बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात इतर सगळे एक जात महामूर्ख आहेत! इतके खुषीत फिरतायत २ दिवस. जसे काही रामाने त्राटिकेचा पाडाव केला म्हणुन हे प्रजाजन आनंदी झालेत Lol यांनी खर तर काळजीत असायला हवे की हे दोघे सगळे फुटेज खातायत आणि आपण बघे बनून राहिलोत म्हणून.
आता आज पुन्हा निकी- अरबाज चे दिलजमाई असा प्रोमो येतोय. अरे बास करा की आता. कुणाला इन्टरेस्ट नाही त्या लव स्टोरीत. घरातल्या बावळटांना कळत नसले तरी प्रेक्षकांना नक्की माहित आहे हे किती फेक आहे ते.

आज जान्हवी, अंकिता, वर्षाताई चांगलं खेळल्या. अभिजितला लागलं होतं तरी तो खेळला. पुढारीचं काय समजतंच नव्हतं मला. निक्की टास्कला घाबरली, अभिजितला पाठवलं. जान्हवीचा attitude, हातवारे, पाय आपटून जोरजोरात बोलणे तसंच.

पहिल्या फेरीत एका टीमचा बॉक्स थोडा तुटलेला होता, निककीने तोडला अजून आणि म्हणून जान्हवीने कॉइन मोजलेले असताना, दुसरा बॉक्स मुद्दाम तोडला आणि दोघींनी 0 मार्क्स दिले एकमेकांना.

बाकी अरबाझ निक्की टॉम अँड जेरी.

ते अभिजित बाथरूम मध्ये 'मला या बंधनातून बाहेर पडायचं आहे' असं बिबॉस ला सांगतो आणि त्यावर ते 'नियम तोडायचा असल्यास शिक्षा पूर्ण घराला होईल' हे बोललेले कधी दाखवले? मला दिसलेच नाही.

निकी अरबाज एकत्र येऊन काय साध्य होणारे?

आर्याला या दोघांच्या भानगडीत का पडायचे आहे? ती निकी अरबाज ची एक्स गर्लफ्रेंड आणि ती स्वतः त्याची करंट गफ्रे आल्यासारखी त्याची मानसीक भावनिक काळजी का घेते आहे?

अभिजित तिकडे मोठ्या तावातावाने निकी सोबत राहायचे नाही म्हणाला, सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या पार आणि नंतर तो तिच्याशी अगदी नॉर्मल वागत होता. घरचे इतर सर्व ठार वेडे आहेत की आंधळे??

अरबाज आणि निकी चे सगळ्यांसमोर सॉरी म्हणुन पॅच अप करायचे ठरले आहे. त्यातही निकिने अरबाज ने आधी सॉरी म्हणायचे सांगून स्वत:ची मान ताठ ठेवली आहे.

अरबाज ने घनश्याम आणि पॅडी ही जोडी कॅप्टनशिप मधून बाहेर काढताना केवळ घनश्याम मुळे तुमचे सुद्धा नाव घ्यावे लागत आहे असे पॅडी ला म्हटले असते तर एक शत्रू कमी झाला असता गेम मध्ये. सेम with निकी अभिजित. पण अर्थातच अभिजित ला अरबाज चे मेन भांडण निकिशी आहे हे माहीत आहे atleast. पॅडी दादांचे तसे नाहीये.

पियू शेवटी दाखवलं, पूर्ण घराला शिक्षा होऊ नये म्हणून अभिजितने परत बांधून घेतलं.

पियू correct पॅडीदादांना पुढारीमुळे बाद करतोय एवढंच बोलायला हवं होतं.

युपी खरंच बी टीमची वरात काढायला हवी.

अरबाज निक्की परत एक झाले तर टीम बी चा बँड वाजवणार आता... काल शेवटी दोघे परत गळ्यात पडत होते...
टास्क चांगला होता पण राडा करायला आवडतंच निक्की ला... बाई सगळं कोळुन प्यायल्यात.. आख्खं घर विरोधात गेलं तरी ठाम होती. राखी कडुन हिन्दी बिबॉ मधुन मस्त टिप्स घेउन आलेली आहे निक्की... तिला शेवटपर्यंत काढणं कोणालाच जमणार नाही. आणि जाताना सुद्धा ती पैशाची बॅग घेउन बाहेर पडेल कारण आपण असं वागुन आपण जिंकु शकत नाही ते तिला माहिती आहे.
अरबाज जे काही वागतोय ते बघुन हिंदी बिबॉ च्या पुढच्य सिझन ला त्याची एंट्री नक्की आहे... तिथे जे काही कंटेंट लागतात ते सगळे तो देउ शकेल.
काल किराणा सामान घेताना.. दोन्ही टीम्स ने त्याच त्याच वस्तु कशा काय घेतल्या ? मसाले, तांदुळ, अंडी असं दोन्ही टीम्स ने घेतलं.... वेगळं शिजवुन खायचं असं सांगितलंय का बिबॉ ने ? असं कसं शक्य आहे ? मला तो प्रकार नीट झेपला नाही. बीबी करंन्सी एकत्र करुन सामान घेउ देतील असं वाट्लं होतं. आणि ज्यांनी जास्त करन्सी मिळवली त्यांना पॉवर... असो.. कळेल काय ते...

पॅडी दादांना काल राग अलेला आणि वाईट वाटत होतं असं मला वाटलं... निक्की च्या मुर्खपणामुळे करन्सी कमी झाली ते एक आणि कॅप्टनपदाच्या शर्यतीतुन पुढार्‍यामुळे ते बाद केले गेले तसं अरबाज ने सांगायला हवं होतं.
अभिजीत सावंत काय निक्की शी काडीमोड घेतो/घेत नाही/घेतो/घेत नाही असं तळ्यात मळ्यात करत बसले.. स्वतः चं हसं करुन घेणं यालाच म्हणतात.

पुण्यात दहिहंडी मधे.... "बाई, हा काय प्रकार" फेमस झालंय... त्यावर रॅप साँग्स आणि रीमिक्स गाणी जोरात चालु आहेत...
निक्की गणेशोत्सव मधे डीजे गाजवणार एकंदर...

निक्की च्या मुर्खपणामुळे करन्सी कमी झाली ते एक

जान्हवीच्या म्हणा, तिने कॉईन्स मोजले होते, मग निक्कीची कॉपी करत मी यांचे कॉइन ग्राह्य धरणार नाही असे म्हणत आणि बळच माज करत टीम ए चा चांगला असलेला बॉक्स तोडला आणि दोन्ही संघाची कमाई शून्य करून आली. (यावरून मला "चक दे" मधील सीन आठवला). दुसरी फेरी सुद्धा फेक आणि बायस्ड खेळले. अभिजित बद्दल ऐवढी सहानुभूती असती तर जायचे ना कोणी त्याच्या ऐवजी. इथे वैभवला चांगला चान्स होता पण त्याने घालवला. बर नंतर जान्हवीने अभिजितला काही कॉईन्स दिले, त्यावर अरबाज तिला बोलला कि अजून कमी कॉइन द्यायचे म्हणजे आपली करन्सी वाढली असती. मग सरळ सरळ त्याला देऊच नका ना कॉइन कशाला खोटेनाटी सहानुभती दाखवली अभिजितला. तिसऱ्या फेरीत सुद्धा वर्षा आजी घनश्यामचे कॉईन्स घेऊ लागल्या पण त्याने वाचवले आणि मग हळूच मागून धक्का देऊन त्यांचा बॉक्स पाडला (हि कळ धनंजयने लावली), मग सगळी खेचाखेची. सगळे कॉईन्स जमीनीवर पडले असता यांनी ते कसे वाटले त्यांनाच माहिती (ते आपल्याला मुद्दाम दाखवले नाही). इथे मग बी टीम आपसात भांडली आणि निक्कीने मागे बसून मजा बघितली.

पुढे पॉवर मिळाली तेव्हा तर यांनी बावळटपणाचा कळस केला. सगळा निर्णय अरबाज आणि जान्हवीच्या मताने झाला आणि यांनी बुगुबुगु माना हलवल्या. निकी - अभिजितला साहजिकच बाद करणार होते पण अरबाजने शिताफीने पंढरीनाथला बाजूला केले. वैभव - धनंजयला ठेवले. आता अरबाज वैभवला कॅप्टन होण्यासाठी मदत करणार. पिकनिक गॅंगच्या हाताशी येणार भोपळा.

पॅडीदादांचं वाईट वाटलं मला पण एकीकडे बरंच झालं, फार अरबाझ अरबाझ करत होते. आता जरा स्वतंत्र विचार तरी करतील याचा. ते थोडे विचारी आहेत म्हणून वाटतंय.

वैभव जान्हवी स्वतंत्र राहू शकत नाहीते हे दिसून येतंय मात्र, एकतर निक्की किंवा अरबाझ यांच्याच हाताखाली रहायचं आहे. बी टीम तर बावळटपणाचा कळस आहे.

घनश्याम अन्किता राउंड भारी झाली , घनश्याम चांगला खेळत होता, उगीच कॉर्नर केलं गेलं त्याला !
अन्किता खेळली चांगली पण पर्सनल खुन्नस काढली , मग रडत बसली !
निक्कीने तिच्य एकटीच्या बिगबॉसच्या नियमाने डंब डिसिजन दिला तिची टिम जिंकत असून , पण तिला फक्तं तिची चर्चा हवी आहे, तिला माहित आहे बिबॉ उपाशी ठेवणार नाही !
अभिजीतचं नक्की काय चाललं होत , मला निकीपासून वाचवा मग जाऊ दे, Proud
जान्हवीला चांगली इमेज घेऊन बाहेर यायचय म्हणून डॅमेज कंट्रोलला लागली आहे, मला हसु येत होतं, काय तर म्हणे वर्षाताईंशी नीट बोल , सिरीयसली ? लुक हुज टॉकिंग ! पण ठिक आहे, मिळालेल्या संधीचा फायदा तरी घेतेय !

संधीचा फायदा वगैरे नाही, कलर्स चॅनेलची असल्याने फीडबॅक नक्कीच येत असणार तिला. बाहेर अजूनही लोकं विरोधात आहेत. परवा लगेच टोकलं त्यामुळे बिग बॉसने की जान्हवी तुम्ही किती नियम पाळता. यातूनही तिला सांगतात सर्व. तसं केलं नसतं तर ती निक्कीच्या प्रत्येक बाबतीत बोलत बसली असती आणि मग रीतेशला शाळा घ्यायला लागली असती.

कालचा टास्क छान होता Happy निदान इतर लोक दिसले!
मला पुढारीचा गेम काही चूक नाही वाटला, चांगला प्रयत्न केला की त्याने. त्याचे बिचार्‍याचे कौतुक होत नाही. पॅडी कशाला रुसून बसला. अंकिता पण छान खेळली. अशा टीम्स शफल केल्या की खेळ जरा चांगला होईल.
अभिजीत चे काय कौतुक चालवले होते सोमिवर. मला काहीच स्पार्क नाही दिसला. अचानक त्याला साक्षात्कार झाला का?!

तो निक्की अरबाज शो कमी करून निक्कीला जरा बॅकफूटवर नेलं तर कदाचित बाकीचे लोक पण लाईमलाईटमध्ये येतील.जस काल पुढारी,डीपीने जरी सांगितलं उसगावकरची पेटी फोडायला,तरी खेळला,अंकिता खेळली.निक्की एकटी टास्क खेळू शकत नाही,हे तिनेच दाखवून दिलं.तिला फक्त आरडाओरडा करतात येतो आणि स्वतः:वर फोकस आणता येतो.डीपी पण छान खेळला.
अभिजितला का चढवत आहेत सोमिवर कळत नाहीत.
टास्क जास्त आणले पाहिजेत.बौध्दिक असतील तर आणखी मजा येईल.
खुर्ची सम्राट मध्ये वाटलं होतं निक्की खेळेल पण कालच्या टास्क वरून निक्की तर बाद,उसगावकर,पॅडी पण खुर्ची सम्राट टास्क खेळतील का ,डाऊट आहे.म्हणूनच पाच आठवडे झाले हा टास्क अजून येत नाही.
निक्की पुराण आता बंद करा ,कंटाळा यायला लागला आहे.

अभिजितला का चढवत आहेत सोमिवर कळत नाहीत. >>> मी वाचलं नाही, पण कदाचित त्याने निक्कीला विरोध केला, मला जोडीतून बाहेर पडायचं आहे सांगितलं आणि मग सर्वांना शिक्षा होऊ नये म्हणून आपल्याला त्रास झाला तरी जोडीत राहू हे सांगितलं म्हणजे त्याग बिग केला असं वाटलं असावं पब्लिकला प्लस पाय दुखत असून खेळला. एनिवे ह्या दोघांव्यतिरीक्त पब्लिक फोकस स्वतःवर घेण्यात अभिजीत यशस्वी झाला असेल तर चांगलंच आहे की.

सेटिंग मस्त होतं. आधी बिग बॉसने अभिजीतला बोलवून त्याचा पाय कसा आहे हे विचारलं. आणि डॉक्टर लोक तो गोळ्या घेत नाही, डीप फ्रीझ लावत नाही असं सांगितलं. मग कॉइन टास्कमध्ये नेमकं त्यालाच उतरवलं.

निक्कीसोबत राहून आपण अडकलो आणि ऑडियन्सच्या नजरेत उतरणार हे त्याला लक्षात आलं होतं. म्हणून जेव्हा निक्की अरबाझ तमाशा चालला होता, तेव्हा टीम बी वाल्यांनी सांगूनही मी काय करणार त्यात असं म्हणून दूर राहिला.

टास्कमध्ये निक्कीमुळे हाती माती लागली हे कळल्यावर तिच्यासोबत राहायचं नाही, असं पुन्हा पुन्हा सांगून शेवटी सगळ्यांना शिक्षा होईल म्हणून तिच्यासोबत राहायला तयार झाला आणि लगेच यातलं काहीच झालं नसावं, अशा प्रकारे तिच्याशी गप्पा मारू लागला. वर तिच्यात आणि अरबाझमध्ये मांडवलीही करून दिली.

निक्की सतत तोंडात एखादी गोळी ठेवल्यासारखं बोलत असते. तिला एंटायटलमेंट कॉम्प्लेक्स आहे. स्वतः कामं करणार नाही. आपल्या पार्टनरलाही करू देणार नाही. मागे सगळी ग्रोसरी स्टोर रूममध्ये नेऊन ठेवा असा आदेश आला, तेव्हा ही एकटीच बसून राहिली. तेच या आठवड्यात ग्रोसरी आल्याचं कळताच सगळ्यात आधी घुसली आणि आइस क्रीम घेऊन आली.

बिग बॉसच्या मनाप्रमाणे राडे आणि फाटाफुटी होत नसल्याने शनिवारी अगदीच उघड हिंट्स देतात. गेल्या शनिवारी अरबाझला डोर मॅट म्हणणं जास्त वाटलं. पण काल त्याने ते जणू सिद्ध केलं. आज स्टँप पेपर वर लिहून निक्की त्या पाकिटावर शिक्का मारेल. उद्या रितेश काय म्हणतो बघायला मजा येईल.

निक्की अरबाझ एकत्र आल्यावर बाकीच्या सगळ्यांची मजा येईल. सगळ्यात जास्त वैभव जान्हवीची. पुन्हा नाक घासत निक्कीकडे जातील का?

अंकिताचं मालवणी ऐकायला आवडतंय.

निक्की सतत तोंडात एखादी गोळी ठेवल्यासारखं बोलत असते.

>> मी हे मागे पण लिहिलं होतं. तिच्या लिप सर्जरीमुळे तिला नीट बोलता येत नाही बहुतेक. सतत थुंकी येते तोंडात ती तशीच धरून बोलत राहते. मग ते गोळीसारखे वाटते बघणाऱ्या माणसाला.

अंकिताचा चानेल kokanhearedgirl पूर्वीपासून पाहात होतो. सिविल एंजिनिअर आहे. फार मजेशीर बोलते. तर ही अचानक बिबिमध्ये कशी काय गेली हा प्रश्न पडला. तिचे प्रेमप्रकरण तिने चानेलमध्येही सांगितले आहे. म्हणजे आता नवीन सनसनाटी सांगते आहे असं नाही. तिच्या हेक्टर कारचा एपिसोडही पाहिला होता. मुख्य म्हणजे घाबरत नाही.
जिंकणे हारणे बाहेर पडणे यांचा तिच्यावर काही फरक पडणार नाही.
पॅडीबद्दल बोलायचं तर तो चांगला नट आहेच. इतर स्पर्धकांबाबत फारसं माहीत नाही.

वर्षाताई टोटली rocking आज,त्यांच्या नाटकी बेअरिंगची आज मजा आली, वेलप्लेड. जेरीस आणलं बोलण्यात बाकीच्याना. सूरजने त्याग केला नसता तर तो झाला असता कॅप्टन. जान्हवी वैभवचा पडलेला चेहेरा बघायला आवडला.

जान्हवी तर मागच्या आठवड्यात मला नाही रहायचं, मला नॉमीनेट करा म्हणत होती, आज कॅप्टन होण्यासाठी धडपडत होती.

आर्या एकंदरीत डोक्यावर पडलीय.

बिग बॉसला एकंदरीत जान्हवी वैभव कॅप्टन नकोच होते, मस्त खेळी केली त्यांनी.

सध्या बिबॉसला काय करायच तेच कळत नाही.अरबाजविरुध्द वैभवला भडकवल,काही उपयोग झाला नाही.निक्कीला अरबाजच्या क्लिप्स दाखवल्या,पण तरीही अरबाज काही निक्की प्रेमातून बाहेर येत नाही,जोड्या तुटल्या की हे परत एकत्र,सूरजला चान्स देऊनही तो काही पुढे येत नाही.पुढार्याला काढायच होत तेही जमल नाही,तो आलाच नाही नॉमिनेशन मध्ये.
आता खरच वाटत आहे,ससा कासवाच्या शर्यतीत उसगावकरच पुढे जायच्या.
आर्याला पण नारळ दिला तरी चालेल.
उद्य्या अर्धाअधिक धक्का निक्कीभोवतीच असणार.
टीम बीला तर फैलावरच घेतल पाहिजे.

चांगल्या सेट झालेल्या टिम्सची वाट लावली बिबॉने चुगल्या दाखवूनआणि भलत्या लोकांना जोडीत बांधून, आता कोणी कोणाचे नाहीये !

आता कोणी कोणाचे नाहीये>> त्यामुळेच आता अनप्रेडिक्टेबल झालंय सगळं, मला आवडतंय ते.
आज वर्षा ने तिच्या भाषाप्रभुत्वाच्या जोरावर अर्ग्युमेन्ट करून इतरांना जेरीस आणलं. सगळेच डल वाटले तिच्या बोलण्यापुढे. त्यातल्या त्यात अंकिता चांगले बोलली.
बी टीम चे लोक लगेच त्याग करायला तयारच असतात तसेही. फार येडे आहेत.

वर्षा सात जणांत तिलाच का कॅप्टन करावं हे सांगत होती, तेव्हा खरंच हसू येत होतं. तिथेही सगळे हसत होते/ ससा आणि कासवात तर धडपडली होती. पण तिला नाटकाचा अनुभव असल्याने जराही विचलीत न होता, तिने आपलं भाषण चालू ठेवलं. तिचं भाषण सगळ्यात जास्त वेळ चाललं.

काल.मात्र बोअरिंग भागात उसगावकलने शेवटी कँप्टन्सी टास्क मध्ये जान आणली.सॉल्लिड एंटरटेन केल.
कात ते स्वरचित डायलॉग्ज होते
"मी धरणीवर स्वत:ला झोकून दिल,घन:श्यामने पाठीत खंजीर खुपसला,,ससा कासव शर्यत"बापरू,हसून वाट लागली.
शाब्दिक टास्क मध्ये यांना कोणीही हरवू शकत नाही,अगदी निक्कीही नाही,हे मात्र खर.
बाकीचा भाग म्हणजे तेच तेच दळण होत.
आज आता भाऊ जेव्हा उसगावकरांच कौतुक करतील,तेव्हा ताई काय रिअँक्ट करतील याची उत्सुकता आहे.
काल किलरबाई आणि वैभव सोडले तर.घरच्यांनी पण ताईंना अगदी डोक्यावर घेतल ते बघून पण मजा आली.

काल डीपी काहीच्या काही शेंड्या लावत होता अंकिताला की म्हणे तुझा खेळ दिसावा म्हणून मी त्या पुढाऱ्याला ते बॉक्स फोडायला लावले..... काहीही हं डीपी!!

काल बी ग्रूपने परत माठपणा केला.... आत त्यांचे बहुमत असतानासुद्धा वैभव आणि जान्हवीला शेवटच्या तीनात जाऊ दिले.... अरे तुम्हाला आधी बहुमताने त्या दोघांना बाहेर काढता आले असते..... सूरज असाही गुंडाळला जातो..... मग करा ना तुमच्यातल्या ज्या कुणाला करायचे आहे कॅप्टन ते!!
आता या आठवड्यात समीकरणे जरा बदलली आहेत म्हणून नाहीतर निक्की आणि अरबाझने जान्हवी किंवा वैभवलाच दिला असता चान्स!!

आर्या सगळ्यांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याच्या नादात परत एकदा गंडली

अंकिताला खाली दाखवण्याच्या नादात बाकीचे वर्षाचे जरा जास्तच कौतुक करत होते पण त्या वर्षाताईंना घरातल्या ड्युटीज पण नीट वाटता येत नव्हत्या!!
त्यांना त्रास दिल्यावर धक्क्यावर बोलणी खायला लागतात माहित असल्यामुळे सगळे जरा सामोपचाराने घेतील नाहीतर कधीच गुंडाळून ठेवले असते त्यांना निक्की आणि गॅंगने

आता आज बघू भाऊ धक्क्यावर वेगळे काही करतायत का ते!!

Pages