Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टीम बी ने नॉमिनेशन्स काय
टीम बी ने नॉमिनेशन्स काय डोक्याने केले आहेत कळत नाही.
येडपट लोक.
ती ठरवून आली होती की प्रसिद्ध नावं असतील तर त्यांच्याशी पंगा घ्यायचा. तसंच जे स्ट्राँग लोक दिसतील त्यांच्यासोबत खेळायचं आणी अर्ध्या पाउण सीझन नंतर त्यांच्याच विरुद्ध जाऊन पब्लिक समोर पॉजिटिव व्हायचं. 
आज जान्हवीच्या नवर्याची मुलाखत पाहिली. त्यांना सगळ्यांना पब्लिक खूप ट्रोल करतंय वगैरे. ते वाइटच आहे. पण बोलता बोलता त्याने तिचा पूर्ण गेम एक्सपोज केला
टिम बी काय माती खाते दर
टिम बी काय माती खाते दर वेळेला, आपापसातच नॉमिनेट करतात कायम , करा कि वैभव , जान्हवीला नॉमिनेट
सूरज त्या दिलेल्या क्रायटेरियामधे बसत असला तरी इतक्य॑ दिवसात समजल नाहीका सूरज कुठे जात नाही ते, आपल्यापेक्षा कमी पॉप्युलर असलेल्याला दुसर्या गृपला करावं नॉमिनेट !
निकी आणि अरबाझ दोघेच हुषार आहेत मग , पॅडीनेही बरोबर नॉम्क्नेशन केले .
बाकी घनश्याम काय भारी बोलतो , शब्द न शब्द क्लिअर अॅन्ड लाऊड , मजा आली त्याचे वाद बघताना !
बिगबॉसने ठेवायला पाहिजे त्याला, डीपी आर्याला काढा डबल एव्हिक्शन मधे !
मला जाम बोअर होतंय आता...हा
मला जाम बोअर होतंय आता...हा पूर्ण season पाहू शकेल असं वाटत नाही...आता काही interesting असेल तरच पाहिल नाहीतर सरळ family week...यावेळी extra कल्ला पण कमालीचा बोअर होता...15 min पाहिला फक्त...काल धनंजयने वर्षासोबत वाद घातला ते आवडलं..खूप हसू आलं...अंकिताने सूरजला उगाच नॉमिनेट केलं...गेममध्ये fair वगैरे ठीक आहे nomination मध्ये इतकं fair कशाला व्हायचं..त्यापेक्षा वैभवला करायचं असतं nominate...अंकिता बर्यापैकी diplomatic खेळतेय...पण सध्यातरी तीच चांगली वाटतेय...आर्या नाही आवडली ह्या आठवड्यात...
वर्षाचे शासकीय मराठी
वर्षाचे शासकीय मराठी निदर्शनास आले आहे.
मला कालच्या नॉमिनेशन
मला कालच्या नॉमिनेशन टास्कवरुन सुरज जिंकावा ट्रॉफी असंच वाटतं. मजा येईल. स्वत:ला अतिशहाणे समजणारे बाराच्या भावात जातील. वर्षाताई शेवटच्या कॅप्टन्सी मुद्द्यावरून जान्हवी, वैभवला नॉमीनेट करू शकत होत्या. त्यांनी कुठे surrender केली त्यांच्यासाठी कॅप्टनशिप. उगाच जिथे डीपि, सुरज चांगले खेळले ते मुद्दे काढले. जान्हवीने बॉक्स मुद्दाम तोडला हे कारण होतं आणि वैभवचे काढायचे काहीतरी कारण. डीपि जिथे नीट खेळला ते कारण दिलं, ते काहीही होतं.
काल निक्कीने अंकिताला चांगलं समजावले आणि अंकिता अभिजीत एकत्र यावेत हे प्रयत्न केले. निक्की अरबाज एकत्र आल्यावर बी टीम आणि वैभव जान्हवी मस्त तोंडघशी पडले त्यातल्यात्यात पुढारीने जमवून घेतलं परत निक्कीशी. आर्याची परिस्थिति ना घरकी ना घाटकी झालीय. आपल्याला अरबाजने मूर्ख बनवले हे बोलण्याची हिम्मत फक्त पॅडीदादांनी दाखवली आणि त्याला नॉमिनेट केलं.
सुरजला ज्यांनी नॉमीनेट केलं त्यांच्यावर लोकं चिडली आहेत. सुरजने जरा जोमात यायला हवंय.
सर्व बी टीमचे खरंतर एक नाव अरबाज हवं होतं, प्रॉपर्टी तोडफोड एक कारण आणि सर्व त्याच्यामुळे तोंडघशी पडले हे एक कारण. ती हिम्मत फक्त पॅडीदादांनी दाखवली.
आजचा भाग टीव्ही म्यूट ठेवून
आजचा भाग टीव्ही म्यूट ठेवून बघायला लागेल.
नाच गं घुमा मधले सीन्स फेसबुकवर दिसतात, त्यात मुक्ता बर्वेचा नवरा झालेला अभिनेता अख्खं शरीर हलवत बडबडत असतो. मला वाटे कोण इतकी शक्ती वाया घालवेल? निक्की आणि जान्हवीला बघून वाटलं, तो तर अंडरप्ले करतोय!
<सर्व बी टीमचे खरंतर एक नाव
<सर्व बी टीमचे खरंतर एक नाव अरबाज हवं होतं, प्रॉपर्टी तोडफोड एक कारण आणि सर्व त्याच्यामुळे तोंडघशी पडले हे एक कारण. ती हिम्मत फक्त पॅडीदादांनी दाखवली> +१.
हिंमतीपेक्षा अक्कल.
अभिजीत सावंत पहिला इंडियन आयडॉल. फायनलला आलेले इतर दोघे गायक त्याच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड, व्हर्सटाइल होते. अभिजीत जिंकणं आश्चर्यकारक / धक्कादायक होतं. इथेही तसं होऊ नये. त्याने निक्कीसमोर चारपाच वेळा शेपूट घातलं. आर्या वीक आहे, तिच्यासमोर चुरू चुरू बोलतो.
काल आर्या सुरजलस नॉमिनेट करण
काल आर्या सुरजलस नॉमिनेट करण निकषांनुसार तसं योग्यं होतं पण प्रचंड व्होट्स मिळतायेत दोघांना.
आता ते नवीन फिजिकल टास्क आलय, त्यात पुन्हा सूरज हिरो बनणारच आहे, आर्याही बरोबर इन्स्टिगेट करतेय निकीला व्हर्बली , प्रोमो वरून अरबाझ वैभव फायनली भिडले आहेत
निक्कीचे नखरे, नाटकं सुरू.
निक्कीचे नखरे, नाटकं सुरू. ड्युटीज करत नाही तर बिग बॉस ने डायरेक्ट शिक्षा द्यायला हवी.
जान्हवीला भांडताना अजिबात पॅनिक अटॅक येत नाही. पुढारी पण जबरी उत्तरं देत होता. जान्हवी आत्ता पडेल की नंतर पडेल इतकी अंगविक्षेप (शब्द बरोबर आहे का) आणि हातवारे करते.
मी थोडा वेळ बंद ठेवला tv.
ती स्कूटी आणलेली बघून मला
ती स्कूटी आणलेली बघून मला वाटले टॉर्चर टास्क असावा. तसे दिसत नाही प्रोमो वरून. कशाला आहे ती स्कुटी ?
टास्क म्हणजे गोंधळात गोंधळ,
टास्क म्हणजे गोंधळात गोंधळ, राडा. बिग बॉसलाही हेच हवं असतं.
कसा होता आजचा एपिसोड? माझा न
कसा होता आजचा एपिसोड? माझा न बघण्याचा निर्णय योग्य होता का?
की बघणेबल होता?
योग्य निर्णय मोक्षु. मीही
योग्य निर्णय मोक्षु. मीही थोडा वेळ बंद केला tv.
टास्क कसा होईल ,होईल की नाही
टास्क कसा होईल ,होईल की नाही माहीत नाही,पण गेले किती आठवडे रितेश भाऊ जो प्रयत्न करत होते ,वैभवला अरबाज विरोधात भडकवून, ते मात्र या टास्कमुळे सिध्द होईल,एकदाचे भिडतील एकमेकांच्या विरोधात.
बाकी,तोडफोडीशिवाय बिबॉस टास्क होत नाहीत,त्यामुळे अरबाज आणि वैभव राहाणारच.
निक्कीचा मात्र आता खरच कंटाळा येत आहे,हिला मराठी बिबॉस कसा असतो ते माहित नव्हत का,कसले सदस्य आणले आहेत अस सारख म्हणत आहे,मग जाऊ दे ना हिला घरी,कशाला ठेवत आहेत,हिला हिंदीसारख इथे कस मिळेल.
तशीही नॉमिनेटेड आहेच,वोट्स पण फार मिळत नाहीत,हिलाच काढा मग.
खरतर निक्कीला राखीसारख नंतर गरज पडल्यावर आणायला हव होत.
ती नसती तर तिच्याशिवाय बघण्याची सवय झाली असती.पण अरबाज साठी तिला आणि तिच्यासाठी अरबाजला आणल.त्या दोघांनाही काढा,म्हणजे मगच मराठी बिबॉस चालू होईल.
मग आणा वाईल्ड कार्ड ,आज वर्षा म्हणत होती,अजून लोक येणार आहेत,यांना माहित असत का,
तस असेल तर खरच निक्की आणि अरबाजलाच काढा.मराठी बिबॉस तेव्हापासून च चालू होईल.
उद्या जान्हवी निक्की अरबाज
उद्या जान्हवी निक्की अरबाज विरोधात पेटून उठणार आहे, जान्हवीने गेम प्लॅन केल्याप्रमाणे ती positive दिसेल पब्लिकला.
मला ती आवडेल असं वाटत नाही.
ती नसती तर तिच्याशिवाय
ती नसती तर तिच्याशिवाय बघण्याची सवय झाली असती.
>> पण मग बघणार कोण होतं? इकडे सगळे पिकनिक करायला आल्यासारखे एकमेकांना समजून उमजून लुटूपुटू वागत आहेत. निदान ती आहे म्हणून लोकांना गेम काय लेव्हलला जाऊन खेळावा लागतो हे कळतंय (त्याचा उपयोग किती होतोय ते जाऊ द्या).
आत्ता आत्ता पिकनिक गँग जराशी सक्रीय झाली आहे असे वाटतेय (तरी नॉमिनेशन मध्ये माठ ठरलीच). त्याचे ९९% श्रेय निकी अरबाज आणि रितेश आणि बिग बॉसच्या कानी कपाळी ओरडुन दिलेल्या टीप्सनाच आहे.
निक्की अतिशय वाह्यात आहे ,
निक्की अतिशय वाह्यात आहे , मी घरात असते तर तिला २ उडवून दिल्या असत्या , काढून बाहेर पाठवलं असतं तरी भले बेहत्तर . ड्युटी करणार नाही , अभिजीतला काम करू देणार नाही , लहानपणचा ट्रॉमा आहे म्हणून गेम खेळणार नाही . स्वतः फेअर खेळणार नाही पण इतरांनी फेअर खेळावं अशी अपेक्षा करणार . .. माणूस म्हणून पण घाण. उर्मट तर जगापेक्षा जास्त .
निकीला का फुटेज देतात लोक,
निकीला का फुटेज देतात लोक, फिल्टर लावा आणि कॅमेरात दाखवणच बन्द करा तिला.
बॉटम २ मधे ठेवले पाहिजे निकीला यावेळी.
आर्या नुसती बोलली कि थंड पाणी टाकेन, पण टाकण्याची हिंमत केली नाही.
नळातून दूध येताना पहिल्यांदा
नळातून दूध येताना पहिल्यांदा पाहिले. कालच्या नळावरच्या भांडणाला काहीच अर्थ नव्हता. सगळं ठरवून चाललेले. तुम्ही हे नाव सांगा तर आम्ही ही नावे ठरवू. निक्किने दूध तोंडात लपवले तर जान्हवीचे पण तेच. अरे देवा तीला कॉपी करणे सोडा. बाकी जान्हवीने आता तिच्या समवयस्क किंवा छोट्याना टार्गेट करायचे ठरवले आहे आणि ही बोलताना अशी आकाशात का बघते. घरात १७६० कॅमेरे आहेत कधी तरी त्यात बघून बोल म्हणावं. असो ही अशीच खेळत राहिली तर लवकरच घराबाहेर जाईल. तुम्ही विरोधी ग्रुप मधील भक्कम खेळाडूला काढले तर आम्हीही काढू. अरे काय तुमची प्लॅनिंग आणि काय तुमचे खेळ. सहाव्या आठवड्यात बिबॉला सांगावे लागते की खेळ कसे खेळावे यातच यांची धन्यता आली.
काल धनंजय वर्षा आजीला उलट बोलला, माझी फी तुम्हाला परवडेल का असे वर्षा आजीला विचारले. आता याला कोणी नाही बोलणार (निक्की, जान्हवी चुकल्या तर हा सुद्धा चुकला).
सूरज फुसका बार ठरतोय. बाकी वोटिंग वगैरे अंधश्रद्धा. यंदा धनंजय किंवा घनश्याम बाहेर जाणार.
निक्की अतिशय वाह्यात आहे ,
निक्की अतिशय वाह्यात आहे , मी घरात असते तर तिला २ उडवून दिल्या असत्या , काढून बाहेर पाठवलं असतं तरी भले बेहत्तर . ड्युटी करणार नाही , अभिजीतला काम करू देणार नाही , लहानपणचा ट्रॉमा आहे म्हणून गेम खेळणार नाही . स्वतः फेअर खेळणार नाही पण इतरांनी फेअर खेळावं अशी अपेक्षा करणार . .. माणूस म्हणून पण घाण. उर्मट तर जगापेक्षा जास्त .
टीम बी वाल्यांनी निक्कीला
टीम बी वाल्यांनी निक्कीला पूर्ण इग्नोर करावं. तिला अख्खं घर आपल्याभोवती फिरवायचंय. सतत चर्चेत राहायचंय.
आधी मला वाटायचं चॉकलेट मिळतंय, आइसक्रीम मिळतंय यात एवढी लाउड रिअॅक्शन देण्यासारखं काय आहे? आता लक्षात येतंय की ती बिग बॉस कोळून प्याली आहे. जेवढी लाउड रिअॅक्शन तितकं कॅमेर्यात दिसू. बिग बॉसच्या घोषणांच्या वेळीही बाकीचे गुपचूप ऐकत असताना हिच्या लाउड रिअॅक्शन्स येतात.
तिचा एक ठरलेला डायलॉग आहे - हे तू मला नाही सांगायचं. काल कॅप्टन वर्षाला पण हेच सांगितलं. तू कॅप्टन आहेस, मालक नाहीस आणि काय काय!
बीबॉ ने सांगितलं कि ग्रोसरी
बीबॉ ने सांगितलं कि ग्रोसरी स्टोअर रूम मध्ये आणून ठेवा कि हि बाई फक्त हुकूम सोडणार . .. पण तेच त्यांनी आईस्क्रीम पाठवलं तर तो डबा उचलायला तयार . प्रोमोत दाखवलं कि डीपीची डिश धरून ती खातेय त्यात आणि तो मज्जा घेतोय तिची कि अशी मोठ्या सिनेमात काम केलेली हिरोईन त्याची प्लेट धरून बसलीये , पण ती स्वतःचं पोट भरून घेतेय असं वाटतंय . कारण जान्हवीने स्वतःच्या हाताने करून गिळ असं सांगितलं आहे तिला .
जुनं आहे ते, पहिल्या किंवा
जुनं आहे ते, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील. तेव्हा गणितं वेगळी होती. खाण्याच्या बाबतीत आत्तापर्यंत दाखवलेल्या शो मध्ये धनंजयने सगळ्यात जास्त लोकांच्या खाण्याबाबतीत कंमेंट केल्या असतील. आईसक्रीम, कॉफी इत्यादी बद्दल म्हणत असाल तर बिबॉ टीम काही तरी नेहमी पाठवतच असते. काल समोसे होते घरात. सिगरेट तर येतेच घरात, कदाचित दारुही देत असतील. या सगळ्याची कुठे चर्चा होताना दाखवत नाही कि कुठले फुटेज दाखवत नाहीत. शो ते चालवतात, त्यामुळे काय दाखवायचे, काय नाही, कोणाला घरात ठेवायचे कोणाला नाही हे सगळे तेच ठरवतात. मग लाऊड एक्स्प्रेशनला फुटेज द्यायचे कि रडण्याला कि भांडणाला हे सगळे त्यांच्या हातात.
निकी काल सरळ म्हणतच होती, या
निकी काल सरळ म्हणतच होती, या घराला हलवून सोडणार मी आता. घराला माझ्या हिशोबाने चालवणार. आणी ते ती करतेच आहे. भाऊचा धक्का वगैरे ने तिला का ही ही फरक पडत नाही. सगळी समीकरणं ती च ठरवणर. फार झाले तर निरर्थक सॉरी म्हणणार. सोप्पे आहे तिला.
तिने स्वतः तेच केले की. तिचा समज आहे की फेअर खेळणे म्हणजे एक त्या ग्रुप मधला आणि एक आपल्याही ग्रुप मधला नॉमिनेट करायचा म्हणे! हे भगवान!! पॅडी च त्यातल्या त्यात समजून बोलत होता. मला तर वाटले टास्क मधे "प्रत्येक टीम मधल्या एकाला बाद करा " असे म्हटल्यावर टीम बी विचार करणार आपण फेअर खेळू, त्यांच्यातल्या वीकेस्ट माणसाला काढू टास्क मधून किंवा आपल्याच पॅडी दादाला काढू. 
घरातले इतर लोक अगदी लिंबू टिंबू आहेत. वर्षा ला तिने म्हटले सूरज ला तुम्ही कॅप्टन म्हणून समजावायला हवं होतं मला नॉमिनेट करणे चुकीचे आहे म्हणून. असल्या अजब मुद्द्यावर वर्षा तिला एक्सप्लेनेशन देत कशाला बसली होती. सांगायचे ना, त्याचे नॉमिनेशन त्याची मर्जी. हाइट म्हणजे वर्षाने आपल्याच ग्रुप मधल्या दोघांना का नॉमिनेट केले अशी चर्चा अंकिता करत होती
मला वाटतं निक्कीला हे सर्व
मला वाटतं निक्कीला हे सर्व करायला बिग बॉस भाग पाडतायेत, जान्हवी तिच्याशी भांडून पॉझिटीव्ह व्हावी म्हणून. जान्हवीला शेवटी पाचात न्यायचं आहे कलर्स मराठीला, तिची प्रतिमा सुधरवण्यासाठी हा मार्ग आहे. जान्हवीने जे काही करुन ठेवलंय ना त्यामुळे पुर्ण मराठी इंडस्ट्री चिडली आहे, केदार शिंदे हे त्याच इंडस्ट्रीचा भाग आहेत. आता निक्की जास्त व्हिलन दिसून जान्हवी तिच्यापुढे चांगली दिसण्यासाठी सर्व सुरु आहे, असं मला पर्सनली वाटतं. जान्हवीची पापं धुवायला चॅनेल सज्ज झालंय, दिसून येईलंच हे सर्व आता.
जर योगिता किंवा निखिल ही दोघे चांगली खेळली असती तर जान्हवीला कधीच घरचा रस्ता दाखवला असता, आता ती एकटी कलर्स फेस आहे आणि तिला नक्की फायनलला नेणार. त्यासाठी निक्की जास्तीत जास्त व्हिलन दिसायला हवी आहे आणि तिला ट्क्कर देणारी म्हणून जान्हवी समोर यायला हवी आहे. बिग गेम फ्रॉम बिग बॉस, आय थिंक सो.
मागच्यावेळी केळकर आधी व्हिलन मग हिरो ठरलेला आणि अपुर्वा तिच्या आई मामामुळे व्हिलन म्हणून प्रोजेक्ट झालेली, सेम होणार पण ट्रॉफी द्यायचे नाहीत जान्हवीला.
जान्हवीला पाचात नेणारच
जान्हवीला पाचात नेणारच .युट्यूबर्स ,इन्फ्ल्युएंजर्सना हिंदी मध्ये फूटेज देत असतील,विनरही करत असतील,पण मराठीत एकतरी कलर्सचा फेस पाचात असणार.
सूरजला उगाचच पाचात नेऊन विनरही करतील.
निक्कि मात्र आता बिबॉसकडून बळीचा बकरा होत आहे अस वाटत आहे,आपण करत आहोत ते सगळ बाहेर आपल्याच विरोधात जाऊन ,आपली इमेजही वाईट होत आहे,हे न कळण्याइतकी ती बिनडोक नक्कीचं नाही.चांगली दामदुप्पट किंमत.वसूल करत असेल.नाहीतर, मीच घर चालवणार वगैरे बोललीच नसती.बिबॉस सुध्दा फेवर करत आहे म्हणजे नक्कीचं काहीतरी सेटिंग आहे.
पण आता ते बोअर होत आहे आणि अतीही होत आहे,काल तर ती जान्हवी म्हणाली सुध्दा की बिबॉसने शिक्षा द्यायला हवी.
एकंदरीत निक्की पुराण आता कंटाळवाण होत आहे.
मला एक कळत नाही,निक्कीला बाजूला करण्यासाठी तोडीसतोड वाईल्ड कार्ड का आणत नाही आहेत?
या आठवड्याचे सोमि वोटिंग बघितले तर पुढारी, अरबाज, निक्की असा शेवटून क्रम आहे.पुढारीच जाईल
टीम बी तरी आहे कुठे एकत्र.सगळाच घोळ आहे या सिझनला.स्क्रिप्टेड जास्त वाटत आहे.
बाहेर आल्यावर एकेक सिक्रेट बहुधा निक्कीच फोडेल.
गेल्या चार सीझन्सच्या
गेल्या चार सीझन्सच्या फायनलिस्ट्स पैकी कलर्सच्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेले कोण होते? एक वीणा जगताप दिसते आहे. आणखी कोणी? विकास पाटील तसा खूप जुना आहे.
मराठी बिग बॉसमध्ये आलेल्यांतले बरेचसे नवे टीव्ही कलाकार माझ्यासाठी तरी अनोळखीच होते. यावेळचे एव्हिक्ट झालेले दोघे आणि ही जान्हवी यांना मी पहिल्यांदाच बघतोय.
टीव्ही सिरियल्सचा आणि बिग बॉसचा ऑडियन्स वेगळा असतो, असं दिसतं.
चॅनेल किंवा निर्माते एव्हिक्शन मॅनिप्युलेट करत असतील. जसं गेल्या वेळी त्यांनाच काय, आपल्यालाही एव्हिक्ट व्हावे असं वाटलेले कोणीच नॉमिनेशन मध्ये न आल्यावर त्यांनी व्होटिंग लाइन्स बंद केल्या. पण आतापासूनच कोणाला फायनल मध्ये न्यायचं इ. ठरवत असतील असं वाटत नाही. तसं वाटलं, तर इतका फिक्स्ड असलेला शो मी पाहणार नाही.
शनिवारी या लोकांसाठी मेक अप आर्टिस्ट्स येत असतील आणि कपडेपट निर्माते देत असतील, असं वाटतं. फायनलसाठी तर मेक अप नक्कीच प्रोफेशनल्स करत असतील. म्हणजे बाहेरच्या कोणाशी संपर्क नाही, हे खरं नसावं. पण बोलू देत नसतील.
निक्की सारखे लोक विनर होत नाहीत, पण फायनलपर्यंत पोचतात आणि तेवढ्यावर भरपूर पैसे कमवतात.
सध्या मला अंकिता जान्हवी टॉप
सध्या मला अंकिता जान्हवी टॉप २ वाटतायेत. सुरज खेळला तर होईल विनर. सध्यातरी वाटत नाहीये.
जान्हवीची प्रतिमा कशी सुधारत नेतील पहा आता, आगे आगे देखीये होता है कया .
खरय, त्या निक्कीला सलमान खान
खरय, त्या निक्कीला सलमान खान आवरु शकला नाही , फिनाले पर्यन्त बोलणी खाल्ली, तिथे ती रितेशला काय घाबरणार ? ट्रॉफी जिंकायला नाही फुटेज घ्यायला आली आहे फक्तं !
इन फॅक्ट तिचा पुढचा प्लॅन तयार आहे, जेल मधे जाणार आणि मग तिथे बसून फुटेज घेणे !
ती जेलमधे गेल्यावर कॅमेरा आणि सगळे लोक बघा कसे जेलभोवती फिरतील , ड्युटीज सुद्धा नसतातच जेलमधे !
जान्हवीला भोळे पब्लिक लगेच हिरो बनवतेय, मला कणभरही पॉझिटिव वाटत नाही ती , १००% फेक आहे !
गुड फॉर हर, बाहेर येऊन डिप्रेशन मधे जाणार नाही.. सिझन १ ला जुई गडकरी अंडरग्राउंड झाली होती हेट्रेड आणि धमक्या पाहून.
आख्खा शो स्क्रिप्टेड नसेल, पण
आख्खा शो स्क्रिप्टेड नसेल, पण बिबॉ कडून इन्टर्वेन्शन नक्कीच होत असेल , सिक्रेट रुम मधे बोलावऊन सूचना वगैरे दिल्या जात असतील.
कलर्स ने लक्षात ठेवावे की हा मराठी बिबॉ आहे. अरबाज निकी ची हिंदीतल्या सारखी अरेरावी, फेक अफेअर इ. नधे मराठी प्रेक्षकांना काही इन्टरेस्ट नाही वाटत. त्यांनी निकीला अन अरबाज ला इतके जास्त फुटेज देऊ नये खर तर. अनसीन अन्देखा मधे बर्याच क्लिप्स असतात ज्या सूरज, पॅडी, डिपी कधी कधी वर्षा यांचे एन्टरटेनिंग गप्पा, चेष्टा मस्करी दिसते ती दाखवा जास्त .
Pages