बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जान्हवीला अजूनही निगेटिवच कमेन्ट्स दिसतात सोमि वर. खोटी वाटते आहे आणि कॉपी कॅट.
घरातलेच वेडे आहेत सर्वात. तिला उगीच चढवत आहेत.
अरबाज ला निकी फुल कन्ट्रोल करतेय. तिला कोणीतरी मसल मॅन हवा होता बस्स. कन्टेन्ट करायला आणि टास्क मधे राडा करायला. अरबाज स्ट्राँग प्लेयर आहे पण खरच डोअरमॅट झाला आहे.
यावेळी इतक्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटी़ आहेत घरात, वाइल्ड कार्ड ची गरज नाहीये.

मला वाटते आणावे वाइल्ड कार्ड ला. ती निक्की हवे तसे वागते आणि बाकिचे फक्त त्यावर वाद, चर्चा, गोंधळ करत बसतात. वैताग आला.

निक्कीसाठी राखीलाच आणावे लागेल.

टास्क अंकिता, जान्हवी, आर्या आणि पुढारी चांगलं खेळले. अंकिताला कसं लागलं, ती कशी पडली समजत नाहीये. निक्कीने नडून सुरुवात छान केली, हाहाहा. सगळे तसंच वागायला लागले. बिग बॉसला हेच हवं असतं.

टास्कमध्ये डोकं पुर्वी स्मिता, मेघा, सई, वीणा, मिनल काय लढवायच्या ते आठवलं.

जान्हवी मलाही अजिबात positive वाटत नाही. मागे पुढारी साठी अंकिताला बोलले तसं यावेळी जान्हवीला बोलतील का. टास्कमध्ये काहीही होतं ना.

फोकस जास्त निक्कीवरच होता मात्र. शेवटी अंकिता , आर्या, जान्हवी तिचीच चर्चा करत होत्या. चर्चेत तीच.

बिग बॉस सरळ सरळ निकी ला फेवर करतायत ते दिसतंय . दुधाच्या टास्क मध्ये धक्काबुक्की निकी ने सुरु केली पण तिला काहीच बोललं गेलं नाही . उलट सगळ्यांना दोष दिला गेला .
जान्हवीचा स्टॅन्ड आवडला मला आणि तो परफेक्ट होता . पण बिगबॉस नि जान्हवीला निकी साठी चहा करायची विनंती केली तर तिला सरळ सरळ नकार देणं शक्य नव्हतं पण त्यात तिने छान ट्विस्ट देऊन थोडी अक्कल किसून घालू का विचारलं ते जाम आवडलं मला .

बाकी निकी भुंकत असताना बाकीचे तिला उत्तर का देत बसतात ते कळत नाही मला . वर्षा उसगावकर तर अगदी गांधीजी मोड मध्ये जातात . ते चूक आहे . सगळ्या घराने एक होऊन निकीला आणि गरज पडली तर अरबाज वर बहिष्कार टाकला पाहिजे .

एक वेळ घन:श्याम जिंकलेला चालेल मला पण निकी जिंकलेली चालणार नाही . अरबाज तर पार नांग्या टाकतो तिच्यासमोर . तुला ती डोअरमॅट समजते आणि तुझ्या पाठीवर वेलकम निकी असं लिहिलं आहे अशी सरळ सरळ वॉर्निंग देऊन पण अरबाज तिच्या इतका आहारी गेलाय . हि कसली इमोशनल vulnerability

निकी जिंकणारच नाहीये , तिला फक्तं तिच्या मर्जीने एन्ड पर्यन्त लोकांना नाचवायचय आणि स्क्रीनवर दिसायचय.
बिबॉही सपोर्ट करतायेत तिला, कॅप्टन रुम मधे जाऊन बसली तेंव्हा बिबॉने का नाही आक्षेप घेतला ?
टिम बी मधे आज फक्तं डीपी बोलला ओरडून निकीला , पॅडीही बरोबर होता पण बाकी सगळे येडे महान बनायला निघालेच होते निकीला जेवायला द्या म्हणून !
जन्हवी आणि निकी एकाच लेव्हलला जाऊन भांडतात म्हणून जान्हवीचा स्टँड बरोबर वाटतोय पण हे ती इतर सदस्यां बाबत पुन्हा करुच शकते , पुढारीला चिरडून टाकेन, फाडून टाकेन म्हणालीच, त्याच्या उरावर जाऊन बसलीच होती !अरबाझ तर लिटरली डोअरमॅट आहे ते प्रुव्ह करतोय, काढा त्याला विकेन्डला, तसेही त्याला बॉटम व्होट्स मिळतायेत, मग बघु कुठला अल्फामेल पकडते निकी , कदाचित अल्फामेल ऐवजी अभिजीतला पकडेल !
सर्वात पुचाट अभिजीत आहे, कोणीही जिंकु देत शो पण अभिजीतला पहिल्या पाचातही आणु नका !
Btw , वैभव आज जान्हवीच्या मांडीवर का झोपला होता Uhoh ?

कालचा भाग नाही पाहिला.काय झाल.चर्चेवरून एकंदरीत निक्की बाईंनीच गाजवला अस दिसत आहे.पण टास्क कोण जिंकल?
क्लिप्समध्ये पाहिल तर जान्हवी निक्कीला जेवून देणार नव्हती.
सोमिवर निक्कि पहिल्यापासून व्हँम्प आहेच.पण आता या टप्पयावर तिला आणि तिच्यामुळे अरबाजला काढता येणार नाही,कारण अरबाजला काढून त्याच्यासारखा कोणी नाही घेतला तर ही अभिजितकडे जाणार जो प्रचंड इमेज कॉन्शस आहे,सो काहीच गोंधळ घालता येणार नाही कारण तेव्हा अरबाज नसेल.
म्हणजे निक्कीसाठी अरबाजला ठेवणार.
पुढार्याला काढल तर आता जान्हवीला कचाकचा भांडता येईल अस कोणीच उरणार नाही.पण त्यालाच काढतील कारण आर्याला वोट्स आहेत.
म्हणूनच निक्कीला सुरुवातीपासून न आणता जर मध्येच आणल असत तर हा निक्की शो नंतर सुरू झाला असता,टीआरपी एवढा नसता मिळाला.पण तसही लास्ट सिझनला तो नव्हताच.
मराठीत हाच प्रॉब्लेम आहे की इथे यायला लोक फारसे उतावीळ नसतात,जस हिंदीत असत,हिंदीपेक्षा कंट्रोव्हर्शियल लोक मराठीत कमी असतात,जी आहेत ती यायला तयारच असतात असही नाही.उ.दा.मानसी नाईक,केतकी चितळे यांनी अनेकदा विचारून नकार दिला आहे,केतकीने एपिलेप्सीच कारण सांगितल होत.
सिझन दोन मध्ये किशोरी ला सो कॉल्ड काय सहन कराव लागल त्यामुळे यायला कोणी तयखर नसत म्हणे.कधीकधी येण्याच कमिट करून आयत्या वेळी माघार पण घेतात अस ऐकल आहे.
म्हणूनच या मेकर्सना मग निक्की ,अरबाज अशा असे शो कोळून प्यायलेल्यांना आणाव लागत असेल,अस वाटत,बर बाकीच्या हिंदी लोकांना विचारायच तर लँग्वेज प्रॉब्लेम्स आहेच.
आताच एवढ भयानक मराठी ऐकतच आहोत आपण.
अशा फ्रंटवर हे शो चालवत आहेत,
त्यामुळे त्यातल्या त्यात टीआरपी मिळणार्या कलर्सच्या या शोसाठी जे सदस्य भरपूर कंटेंट देतील त्यांना बिबॉस फेवर करणारच.
त्यामुळे निक्की आणि अरबाजला शेवटपर्यंत झेलण्याशिवाय पर्याय नाही,आणि त्यांच्याबरोबर जान्हवीरा सुध्दा कारण आता ती त्यांच्या विरोधात आहे.

निक्की नाही जिंकणार. हे तिलाही महितेय. ती तिचा गेम खेळतेय. जान्हवीला positive करण्यासाठी तिला जास्तीत जास्त वाईट वागायला लावतायेत. हे माझ्या कधीच लक्षात आलंय, सो चिल. ती पैसे घेऊन बाहेर पडणार. निक्कीचे कौतुक झाल्यावर ती लगेचच्या आठवड्यात इतकी व्हिलन का वागतेय हे समजून घ्या. जान्हवी उद्दात्त वाटायला हवी आहे. कलर्स फेस बाराच्या भावात जाऊन कसं चालेल. कोणीही पहिले येऊदे, जान्हवी दुसरी येणार हे नक्की झालं.

गंमत अशी होतेय की जान्हवीचा मूळ स्वभावच उफाळून येतो, ती काही positive वाटत नाही. ती टास्क चांगली खेळुदे पण व्हिलनच वाटते.

जान्हवी फेक आहे. तिचे बिबॉ बद्दल फंडे चुकीचे आहेत. तिला वाटते इथे फक्त भांडण करायचं असतं त्यामुळे ती कुणाशीही कृत्रिम भांडायचा प्रयत्न करते. विशेष्तः जर निकी एकिकडे भांडत असेल तर ती हमखास दुसरीकडे इतर कुणाशी वाद सुरु करते. काही कारण असो वा नसो. तिचे भांडण पण खोटे वाटते. काल निकी म्हणत पण होती की जान्हवी आपल्या ग्रुप मधे होती तेव्हा सारखे म्हणायची की समोर च्या ग्रुप मधून कोणी भांडतच नाहीये आता काय करायचं आपण एकमेकीशी भांडू या का? Lol
वैभव सगऴ्यात युसलेस वाटतो आहे सध्या. त्याला आणि मग अरबाज ला काढा खरंच , काही फायदा नाही त्यांचा.

बी टीम डोक्यावर पडली आहे, कॅप्टनसी टास्क मध्ये बी चे तीन ए ची जान्हवी. त्या जान्हवीचे किती कौतुक बी टीमला सेकंड प्रेफरन्स जान्हवी यांची, सुरुवात द ग्रेट अभिजितने केली, सर्वात शेवटी सूरज. ह्यांचा क्रम असा अंकिता, जान्हवी, वर्षाताई, सूरज. अरे सूरजला करा की कॅप्टन. नाहीतर जान्हवी समोर सरेंडर व्हा, देऊन टाका तिला.

बी टीमला अति कौतुक आहे त्या जान्हवीचं, निक्कीला बोलते म्हणून. सूरज व्हायला हवा कॅप्टन.

बी टीम जान्हवीच कौतुक करते हा मूर्खपणाच आहे,पण नीट विचार केला तर सूरज खरच योग्य कँप्टन आहे का?आता सहा आठवडे होत आले ,तरीही अजूनही त्याला निर्णय घेता येत नाहीत. फक्त पँडीसमोर कशाला,सगळ्यांसमोर ठामपणे सांग ना,मलाच बहुमत द्या,मला कँप्टन व्हायचे आहे.याचे काही प्रयत्नच दिसत नाहीत.
मला अंकिताला कँप्टन परत बघायला आवडेल.
आज वर्षा पहिल्या फेरीत गंडली,पण शेवटी मस्त टोलवल.निक्कीला.
शांतपणे निक्कीला टक्कर देणारी तीच आहे,जान्हवी अजिबात नाही.
जान्हवी मात्र कँप्टन होता कामा नये,निक्कीला कदाचित आरडेओरडे करून फुटेज घेईल,पण डोक्यावर चढेल.
पण बी टीम तिलाच फेवर असेल अस दिसत आहे.

सुरज झाला तर पूर्ण बी टीम कॅप्टन होईल, तो सर्वांची मतं जाणून घेईल आणि झाल्याशिवाय कसं कळणार त्याला झेपतेय की नाही.

जान्हवीला फेक वरून positive करायचा कलर्स मराठीचा डाव हळूहळू सक्सेस होतोय मात्र.

सूरजला कोणीही येऊन मॅनिप्युलेट करतं, आठवा अरबाझने त्याला मत बदलायला लावलं आणि तो लगेच कन्व्हिन्स झाला , त्याला निर्णय घेता येत नाहीत , बोलता येत नाही कि काही समजत नाही !
जोवर सुरज पुढारी सारखा क्लिअर आणि लाउड बोलून स्टँड घेणार नाही तोवर त्याला हे सहन करावच लागेल, जोवर तो गुळमुळीत बोलून ‘चालतय कि‘ अ‍ॅटिट्युड ठेवेल तोवर का कोणी बनु देईल त्याला कॅप्टन ?
सुरजला पब्लिक सपोर्ट , बिबॉ सपोर्ट आणि रितेशचा सपोर्ट आहेच पण या आठवड्यात पोएटिक जस्टिस तेंव्हाच मिळेल जेंव्हा जान्हवी कॅप्टन बनेल आणि निकीला जेलमधे टाकेल Happy
२ आठवड्यापूर्वी निकी कॅप्टन असताना तिने तिच्या हाताने जान्हवीला जेलमधे टाकले आता रोल रिव्हर्स होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे बिबॉला मसाला.. होऊ द्या खर्चं !
अन्जु,
जान्हवीने तुझ्या मनात कब्जा केलाय Biggrin

Lol

निक्कीला जेलमध्ये टाकायलाच हवंय यावेळी पण बी टीम स्वतः हिरो का नाही होत, प्रत्येकवेळी त्यांना ए टीमचे कोणीतरी लागतं एक वर्षाताई अपवाद. यावेळी जान्हवीला तुम आगे बढो हम कपडा संभालता है, मागच्यावेळी अरबाजच्या पाठीमागे सगळे, स्वतःला कणा आहे की नाही, नडा की निक्कीला आणि व्हा हिरो.

अन्जु,
तुझ्या मनासरखं झालं, बिबॉ नवीन प्रोमो प्रमाणे सूरज झाला आहे कॅप्टन, खरच झालाय का मिसगाइडींग प्रोमो माहित नाही पण झाला असेल तर बघु आता कोण मिती दबाव आणतं कि तो स्वतःचं डोकं चालवतो !

ते मिसलीड असेल, सुरज होईल असं वाटत नाहीये. सुरजचं नाव घेतलं की trp जास्त मिळेल म्हणून असेल.

एनिवे अंकिता झाली तरी आवडेल मला.

मिसलिडींग वाटत तरी नाहीये प्रोमो दिसायला, प्रॉपर अनाउन्समेन्ट, नमस्कार करून कॅप्टन रुम मधे जाताना दाखवलाय खरा !

हो का, मग भारीच, मला प्रोमो नाही दिसला, कॅमेऱ्याकडे बघून नमस्कार करतानाचा फोटो दिसला, सुरज कॅप्टन झाला असं कोणीतरी youtube वर कॅप्शन दिलं. त्याने आता स्वतःला सिद्ध करायला हवं.

काल आरडाओरडा फार हातवारे नव्हते. त्यामुळे बरा वाटला भाग. निक्कीला वैभव आणि जान्हवीची गरज वाटते आहे. पण ती त्यांच्याशी बोलायला अरबाझला पाठवते. स्वतः म्हणायला मोकळी, की मी काही बोलले नाही, इ.इ.

वर्षाताईंचा सेन्स ऑफ ह्युमर छान आहे.

हा आठवडा खूप कठीण असेल, असं बिग बॉस म्हणाले, तसं काही झालं नाही.

चांगला होता संगीत खुर्ची टास्क, मला पॅडीचा गेम आवडतोय, छान बोलत होता घनश्याम आणि सूरजशी !
अभिजीत अगदीच गट्स /हिंमत नसलेला माणुस आहे, कशाला निकीला खुष ठेवतो !
अन्किता पण स्मार्ट गेम खेळतेय पण कनिंग आहे, पब्लिकला किती आवडेल तिचा गेम माहित नाही, सूरज आणि डीपी फॅन्सना राग येतोय तिचा Happy

पँडीचागेम हळूहळू आवडायला लागला आहे,प्लँनिंग करतात,पण सगळ्यांशी जुळवून घेत,आरडाओरडा नाही,अपशब्द नाहीत, गरज पडली तर सॉरी म्हणतील,स्पोर्टिंगली घेतात,मनोरंजन करत आहेत,ज्याचा जेव्हा आदर करायचा तेव्हा करतात.अगदी मेघासारख नाही,पण घराला बरोबर घेऊनच खेळत आहेत.केवळ वोट्स कमी आहेत आणि सिनियर आहे म्हणून नाहीतर पहिल्या पाचात आलेले आवडेल मला बघायला.
अभिजित मात्र आता मनापासून नावडता होत आहे,डीपी पण नाही एवढा आवडत,आर्या विनिंग मटेरिअल नाही,वर्षा फारफारतर दोन आठवडे,पुढारी तर जाईलच या आठवड्यात.वैभवला पण
काढतील.
राहिले निक्की ,अरबाज,जे विनर नाहीत, अभिजित(आयडॉलची क्रुपा)अंकिता,पँडी,मला हे दोघही चालतील,सूरज,नको(सॉरी अंजू)☺️ जान्हवी नकोच नको,पण पाचात असणार.
आता वाईल्ड कार्ड आले तरी पाचात नाही नेणार बहुतेक.
कालचा टाक तसा छान झाला.निक्कीचा प्लॅन उधळला गेला,पण पठ्ठीच एक मात्र आहे,लगेच कबूल केल.अरबाजला अगदी जोरू का गुलामच केल आहे,निक्की बोले अरबाज ऐके ,अस झाल आहे.
कँप्टन सूरज झाला असेल तर मग पुढचा आठवडा ही बिबॉसने दिलेली संधी समजून त्याच सोन कराव.जर स्वत:च अस्तित्व सिध्द करण्यास अयशस्वी ठरला तर मात्र वोटिंग आणि सोमि प्रेशर चा विचार न करता मागच्या वेळेसारख टीमने निर्णय घेऊन विनिंग रेसमधून बाहेर कराव.
माझ्यामते जान्हवी सुध्दा मोठेपणा घेऊन सूरजला वोट करेल,ही पण संधी देईल बिबॉस तिला आणखी पॉझिटिव्ह दाखवण्याची.
बघू कसा होतो कँप्टन्सी टास्क.
तो अँक्ट राइडरवाला मंदार अभिजितचा पीए आहे का,की अभिजितने सेटिंग केल आहे,किती ते कौतुक अभिजितच.
त्याच म्हणण आहे,उद्या गणपती येत असल्याने धक्का आजच होऊन एलिमिनेशन पण आजच होईल.

निकी ,अभिजीत ,सूरज आणि अन्किता हे चौघे असतीलच फिनालेला असं आत्ता वाटतय.. पाचवा कोण प्रश्नं आहे.. पॅडी/जान्हवी/अरबाझ कि वाइल्ड कार्ड हे बघायचं !

कसला कठीण आठवडा आणि कसले काय. बिबॉ टीमचे प्लँनिंग फसत चालले आहे, या आठवड्यात काहीही कठीण झाले नाही. नळावरचा टास्क फेल गेला. कॅप्टनशिप टास्क सुमार झाला. काही गोंधळ नाही, काही मसाला नाही. सगळे लोक आपल्या आपल्या शेलमध्ये गेले. निकी, अरबाज, अभिजित अगदीच बकवास खेळले तर जान्हवी फेक. वर्षा आजीला एक दोन डायलॉग मिळाले. अंकिता मागे पडली. धनंजय, पंढरीनाथ व सुरजने काही भरीव केले नाही. घनश्याम बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. डबल एलिमिनेशन झाले तर घनश्याम आणि धनंजय बाहेर येतील. एकल एलिमिनेशन झाले तर घनश्याम.

या लोकांना एक कळत नाहीये कि एकदा कॅप्टन झाले तर पुन्हा व्हायचे नाही असा नियम नाही. फाईट करा, प्लँनिंग करा, मस्त डोके चालवा, लोकांना भुरळ घाला. तर हे काहीच करत नाहीत, सरळ माघार घेतात. निक्कीने पहिले माघार घेतली. मग अरबाज, अंकिता, वर्षा यांनी तिच्या पावलावर पाऊल टाकत कॅप्टनशिप टास्क मधून बाहेर पडले.

पँडीचागेम हळूहळू आवडायला लागला आहे >>> मला त्याचं नॉमिनेशन खूप आवडलं, एकट्याने हिंमत दाखवली की अरबाझने कसं मुर्ख बनवलं आणि त्याला नॉमिनेट केलं. तेव्हा त्यांनी माझं मन अति जिंकून घेतलं. खरं तर सर्व बी टीमने हे जाहीररित्या कबूल करून, त्याला नॉमीनेट करायला हवं होतं. सुरजने तिथे मूर्खपणा केला.

सूरज,नको(सॉरी अंजू) >>> सॉरी काय, मला तो विनर म्हणून योग्य वाटत नाहीये. तो कॅप्टन व्हावा असं मात्र वाटत होतं कारण एकतर बी टीमचा कॅप्टन व्हावा, दुसरं अंकिता, वर्षाताई झाल्या आहेत कॅप्टन त्यामुळे सुरजला चान्स मिळवा असं वाटत होतं.

विनर अंकिता होईल मोस्टली पण पॅडीदादा झाले तर आवडेल. सुरजमधे मागे दिसलेली विनर क्वालिटी त्याच्या काही मुर्खपणाच्या निर्णयामुळे वाटत नाही. विनर मात्र बी टीमचा व्हायला हवा.

एरवी मी कुठल्याही youtuber चे बघत नाहीये. काल कोणीतरी अरबाज बाबा आणि पुढारी बहीण मुलाखत घेतली. ती पाच मिनिटं बघितली. पेशन्स नाहीत माझ्याकडे जास्त बघण्याचे. अरबाजच्या बाबांचं मराठी अरबाजपेक्षा खूप चांगलं आहे आणि त्यांनी तो बाहेर कमिटेड असून निक्कीशी असं वागतोय त्यावर टीका केलीय, निक्की आवडत नाहीये त्यांना बहुतेक आणि जान्हवी वैभव आवडतात, हे एवढं बघितलं. पुढारीची बहीण कोण ते बघितलं आणि फार पुढे मुलाखत बघितली नाही तिची.

त्या सूरजला सोमिशर जवळजवळ विनर म्हणून घोषित केले आहे. >>> धन्य आहेत. हिंदीतला एम सी स्टान वाटतोय तो सर्वांना बहुतेक.

मला पण पॅडी चा गेम आवडतो. त्याला गेम कळलाय असे वाटाते. बाकी लोक सारखे कुठे ना कुठे माती खातात.

नवीन प्रोमोनुसार निक्कीने मदत केली बहुतेक सुरजला, अंकिताही म्हणतेय की तिने खूप केलं. अंकिताला बहुतेक बुक्कीत टेंगुळ दिलं त्याने. सुरज निक्कीला विनंती करतोय, मला त्रास नको देऊस, अंकीता म्हणतेय मी देणार, हाहाहा.

Pages