बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निक्कीचं कौतुक झालं म्हणून जान्हवीचा पारा चढला, मजा वाटली बघताना. पुढारी, अरबाझ निक्कीबाबत सॉफ्ट झालेत.

काल रितेश बराच योग्य व्यक्त झाला. अरबाझने प्रॉपर्टी फोडली, त्याला कोणीही नाही बोललं, बॉक्सही त्याच्याकडून तुटला, निक्कीने नाकारला तरी निक्कीला सर्व बोलले, जान्हवीने मुद्दाम तोडला तिला कोणीच नाही बोललं. बी टीमही सिलेक्टिव्ह वागत होती, फक्त निक्कीला पाण्यात बघत होती आणि अभिजित सोबत असल्याने त्यालाही. सर्वांनी मिळून अभि निक्कीला मोठं केलं actually.

एनिवे आज नाचगाणी बोअर होतायेत, तसाही रविवार कंटाळवाणा असतो.

एनिवे आज नाचगाणी बोअर होतायेत, तसाही रविवार कंटाळवाणा असतो. +123

सगळे फक्त अंकिता च फेक एलिमिनेशन बघण्यासाठी थांबलेत.

प्रोमो मिसलिडींग असतात , कदाचित नुसताच प्रॅन्क असेल कारण प्रेक्षक ओळखु शकतात तर निदान काही कॉन्टेस्टन्ट्स तरी ओळखतील सिक्रेट रुम असेल तर !
बाकी अन्किताच या आठवड्यात बेस्ट वाटली, खरच सिक्रेट रुम ड्रामा असेल तर तिला विनर बनवायची हिन्ट आहे ही, मला आवडेल ती जिंकली तर !

Lol मी mute केलाय tv त्यामुळे समजलं नाही पण आर्या खरोखर प्रेमात आहे का अरबाझच्या, तिची उत्तरं बरोबर होतीना, त्यांना शॉक नाही बसला. अंकिताचं पहिलं उत्तर बरोबर होतं खरंतर, एक वेळा ऐवजी ती एक दोन वेळा म्हणाली, तर एवढं काय.

बाकी अन्किताच या आठवड्यात बेस्ट वाटली

सिरीयसली? काय खेळली काय ती. घनश्यामचा पाय ओढला, धनंजय सोबत गप्पा केल्या, थोडी रडली, कॅप्टनशिप टास्क मधून माघार घेतली.

माझा ओढला असता तर चाललं नसतं म्हणाली.

किमान हे खरं बोलली ती, कोणत्या स्त्रीला पुरुषाने हात लावलेला चालेल. उलट ही तेच आहे, तिने ही घनश्याम ला ओढायला नको होते. योगिता वेळी अरबाज चुकलाच होता. ते कोणत्याही प्रकारे जस्टिफाय होत नाही. मग हीचे का व्हावे?

बघणारे बनले येडे. झोपा आता. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात रितेश घरी जाऊन सदस्यांना सांगतो की व्होटिंग लाईन्स बंद आहेत आपण बघणारे आहेत त्यांना येडा बनवू. मी अंकिताला खोटं खोटं बाहेर काढेन तुम्ही जरा जास्त ड्रामा करा.

Submitted by बोकलत on 1 September, 2024 - 13:01
ही कुठली वेळ, हा कोणता टाईम स्टॅम्प "13:01" ?

अंकिता जिंकली तर आवडेल मलाही पण ती बेस्ट वगैरे नव्हती. तिच्यासह सर्व बी टीम प्लस जान्हवी वैभवने निक्कीवर जळण्यात, अभिजीतला घा पा बोलण्यात आणि अरबाझची हाजी हाजी करण्यात आख्खा आठवडा घालवला, होप पुढचा आठवडा सुधारतील.

बी टीममधून बेस्ट वर्षाताईच होत्या, शेवटी जी काही बॅटिंग करून कॅप्टनशिप पदरात पाडून घेतली, त्याला हॅट्स ऑफ.

AI अरबाझ योगिता प्रकरण वाच्यता केली नव्हती अजिबात, हायलाईट केलं नव्हतं, अंकिताचे केलं, तिला बोलले, ठीक आहे, तिला चूक दाखवली पण अरबाझच्या वेळी का नाही बोलले, मला तर आठवत नाही बोलल्याचं, मुद्दा काढल्याचे. त्याला का त्यावेळी पाठीशी घातलं. बोलले असतील आणि माझं मिस्ड झालं असेल तर मी माझी तुलना चूक मान्य करेन.

माझा ओढला असता तर चाललं नसतं म्हणाली.

किमान हे खरं बोलली ती >>> हो खरंतर तिच्या प्रामाणिकपणाला हॅट्स ऑफ. त्यामुळे तिने चूकही मान्य केली, हा तिच्या स्वभावातला प्लस पॉइंट आहे.

अंकिता एविक्शन चा फक्त प्रॅन्कच होता. सिक्रेट रुम वगैरे नाहीये.
अंकिता मला व्यक्ती म्हणून आवडते, ती हुषारही आहे. पण बिबॉ गेम मधे तिचे स्वतःचेच मॉरल स्टँडर्ड्स तिला समोरच्याच्या लेवल ला जाऊन भांडताना किंवा ट्विस्टेड /इव्हिल डावपेच वापरताना अडवतात असे वाटते!
अभिजीत बद्दल मला नीट ठरवता येत नाही. तो अंकिताला खटकतो तेव्हा ते चुकीचे नाही वाटत. पण त्याचीही बाजू पटते कधीतरी Happy
त्याचा स्वभाव मुळात डीसेन्ट आणि एकूण अ‍ॅटिट्यूड फार वाद झाला तर गिव्ह अप करून वाईटपणा टाळण्याचा वाटतो. तो लॉयल आहे. पण सगळीकडे स्टँड घेईलच असे नाही. तसंच लीडरशिप हा गुण नाही दिसत.
हे दोघेही टॉप ५ मधे असणार हे निश्चित!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात रितेश घरी जाऊन सदस्यांना सांगतो की व्होटिंग लाईन्स बंद आहेत आपण बघणारे आहेत त्यांना येडा बनवू. मी अंकिताला खोटं खोटं बाहेर काढेन तुम्ही जरा जास्त ड्रामा करा.

>> पुढच्या वेळी हे असं काही लिहाल तेव्हा आम्हाला सुद्धा बघायला इथे व्हिडिओची लिंक देत चला.

मला आवडला आजचा एन्टरटेनिंग एपिसोड Happy
पुढारीला माफ केलं बरं झालं, जाईलच बिचारा नेक्स्ट विक !
सूरज जान्हवीचा डान्स बेष्ट, कमाल धम्माल बेमिसाल.. जान्हवीने तर केलाच पण सुरजने सिक्सर मारली, एन्टरटेन्मेन्ट अनदर लेव्हल ..रितेश म्हणाला तसं लोक ओरिजनल डान्सस्टेप्स सोडून याच्याच स्टेप्स लक्षात ठेवतील Biggrin
शॉक टास्क मधे वर्षा उसगावकरने काय ते ओव्हारॅक्टिंग केलं Biggrin पुढारी बिचारा रडवेला झाला !
अरबाझ आर्या दोघांवर काहीही शॉक इफेक्ट दिसला नाही.
इतक करून मेड फॉर इच अदर वैभव आणि डीपी Proud
रिल्स पण खूप फनी होती , निकी खुष झाली असेल .
अंकिताचा प्रॅन्क केल्याने काय फरक पडेल माहित नाही, बिबॉला अन्किता वि अभिजीत बघायचय कि त्यांना एकत्रं खेळताना ?
सध्या टॉप ५ अभिजीत, अन्किता ,निकी ,सुरज आणि अरबाझ वाटत आहेत !

अरबाज पटेल youtuber आहे का. मला सजेशन्स येतायेत, मी दोन मिनिटं त्याच्या दुबईचा vlog बघितला, त्याच्याबरोबर त्याची gf आहे बहुतेक. ते दोघे कपल म्हणून छान दिसतायेत. इथल्यापेक्षा त्या vlog मध्ये अरबाज जास्त इम्प्रेसिव वाटला.

हो वर्षा आणि पुढारी ने एन्टरटेन केले शॉक टास्क मधे! एकून त्या टास्क मधे प्रश्न मजेशीर होते. डान्स मधे अर्थात सूरज ने मजा आणली.
आता या आठवड्यात टॉर्चर टास्क प्लान केलंय की काय ? येऊ द्या येऊ द्या! Happy

>>सगळे फक्त अंकिता च फेक एलिमिनेशन बघण्यासाठी थांबलेत.

मी पण तेव्हढाच भाग शांतपणे बसून बघितला.... बाकी सगळा एपिसोड येता जाता थोडा थोडा बघितला!!
त्या फेक एलिमिनेशनमध्येपण काही विशेष ड्रामा नाही वाटला

>>आर्या आणि अरबाज दोघे ऐ लिहून ए म्हणाले Rofl
अगदी अगदी!! पण दोघांनीही तसेच केल्यामुळे मला वाटले की त्यांना बहुतेक 'ऐ'च म्हणायचे असेल..... असे ए च्या पुढे हेल वगैरे काढून हाक मारत असेल ती कदाचित!!

हा सहावा आठवडा आहे.बिबॉसच्या नियमानुसार चाळीस दिवसांच्या आत वाईल्ड कार्ड्स आणतात.या आठवड्यात नाही आणले तर मग या वेळेस नो वाईल्ड कार्ड
म्हणजे आहेय त्यांच्याबरोबरच पुढे जाव लागेल.म्हणजे निक्की, अरबाज, जान्हवीला बाहेर काढण शक्यच नाही.
गेल्या सिझनला राखघ आणि आरोहला पाहुणे म्हणून आणल आणि मग सदस्य केल होत का शिवानीसारख की वाईल्ड कार्ड म्हणूनच आणल होत ,पण माझ्या मते ते उशीरा आले होते का?

तिला चूक दाखवली पण अरबाझच्या वेळी का नाही बोलले, मला तर आठवत नाही बोलल्याचं, मुद्दा काढल्याचे. त्याला का त्यावेळी पाठीशी घातलं. बोलले असतील आणि माझं मिस्ड झालं असेल तर मी माझी तुलना चूक मान्य करेन.

अहो, चूक वगैरे मान्य/ अमान्य साठी नाही लिहिला. मी काय कोर्ट थोडी आहे आणि मी काही जज नाहीये. आपली आपली मते आहेत. मी फक्त एवढ्या साठी लिहिले कि पाय ओढणे चूक होते आणि अरबाज - योगिताचा ड्रेस ओढणे सुद्धा चूक.

'त्यामुळे तिने चूकही मान्य केली, हा तिच्या स्वभावातला प्लस पॉइंट आहे." यावर आपली मते जुळली बघा. तिने डिसेंट खेळ खेळावा. तिनेच काय इतरांनाही निकी, जान्हवीला कॉपी करू नये. तिचे मालवणी बोलणे. गमती जमती याचा तिला ऍडवांटेज मिळू शकते. कालच्या फेक एव्हिकशनला तर तिला क्लिअर सांगितले "अपेक्षा आहेत." इतकी मोठी हिंट दिल्याची आठवत नाही.

ओके, लक्षात आला मुद्दा. मीही मला म्हणायचं होतं ते क्लियर केलं.

वाईल्ड कार्ड राखी आली तरच मजा येईल, बाकी जी नावं येतायेत ती एवढं काही करतील असं वाटत नाही.

हो. अंकीता, अभिजीत, सुरज यापैकी विनर होईल.

डीपी आधी काहीतरी छान खेळेल वाटलेलं, काही नाही. तो फार काही करतच नाही.

पाच आठवडे झाले, हा सहावा तरी यांना सांगावे लागते की कॅप्टनशिप म्हणजे इमूनिटी, कोणताही टास्क सोडू नका, कोणत्याही टास्क मधून माघार घेऊ नका, "अपेक्षा आहेत", कोणाला नाही कळले तरी बोल अश्या लोकांना का विजेता करावं?

निक्की कितीही कर्कश्श वाटली तरी फुटेज तिच्यामुळेच मिळतंय पूर्ण घराला. असा एक तरी अति आगाऊ व्हिलन प्रत्येक सिझन मध्ये असतोच. हिंदी बिबॉमध्ये पण. टॉप फोर पर्यंत जातातच हे. पण जिंकत नाहीत. जिंकणार कोणीतरी यांच्या जीवावर स्वतः ची इमेज उजळ करुन. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने.

यावेळी पुढारीला मोकळं करतील, गणेशोत्सवात भाषणं ठोकायला. यावेळी सात जण नॉमिनेट झाले.

सर्वात मजा अरबाझने आर्याला नॉमिनेट केलं तेव्हा आली. तिच्या लाडक्या अरबाझ आणि वैभवने तिला नॉमिनेट केलं.

जान्हवी वाकडी तिकडी का उभी रहात असते आणि हालत का असते. उद्या तिचं नेहेमीचं व्हिलन रुप पुढारीसमोर प्रकट होणार.

चला आज अरबाझला नॉमिनेट करताना पॅडीदादा म्हणाले तरी की तू आम्हाला सर्वांना मुर्ख बनवलं. निक्की आणि अरबाझ एकत्र आले शेवटी, ते वेगळे झाले नव्हतेच खरंतर.

जे नॉमीनेट झाले नाहीत, त्यापैकी काही जणांचा attitude बघायला मिळेल या आठवड्यात, विशेषतः वैभव, जान्हवी.

जवळजवळ अर्ध घर नॉमिनेट झाल आहे.पुढार्याला च काढायच आहे ना,मग एवढे सगळे कशाला पाहिजेत. चार पण चालले असते की.

Pages