Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला कालचं अरबाजचं वागणं fake
मला कालचं अरबाजचं वागणं fake नाही वाटलं...पण मला आश्चर्य याचं वाटतं की तो बाहेर committed आहे हे त्यानेच week end ला कबूल केलं... मग निक्की कोणाही सोबत असली तरी त्याला इतका त्रास का होतोय?आणि हे खोटं यासाठी वाटत नाहिये की इतकी चांगली अॅक्टींग हे लोकं करू शकतात असं मला तरी नाही वाटत...निक्कीने सुद्धा अरबाजला instigate केलं..असं मला वाटलं नाही..उलट त्याला होणारा त्रास तिला बघवल्या जात नव्हता म्हणून ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती...उलट ती अरबाजला खूप घाबरते असं वाटलं मला तरी...बाकी निक्की किती strog आहे, सगळं घर तिच्या विरोधात आहे...तिचे सगळे so called friends तिला फितूर झालेत तरी तिच्या डोळ्यातून टिपूस नाही आला...
पण नंतर एकदम शांत झाली आर्या...hope ,की तिला समजलं असेल...
अंकिताने निक्कीच्या आवाजाची नक्कल भारी केली...खूप हसलो आम्ही...आणि निक्की पण चूप बसली...आणि अंकिता जान्हवीला म्हणाली की मी तुला safe केलं कारण निकीशी नडायला तू आम्हाला हवी आहेस...काहीही....जान्हवीच्या खांद्यावर बंदूक ठेवून का लढायचंय तिला ?ती स्वतः च मस्त टक्कर देऊ शकते निकिला...
आर्याने self respect ठेवावा आता...तो अरबाज तिला अज्जिबात भाव देत नाही तरी सारखी त्याला चिपकत होती...तो बिचारा निक्कीच्या विरहात वेडा झालेला आणि हीचं आपलं भलतंच चालू...
कालचा भाग म्हणजे मेलोड्रामा
कालचा भाग म्हणजे मेलोड्रामा चित्रपट होता...
टीम बी मुर्ख आहे... उगीच अरबाज ला चुचकारत बसलेत... उलट काल निक्की च्या लाडीगोडी मुळे अरबाज पाघळला आसता आणि दोघं परत एक झाले असते तर निक्की चा फेकपण नीट हायलाईट झाला असता..अरबाज ला निक्की विरुद्ध भडकावुन उलट टीम बी येडे दिसत होते आणि आरबाज निक्की एक होउ नये यासाठी डेस्परेट दिसत होते.
टीम बी ने लांबुन बसुन सगळी मजा बघायला पाहिजे होती आणि नुसत्या आपपल्या कमेंट पास करायला पाहिजे होत्या..
निक्की ला कळतय की टास्क आल्यावर आपलं अरबाज आणि वैभव शिवाय काही चालणार नाहिये त्यामुळे ती परत लाडीगोडी लावय्चा प्रयत्न करतेय.
अरबाज कमिटेड असेल तर एवढा पझेसिव्ह का वागतोय ? त्याला लव्ह अँगल करायचाय तर आता खांदा द्यायला आर्या आलेली आहे. तिच्याशी कर की म्हणाव लव्ह अँगल...
काहीच अपिल होत नाहिये या बिबॉ मधे... आर्या, अरबाज मराठी भयंकर बोलतात त्यामुळे काही मुद्दे नीट समजत नहीत.
वर्षाताईंचं दुसरं टोक.. थेट रंगमंचावरचं मराठी डायलॉग डिलीव्हरी.
हवे ते स्पर्धक नॉमिनेशन मधे न आल्याने वोटींग बंद केलंय का ? आता वाईल्ड कार्ड आणतील आणि नवीन पाहुणा आला म्हणुन वोटींग बंद करतील.
सिक्रेट रुम मधे पाठवायचं असेल तर अभिजीत ला पाठवा म्हणावं.. बोअर झालं त्याला बघुन.,..
जितका मला अरबाज चा मुद्दा
जितका मला अरबाज चा मुद्दा समजला आहे ते सांगते .
मला नाही वाटत तो निकीसाठी पझेसिव्हनेस बाळगून आहे . त्याला निकी अभिजितशी बोलते किंवा त्याच्याशी तिची मैत्री आहे हि गोष्ट पहिल्यापासून आवडत नाही . तसंच निकिला सुद्धा अरबाज आर्या बरोबर बोललेला आवडायचं नाही . त्यावरून त्यांचे सतत वाद होते .
आता या टास्कमध्ये नेमकं बीबॉ नि अभिजित आणि निक्कीला एकत्र बांधून काडी टाकली आहे . त्यात अरबाज ला खटकलेल्या गोष्टी म्हणजे
निकी अभिजीतबरोबर सगळं शेअर करते (टीम ए ने तिच्या विरुद्ध बोललेल्या गोष्टी तिला दाखवण्यात आल्या त्याच्यामुळे ती भडकली आहे.
अभिजीतला कोणी काही केलं तर मी त्यांना धोपटून काढेन वगैरे बोलली , तिसरं म्हणजे चहाचं भांडं जे तिने वापरलं होतं ते तिने उचलून ठेवणं अपेक्षित होतं , पण ती तिचं स्वतःचं काम न करता , अभिजीतला पाठीशी घालून म्हणत होती कि तू किती काम करणार . .. सगळं तर तूच करतोय . मग अरबाझ म्हटला तू स्वतःचं तर काम करत नाहीयेस , पण दुसऱ्याला सांगातेयस तिसर्याचे काम करायला हे योग्य नाही . आणि अरबाज चा राग अभिजितवर यासाठी आहे कि एकदा केव्हा तरी त्याने अरबाज ला धक्का मारला तो मुद्दाम , अभिजीतचं म्हणणं आहे कि मुद्दाम मारलेला नाही .
जेव्हा अरबाजने कॅप्टन्सी निकीला दिली त्या नंतर तिने त्याला बजावलं कि तू सारखा या रूम मध्ये येत नको जाऊ , पण बहुतेक अभिजित सतत निकीच्या कॅप्टन रूम मध्ये जातोय .
शिवाय जेव्हा विकेंड वॉर ला रितेश अरबाज ला डोअर मॅट म्हटले तेव्हा सुद्धा निकी काही बोलली नाही , गप्प बसली याचा त्याला राग आहे .
या सगळ्यात मला एक जाणवलं कि अभिजीत फक्त मजा बघतोय .
अभिजीतने नॉमिनेशन टास्क मधे
अभिजीतने नॉमिनेशन टास्क मधे ब्लंडर केला !
त्याला शेवटून दुसरा पाठवून बिबॉने त्याला डिसिजन मेकर बनवायची संधी दिली होती , त्याने वाया घालवली !
तो आला तेंव्हा वर्षा -आन्किता, तो आणि निकी होते, इथे १ जोडी बदलून पुढारी पॅडीला टाकायचा क्लिअर चान्स होता कारण एकटा पुढारीच राहिला होता !
तो आला तेंव्हा वर्षा -आन्किता
तो आला तेंव्हा वर्षा -आन्किता, तो आणि निकी होते, इथे १ जोडी बदलून पुढारी पॅडीला टाकायचा क्लिअर चान्स होता कारण एकटा पुढारीच राहिला होता !>>>मग त्याने कोणाला nominate केलं??actually टास्कच किती चुकीचा होता...शेवटच्या व्यक्तीच्या हातात अख्खं nomination...काहीही...nomination मध्ये खरंतर सगळ्यांना fair chance मिळायला हवा...
टास्क चांगला होता , बिबॉला
टास्क चांगला होता , बिबॉला घनश्याम हवा होता नॉमिनेशन मधे , खूप ऑबव्हियस आणि सोपे होते म्हणून अभिजीतला शेवटून दुसरा पाठवून संधी दिली होती !
जो नॉमिनेट करायला येईल तो जर स्वतः नॉमिनेटेड असेल तर त्याला स्वतःची पेअर नाही स्वॅप करता येणार हा रुल होता , म्हणजेच शेवटी येणार्या घनश्यामला फक्तं अभिजीत आणि निकीलाच स्वॅप करावेच लागले असते जर तो नॉमिनेटेड असता तर !
पण अभिजीतने वैभव डीपीला केलं नॉमिनेट, मग पुढारी वाचवणारच त्यांना !
जान्हवीला टिप्स मिळतायेत, असं
जान्हवीला टिप्स मिळतायेत, असं वाटतं. मला ती नाटकीच वाटते, पॉझिटिव्ह झाली वगैरे वाटत नाही आणि pady उगाच अपराधी वाटून घेतोय. तिचं ते निक्कीवर ओरडणे वगैरे, काहीही मनात उतरत नाहीये माझ्या, फेक आणि तोच तोच पणा वाटतो.
यावेळी कनेक्शन नाहीच वाटत कोणाशी.
मजा म्हणजे आख्खे घर निक्कीच्या विरोधात गेल्याने, निक्की मला बरी वाटायला लागली
फुल टू मेलोड्रामा होता म्हणून तो कॉमेडी शो वाटला मला, मी हसत होते.
निक्की आणि अरबाझ बाहेर ठरवून आलेत, बाकीचे उल्लू होतायेत असंही वाचलं कुठेतरी.
सोमिवर अशीही चर्चा आहे की
सोमिवर अशीही चर्चा आहे की निक्की आणि अभिजितमधल कनेक्शन राहुल वैद्य हा आहे.तो आणि निक्की एकाच सिझनमध्ये होते वाटत.
म्हणून दोघही बाहेरूनच काहीतरी प्लँन करुन आले आहेत.
त्यांना बिबॉस मत कमी असतील तरी काढण शक्य नाही,पण वोटिंग मध्ये अभिजित दुसरा असतो बरेच वेळा.
निक्की तर जाण शक्यच नाही.
मग बिबॉसला उसगावकर कि्आ हवी आहे,आता तिच्या नाटकी बोलण्याचाही कंटाळा आला आहे,आणि आता तिच्या विरोधात बोलायला जान्हवी आहेच ना,मग वोटिंग लाईन्स चालू ठेवून काढायच ना उसगावरला बाहेर.पुढार्याला नंतर काढा.
तसही मागच्या सिझनमध्ये कुठू वोटिंग प्रमाणे एलिमिनेशन केली होती,बिबॉसला हव त्याला काढल होत की,मग आताही उसगावकरला काढण सहज शक्य होत.कशासाठी ठेवत आहेत तिला.
काल मला तर घरात फक्त २ च जण
काल मला तर घरात फक्त २ च जण आहेत असं सारखं वाटत होतं कारण इतरांच असणं नसणं काहि फरक पडत न्हवता.. एकवेळ असहि वाटलं या दोघांनाच ठेवुन करा काय तो बिगबॉस..
निकी बोलली देखिल हि सगळी लोकं काहि कामाची नाहित.. तेव्हा सगळे आ म्हटले..
निक्की, बस नाम ही काफी है.
निक्की, बस नाम ही काफी है. कशात ही काही नसताना फुटेज कसे खायचे हे फक्त हिलाच माहिती. हिने अरबाजला सोबत घेऊन पूर्ण एपिसोड खाल्ला की राव.
२४ तारखेची हि कंमेंट आज पुन्हा लागू पडली कि काय
तसही मागच्या सिझनमध्ये कुठू
तसही मागच्या सिझनमध्ये कुठू वोटिंग प्रमाणे एलिमिनेशन केली होती,बिबॉसला हव त्याला काढल होत की
नेहमी असेच असते. वोटिंग दिखावा असतो, एलिमिनेशन मध्ये किती लोक घ्यायचे, कोणाला कधी काढायचे हि बिबॉ टीम ठरवते. वोटिंगचा काहीही संबंध नसतो, ते फक्त प्रतिसाद आणि प्रतिक्रिया किती मिळतात हे बघण्यासाठी असतात.
खरं आहे.
खरं आहे.
नॉम्ज्ञेशन्स , एलिम्जेन्शन्स
नॉम्ज्ञेशन्स , एलिम्जेन्शन्स बिबॉला जे हवं तसं ते घडवतात, त्यांना हव असतं तर अरबाझलाही टाकलं असतं नॉमिनेशन मधे तोडफोड केल्यामुळे किंवा जान्हवी बरोबर त्यालाही टाकलं असतं जेल मधे , पण नाही.. त्याला खुल्ला सांड मोड मधे दाखवून कन्टेन्ट द्यायचाय , रितेशच्य॒ विकेन्डला कोणीतरी टार्गेट हवेच !
निकीच्या अवती भवती ड्रामा बघायचा कंटाळा आलाय आता, बिबॉला सुद्धा टिम बी मधून कोणीच हिरो दिसत नाहीये म्हणून व्हिलन्स कडून कन्टेन्ट वसुल करतायेत !
पहिल्यांदाच असं झालय कि अख्या घराने टार्गेट केलेली व्यक्ती हिरो ऐवजी व्हिलन दिसतेय आणि बाकीचे घर मूर्ख !
एकंदर रितेश म्हणतो तसा हा
एकंदर रितेश म्हणतो तसा हा निकीचा बिबॉ आहे. आता असे होत चाललेय की बाकीचे लोक मॅटरच करत नाहीयेत. काल तर अक्षरशः निकी अणि अरबाज शो होता. बाकी कुणाच्या असण्या नसण्याने काहीही फरक पडत नव्हता. बिबॉ ने काहीतरी टास्क वगैरे आणायला हवीत आता.
अभिजीत च्या दृष्टीकोनातून सगळे निकी ला टार्गेट करतायत आणि तो स्वतः इन्डायरेक्टली टार्गेट होतोय. पण त्याला कळले नाही की बाहेर ते कसे दिसत आहे. काल नॉमिनेशन मधे ही त्याने माती खाल्ली! आता काहीतरी वेगळ्या प्रकारचे एलिमिनेशन करणार की काय कुणास ठाऊक.
जान्हवी चा त्या शिक्षेमुळे गेम आता पार कन्फ्युज्ड होणार. तिला वाटतंय ती निकीशी पंगा घेईल आणि स्वतः पॉजिटिव दिसेल पण तसे होणार नाही, एक तर निकी तिला काही फुटेज घेऊन्च देणार नाही आणि दुसरे या सगळ्या प्रयत्नात जान्हवी फेकच दिसणार. आधी होती तो मुखवटा होता हेच सिद्ध होणार. काल तिचा अटेन्शन घ्याय्चा प्रयत्न सुरु होता निकी ला काहीतरी बोलून पण फारच लेम वाटले ते.
कंटाळा आला, उगाच बघितला
कंटाळा आला, उगाच बघितला एपिसोड.
आज फार म्हणजे फारच बोअर झाल.
आज फार म्हणजे फारच बोअर झाल.
ऑफिशिअली हा निकी अरबाझ शो
ऑफिशिअली हा निकी अरबाझ शो बनबण्यात बिबॉ आणि निकी यशस्वी झालेत , बाकी फेक आहे ते ऑबव्हियस आहे !
‘टिम बी महामूर्ख दिसत आहे, साइड कॅरॅक्टर्स पण नाही , एक्स्ट्रॉ असतात ना गर्दीतले तसे !
टास्क आता आठवडा संपताना येणार , बाकी हा आठवडा लफडा सदन/स्प्लिट्सविला झालय !
आता कोणी वाइल्डकार्ड आणण्यात काही पॉइन्ट नाही, इतकी वाट लागली आहे प्लॉटची आणि गृप्सची !
आणायच आसेल वाइल्डकार्ड तर अरबाझची कमिटेड गर्लफ्रेन्ड आणा, जसे मागच्या हिन्दी सिझनला मुनव्वरची एक्स आली होती!
"बाई, हा काय प्रकार".. असं
"बाई, हा काय प्रकार".. असं झालं कालचा एपिसोड बघुन...
अरबाज रडतोय... निक्की रडतेय.. आणि जालीम दुनियावाले(टीम बी) त्यांना जुदा करायला टपलेत असं दिसतंय ते...
गेम राहिला बाजुला... येड्यांचा बाजार झालाय...
टीम बी मधल्या एकालाही हे क्लिक होउ नये का की आपला याच्याशी काहीही संबंध नाहिये तरी आपल्यामुळे त्या दोघांना फुकटचं फुटेज मिळतंय...
काल शेवटी शेवटी अरबाज अक्षरशः आर्या सोबत शिक्षा केल्यासारखा बसला होता.. त्याला ती अजिबात आवडत नाहिये हे दिसतंय.. त्यामुळेच बहुतेक वैतागुन रडायला लागला शेवटी
वर्षा उसगावकर जिजाऊच्या
वर्षा उसगावकर जिजाऊच्या रोलसाठी ऑडिशन देतेय असं वाटत राहतं. पण फारतर आनंदीबाईचा रोल मिळेल.
Btw , सूरजला असे
Btw , सूरजला असे म्युन्सिपाल्टीच्या सफाई कामगारा सारखे कपडे का दिले आहेत ?
अरबाजची gf लिझा बिंद्राचं
अरबाजची gf लिझा बिंद्राचं insta profile पाहिलं...break up होणार बहुतेक त्याचं....कालचा एपिसोड खरंच खूप बोअर झाला...वर्षा उसगावकर कित्ती कृत्रिम बोलते...नॉर्मल आयुष्यात इतकं पुस्तकी कोण बोलतं...आजचा promo भारी वाटला पण...मजा येईल आज....काल अभिजीतला सुद्धा नाकीनऊ आणलं निकिने...आणि आजच्या promo मध्ये तर अजून twist आहे
टीम बी मूर्ख आहेच, निक्की
टीम बी मूर्ख आहेच, निक्की आवडत नाही म्हणून अरबाझला जवळ केलं आहे. त्याच बरोबर जान्हवी आणि वैभवलाही अरबाझच्या हाताखाली रहायचं आहे, निक्कीला एकटे पाडून ती strong जास्त होतेय. तिला तिचा गेम चांगलाच कळतो.
सर्व असे ह्या ना त्या कारणाने निक्की अरबाझ भोवती फिरत असल्याने, शो मात्र टू मच बोअर होतोय.
जिजाऊच्या रोलसाठी ऑडिशन देतेय
जिजाऊच्या रोलसाठी ऑडिशन देतेय असं वाटत राहतं. पण फारतर आनंदीबाईचा रोल मिळेल.
>> हाहाहाहा. त्यांना 'येथे ओशाळला गटणे' नाटकात लीड रोल मिळू शकेल. काल मलाही असेच झाले त्यांचे संवाद ऐकताना. कोणी इतके छापील कसे काय बोलू शकते?
बाकी सगळ्याच कमेंट्स ना कलेक्टीव्ह मम म्हणते. काय सावळा गोंधळ चालु आहे bb मध्ये. खरोखर निकी या एकाच व्यक्तीच्या भोवती संपूर्ण घर फिरते आहे. अक्षरशः एकटी शो स्टॉपर आहे bb ची.
निकी तंबोलीचे खरे नाव निकिता तांबोळी असे असावे. बाकीचे / हिंदी वाले लोक तांबोळी चुकीचे म्हणत असतील एकवेळ.. पण निकी स्वतःच स्वत:चे नाव तंबोली (कधीकधी टंबोली) असे चुकीचे का उच्चारते?
मध्ये RJ शोनाली ने RJ सुमित ची मुलाखत घेतली त्यात तरी सुमित म्हणत होता की तो bb मध्ये जाणार आहे. हेच ant rider ने स्पष्ट सांगितले की तो येणार नाहीये.
आता निकी च्या टीम मध्ये वैभव ला टाकून त्याच्यावर गद्दार हा शिक्का पुसण्याचे मॉरल प्रेशर टाकलेले आहे. त्यामुळे मनात असो नसो तो यावेळी प्रामाणिकपणे खेळणार हे नक्की.
अरबाज आर्या ला कंटाळला असेल किंवा जे काही कारण असेल पण तिला आत्तापासूनच गरज संपली की झटकून टाकायचे प्लॅनिंग करत होता जान्हवी बरोबर. त्यामुळे आर्या खरोखर हुरळून गेली असेल तर पॅडी दादांनी तिला दिलेलं इशारा एकदम बरोबर होता.
जान्हवी ची अगदीच रया गेली आहे आणि तीही गर्दीचा एक भाग झालेली आहे. बिग बॉस ने सुद्धा 'तुम्ही किती नियम पाळले' असे विचारून तिला एकदम तिची जागा दाखवून दिली आहे.
हो जान्हवीला मस्त जागा दाखवली
हो जान्हवीला मस्त जागा दाखवली बिग बॉसने, शो मेकर्सच्या लक्षात आलंय की जान्हवीला शिक्षा दिली तरी सिंपथी मिळणार नाहीये प्रेक्षकांची.
पॅडी दादा बरेचदा इतरांना योग्य सल्ले देतात पण आत्ता मात्र त्यांच्या स्वतःच्या लक्षात येत नाहीये की निक्कीला धडा शिकवण्यासाठी अरबाझला हिरो करतायेत, बाकीचे काय फुटेज घेणार.
बिबॉ टीम पार गडबडली आहे या
बिबॉ टीम पार गडबडली आहे या वेळी. त्यांचे स्वतःचे प्लॅन फ्लॉप ठरत आहेत. घनश्यामला नॉमिनेशन मध्ये सगळ्यात शेवटी पाठ्वण्यामागे त्यांना वाटले असेल शेवटी त्याचा फोटो असेल आणि तो स्वतःला सेफ करू शकणार नाही. गेल्या वीकेंडच्या / धक्क्यावर काहीतरी मेजर झाले आहे ते प्रेक्षकांना दाखवले नाहीये. त्यामुळे त्याची उचलबांगडी करायची असेल. सोबतीला त्याचा खेळ पण खालावत चालला आहे. त्यामुळे हि योग्य वेळ होती, पण अभिजित ने घोळ केला, त्याच्या हाती स्वतःला वाचवण्याची संधी होती. वैभव - धनंजय जोडी ऐवजी घनश्याम - पंढरीनाथ जोडी निवडली असती तर शेवटी आलेल्या घनश्यामला निकी - अभिजितचेच फोटो सेफ करावे लागले असते आणि घनश्याम - पंढरीनाथ जोडी सोबत त्याला वर्षा-अंकिता जोडी नॉमिनेटे करता आली असती. यात चोघेही लो हँगिंग फळ ठरले असते. मग बिबॉं टीम ने मनाप्रमाणे घनश्याम ला बाहेर काढले असते. पण इथे त्यांचा घनश्यामला शेवटी पाठवण्याचा डाव फसला.
बाकी गेले ३ एपिसोड पंढरीनाथ, वर्षा, घनश्याम, सुरज, धनंजय अगदी नाममात्र दिसले. यांचे बाहेर येण्याचे चान्स वाढले आहेत.
अरे हो नॉमिनेशन टास्क मध्ये आर्याने पुन्हा एकदा घोळ केला होता. निकी - अभिजित पैकी अभिजितचा आणि वैभव - धनंजय पैकी धनंजयचा फोटो सेफ करण्यासाठी उचलला होता. बिबॉ सांगितले बाई असा खेळ नाहीये.
एक आठवड्यासाठी बिबॉसने हा जो
एक आठवड्यासाठी बिबॉसने हा जो काही लैला मजनू घाट घातला आहे तो आज किंवा उद्या संपेल,जोड्या तुटल्या की लैला मजनू परत एकत्र,वैभव ,पुढारी धावलेच मागे.प्रॉब्लम होणार किलरबाईंचा,ना घर का ना घाट का अस व्हायच.
अरबाज तर वाटच बघत आहे,कधी जोडी तुटते आणि कधी एकदा निक्की कडे जातो.
आर्या पण तोंडावर पडेल.
अभिजित बाहेर पडला जोडीतून असा
अभिजित बाहेर पडला जोडीतून असा प्रोमो बघितला.
अरबाझ निक्की परत एक झाले, तर बाकीच्यांची तोंडे बघायला मजा येणार.
अरबाझ निक्की परत एक झाले, तर
अरबाझ निक्की परत एक झाले, तर बाकीच्यांची तोंडे बघायला मजा येणार.....
ते तसही होणिरच आहे,म्हणूनच म्हटल ना,लैला मजनूचा हा खेळ चालवला आहे बिबॉसने. तो संपलि की अरबाज निक्की परत एकत्र,पुढारी,वैभव पण जातील,पण किलर बाई कुठे जातील.
टीम बी ने स्वत:चाच मामा बनवला आहे.
परत तेच तेच दळण दळतील.
अरबाझ निक्की एक झाले की
अरबाझ निक्की एक झाले की किलरबाई हातवारे करून फुल टू ड्रामा करतील.
घरात इतर सगळे एक जात महामूर्ख
घरात इतर सगळे एक जात महामूर्ख आहेत! इतके खुषीत फिरतायत २ दिवस. जसे काही रामाने त्राटिकेचा पाडाव केला म्हणुन हे प्रजाजन आनंदी झालेत
यांनी खर तर काळजीत असायला हवे की हे दोघे सगळे फुटेज खातायत आणि आपण बघे बनून राहिलोत म्हणून.
आता आज पुन्हा निकी- अरबाज चे दिलजमाई असा प्रोमो येतोय. अरे बास करा की आता. कुणाला इन्टरेस्ट नाही त्या लव स्टोरीत. घरातल्या बावळटांना कळत नसले तरी प्रेक्षकांना नक्की माहित आहे हे किती फेक आहे ते.
Pages