बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी सिरीयल, रिॲलिटी शो मध्ये तिला नक्कीच काम मिळतील. हाताशी काही चित्रपट आधीच आहेत. मराठीत सुद्धा मिळू शकतात. काम मिळेल असेल तर ती काय कोणीच नकार देणार नाही.

आज नॉमिनेशन मध्ये धनंजय आणि वर्षा आजी येतील का?

वाइल्ड कार्ड एंट्रीनंतर निक्की इज रॅटल्ड.

हा पाण्यात ढकलायचा प्रकार आधीच्या सीझन मध्येही झालेला आहे ना?

वाइल्ड कार्ड एंट्रीनंतरचा सीन पाहून मला आदिश वैद्यची आठवण झाली. तो येताच जय आणि कंपनी अशीच रॅटल झाली होती. जय भांडणात एक्साइट झाला की लिटरली माकडचेष्टा करी. आज निक्कीला बघून तेच आठवले.

निक्की म्हणतेय मला इथे कोणाचीही गरज नाही. या कोणामध्ये अरबाझही आला हे त्याला कळत नाही? तो आता लिटरली निक्कीचं शेपूट झालाय.

हा बिग बॉस चुकली करायची एकही संधी सोडत नाही. पंढरीनाथनी फळ्यावर लिहिलं हे त्यांनी लगेच फोडून टाकलं.

बोअर वाटतोय तो वाइल्ड कार्ड मनुष्य. अजून एक बैल कशाला? काही कामाचा नाही. आर्याच्या आधी आता वैभव जाईल असे वाटते मला.
वर्षा च्या गेम चे कौतुक होते नेहमी त्यामुळे इतक्यात नाही जाणार. कदाचित यानंतर पॅडीचा नंबर?
अरबाज चा रोल फक्त निकीचा बॉडी गार्ड असा झाला आहे. खर तर तो स्मार्ट प्लेयर असावा पण मग निकीची मदत कशाला हवी त्याला?! यावेळी बरेच जण इन्डिविजुअल गेम खेळतायत असे वाटते. एका ग्रुप शी थोडे फार अलाइन्ड असतात पण फार नाहीत. ते आवडते आहे मला.

वा वा खूप आवडला आजचा एपिसोड....संग्राम चौघुले...दम है बंदे में...अरबाज आणि निकी कित्ती तडतड करत होते...फारच मज्जा वाटली बघताना..खरंतर याच निकि , जानवी आणि अरबाज मुळे show बघणे सोडून दिलं होतं...पण संग्रामने जर निकि आणि अरबाजला नेहमी असंच सळो की पळो करून सोडलं...तर नक्की पाहणार bigg boss...promo पाहून तर उद्याचा एपिसोड पण मस्त वाटतोय...संग्राम चौघुले फक्त बॉडी builder च नाही तर Mr.Universe पण आहे म्हणजे नक्कीच हुशार असणार...

निक्की एवढी कटकट बडबड करते, बिग बॉस का हायलाईट करते तिला, आम्हाला दाखवू नका, असं करून कॅमेरा निक्कीवरच ठेवता.

हिंदी बिग बॉस काही शॉट्स बघितले, राखी आणि निक्कीचे युट्युबवर, तिथे निक्की किती छान दिसत होती, हे ओठाचे वगैरे बहुतेक नव्हतं तेव्हा.

हिंदी बिग बॉस काही शॉट्स बघितले, राखी आणि निक्कीचे युट्युबवर, तिथे निक्की किती छान दिसत होती, हे ओठाचे वगैरे बहुतेक नव्हतं तेव्हा.

संग्राम चौघुले फक्त बॉडी builder च नाही तर Mr.Universe पण आहे म्हणजे नक्कीच हुशार असणार...
>>> mr युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पrdha असते… डोक्याचे काही काम नाही.. बैल असतात सगळे…

संग्राम प्रथमदर्शनी तरी हुशार वाटतोय, त्याला सगळं पाहून आल्याचा फायदा आहे. पुढे कळेलच.
आता धनंजयला जाऊ द्या.

काल पँडी खूप आवडला.त्याने फळ्यावर लिहिलेल बिबॉसने सांगितल तरीही पठ्याने माघार घेतली नाही.मस्त उत्तर देत होता.घरातले सुध्दा एकदम कन्व्हिन्स होत नव्हते की ते पँडीनेच लिहिल आहे.
बिबॉसला पचकायची काहीच गरज नव्हती.पण मस्त रिअँक्ट केल पँडीने.
पँडीला कुठेतरी इनसिक्युअर वाटत आहे की टीम बी फुटेल,म्हणून काल अंकिताला समजावत होताकी निक्की च्या बोलण्यावरून अभिजितला बोलू नको ,ते नंतर आपल्यात कर.
पण पँडीने हा प्रयत्न फार करू नये.टीम बी एकत्र कधीच नव्हती, त्या अभिजितला तर जवळ करण्याची काहीच गरज नाही.
अभिजित अंकिताच फारस चांगल नाही,अंकिताचा ओढा डीपीकडे आहे,आर्या
तर भरकटलेलीच आहे.वर्षा स्वत:च्याच विश्वात आहे.डीपी आजकाल वैभव ,अरबाजबरोबर जास्त असतो.
टीम बीला एकत्र ठेवण्याचा पँडीने फार प्रयत्न करू नये.
सोमिवर ,पँडीबद्दल मत आहे की तो सूरजचा वापर करून घेत आहे.पण
त्याला गेम कळत आहे,त्यामुळे सूरजच्या विरोधात जाण म्हणजे प्रेक्षकांच्या विरोधात जाण,म्हणून कदाचित तो तस करतही असेल,त्यात मला तरी फार चूक वाटत नाही.सूरजला सांभाळून तोच घेतो टास्क खेळतो,डोक लावतो,निक्की आणि अरबाजला मस्त उत्तर देतो.
खरतर पहिल्या पाचात असला पाहिजे.

संग्रामच्या येण्याने निकी अरबाझ चांगलेच हल्ले आहेत पण त्यानी सुरवातीपासून यायला हवे होते !
आत्ता तरी नुसताच डंब बॉडी बिल्डर वाटत नाहीये , बोलला चांगला पण किती दिवस असाच त्याचा ऑरा रहातो बघायला लागेल, आत्ता सुद्धा तो ठराविक टार्गेट घेऊन आलाय असे दिसते !
वैभव अरबाझला त्यानी विचारले जय वीरु बनायचय कि मुन्ना सर्कीट हे दिलेलं उदाहरण भारी होतं बाकी, भाईने बोला बापु दिखता है तो दिखता है तसा आहे वैभव Biggrin
आवडला पण आजचा एपिसोड , निकीच्या नोज जॉबच्या खोट्या एक्स्॑क्युजला ग्राह्य धरले नाही बरे झाले !

mr युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पrdha असते… डोक्याचे काही काम नाही.. बैल असतात सगळे…>> अच्छा.. हे नव्हतं माहित...मला वाटलं...miss world सारखे general knowledge related quiz वगैरे पण राहत असेल...पण तरीही मला तो हुशार वाटला...गेम पुढे गेल्यावर कळेलच...यावेळी सूरज जिंकला तर आवडेल मला..आणि संग्रामला बहुतेक सूरजला tips द्यायलाच पाठवले आहे...

संग्राम प्रथमदर्शनी तरी हुशार वाटतोय, त्याला सगळं पाहून आल्याचा फायदा आहे. >>> अगदी अगदी.

त्याच्या पहील्या पाच नं मधे अंकीता, पॅडी नाही हे जरा आश्चर्य वाटलं. जान्हवी असणारच होती आणि ती असणारच हे मी आधीपासून लिहीतेय. कलर्स फेस असतोच असतो दरवर्षी. त्याने पाच निवडले ते बिग बॉसने सांगितलेलेच असण्याची शक्यता जास्त वाटते.

उलट मला संग्राम अगदीच बिनडोक वाटला.
आर्या ला म्हणत होता मला तुमच्याशी बोलायचे आहे तेव्हा ते ठार डंब वाटत होता.

कोणी विचारले आहे का त्याला आम्ही बाहेर कसे दिसतोय किंवा खेळात काय इम्प्रुव्ह करायला पाहिजे वगैरे? आधीच्या सिझन ला नवीन आलेल्या मेंबरला आधीचे मेंबर तसं विचारतात आणि मग तो ते सांगतो. आल्या आल्या न विचारता प्रवचन सुरू करत नाही.

फळ्यावर, कागदावर किंवा कुठल्याही प्रकारे लिहिणे संदेश पोहोचवणे याची अनुमती नाही. फळा हा इरिनाला मराठी शिकण्यासाठी देण्यात आला होता, त्यावर इतर कोणी लिहिणे अपेक्षित नाही त्यामुळे हे पंढरीनाथचे गुपित फोडले असेल.

संग्राम आल्याने खूप काही फरक पडणार नाही. वाइल्ड कार्ड एन्ट्री होते तेव्हा पहिले एक दोन दिवस फेरफार होते मग येरे माझ्या मागल्या. वाइल्ड कार्ड अजून कुठल्याही सिझन मध्ये विजेता हि झालेला/झालेली नाही.

अंकितावर बिबॉ टीमची विशेष मर्जी असावी. तिला थेट आणि अप्रत्यक्ष हिंट देणे सुरूच आहे. बहुतेक त्यांना तिला विनर करायचे आहे. सिरीयल, पुढील रिऍलिटी शो होस्ट, चित्रपट मिळू शकतात.

मला असे काही वाटले नाही की निकी आणि अरबाज ला काही फरक पडला आहे किंवा पडेल. ते रिएलिटी शो करून आलेत. त्यांना सर्व माहित आह्रे. निकी म्हणतही होती की वाइल्ड कार्ड जो येणार तर आपल्या विरुद्ध खेळणार यात काहीच सरप्राइज नाहीये. कारण नेहमी वीक लोकांना साथ देण्यासाठी वाइल्ड कार्ड पेरतात. अरबाज ही तसेच म्हणत होता की थोडे दिवस त्या टीम ला हा मसीहा वाटेल अन मग जाईल तो.
ते दोघे बाहेर निगेटिव दिसत आहेत हेही त्यांना पुरेपूर माहित आहे. ते दोघे व्यावसायिक प्लेयर आहेत. त्यांच्या खेळात फरक पडणार नाही फारसा, उलट भांडण वगैरे करून कन्टेन्ट क्रिएट करून कॅमेरा आपल्यावर ठेवायला अजून एक चान्स!!

मै +१००

काल अरबाज वैभव शी संग्राम विषयी बोलत असताना निकी त्याला हाताला घेऊन मुख्य गार्डन एरियात घेऊन आली आणि मग जोरजोरात संग्राम ला वाईट साईट बोलायला लागली. ते इतकं प्लॅनड/ स्क्रिप्टेड वाटले ना..

निकी ला चर्चेत राहणे, स्वतः वर फोकस ठेवणे इतकं परफेक्ट जमतं की खरोखर यासाठी मानलं पाहिजे तिला.

मैत्रेयी, पियू परफेक्ट.

फेअर अंकिता बरोबर बिग बॉसच्या कात्रीत अडकली आणि जान्हवीला नॉमीनेट करू शकली नाही Lol जान्हवी टास्क चांगलाच खेळली पण अंकिता म्हणू शकली असती, बिग बॉस मला नाही फार आवडला तिचा गेम. जान्हवी बोलण्यात आणि स्वत:साठी स्टॅण्ड घेण्यात हुशार आहे, हे मानायला हवं मात्र.

बी टीमवाले बावळटच रहाणार.

यावेळी डीपी किंवा वैभव घरचा रस्ता.

जान्हवीला बहुतेक बिबॉसला च नॉमिनेट होऊ द्यायचे नाही.
असो.कुणीही नॉमिनेट झाल,तर या वेळेस वर्षा जाणार हे नक्की.कंटाळा आला तिचा सुध्दा.अन्जू,मला वटत वर्षा जाईल.डीपी नंतर असेल.
सूरजला कँप्टन्सी काही जमत नाही.तो पण
बोल बच्चनच वाटतो.
अंकिता मला आता स्वार्थी वाटायला लागली आहे,पाहिजे तेव्हा टीम बी.नको तेव्हा स्वत: ठरवणार.
अर्थात जान्हवीला नॉमिनेट होऊच द्यायच नाही,अस ठरवल असेल.बिबॉसने तर मग प्रश्नच मिटला.
मला वाटत ,निक्कीला पण पुढे काढतील आता,कारण तिची कंटेंट देण्याची कँपँसिटिच संपत चालली आहे,तेच तेच रिपिट होत आहे ,कंटाळा यायला लागला आहे.
सिझन 2मध्ये जस शिवानी ला बाहेर.काढून नंतल परत.गेस्ट म्हणून घेतल आणि मग सदस्य करून फिनँलेपर्यंत नेल,तसही केल.तरी चालेल.
सिक्रेट रुम पण नको,काढा,दोन.तीन आठवडे ठेवा बाहेर,बघा काय फरक पडतो ते गेमवर आणि टीआरपीवर आणि गरज पडली तर आणा परत.शिवानीने गेम सोडून जर तिला आणू शकतात,तर हिलाही परत आणता येईल पण सध्या दोन तीन आठवडे आराम द्यायला हरकत नाही,खरच कंटाळा येत आहे.तिलाही काही नवीन देता येत नाही आहे.

बिग बॉस जान्हवीला फायनल पाचात नेणारच आहेत तर तिच्या नॉमीनेशनला का घाबरतात Lol .

नॉमीनेट असणं म्हणजे बाहेर पडणे असं नाहीना.

निक्कीला मागच्यावेळी सिक्रेट रूममध्ये टाकायला हवं होतं, आता टाकून काही उपयोग नाही.

जान्हवीला बहुतेक बिबॉसला च नॉमिनेट होऊ द्यायचे नाही.
>>> अंकिताने बिग बॉस ने ३-३ वेळा सांगून सुद्धा जरासुद्धा अक्कल वापरली नाही याचे खापर बिग बॉस वर फोडू नये.

निक्की अरबाज ला सगळे बाहेर काढा म्हणतात.. पण त्यांच्या इतका गेम कोणालाही कळलेला नाही. आजवर त्यांनी दिलेले एकही कारण कधीही असे निकषांत न बसणारे नव्हते. निकी गेमच्या आणि घराच्या रुल्स च्या बाबतीत कायम अलर्ट असते. ती एवढा धिंगाणा करते पण नियमात राहून करते.

Btw डीपी नॉमीनेट नाहीये बहुतेक त्यामुळे वैभव किंवा वर्षाताई जाईल.
<<
According to the promo, all are nominated as punishment of breaking rules .

वैभव जाईल असे मला वाटते, वर्षा इतक्यात नाही जाणार . परवाच कौतुक झाले आहे धक्क्यावर. डीपीचे दिवस पण संपत आले असे वाटते.

ते संग्र्॒म्॑ने दिलेले टॉप ५ खरेच त्याचे अस्॑ते तर अर्॑बाझ, निकी ला पाण्यात नस्॑तं ढकललं Happy
उतलेल्या लोकात वैभ्॑व, डीपी, वर्षा आणि आर्या असे जायला हवेत अनुक्रमे गेमच्या बेसिस वर !
अनसीन अनदेखा मधे अरबाझ , वैभव आणि संग्रामचे कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन पाहिले, अरबाझ म्हणत होता संग्राम हे भारतातले सगळ्यात मोठे नाव आहे बॉडी बिल्डिंग मधले , वैभव तर घरा बाहेर आहेच संग्रामचा मित्रं, खूप रिस्पेक्ट देऊनच बोलत होते ते संग्रामशी.
स्क्रीन वर भांडताना दिसतात ते तात्पुरतं वाटतं मला, वेल एडिटेड शो !
अरबाझने खरच निकीमुळे बिघडवला स्वतःचा गेम, किती टॅलेन्टेड आणि अ‍ॅक्टिव्ह आहे तसं पाहिलं तर.

बाहेर कमिटेड असताना कशाला हे उद्योग करायचे, गेम नीट खेळायचा ना, त्याचा youtuber म्हणून वावर किती चांगला आहे, दुबई मधले एक दोन vlogs बघितले, अगदी पूर्ण नाही पण तो कसा वावरतो यासाठी बघितले.

Pages