Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ, एकदम योग्य पॉइंट अन्
भाऊ, एकदम योग्य पॉइंट अन् मस्त व्यंगचित्र...
कसोटीत कोहली आणि वनडे 20-20
कसोटीत कोहली आणि वनडे 20-20 मध्ये रोहीत कप्तान असे हवे होते. आताच नाही तर आधीपासूनच. पण आपल्याकडे सर्व फॉरमॅट एक कप्तान यामुळे आधी कोहली दोन्हीकडे होता आता रोहीत दोन्हीकडे आहे.
2 मॅच आणि एक सिरीज हरले, ही
2 मॅच आणि एक सिरीज हरले, ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. जगातल्या सगळ्या टीम कधी जिंकतात कधी हरतात, हे चालायचेच. पुढील मॅच कडे फोकस करावा आणि खेळावे.
खरे आहे. सेटेनरचे सुद्धा
खरे आहे. सेटेनरचे सुद्धा कौतुक करायला हवे. त्याचे स्पीड वेरिएशन आणि डावपेच कमाल होते. आपल्याकडे सोशल मीडियावर बरेच लोकं याचे कौतुक तर दूर पण त्याच्यासारख्या बॉलरने आपल्या विकेट काढल्या म्हणून त्याला आणखी तुच्छ लेखत आहेत.
या आधी 2012 साली इंग्लंडने
या आधी 2012 साली इंग्लंडने असेच आपल्याला स्वान आणि पानीसर यांच्या फिरकीवर नाचवून मात दिली होती तेव्हा सेहवाग, गंभीर, सचिन, पुजारा, धोनी असे फिरकीला चांगले खेळणारे फलंदाज होते आपल्यात.
खुद्द सचिनने देखील चार सामन्यात 18 च्या सरासरीने फक्त 112 धावा केल्या होत्या.
सेहवाग, गंभीर, पुजारा, धोनी, युवराज, आश्विन या सर्वांच्या धावा आणि सरासरी सचिनपेक्षा जास्त होती.
ती मालिका सुद्धा तेव्हा एक धक्काच होती.
पण आपण पुढे जाऊन त्याचा पॅटर्न होऊ दिला नाही. आणि हे जास्त महत्वाचे आहे.
त्यामुळे तूर्तास वेट आणि वॉच अशी भूमिका घ्यावी हे उत्तम.
एखादी सिरीज हरली म्हणजे फार
एखादी सिरीज हरली म्हणजे फार काही वाईट घडले नाही. पण येणारी पुढची सिरीज मात्र फारच अवघड आहे. त्यात ऑस्ट्रेलिया बदला घेण्यास उत्सुक असेल.
खालील विचारांशी सहमत आहे.
खालील विचारांशी सहमत आहे.
Even at the age of 40, Sachin Tendulkar Played Domestic Cricket!
It's High time, Both Kohli/Rohit to follow the Same!
अर्थात सध्या अती क्रिकेट काळात हे इच्छा असूनही तितके शक्य नाही म्हणा.. स्पेशली दोन्ही तिन्ही फॉर्मेट आणि आयपीएल खेळणारेबाबत..
अर्थात सध्या अती क्रिकेट
अर्थात सध्या अती क्रिकेट काळात हे इच्छा असूनही तितके शक्य नाही म्हणा.. स्पेशली दोन्ही तिन्ही फॉर्मेट आणि आयपीएल खेळणारेबाबत..
>>
अती क्रिकेट नको म्हणून लहान टीम विरुद्ध च्या सिरीज मधून तसही सुट्ट्या मारातातच की. त्यामुळे तो बहाणा आता करता नाही येणार.
त्यातनं आता टी 20 मधून नीवृत्ती घेतल्याने ते लोड पण नाही.
हरले हे दुय्यम पण कसे व कां
हरले हे दुय्यम पण कसे व कां हरले , विशेषतः लागोपाठ दोन एकतर्फी सामन्यात कां हरले, यावर गंभीरपणे विचार होणं योग्य व आवश्यकच !!
आज कुठेतरी सूनंदन लेलेंची
आज कुठेतरी सूनंदन लेलेंची पोस्ट वाचली. भारतीय संघाच्या सरावात ' कलात्मकता ' नव्हती, असं ते म्हणतात. बहुतेक, त्यांना ' कल्पकता ' नव्हती, म्हणायचं असावं. वास्तविक, स्पिनपुढे पहिल्या कसोटीत फलंदाजी ढापळली, तर सरावात त्यावरच भर देणं हे समजायला कल्पकतेचीही गरज नसावी !
कसे व कां हरले , विशेषतः
कसे व कां हरले , विशेषतः लागोपाठ दोन एकतर्फी सामन्यात कां हरले, यावर गंभीरपणे विचार होणं योग्य व आवश्यकच !! >> नैसर्गिक खेळणे मह्त्वाचे कि परिस्थितीला सूट होईल अशी अॅडॉप्टीबिलिटी दाखवणे मह्त्वाचे ह्याचे उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे का हे आधी ठरवा
बीसीसीआय चे प्रवक्ते हा एक
बीसीसीआय चे प्रवक्ते हा एक मजेशीर प्रकार आहे. किती तरी वर्षे त्यांनी मीडीया मॅनेजर नियुक्त केलेला नाही. कोच नि कप्तान किंवा मेन सिलेक्टर त्यांना सोयीचे वाटॅल तेंव्हा स्पष्टीकरण देत आले अहेत. द्रविडच्या काळात त्यात एक सुसूत्रता आली होती असे जाणवले होते. पण त्यातही काही वेगळा किंवा वादग्रस्त निर्णय घेतला असला कि सगळे आळ्मिळी गुप्प चिळी असा प्रकार होत असे. नि मग बीसीसीआय चे सूत्र अनऑफिशियल वावड्या सोडून देत टोन सेट करतात.
हर्शित राणाची ऑस्ट्रेलिया साठी मुकेश कुमार किंवा सैनीच्या पुढे निवड हा त्यातलाच प्रकार आहे. ती योग्य कि अयोग्य हा भाग बाजूला ठेवूया सध्या. पण त्यावर एकही कमेंट कोच, कप्तान किंवा सिलेक्टर ने केली नाही. मग बीसीसीआय चे सूत्र अनऑफिशियल मुलाखतीमधून 'हि गंभीरची निवड आहे" असे वदले. आता भारतीय क्रिकेट फॉलो करणार्या शेंबड्या पोरालाही ह्यात मागे गंभीरचा प्रभाव आहे हे सांगायची गरज नाही पण 'उगाच त्याला क्रेडीट कशाला द्या" असा अॅप्रोच ठेवत अनऑफिशियल गोष्टी सोडून देतात
लेले ला काय नाय येत.
लेले ला काय नाय येत. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एक्स्पर्ट असामी आणि फेफ आहेत.
बोकलत मी अजूनही तू
बोकलत मी अजूनही तू क्रिकेट खेळ "हूड"पणे समजावून देण्याची वाट बघतो आहे.
“त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने
“त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एक्स्पर्ट असामी आणि फेफ आहेत.” -
हे सरांनी वाचलं तर रागावतील बरं का ….. तुमच्यावर. 
हे सरांनी वाचलं तर रा .....
हे सरांनी वाचलं तर रा .....
सर त्यांना ढूंकून भीक घालत नाहीत म्हणून त्यांनी वेगळी झाडे पकडली आहे आज
*नैसर्गिक खेळणे मह्त्वाचे कि
*नैसर्गिक खेळणे मह्त्वाचे कि परिस्थितीला सूट होईल अशी अॅडॉप्टीबिलिटी दाखवणे मह्त्वाचे .... आधी ठरवा* - प्रदर्शनीय सामना खेळताय की कसोटी सामना यावर ह्या प्रश्नाचं निश्चित व एकमेव उत्तर असावं !
*..कितीतरी पटीने एक्स्पर्ट असामी आणि फेफ आहेत.* - 100% सहमत ! अर्थात, 'सरां'चीही एक युनिक स्टाईल
आहे व एक्सपर्ट संघात असाही एक तरी शैलीदार एक्सपर्ट. हवाच !!
प्रॅक्टिसच्या नेटवरचे सर काय सांगतायत तें न ऐकता इंटरनेटवरच्या ' सरा'ना फॉलो केलास, तर तुला इथून तर डच्चू मिळेलच पण तिथेही टाळ्या मिळतील की टपल्या याचाही विचार कर !!

खरं काय ते बोललो तर लगेच भीक
खरं काय ते बोललो तर लगेच भीक मागच्या गोष्टी सुरू झाल्या. भलाईचा जमाना नाय राहिला आज काल. फेफ चांगला माणूस आहे.
परिस्थितीला सूट होईल अशी अ
परिस्थितीला सूट होईल अशी अॅडॉप्टीबिलिटी दाखवणे ही केवळ कसोटीची मक्तेदारी नाहीये. एकदिवसीयमध्ये देखील हा गुण गरजेचा. तिथे तर काळ काम वेग याचे गणित वेगाने बदलत असल्याने ती परिस्थिती सुद्धा थोड्या थोड्या वेळात बदलत असते.
म्हणून तर जगात मारझोड करणारे कैक आहेत. पण फिनिशर म्हणून धोनीचा मान वेगळाच आहे. अॅडॉप्टीबिलिटीचेच दुसरे नाव थाला म्हणावे.
भाऊ
भाऊ
प्रोफेशनल क्रिकेटर कधीच बाहेरचे आवाज ऐकत नाहीत. इथे भारतात आजच्या तारखेला काही करोड नसले तर किमान काही लाख तरी क्रिकेट एक्स्पर्ट असतीलच. आणि त्यांचे मिळून काही हजार युनिक ओपिनियन आणि सल्ले असतील. कोणी वेचायचे म्हटले तरी कुठून कसे वेचणार..
मागे एका कार्यक्रमात रोहीत शर्मा म्हणाला होता की बाहेरचे हे आवाज ऐकू येऊ नये म्हणूनच आम्ही क्रिकेटर कानात हेडफोन घालून प्रवास करतो.
*अशी अॅडॉप्टीबिलिटी दाखवणे
*अशी अॅडॉप्टीबिलिटी दाखवणे ही केवळ कसोटीची मक्तेदारी नाहीये.* - खरंय. पण इतर प्रकारात ती न दाखवणे चुकीचे असले तरी खपून जावू शकते पण कसोटीत तें घातक व अक्षम्य असते !!

*क्रिकेटर कानात हेडफोन घालून प्रवास करतो.* - हे म्हणजे असं झालं की कुण्या देशाचा राजा म्हणतो, " मी कधी बुद्धिबळ स्पर्धा बघतच नाहीं !" . अरे, बुद्धिबळपटू डोक्याचा भुगा पाडत असतात ते समोरच्याला हरवायला, प्रत्यक्ष राजा बघतोय की नाही, याचं त्यांना कांहीं देणं घेणं नसतं. बाहेरचे एक्सपर्टही तसेच , !!!
खपून खरे तर कुठेही जात नाही.
खपून खरे तर कुठेही जात नाही. फक्त हल्ली लिमिटेड ओवर क्रिकेट मध्ये खेळपट्टी सपाट आणि फलंदाजधार्जिनी बनवली जाते.. त्यामुळे हे काही अंशी योग्य आहे म्हणू शकतो.
अॅडॉप्टीबिलिटी जशी
अॅडॉप्टीबिलिटी जशी फलंदाजांनी दाखवायची असते तशी गोलंदाजांनी सुद्धा दाखवणे गरजेचे असते. संटनेरने आपल्याला तिथेच मात दिली.
सर,
सर,
माबो वरील एक्सपर्टनी पण.
चुकून माकून एखादी सेरीज हरले तर केवढे वाद.
म्हणून तर जगात मारझोड करणारे
म्हणून तर जगात मारझोड करणारे कैक आहेत. पण फिनिशर म्हणून धोनीचा मान वेगळाच आहे. अॅडॉप्टीबिलिटीचेच दुसरे नाव थाला म्हणावे.
>>
पेड पीआर चं डील केलं आहेस का?
शर्मा नी 2023 वर्ल्डकप नंतर पेड पीआर वर भयानक पैसा ओतला आहे म्हणतात
छे.. काही गोष्टी त्या त्या
छे.. काही गोष्टी त्या त्या खेळाडू सोबत जोडल्या गेल्या आहेत. तो तो विषय निघाला की पहिले ते ते नाव डोक्यात येते.
आणि शर्मा २०२३ वर्ल्डकप मध्ये सर्वच्या सर्व सामने फायनल वगळता, तसेच २०२४ मधील सर्वच्या सर्व सामने फायनलसह पेड पी आर वर पैसे ओतून जिंकला याची खरेच कल्पना नव्हती.
प्रदर्शनीय सामना खेळताय की
प्रदर्शनीय सामना खेळताय की कसोटी सामना यावर ह्या प्रश्नाचं निश्चित व एकमेव उत्तर असावं ! >> परफेक्ट भाऊ ! हेच आम्ही गेले काही दिवस म्हणतोय. नैसर्गिक शैलीदार खेळामागे आपण वाहत जात आहोत का ह्याचे मूल्यमापन होत असेल अशी आशा धरूया. बाकी तुम्ही आम्हाला एक्स्पर्ट म्हणणे अधिक होतेय.
पेड पी आर वर पैसे ओतून जिंकला याची खरेच कल्पना नव्हती. >> अँकी जिंकण्याबद्दल म्हणाला नाहिये तर शर्मा प्रसिद्धीझोतामधे राहण्याबद्दल म्हणतो आहे. तो अॅप्रोचेबल आहल, खेळाडूंमधे पॉप्युलर आहे , कॉमन माणसासारखा वागतो इत्यादी गोष्टी आधीही होत्या पण आता त्या हायलाईट केल्या गेल्या आहेत वगैरे वगैरे. इंडीया अनकट मधे ह्यावर लेखही होता. (हे तेच लोक ज्यांनी तहलका मधे मॅच फिक्सिंग बद्दल गौप्य स्फोट केला होता - ह्याचा अर्थ शर्मा मॅच फिक्स करतो इत्यादी मी सुचवत नाहिये ). हे चुकीचे कि बरोबर ह्याबद्दल माझे ओपिनियन अजून बनवलेले नाहि आहे.
अँकी जिंकण्याबद्दल म्हणाला
अँकी जिंकण्याबद्दल म्हणाला नाहिये तर शर्मा प्रसिद्धीझोतामधे राहण्याबद्दल म्हणतो
>>>>
एक्झॅक्टली.. आणि मी खेळातील हार जीत बद्दल बोलत आहे. कारण माझ्यासाठी ते मॅटर करते. त्यानंतर तो प्रसिद्धी झोतात राहतोय की गुमनाम अंधेरी गलियो मे.. काय फरक पडतोय. मी काही २०२३ नंतर शर्माचा चाहता नाही तर आधीपासून आहे. मायबोलीवर २०१४ पासून माझा शर्मावर धागा आहे. आधीपासून तो व्हाईट बॉल कप्तान हवा होता असे म्हणत आलोय.
राहिला प्रश्न खेळाडूंना ब्रँड बनवणे तर ते सचिनपासून सुरू झालेय. धोनी आणि कोहली बाबत सुद्धा झालेय. मग रोहितने काय घोडे मारले आहे. हे सारे खेळाडू तसेच लिजेंड होते म्हणूनच हे शक्य झालेय.
याचा आर्थिक फायदा त्या खेळाडूंनाच नाही तर बोर्डाला, स्पॉन्सरना, क्रिकेट संबंधित सर्वाँना होतो. अगदी ते इन्स्टावर पेज काढून रील फिरवतात आणि मिलियन लाईक कमेंट सबस्क्राईबर मिळवतात ते सुद्धा यातून पैसे कमावतात.
या सगळ्यात रोहितच्या धावा, सरासरी, षटकार, शतके, ट्रॉफी, आणि कैक विश्वविक्रम, आणि त्याने जिंकवून दिलेले सामने हे सारे पराक्रम त्याचेच आहेत. तेच भांडवल घेऊन कोणी पैसे कमावत असेल तर कमावू दे. आनंदच आहे
एक्झॅक्टली.. आणि मी खेळातील
एक्झॅक्टली.. आणि मी खेळातील हार जीत बद्दल बोलत आहे >> 'एक्झॅक्टली' ह्या शब्दाचा अर्थ काय होतो तुझ्या शब्द्कोषात. अँकिने एक मुद्दा मांडला त्याला प्रतिसाद म्हणून तो लगोलग पोस्ट केलेस त्या पोस्टचा टोन एकदम स्पष्ट करतोय कि तू त्याच्या मुद्द्याला लागून हे लिहिले आहेस. अर्थात ते " खेळातील हार जीत बद्दल" हे कसे हे तुझे तुलाच माहित. मुद्दा तुझ्याबद्दल नसून रोहित बद्दल आहे. आता 'मीच मायबोलीचा रोहित' असाही तुझा दावा असेल तर बोलणेच खुंटले
मी एका प्लेअरचे कौतुक
मी एका प्लेअरचे कौतुक केल्यावर त्यांनी पेड पीआर असे गमतीने का होईना म्हटले.. त्यावर माझे उत्तर असे होते की मी त्या खेळाडूंचा चाहता आहे ते मला पैसे मिळतात म्हणून नाही तर त्या खेळाडूने भारताला जिंकवून दिले आहे म्हणून... पैशाने ते खेळाडू प्रसिद्धी मिळवू शकतात पण परफॉर्मन्स त्यांना स्वताला च द्यायचा असतो जो त्यांनी दिला आहे
Pages