेलियाला तिथे जाऊन डॉमिनेट करू शकतात.

Pages