बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षाचं बोलणं ऐकून हहपुवा आणि एन्टरटेन्मेन्ट दोन्ही “ मला ब्रम्हांड आठवलं, मी धरणीवर घोरपडीसारखी चिकटले Biggrin
मजा आली पण तिची एक से एक अर्ग्युमेन्ट्स ऐकून , बी टिमच्या येड्यांनी कशाला माघार घेतली पण , खाणार बोलणी आता धक्क्यावर!
जान्हवी आणि वैभवची स्तुति होणार फॉर अ चेन्ज !

मी धरणीवर घोरपडीसारखी चिकटले.....+11111
हो,जाम हसायला आलं.एकदम तानाजी मालुसरेच आठवले.पण खरच,एकदम इश्टाईलमध्ये चिकटलेल्या होत्या.तो मोनोलॉग एडिट करून पोस्ट करता येईल का,परत परत बघायला आवडेल.

स्वरूप, बरोबर लिहिले आहे. जान्हवीला बरीच बोलणी झालेली दिसतेय म्हणून वर्षा आजीला ती काही जास्त बोलली नाही. तिला तसेही बोलता आले नाही. एकूणच तिचा टोन आणि शब्द फारच हललेले दिसले. तिला तिचा सुर काही सापडत नव्हता. उगाच काहीतरी बोलायचे म्हणून बोलली. वैभव तर शून्य मार्क, कुठलाच मुद्दा त्याला मांडता आला नाही. जर तिथे निक्की असती तर मग मजा आली असती, पण सगळा फुसका बार झाला.

वयाने आणि इंडस्ट्री मध्ये सिनियर म्हणून वर्षा आजीला झुकते माप मिळाले. बाहेर निक्की व अरबाज यांना जान्हवी व वैभव यापैकी कोणालाच कॅप्टन करायचे नव्हते त्यामुळे लगेच वर्षा आजीचे नाव घ्यायला सुरुवात केली. तसेही निक्की सुरुवातीलाच बोलली की बाहेर बसलेल्या लोकांना निवडणूक प्रक्रियेत काही तरी काम येईल. यावरून पुन्हा एकदा दिसले की तिला गेम खूप जास्त कळतो आणि झालेही तसेच बाहेरच्या लोकांनाच कॅप्टन निवडावा लागला. कारण माठ असलेल्या बी टीमने पुन्हा एकदा बावळट पणा केला होता.

बिबॉने कानउघडणी केली नाहीतर माघार घेण्यात ते सगळे पुढे आलेच होते. त्या धनंजयच्या बायकोला दाखवा हे की तिचा नवरा कशी लगेच माघार घेतो. आता पर्यंत झालेल्या एकाही कॅप्टनशिप टास्क मध्ये त्याने पुढाकार घेतला नाही, उलट माघराच घेतली आहे आणि तिकडे त्याची बायको म्हणते माझ्या नवऱ्याला स्क्रीन टाईम का मिळत नाही (याचीही रील/व्हिडिओ करून यूट्यूब वर पैसे कमवले ते वेगळेच).

आर्या तर पूर्ण हुकली होती. बिबॉने सरळसरळ तिला मूर्ख म्हटले आणि पुढील वेळी नॉमिनेशन साठी तयार रहा अशी छुपी हिंट दिली. सूरज पण काही जास्त बोलला नाही, पाहिले माघार घेतली नंतर बिबॉ बोलल्यावर क्षणिक माघार वापस घेतली.

सरळ टास्क होता, पहिल्या फेरीत बहुमताने वैभव जान्हवीला बाहेर काढायचे, नंतर आपसात बहुमत करून कॅप्टन ठरवायचा. सूरज, धनंजयला चांगला चान्स होता तो त्यांनी घालवला. बर एकदा कॅप्टन झालो तर पुन्हा कॅप्टन व्हायचे नाही असा काही नियम नाही हे त्या बावळट ग्रुप मधील रडूबाई अंकिताला सांगा. आता किती वेळा ही माघार घेणार हीलाच माहिती. खरच निक्की गेम मध्ये या सगळ्यांच्या कैक पटीने पुढे आहे. तिला कॅप्टनशिप चान्स आला तर ती प्रत्येक वेळी फाईट करणार. शक्ती युक्ती दोन्ही वापरणार.

निक्की सुरुवातीलाच बोलली की बाहेर बसलेल्या लोकांना निवडणूक प्रक्रियेत काही तरी काम येईल. यावरून पुन्हा एकदा दिसले की तिला गेम खूप जास्त कळतो आणि झालेही तसेच

>> हो. तिला व्यवस्थीत कळतो गेम. मध्ये मध्ये खाण्याच्या सामानविषयी पण ती ओपनली सगळ्यांना सांगत असते.. की बिग बॉस पाठवतील सगळं. एवढं ग्रोसरी ग्रोसरी करू नका.

वर्षाताई एक चांगली उत्स्फूर्त कॉमेडी लेखिका आणि कलाकार आहे हे ह्या निमित्याने समोर आलं. सटासट वाक्यरचना करत होती. तिने मजा आणली काल.

अरबाज सकट सगळे वर्षाताईच्या बाजूने होते. निक्की हरूनही जिंकली कारण वैभव किंवा जान्हवी कॅप्टन झाले नाहीत. निक्की आवडो न आवडो, बिग बॉस खेळ जाणून आहे.

आर्याने टिश्यू पेपर कॅप्टन रूम मध्ये टाकलेले, तो मुद्दा येतो का बघूया. आज बी टीमला झोडायला हवं.

जान्हवी माझ्या अजूनही डोक्यात जाते, तिचे हातवारे आणि बोलणं बघून पक्की गुंडच वाटते.

अमृता तिच्या रोस्टमध्ये म्हणाली की मानकाप्याच्या वीकमध्ये आर्याचा परफॉर्मन्स नाककाप्या होता म्हणून Proud

Lol स्वरूप अगदी खरं बोलली अमृता.

जबरदस्त होता आजचा भाऊचा धक्का, मला जाम आवडला.

रितेशने निक्कीचं कौतुक केल्याने लोकं सो मि वर भडकली आहेत Lol

मला मजा वाटली अभिजीत निक्कीचं कौतुक बघून. अभिजीतला हिरो केलं, बरेच मुद्दे बरोबर होते रितेशचे.

अभिजीत सारख्या कॉवर्ड , स्पानलेस इमेज कॉन्शस माणसाला बिबॉच्या ब्रँड साठी फेमस नाव हवे म्हणून विनर करायचा प्लॅन थोपू नये !
तिथे अ‍ॅक्ट रायडर्स जणु अभिचा पी.आर झालाय, किती ते बटरींग आणि वर मी जे बोलतो ते रितेश बोलतो हा माज !

मी युट्यूबर्सचे यावर्षी बघतच नाहीये. रितेश मुद्देसुद बोलला मात्र. अभिजीतबाबत त्याने मांडलेले मुद्दे योग्य वाटले. नॉमिनेशनबाबत तो कसा चुकला हेही सांगितलं त्याला.

सुरजलाही योग्य सल्ला दिला. सुरज यावेळी कॅप्टन झाला असता खरं तर. मध्ये तो हीरो वाटलेला पण हल्ली जाम बॅकफुटवर गेलाय.

बी टीमला झोडलेले बघायचं होतं मला, त्यांनी अरबाजकडे बुद्धी गहाण टाकलेली, ते बघायला मिळालं मला.

मला नाही आवडला आजचा भाऊचा धक्का...किती ते निक्कीचं कौतुक...तेही गरज नसताना...उलट तिने आठवडाभर एवढं चांव चांव केलंय की मला एपिसोड्स बघणं देखील नको वाटायचं....आता इतकं कौतुक झाल्यावर तर कित्ती शेफारेल ती बया....डय़ुटीज वाटत असताना अंकिताने अभिजीतचेच दोन वाक्य त्यालाच सुनावले....तर त्याबद्दल तिला उगाच बोलला रितेश...अंकिता निकि सारखी उगाच भांडत नाही तर अगदी to the point बोलते...ते फार आवडतं मला...तो अभिजीत तरी कुठे individual वाटला आठवडाभर?निक्की जसं म्हणेल तसा तिच्या तालावर तर डोलत होता....तर त्याचं किती ते कवतिक... एकूण अज्जिबातच नाही आवडला आजचा धक्का...

निक्कीचे जास्त कौतुक मुद्दाम केलं असेल बाकी सर्व घर निक्की हेटर होतं म्हणून, उद्या बोलेल रितेश बहुतेक तिच्या काही चुकांबद्दल, विशेषत: ड्युटीज बाबत बोलायला हवं होतं त्याने तिला.

निक्की आज वेलड्रेसड होती.

मला तर बिग बॉसला सुरज, अभिजीत किंवा जान्हवीला जिंकवायचे आहे असं वाटतं. त्यांना वेळोवेळी समज देत राहतात, हिंटस देतात. सुरजने जरा जोर लावायला हवाय, त्याला पाठिंबा खूप आहे बाहेर. जान्हवीला आज सांगितलं की निक्कीला टक्कर तू एकटीच देऊ शकतेस पण योग्य मुद्दे घे.

अर्थात काही गोष्टी जान्हवी विरोधात जाऊ शकतात जसं शासनाच्या पुरस्काराना नावं ठेवणे आणि वर्षाताई आणि pady दादांना फार खालच्या पातळीवर जाऊन बोलणे, कलाकार सर्व तिच्या विरोधात गेलेत त्यामुळे विनर नाही व्हायची पण पुढे जाईल.

निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी चौघेही ट्रॉफी योग्य अजिबात वाटत नाहीत मला.

निक्कीला मांडीवर घेऊन अगो माझी बाय म्हणायचं बाकी आहे फक्त! माझ्या हातात जर निर्णय आले तर ह्या अरबाज आणि निक्कीला सगळ्यात आधी त्याच अनुक्रमे किंवा जमले तर एकत्र घालवले असते.. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, तद्दन फालतू मराठी संभाषण, त्यानंतर दुटप्पी पणा, एंटरटेनमेंट च्या नावाने फालतू नाटकी रोमान्स

निकी कन्टेन्ट क्वीन आहे निगेटिव असली तरी! तिला कसे काढतील ?! Happy
मराठी मात्र भीषण बोलतात बहुतेक सगळेच. "खायला भेटंल" न चा ण वगैरे सर्रास. अरबाज तर मुलींना पण पुल्लिंगी उल्लेखाने बोलतो त्यामुळे कन्फ्यूज व्हायला होतं नेहमी Happy त्या मानाने निकी बरंच बरं बोलते म्हणायचं !!
आज जान्हवीला पुन्हा बाहेर काढले. आता झाला की आठवडा. अजून किती शिक्षा? थोडं अनफेअर वाटलं. सेम घनश्याम बद्दल पण. इतकं काय त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही वगैरे. अनुल्लेख!
बी टीम ला झापले ते बरे केले पण त्यांना काही समजेल असे वाटत नाही. इतके बावळट आहेत की त्यांचा विचार साधारण असा असतो "कॅप्टन निवडायचाय मग कोण स्ट्राँग आहे बरे? हां अरबाज किंवा वैभव , ते चांगले घर सांभाळतील. ठीके मग मी माझे नाव मागे घेते /घेतो " "जान्हवी तूच लढू शकशील बाई त्या निकी नामक राक्षशिणीशी . तू आम्हाला हवी आहेस घरात. मी कुर्बानी देते त्यासाठी " म्हणजे मी स्वतः कोणत्याच कामाचा/ कामाची नाही हे मान्यच केल्यावर पुढे काही शक्यताच उरत नाहीत.
अंकिताला उगीच आज झापले निकीला डिवचल्याबद्दल. तिचे बरोबर होते. फोबिया आहे तर घरी रहा हा टाँट निकीच्या आधीच्या टाँट ची परतफेड होती. एकूण असे वाटले की बिबॉ ला अभिजीत मधे विनर क्वालिटी दिसली आहे. अभिजीत आणि निकी घराचे लाइट बंद करताना दिसणार की काय Happy अंकिता आणि अरबाजही टॉप ५ मधे असतील असे सध्या वाटते.
बायदवे मला डिपी चे ते वाक्य "अंकिता उठून दिसावी म्हणून मी घनश्याम ला बॉक्स उडवायला सांगितला" ही चक्क थाप वाटली . उगीच फुशारकी किंवा क्रेडीट घ्याअचे म्हणून त्याने ते म्हटले असावे . ती थाप नंतर त्याच्याच अंगाशी आली Happy
रितेश ने तेव्हा स्वतःलाच कॉन्ट्रॅडिक्ट केले आधी म्हणाला तुम्ही ग्रुप मधे एकमेकाला सपोर्ट नाही करत आणि शेवटी म्हणाला " तुमचा ग्रुप आहे म्हणून एकमेकाला मदत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता , आज गद्दारी करायला तयार झालात "

जान्हवीला रितेश म्हणाला आहे ना मागे, यापुढे भाऊच्या धक्यावर तुम्हाला स्थान नाही, त्यामुळे काढलं पण पुढच्या वेळी बसू देतील बहुतेक, द्यावंही.

अरबाज बहुतेक गुज्जू असावा. निक्की मराठी आहे.

अरबाझची gf दिसायला मस्त आहे, काही फोटो बघितले.

आठवडाभर मला एकीकडे वाईट वाटत होतं, एकीकडे राग येत होता बी टीमचा. ती माझी लाडकी टीम आहे आणि काय अरबाझला उगी उगी करून, त्याच्या ताटाखालचे मांजर होऊन आणि निक्कीला अति हेट करून ह्या दोघांभोवती फेर धरत मोठं करतायेत त्यामुळे त्यांची कानउघाडणी केली हे भारी वाटलं. होप की आता सुधारतील.

आज जान्हवीला पुन्हा बाहेर काढले. आता झाला की आठवडा. अजून किती शिक्षा? थोडं अनफेअर वाटलं.
>> म्हणजे कलर्स झाले यशस्वी.. लोकांना सिंपथी वाटायला लागली तर…

आज जे अभिजीतचे कौतुक झालं आणि अन्किताला सगळीकडे चूकीचं ठरवलं गेलं ते अजिबातच नाही पटलं !
असला कसला रड्या माणुस हिरो ? बेल्ट काढून टाकला ते अगदीच किडिश हस्यास्पद दिसत होतं !
जान्हवीला आणि पुढारीला सुद्धा दोघांनाही आठवडा झाला तरी शिक्षा दिली तर पब्लिकची सिंपथीच मिळणारे , किती ताणतायेत !
जान्हवीला स्पुन फिडींगही केलं कि निकीशी योग्य मुद्द्यावरून भिड , हिरो बन !
विकेन्डला रितेश स्वतःच चुगल्या दाखवून दर वेळी इक्वेशन्स बदलतात , या घरात मैत्री बदलत रहाते दर आठवड्याला म्हणतात आणि मग बी टिमला एकमेकांना साथ देत नाहीत म्हणून रागव्तायेत !
टिम बी कधीच तुटली आहे पण मेमरी लॉस झाल्या सारखा पुन्हा पुन्हा बी टिम मित्रांना का नॉमिनेट करते म्हणून ओरडतात!

बिग बॉसच्या घरात खोटी प्रेमप्रकरणे करायची नाहीत, प्लॅनिंग-प्लॉटींग करायचे नाही, मोठ्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, जशास तसे वागायचे नाही, समोरच्या टीममधल्या मित्रांना सपोर्ट करायचा नाही, आपल्या मनाप्रमाणें नॉमिनेशन करायची नाहीत, आरडाओरडा करायचा नाही, खंजीर खुपसायचे नाहीत, गद्दारी करायची नाही, टोमणे मारायचे नाहीत..... अरे रितेशभाऊंना काय सत्संग भरवायचा आहे का आत?
आणि वरुन त्यांनी रिअल वागावे ही अपेक्षा??
अरे इतकी प्रत्येक गोष्टीत झापडाझापडी केल्यावर ते जास्तीत जास्त पॉलिटीकली करेक्ट वागणार ना!! अभिजीतसारखे Wink

या सीझनला इतके दाबून ठेवलेय लोकांना म्हणून तर ते जास्तीत जास्त फेक वागायला लागलेत आणि म्हणून प्रेक्षकांचा कुणाशीही कनेक्ट बनत नाही बहुतेक!!

रितेशभाऊ, जरा ढील द्या त्यांना Happy

मुळात निक्कीसारख्या बिबॉस शो कोळून प्यायलेल्या मुलीला मराठी बिबॉस मध्ये आणून तिच्यासमोर,अक्षरश:लिंबूटिंबू असलेले कंटेंस्टंस्टंस आणायचे आणि मग सामना अगदी अटीतटीचा होईल अशी अपेक्षा करायची,हाच सगळ्यात बिनडोकपणा आहे.
यावर्षी खरतर बिबॉसला च त्यांचाच गेम कळत नाही आहे.
गेल्या सिझनचा एवढा मोठा अनुभव पाठीशी असताना काहीतरी विचार करून शो सुरू केला असेल अस सदस्यांना बघून वाटल होत,युट्यूबर्स,इंन्फ्लुएंजर्स होते म्हणून,पण मराठी बिबॉस आहे,निकीसारख्या बॉम्बसमोर ते फुसके बार निघाले तर ,हा विचार टीमने केलेला दिसतच नाही.
म्हणून हा सगळा प्रॉब्लेम येत आहे.
आता सहावा आठवडा सुरू होऊनही जर निक्की शो चालू राहाणार असेल तर त्या शोला काय अर्थ राहतो.
काल त्या अभिजितला ट्रॉफीच द्यायची बाकी होती,काय दिवे लावत आहे तो
निक्कीसमोर बोलता येत नाही आणि बोलायला गेला तर इमेज जाईल(वैशाली माडेचा अनुभव असेल).म्हणून तो बोलतच नाही,त्यात कसली डिग्निटी,आपली पण जान्हवीच होईल ही भीती आहे.
एवढच जर होत तर त्या निक्कीला का नाही सांगितल.ठामपणू की बाई.....तू तुझ अरबाजपुराण माझ्यापुढे गाऊ नको,मला इंटरेस्ट नाही,"हा पण तिला विचारतच होता की की मी बोलू का अरबाजशी?
निक्कीबद्दल बोलायलाच नको,तिला व्यवस्थित माहित आहे,सगळ बाहेरूनच ठरवून आली आहे,सगळ माहित आहे.
बाकीचे तर अजूनही गेममध्ये शिरलेच नाही आहेत.सूरजला अजूनही सांगावच लागत,आर्या अजूनही माती खाते,पँडी ला खेळायच आहे की नाही हेच कळत नाही.पुढार्याचे दिवस भरले आहेत,काय एवढ झाल आहे कळत नाही.वर्षा ,डीपी,वैभव,जान्हवी,पँडी विनर नाहीत हे त्यांनाहीक्षाणि आपल्यालाही माहित आहे.
वाईल्ड कार्ड्सचा अजूनही पत्ता नाही.
एकंदरीत सिझन चार चांगला म्हणण्याची वेळ आली आहे.

यावेळी सिक्रेट रुमची काही गरजच नाही...... सगळी सिक्रेट्स भाऊंच्या धक्क्यावर ओपन होतात.... अजुन वेगळे काय दाखवणार सिक्रेट रुममध्ये ठेऊन?
अंकिताचे फेक इलिमिनेशन मात्र होऊ शकते कारण वोटींग लाईन्स बंद आहेत आणि कालच्या धक्क्यावर तिच्या विरोधात पुरेशी वातावरणनिर्मिती झालेली आहे!!

हो ना सिक्रेट रुम काही फायदा नाही. सगळ्यांना माहित असतं. त्यात यावेळचे ४ हि लोक असे आहेत की जे एलिमिनेट होणार नाहीत हे सगळ्यांना माहित आहे.
**प्रोमो पाहिला आत्ता. पण सिक्रेट रूम मधे अंकिताला ठेवून काय नविन होणार कळत नाही. नुसताच बाहेर जाण्याचा प्रँक असेल तर ठीके.

अंकिताच किंवा अभिजितचही फेक एलिमिनेशन होऊ शकते कारण त्याच्या मूर्खपणामुळे बिबॉसला हवा असलेला पुढारी नॉमिनेशन्स मध्ये आला नाही.
काल रितेश म्हणाला सुध्दा की नॉमिनेशनमध्ये त्याने चूक केली,त्याच्या या चुकीमुळे तो बाहेर जाऊ शकतो.

बाकी,सिक्रट रुममध्ये ठेवायचच असेल तर सध्यातरी अरबाजच योग्य आहे,निक्की कशी खेळते ते कळेल.मजा येईल जरा बघायला.पण तो नॉमिनेटेड नाही,त्यामुळे तेही शक्य नाही.
इतर कोणालाही सिक्रेट रुममध्ये पाठवून फार काही फरक पडेल अस वाटत नाही.
रितेश त्या वैभवला अरबाजविरुध्द भडकवण्याचा एवढा प्रयत्न करत आहे गेले दोन आठवडे,एकदा त्या वैभवने त्या अरबाजला टास्कमध्ये तुडव तुडव तुडवला की बहुतेक रितेशचा आत्मा थंड होईल.

यावेळी सिक्रेट रुमची काही गरजच नाही...... सगळी सिक्रेट्स भाऊंच्या धक्क्यावर ओपन होतात.... अजुन वेगळे काय दाखवणार सिक्रेट रुममध्ये ठेऊन?>>> हो...हे मात्र अगदी खरं... तसही secret room मध्ये त्यांनाच ठेवायला मजा येते ज्यांचे friends त्यांच्या विरोधात बोलतात...अंकिताला secret room मध्ये ठेवून काही फायदा नाही...पण मेन गेट पूर्णपणे उघडलं आहे...काय माहीत काय करतात...बाकी रितेश देशमुखने सगळेच पत्ते open करून चांगल्या season ची वाट लावली....

कालचा धक्का बेस्ट होता, असे वाटले रितेश देशमुख माबो वाचून धक्का होस्ट करत होता.

निक्की शिवाय कोणाचंच खेळ होत नाही. निक्की - वर्षा आजी धुसफूस होती तेव्हा वर्षा आजी दिसायच्या. निक्की - अरबाज असेल तर तो जास्त दिसतो. (वैभव, जान्हवी सोबत फारच कमी फुटेज दिसते), निक्की - पंढरीनाथ होते तेव्हा ते दिसतात, निक्की - घनश्याम असताना घनश्यामची चर्चा होते, निक्की - जान्हवी होती तेव्हा दुसऱ्या आठवड्यात जान्हवी दिसली, निक्की - अभिजित सोबत तर अभिजित दिसला. शेवटी हेच खरे की सध्या तरी निक्की शिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाहीये. अंकिता ला ट्रॉमा वरून बोलणे योग्य होते. पंढरीनाथला पण तेच. आर्या तर घराबाहेर जाण्यासाठी रांगेत आहेच. घनश्याम, धनंजय, आर्या, वर्षा, पंढरीनाथ अश्या क्रमाने हे बाहेर जातील असे वाटते.

अंकिताला सिक्रेट रूममध्ये ठेवून काय साध्य करणार, निक्की ला ठेवायचं त्यापेक्षा, तिच्याशिवाय घर काय करते बघायला मजा आली असती, जान्हवीने लीड घेतला असता आणि नंतर चार दिवसांनी निक्की परत आली की बघायला मजा आली असती.

अंकिताने पुढारीचा पाय टास्क मध्ये ओढला तर तिला एवढं का बोलले, ती ही बावळट, माझा ओढला असता तर चाललं नसतं म्हणाली. टास्क मध्ये अरबाझने योगिताचा ड्रेस ओढला ते बोलायला मात्र योगीताला बंदी केली bb ने.

अंकिताला विनर करण्यासाठी बहुतेक थोडं स्पून फिडिंग करतील.

Pages