Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निकी गेमच्या आणि घराच्या
निकी गेमच्या आणि घराच्या रुल्स च्या बाबतीत कायम अलर्ट असते. ती एवढा धिंगाणा करते पण नियमात राहून करते.>> पियू मी सहमत नाही . उलट तिच्या इतके घराचे नियम कोणीच मोडत नाही . टास्क मध्ये सुद्धा ती खेळताना लहानपणीचा ट्रॉमा आहे म्हणून गुहेत जाणार नाही , नोज सर्जरी झाली म्हणून पाण्यात उतरणार नाही . कॅप्टन रूम मध्ये जाऊन झोपणार . भांडी नाही घासणार . ... सतत उर्मट बोलणार . सगळं माझंच खरं .
संग्राम ची अक्कल काढायची पात्रता नाही निकीची . अरबाज तर सतत आपण दिवसेंदिवस आपण किती मूर्ख आहोत याचे एकापेक्षा एक वरचढ पुरावे देतोय . कॉन्ट्रडीक्ट केलं म्हणे संग्राम ने
अरे आर्याने पाण्यात उतरायला नाही म्हटलं नाही . निकीने नखरे केले .
अरबाज ला वकीलपत्र दिलं आहे का तिचं ?
कोणत्या परिस्थितीत आणि काय कारणास्तव संग्राम ने तिला ढकललं ते बघतच नाहीये अरबाज. नुसतं एकच धरून बसलाय तुम्ही आर्याला ढकललं नाही हिला ढकललं . आणि मेडिकल कंडिशन आहे तर निकी तिची बाजू लढवेल ना
थोडक्यात काय तर निम्मा सीझन
थोडक्यात काय तर निम्मा सीझन संपला तरी कोणीही पोटेंशियल विनर म्हणून समोर येत नाही...... बिग बॉसने NOTA वापरुन फिनाले वीकनंतर सगळ्यांना डायरेक्ट आपापल्या घरी पाठवावे
उलट तिच्या इतके घराचे नियम
उलट तिच्या इतके घराचे नियम कोणीच मोडत नाही . टास्क मध्ये सुद्धा ती खेळताना लहानपणीचा ट्रॉमा आहे म्हणून गुहेत जाणार नाही , नोज सर्जरी झाली म्हणून पाण्यात उतरणार नाही . कॅप्टन रूम मध्ये जाऊन झोपणार . भांडी नाही घासणार . ... सतत उर्मट बोलणार . सगळं माझंच खरं .
>> टास्क मध्ये आणि घरात बऱ्याच गोष्टी करणार नाही हे सांगून तिला स्वतः वर फोकस ठेवायचा असतो फक्त. कुठूनही काहीही करून स्वतः भोवती काँट्रोव्हर्सी तयार करणे आणि सगळ्यांचे सेंटर ऑफ अत्रॅक्शन राहणे, सतत तिचीच चर्चा झाली पाहिजे ही तिची strategy आहे.
उर्मट बोलणे आणि सतत स्वत:चेच खरे करणे याने कोणत्याही नियमाचा भंग होत नाही. कोणत्याही बिग बॉस मध्ये असे एक पात्र लागतेच. हिंदी असो, मराठी असो, तमिळ असो..
अंकिताने बिग बॉस ने ३-३ वेळा
अंकिताने बिग बॉस ने ३-३ वेळा सांगून सुद्धा जरासुद्धा अक्कल वापरली नाही याचे खापर बिग बॉस वर फोडू नये......
अंकितिने बिनडोकपणा केला की एकीकडे फेअर गेम खेळत आहे अस दाखवून जान्हवीला न दुखावता आपल्याविरोधात जाणार नाही याची काळजी घेऊन गेम खेळली ,हे तिच तिलाच माहित.पण तस तर डीपीने पण पहिल्या वेळेस अभिजितला बाद करण्याच एकही कारण न दिल्याने बिबॉसने ती फेरी बाद केली,पण अभजित.नॉमिनेशन्स मध्ये
हवाच असल्याने नंतर मात्र त्याला कारण द्यायला भाग पाडल जे फार काही ग्राह्य नव्हत कारण अभिजित संचालक होता.,त्पीयाने संचालनही चांगल केल.होत.डीपीने सुध्दा अगदी द्यायच म्हणून कारण दिल होत,पण ते ग्राह्य धरल बिबॉसने.
पुढारी जायच्या आधीच्याच आठवड्यात अभिजितमुळे नॉमिनेशन्स मध्ये आला नाही तर वोटिंग लाईन्स गरज नसताना बंद ठेवल्या.
एकंदरीत आपल्याला हवे ते सदस्य येईपर्यंत बिबॉस नॉमिनेशन टास्क चालू ठेवतो.आता या वेळी वर्षा किंवा.वैभव चा नंबर असेल.पण बिबॉसला वर्षाला काढायच असाव.
बिबॉची काल धनंजयला नॉमिनेशन
बिबॉची काल धनंजयला नॉमिनेशन मध्ये आणायची बरीच धडपड सुरू होती. पण शेवटी वर्षा आजीने त्याला वाचवले. शेवटी बिबॉ वर्षा आजी व वैभव वर सेटल झाले. वैभव बाहेर पडण्याचे चान्स जास्त आहेत. वर्षा आजी रोजगार हमी योजनेतील असल्याने किमान शेवटच्या दहा मध्ये राहतील. पुढील वेळी धनंजय, मग पंढरीनाथ असा क्रम वाटतो.
काय बोरींग टास्क होता ,
काय बोरींग टास्क होता , अन्किताला एक व्हॅलिड रिझन नाही देता आलं जान्हवीला नॉमिनेट करायचं?
तशीही ती गेली नसतीच अर्थात पण येडे आहेत टिम बीचे लोक , आय होप वैभव गेला पाहिजे आता !
सूरजला अजिबात झेपत नाहीये कॅप्टन्सी !
उकडलेल्या पदार्थांची क्रिएटिव्हिटी नाही करता येत यांना ? मोमोज, उकडीचे मोदक, इन्स्टन्ट इडली, तांदळाची उकड, उकडलेल्या बटाट्याचे पदार्थ काय काय करता येईल त्यांना पण नुसता भात खिचडी पुढे काही डोकं चाकत नाही येड्यांचं !
अंकिता चुकली या नॉमिनेशन
अंकिता चुकली या नॉमिनेशन मध्ये. बावळट टीम च्या लक्षात येत नाहीये की जान्हवी त्यांच्या खांद्यावर पाय ठेऊन वर चढत आहे.
ही मंडळी घरात काही स्वयंपाक करत असतील असे वाटत नाही. कामाला घरात मदतनीस असतील. तसेही काल जान्हवी आणि आर्या यावरून भांडल्या की आर्या ला काही येत नाही तेव्हा जान्हवी बोलली की ती काय लोकांचे डबे थोडी करते.
विजेता सोडा निर्मात्यांना टॉप 5 सिलेक्ट करताना कठीण होणार आहे. सगळी मजा आहे यावेळी. अंकिता आणि जान्हवीला किती हिंट देणे सुरू आहे.
जान्झवीचा जर्नी व्हिडिओ फुल
जान्झवीचा जर्नी व्हिडिओ फुल ऑन मेलोड्रामॅटिक आसणार आहे, बिबॉच्या भाषेत पर्सनॅलिटीच्या सगळ्या शेड्स ,एक्सट्रिम इमोशन्स ,आणि सिच्युएशन्स , बिबी एडिटिंग टिमने घेतलाही असेल बनवायला !
आज टीम ए.मधून अरबाज आणि बी
आज टीम ए.मधून अरबाज आणि बी मधून.पँडी छान खेळले.टीम बीच्या लोकांना अरबाजला अडवून साधा बझर वाजवता येऊ नये.
संग्राम तर अगदी खोदा पहाड निकला चुहा असाच निघाला.
वर्षाला चांगली आणि वाईट कोथिंबीर कळू नये,बाप रे ती चांगली कोथिंबीर कचर्यात फेकलेली बघून माझाच
तीळपापड होत होता.बिबॉस शांत कसा बसला.
वर्षाने जावे.
मग वैभवने ,
निक्कीला काढल तर अरबाजचा गेम खुलेल.ती सरळसरळ त्याला वापरून घेत
आहे.,कळत कस नाही त्याला.
बाकी जान्हवी टास्क मात्र छान खेळते.आर्या आणि अंकिता सुध्दा.निक्की अरबाजच्या जीवावर खेळते.सूरज तर फार दिसलाच नाही.
पँडी मस्त खेळला.हा.पुढे यायला
हवा,बिबॉसने नॉमिनेशन पासून वाचवायला हव,कारण वोट्स एवढी मिळणार नाहीत.
काय फुसका बार निघाला तो
काय फुसका बार निघाला तो वाइल्ड कार्ड मनुष्य. अरबाज साठी त्याला आणले म्हणे!! त्याला काहीही करता येत नव्हते. फुकटच्या गप्पा नुसत्या. दर वेळी अरबाज सिंगल हँडेड गेम जिंकत होता. खरंच बालवाडी वि. बारावीची पोरे असे सामने होतात टास्क मधे. पॅडी मस्त खेळला तरी पण . अभिजीत, आर्या, अंकिताने प्रयत्न केला पण सगळे एकजात लिंबू टिंबू आहेत.
अरबाझ काय भारी खेळला, वन मॅन
अरबाझ काय भारी खेळला, वन मॅन शो.. संग्रामला तर आरामात बाजुला फेकत होता !
कशाला निकी सोबत राहून निगेटिव दिसतो, एकटा खेळला असता तर विनर मटेरिअल होता तो पण आता पब्लिकचा हेट्रेड काही कमी होत नाही काही केल्या !
पॅडी आर्याही छान खेळले पण बझर पर्यन्त २ ढांगात पोचतो अरबाझ , इतर कोणाचा चान्सच नाहीये !
अरबाझ काय भारी खेळला, वन मॅन
अरबाझ काय भारी खेळला, वन मॅन शो.. >>> अगदी अगदी.
नंतर तो आनंदही मस्त व्यक्त करत होता उत्स्फुर्तपणे. निक्की स्वतः कॅप्टन होणार नाहीये पण अरबाझच्या मदतीने तिला नको त्यांना कॅप्टनपदापासून दुर ठेवतेय.
पॅडीदादा हवेत फायनल पाचात.
जान्हवीला आज अरबाझ निक्कीचा
जान्हवीला आज अरबाझ निक्कीचा बदला घ्यायची संधी मिळाली. अरबाझ कॅप्टनपदाच्या शर्यतीतून बाद झाला. जान्हवी टास्क चांगला खेळते, मी बघितलं नाही नीट आज पण एकंदरीत खेळते. ती positive असती तर बिग बॉस जिंकली असती.
आर्याने मारलं बहुतेक निक्कीला, मला काहीच समजलं नाही नीट, माझं विशेष लक्ष नव्हतं टीव्हीकडे.
आर्याने निक्कीच्या कानाखाली
आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली,आता बिबॉस घराबाहेर काढतात की संपूर्ण सिझन नॉमिनेट करतात ते पाहायच.तशीही ती नॉमिनेट आहेच.
तशीही आर्या पुढे बाहेर जाणार आहेच.बघू काय शिक्षा देतात.
सोमिशर न्यूज आहे की डीपी कँप्टन झाला आहे.
निक्की तर सरळसरळ कॉन्ट्रॅक्ट वर आली आहे हे आज तिच्याच बोलण्याच्या ओघात कळल ,"मी एवढ्या लवकर तर जाणार नाही आहे"म्हणजे एकतर ती स्वत:
मनीबँग घेऊन जाईल किंवा दुसर्या कुठल्यातरी कारणाने जाईल.
आज निक्की आणि आर्यावर फोकस असताना बिबॉसने जक गोष्ट मात्र केली जान्हवीला पहिला चान्स देऊन ,अरबाजला बाद करायला लावून चक्क
मराठी लोकांच्या मनात नेऊन ठेवल,सोमिवर जाम कौतुक होत आहे.
मला आता वाटत आहे की सूरज यर.जवळजवळ बाद आहे विनर रेस मधून.पाच कोण असतील माहित नाही,पण जान्हवी आणि अभिजितला तीनात ठेवणार ,कदाचित लाईट्स ऑफ हेच दोघ करतील.
अभिजितला विनरही करतील.
तो सीन दाखवला का. मला बघता
तो सीन दाखवला का. मला बघता आला नाही.
अभिजीत, जान्हवी, अंकिता पहिले
अभिजीत, जान्हवी, अंकिता पहिले 3 असतील. सुरजचं मिडविक एविक्शन करू शकतात किंवा 5 वा. आत्तातरी तो टॉप5 मध्ये वाटत नाहीये.
आर्याला काढायचे का ठेवायचे हे
आर्याला काढायचे का ठेवायचे हे बिबॉच्या हतात आहे पण मेजॉरीटी पब्लिकच्या नजरेत ती हिरो झाली आहे , जरी गेली तरी बाहेर जोरदार स्वागत होणार तिचं
नाही काढणार, वेगळी शिक्षा
नाही काढणार, वेगळी शिक्षा देतील. जान्हवीपेक्षा तीच जास्त नडु शकते निक्कीला.
सुरज अगदीच डल वाटायला लागलाय.
एपिसोड पाहिला नाही अजुन पण
एपिसोड पाहिला नाही अजुन पण आर्याच्या मारण्याने तिला बाहेर काढून आणि वैभव बैल वाचला असं होऊ नये !
काढायची शक्यता वाटते कारण टास्क मधे धक्का लागणे वेगळे आणि इन्टेन्शनली थोबाडीत देणे वेगळे, रितेशभाऊला त्याची पॉवर दाखवायला म्हणून काढुच शकतात !
तसं असेल तर डबल एविक्शन करूदे
तसं असेल तर डबल एविक्शन करूदे, वैभवला काढायला हवं.
मी तो परवाचा कोथिंबीर सीन बघितला नव्हता. काल बघितला, वर्षाताईने खरंच चांगलीच्या चांगली कोथिंबीर कचऱ्यात टाकली, हिरवीगार होती. निक्कीचं बरोबर होतं, सर्व तिच्या बाजूने बोलले, अभिजित मुळमुळीत वाटला, संग्राम बरोबर बोलला त्याला.
अरे काय , कशाला सेन्सॉर केल ?
अरे काय , कशाला सेन्सॉर केल ? दाखवायची कि थप्पड कि गूंज
जान्हवीने पण मजा आणली अरबाझला कॅप्टन्सी मधून आउट करून , स्कोअर सेट्ल केला !
तिची इमेज पूर्णच व्हाइटवॉश झाली आहे !
आर्याला बाहेर प्रचंड सपोर्ट
आर्याला बाहेर प्रचंड सपोर्ट आहेपण तसा परागलाही होता,तरीपण त्याला काढलच होत.कदाचित मुलीवर हात उचलला म्हणून असेल.इथे मुलींचच मँटर आहे.
पण तरीही मुळ नियमाचाचच उल्लंघन झाल आहे,त्यामुळे कदाचित श्रुंगारपुरे
सारख वीक एंडलाएक आठवडा बाहेर
काढून सिक्रेट रुम मध्ये ठेवून परत आणू
शकतात,आणि मग फॉर्मली काढू
शकतात,फक्त हे सुध्सदा निक्कीला कळता कामा नये आर्या मला लंबी रेस का घोडा
वगैरे वाटली नव्हती.ती सुरुवातीला
प्रॉमिसिंग वाटली होती,पण नंतर तिचा गेम
तिनेच खराब केला.
तिला बाहेरच काढल किंवा सिक्रेट
रुममध्ये नेल तर मग वर्षा किंवा वैभवला नाही काढणार.
आता पंगा घ्यायला जान्हवीला बिबॉस
तयार करत आहेत,आर्याची आता
तशीही बिबॉसला गरज नसावी
गरज नाही.
काल निक्की मात्र हललेली वाटली,आता खरच तिच काम ,तिचा रोल संपत आला आहे अस वाटत आहे.
अरबाझ हुशार आहे. निक्कीच्या
अरबाझ हुशार आहे. निक्कीच्या इतक्या कह्ह्यात का आहे? हे दोघे बघावं तेव्हा चिकटून असतात. पंढरीनाथ डोळे/ कान चावण्याचा एक जोक सांगत असलेली एक क्लिप काल फेसबुकवर पाहिली. त्यातही हे दोघे हातात हात गुंफून बसलेत. जोक पूर्ण झाल्यावर सगळे हसताहेत. पंढरीनाथ सगळ्यात जास्त हसताहेत. त्यांनी खरंच छान सांगितला जोक. दोन माणसांचे संवाद लगोलग आवाज आणि अॅक्सेंट बदलून म्हणणं कठीण असावं. तर निक्कीला अजिबात हसू आलं नाही.
पिशव्या टास्कमध्ये संग्रामला हरवल्याचा आनंद अरबाझने साजरा केला. आता संग्राम त्याच्या वाटेला जात नाही. काल धनंजय म्हणाला तसं. आणि तो भागही आधी दाखवला होता.
कालच्या भागाच्या सुरुवातीला निक्की म्हणाली की नॉमिनेशनमध्ये आर्याला समोर वीक काँटेस्टंट हवा, तशी मला गरज नाही. मी अभिजीत इतकीच स्ट्राँग आहे. (म्हणजे एकतर अॅश्युरन्स आहे किंवा पैसे देऊन व्होटिंगला लोक बसवलेत.) तेच अरबाझची वाचण्याची गॅरंटी नाही. तू मला शेवटपर्यंत हवा म्हणून मी तुला नॉमिनेशनमध्ये वाचवलं
कॅप्टनसी टास्कमध्ये कोणाला काढायचं याबद्दल ती अरबाझला लिटरली हुकूम सोडत होती आणि तो ऐकत होता. जान्हवीने विचारल्यावर निक्कीच्या सांगण्यावरून तुला काढलं हे तो बोलला नाही, पण वैभवने सांगितलं. जान्हवी आणि वैभव दोघांनीही छान केलं.
निक्कीचा आवाज, टोन आणि शब्द सगळेच फार इरिटेटिंग आहेत. माझ्या फॅन्सना भिता का असं काल परत परत विचारत होती. शेवटी ती बोलायला लागली की टीव्ही म्यूट केला.
पिशव्या टास्कमध्ये संग्राम, धनंजय, सूरज फार दिसले नाहीत. पॅडीने मजा आणली. अरबाझ, वैभव दोघे त्याच्याकडच्या पिशव्या काढायला आल्यावर माझ्यासाठी दोघे म्हणून छान टोमणा मारला. जान्हवीही मस्त खेळली. इव्हन वर्षाने १०० टक्के दिलं.
कॅप्टनसीचे उमेदवार निक्कीच्या टीममधले आल्यावर कोण कॅप्टन होणार हे बिग बॉसने स्वतःच्या हातात ठेवलं. कुठला दिवा पेटेल हे काय रँडमली ठरवलं नसेल.
सिक्रेटरुम वगैरे आता अर्थ
सिक्रेटरुम वगैरे आता अर्थ उरला नाही, तसेही चक्रव्ह्यु मधे चुगल्या दाखवतातच , ठेवतील किंवा काढतील !
हिन्दी बीबी मधे प्रत्येक सिझनमधे सर्रस चालते हिंसा, किरकोळ शिक्षा होते किंवा होतही नाही.
२ महिन्यापूर्वी ओटीटी सिझनमधे २ बायका घेऊन आल्व्ल्या अरमान मलिकने खुल ए आम थोबडले एकाला, बिबॉने सन्मानाने ‘स्पेशल केस‘ डिक्लेअर करत बेनिफिट ऑफ डाउट दिला. कारण काय तर त्याच्या बायकोवर कॉमेन्ट्स झाल्या मग नवर्याचा हात उचलला जाणारच
परागला बाहेर काढले होते तसे
परागला बाहेर काढले होते तसे आर्याला काढले पाहिजे. 9 विरुद्ध 3 खेळताना निक्की पूर्ण हललेली दिसली. बॉक्सला पाडणे, त्यावर झोपणे इत्यादी करून तिला टास्क रद्द करता आला असता.
जियो सिनेमा कृपेने तो
जियो सिनेमा कृपेने तो कॅप्टनसीवाला टास्क बघितला.
संग्राम इतकी "खोदा पहाड निकला चुहा" टाईप केस बघितली नाही. निव्वळ घाबरट आणि बावळट. त्याला कोणीतरी म्हटलं तू अरबाज ला अडव तर म्हणे "मी इंज्युअर्ड झालो तर काय" फुसका बार!!
आणि म्हणे हा बॉडी बिल्डिंग आणि तत्सम कॅटेगरी.. पावडर बॉडी वाटला पूर्णच !!
संग्राम असाच राहिला तर
संग्राम असाच राहिला तर निक्कीचं म्हणणं खरं ठरेल, तो तिच्याआधी बाहेर जाईल.
बिग बॉस एकमेकांचा बदला घ्यायचा चान्स चांगला देतात, निक्कीला जान्हवीने नॉमीनेट केलं म्हणून अरबाझ थ्रू काढलं निक्कीने कॅप्टनसी टास्कमधून, मग जान्हवीला अरबाझचा बदला घ्यायचा चान्स दिला. जान्हवी अशीच पुढे गेली तर ट्रॉफी तिला मिळू शकते.
मी अन्जुचीच आठवण काढली
मी अन्जुचीच आठवण काढली जान्हवीचे प्रोमोज बघून

जान्हवी रिअल आहे कि फेक , मेजॉरीटी ऑडियन्सला फरक पडणार नाहीये जोवर ती निकीला तिच्या लेव्हलला जाऊन इमेजची पर्वा न करता अॅग्रेसिव्हली भिडतेय, तिचा ग्राफ वर जातोय आणि विनरही होऊ शकते इतका हेट निकी बद्दल आहे ऑडियन्स मधे !
तशीही मेघा नंतर फिमेल विनर नाही झालेली अजुन
मला पॅडीदादा आज जास्त आवडले,
मला पॅडीदादा आज जास्त आवडले, त्यांच्यात विनर क्वालिटी आहे. आज ते एकटेच इमोशनल जास्त झाले, की बाकीचे बरेच जण उकडलेले अन्न खात असताना, आपल्या घशाखाली बाकी कसं उतरले, touching होतं ते. मला ते जास्त रियल वाटतात.
बिग बॉस बोलत असताना, आर्या मस्तपैकी हसत होती, तिच्या ते लक्षात आलं नाही की आपण निक्कीचा नाही तर बिग बॉसचा अपमान करतोय.
मी आधी म्हटल्याप्रमाणे कलर्स मराठी जान्हवीची प्रतिमा, तिला टिप्स देऊन सुधारत नेणार, सेम होतंय, आत्ता तरी विनर जान्हवी वाटतेय.
जान्हवी आणि अभिजित(काहीही न
जान्हवी आणि अभिजित(अभिजित काहीही न करताच) लाईट्स ऑफ करतील बहुतेक.पण एक कळत नाही
हिंदीमध्ये जेवढा पैसा मिळतो तेवढा मराठीत अजिबात मिळत नाही. मग या निक्कीला असा काय फारसा पैसा मिळणार आहे? ज्यासाठी एवढ हेट्रेड घेत आहे मराठी लोकांच.
अगदी एखाददुसरी सिरियल मिळाली तरी हिची तर मराठी भाषेची पण बोंबच आहे,तिथे तरी ही टिकेल का?
मग कशाला उगाच आली आहे.
तेच अरबाजच.
यांना देऊन देऊन मराठी बिबॉस कितीसा पैसा देणार आहे आणि फेम यांना अस हव आहे का?
Pages