Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजच्या एपिसोडचा प्रोमो बघितला
आजच्या एपिसोडचा प्रोमो बघितला!! अरे किती ती ओव्हरॲक्टिंग कराल
टास्क साठी जोडीमधे बांधल्याचा
टास्क साठी जोडीमधे बांधल्याचा प्रोमो दिसतोय नवा, अर्थात अभिजीत निकीला एकत्र बांधलय आणि अरबाझ - आर्याला !
काय जबरदस्तं खुष दिसतोय अभिजीत, गातोय काय , खिदळतोय काय .. चेकळलाय नुसता
अनदर पुष्की इन मेकिंग, बिबॉचा प्लॅन दिसतोच आहे यांना टॉप २ मधे ठेवायचा पण जनता नाही ठेऊ देणार , हेट्रेड् घेऊन बाहेर पडणार अभिजीत !
अरे अपेक्षितच कन्टेन्ट देतोय
अरे अपेक्षितच कन्टेन्ट देतोय तो!
एन्टरटेनिंग होणार हा टास्क.
पुष्की - सईची वेगळीच केमिस्ट्री झाली होती. तसले काही अभिजीत निकी मधे नाही दिसत. निकी तर फेक आहे, तिचे कोणाशी काही अॅक्चुअल बाँड नाहीच होणार आणि अभिजीत च्या साइड ने मोस्टली तो तिला घाबरत असल्यामुळे "सुसरबाई तुझी पाठ मऊ" कॅटेगरी मांडवली कम मैत्री आहे.
तिकडे आर्या पण सॉलिड खूष दिसते आहे.
Arya got she always wanted,
Arya got she always wanted, 2 body builders without Nikki in her team
तो अरबाझ नील नितिन मुकेश सारखा दिसतो जरा !
अनदर पुष्की इन मेकिंग, >>
अनदर पुष्की इन मेकिंग, >>>exactly हेच येतंय कालपासून मनात...त्यांनी चालू मस्करीत केलंय पण त्याची कुस्करी नको व्हायला...अरबाज कित्ती जळतोय...अभिजीत वर...निक्की आणि अभिजीत शिवाय दुसरा विषयच नाही...निकि मात्र खरंच खुश आहे...बरोबरच आहे... ती तिच्या ग्रुप मधल्या लोकांबद्दल बद्दल कधीच काही बोलायची नाही...म्हणजे gossips करायची नाही...आणि तिच्याबद्दल मात्र तिच्याच मित्रांनी भरपूर gossips केले आहेत...मजा येणार पण आता...
आज निक्कीबद्दलच चर्चा जास्त.
आज निक्कीबद्दलच चर्चा जास्त. ती एकटी उलट जास्त उठून दिसेल.
ह्या अरबाझला बाहेर gf आहे तर तो अभिजित निक्की सोबत असेल तर का जळतोय. अर्थात अभिजीतने फॅमिली मॅन आहे हे भान ठेवावं. वाहवत जाऊ नये.
पॅडीदादा आर्याला बरोबर सांगत होते.
पँडीदादा आर्याला बरोबर सांगत
पँडीदादा आर्याला बरोबर सांगत होते की मनातून घाबरले आहेत.अभिजित गेला निक्कीसोबत आणि आर्या चालली अरबाजसोबत.उसगावकरांचा,डीपीचा तसाही उपयोग नाही,मग आता काय अंकीतासोबत खेळायच.
जान्हवीची इमेज क्लिअर करून बिबॉस मेकर्स नाहीत पण चँनेल तिला पाचात नेईल.तेच सांगायला आले होते का शिंदे घरात.कारण आज फक्त निक्किचाच नाही तर जेलमध्ये पण बिबॉस चालू होता.
पुढारी,उसगावकर, डीपी यांना काढा,कंटाळा आला त्यांचा.
वाईल्ड कार्ड विसरले बिबॉस की खरच कोणी यायला तयार नाही
एक विनंती आहे बिबॉसला, त्या आरोह वेलणकरला मात्र काहीही झाल तरी आणू नका.
जान्हवी अशी नाही तर तशी पाचात
जान्हवी अशी नाही तर तशी पाचात जाणारच, हे मला ती कलर्सचा चेहेरा आहे म्हणून वाटतंय. योगिता नीट राहिली असती तर तिला प्रेफरन्स दिला असता जान्हवी ऐवजी.
आज बहुतेक सगळ्यांच्या बोलण्याचा विषय हा निक्की होता.
जान्हवी अशी नाही तर तशी पाचात
जान्हवी अशी नाही तर तशी पाचात जाणारच, हे मला ती कलर्सचा चेहेरा आहे म्हणून वाटतंय.
<<<<
No way not even close
Colors face has zero value these days.
जान्हवी मोस्ट हेटेड आहे
जान्हवी मोस्ट हेटेड आहे सध्या तरी. मेकर्स ना डॅमेज कन्ट्रोल करावे लागत आहे तिच्यामुळे.
डिजे, मैत्रेयी तुमच्या तोंडात
डिजे, मैत्रेयी तुमच्या तोंडात साखर पडो. तुम्ही म्हणता तसं झालं तर पर्सनली मला आनंद होईल.
कलर्स fb पेजवर आर्यावर वैतागलेत सर्व, अरबाझ वैभव कडे गेली म्हणून.
आर्या गेम खेळतेय.. लोकांना
आर्या गेम खेळतेय.. लोकांना कळत नाहीय…
बर्याच ऑडियन्सला आर्याचा नवा
बर्याच ऑडियन्सला आर्याचा नवा मुव्ह अजिबातच आवडला नाहीये पण मला अजुनही आर्या आवडतेय !


ती तिचा गेम खेळतेय, तसेही टिम बी तिला फार भाव देत नाही , निकीशी पंगा घ्यायला ही परफेक्ट संधी होती तिला आणि ती काही टिम बी बरोबर भांडून वगैरे कायमची नाही गेलेली तिथे , निकीला त्रास द्यायला तात्पुरती गेली आहे फक्तं
अभिजीत मात्रं इतका पुचाट , लाचार , हस्यास्पद दिसतोय निकीपुढे ,थोडा वेडसरच वाटतोय.. कुंगफुचे आवाज काय करत होता.. जे आहे ते फॅन फॉलॉइंग कमी होतय त्याचं !
याउलट निकीला नवा उत्साह आलाय , प्लेइंग स्मार्ट अॅज ऑलवेज.. आठवडा भर ड्रामा करणार !
मला जान्हवी वि. निकी कॅट फाइट बघायची आहे खुर्ची पॉपकॉर्न घेऊन, कोणालाच सपोर्ट नाही ,नुसती मज्जा
जन्हवीच्या एका वाक्याला टाळ्या आणि हसु आलं "अभिजत या घरातला सर्वात मूर्ख माणुस आहे"
आर्या किती डेस्परेट दिसत होती
आर्या किती डेस्परेट दिसत होती काल!! अरबाझबरोबर जोडीची घोषणा झाल्यापासून जे काही ब्लश करत होती की ज्याचे नाव ते!!
हिला अरबाझ आणि निक्की चिकटले की ऑकवर्ड होत होत म्हणे
आत इतके कॅमेरे क्षण न क्षण टिपत असताना बिग बॉस आर्याला म्हणत होते की फोटोग्राफर पाठवू का? बिग बॉस पण यंदा बऱ्याच मजामजा करतायत
बाकी ते लाईटचे झाकपूक झाकपूक, लोकांचे उगाच खोटे खोटे घाबरणे, मानकाप्या वगैरे अगदीच बालिशपणा!!
आधीच्या लोकांनी काहिही करा खरे नॉमिनेशन शेवटच्या दोन लोकांच्या हातात असणार आणि शेवटी कोण दोघे जाणार ते बिग बॉसच्या हातात..... मॅन्युपलेशन वगैरे म्हणू नका बरे याला
त्या नंदकुमार चौघुलेला परत हुकुमशहा म्हणून आत सोडले पाहिजे मग निक्की, जान्हवी कश्या रिॲक्ट करतील ते बघायला मज्जा येईल
दुर्गा मालिकेतील आलेली रुमानी
दुर्गा मालिकेतील आलेली रुमानी खरे म्हणजे आपल्या संदीप खरेची मुलगी , छान काम करेल अशी अपेक्षा आहे
अभिजित गेलाच कामातून , जान्हवी जेलमध्ये असूनही तोंडाची भाषा सुधरत नाहीये , काल निक्कीला बोलत होती पण चूक स्वतःचीच आहे हे काबुल करत नाहीये , निकी हिंदी बिग बॉस पासून अशीच आहे आणि अनेकदा तिने जान्हवीशी बोलताना सांगितलंय मी एकटीच खेळणार , एका मोमेंटनंतर मला ग्रुप नकोच
अरबाज आज तोडफोड करतोय प्रोमो मध्ये म्हणजे यालाही शिक्षा कि घराबाहेर ? वैभव बैल भाऊ आहे तोही नाही सुधारणार
पॅडी , धनंजय पवार आणि वर्षाताई याना पुढे जायला सहारा हवा आणि तो तात्पुरता अंकिता रूपाने मिळालाय , आता काल अंकिताने वैभव आणि धनंजय पवार याना नॉमिनेट केले , जान्हवी सूरज याना वाचवले , डोक्याने खेळते आहे सहा जोड्यापैकी आर्य आणि पॅडी याना वोट जास्त आहेत , अभिजित निकी आधीच नॉमिनेट आहेत हे बघून वैभव - डीपी यांची जोडी नॉमिनेट केली
आता आर्य पुन्हा एकदा तोंडावर आपटून येईल का A ग्रुपमधून ?
मला मानकाप्या नाव फार आवडलय
मला मानकाप्या नाव फार आवडलय
मी जान्हवी हिच्यावर केलेले
मी जान्हवी हिच्यावर केलेले नवीन मालिकेचे पोस्टर सर्वासाठी
बिग बॉस मराठीतून टीम A आणि त्यातील जान्हवी हिचे गटार तोंड दिसतेच आहे. निक्की, अरबाज,इरिना यांचे करियर हिंदीत सेट आहे त्यामुळे बिग बॉस संपल्यावर त्यांची कमाई चालूच असणार.प्रोब्लेम असेल तीन मराठी माणसांना ,जान्हवी, वैभव आणि घनश्याम (पुढारी म्हणून इमेज पूर्ण संपलेली आहे)
त्यामुळे मी विचार केला ,जान्हवी ,वैभव आणि घनश्याम (JVG) बाहेर आल्यावर मालिकेत काम मिळायला प्रयत्न करतील, त्यांना कामे मिळणार नाही, मिळाले तरीही जनता TRP पाडेलच. मग नाईलाजाने यांना यांचाच चॅनल काढून आपलीच मालिका स्वतःलाच बनवायला लागेल, असा विचार केल्यावर मला एक ईशान टीवी हा नवीन चॅनल दिसायला लागला, आणि तयार झाली ही मालिका कन्सेप्ट
किल्लेकर प्रोडक्शन निर्मित किरण प्रकाशित नवीन मालिका
माझे तोंड गटारीचे
फक्त आणि फक्त ईशान टीवी वर
रोज रात्री 8 ते 8.30 वाजता
पुन:प्रक्षेपण - हाच एपिसोड दिवसभर
नायक नायिका - वैभव ,इरिना
प्रमुख खलनायिका - जान्हवी किल्लेकर,
विनोदी भूमिकेत घनश्याम दरोडे
दिग्दर्शक - वैभव सी
संगीत - इरिना रुडकोवा
निर्माता - निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल
मला मानकाप्या नाव फार आवडलय >
मला मानकाप्या नाव फार आवडलय >>>>
कोकणातील प्रसिद्ध भूत , असेही आता आलेल्या स्त्री २ मध्ये सरकटा हे भूत दाखवलेच आहे कि , त्यातलाच प्रकार , दिग्दर्शक अमर कौशिक, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर बहुतेक येताहेत विकेंड भाऊ धक्क्यावर स्त्री २ प्रमोशन साठी
आर्या निकीला जळवायला करत असेल
आर्या निकीला जळवायला करत असेल तर ठीके पण फारच उकळ्या फुटत असल्यासारखी सतत अरबाज ला चिकटत होती ते क्रिन्ज वाटलं. असं चालू राहिलं तर गेम बिघडणार सगळा अन पुन्हा टीन एज मुलीसारखा क्रश, डेस्परेशन आणि मग रिजेक्शन घेउन येणार.
नॉमिनेशन चा टास्क आता शेवटचे दोन लोक ठरवणार. कोण झालेत नॉमिनेट ते प्रोमोज पाहिले नाही मी पण सग्ळेच आता निकी - अभिजीत ला नॉमिनेट करायला टपलेत . उपयोग नाही ते असोच. अजून दोघे म्हणजे वैभव डिपी किंवा पुढारी- पॅडी असे वाटते.
निकी इतकी फेक आहे. तिला कोणी सिरियसली कसे घेतात याचे नवल वाटते. ( मेनली अभिजीत!)
आजचा भाग म्हणजे मासळी बाजार
आजचा भाग म्हणजे मासळी बाजार पण लाजेल असा होता.नुसता आरडाओरडा, चावचाव.
अभिजित आणि निक्कीला भरपूर वोटिंग होत आहे,मग बिबॉसला उसगावकरला काढायच नाही आहे का,वोटिंग लाईन्स का बंद आहेत.
मला आज बिग बॉस फुल कॉमेडी शो
मला आज बिग बॉस फुल कॉमेडी शो वाटला, आजही निक्कीने बाजी मारली. तिचा मला राग न येता बहुतेक आवडू लागली की काय वाटायला लागलं
जान्हवीची कीव आली. तिचे हातवारे, तोच तोच पणा बोअर झालं.
वैभव किंवा पुढारी नॉमीनेट झाले असते तर वोटिंग लाईन्स सुरू असत्या. झालेत त्यांना बिग बॉस काही सध्यातरी काढणार नाही.
अभिजितचा एक मुद्दा पटला, निक्की आणि तो बरोबर असला की बाकीच्यांना आवडत नाही. बाकी सगळे एकमेकांबरोबर असतात की. निक्की निक्की निक्की तिच्याशिवाय दुसरा विषय कोणासमोर नव्हताच. तिचा तिरस्कार, तिच्याबद्दल बोलणं हेच होतं. अरबाझने त्या नादात प्रॉपर्टीची तोडफोड केलीच आणि कॅप्टनपदाच्या शर्यतीतून बाद झाला.
अभिजित आणि निक्कीला भरपूर
अभिजित आणि निक्कीला भरपूर वोटिंग होत आहे,मग बिबॉसला उसगावकरला काढायच
<<<<
भरपूर व्होटींग ? अजिबात नाही, कोणीही वोट करत नाहीये त्यांना , उलट नॉमिनेशन्स ओपन केली तर निकीच बाहेर जाईल !
अभिजीत निकी फिनालेची गॅरेन्टी घेऊन आलेत , नाहीतर पब्लिकने नसते ठेवले फिनाले पर्यन्त !
वर्षा अन्किता दोघींना या येड्यांपेक्षा जास्तं व्होट्स मिळतील नक्की !
व्होटिंग lines बंद आहेत..
व्होटिंग lines बंद आहेत...निकिचं fake elimination करून secret room मध्ये ठेवले पाहिजे..अजूनच मजा येईल मग....elimination prank म्हटलं की मला मेघाचंच elimination आठवतं...कसला जबराट episode होता तो...full emotional...
नको इतकं महत्त्व त्या निकीला
नको इतकं महत्त्व त्या निकीला , आधीच ७०% स्क्रीन टाइम देतायत तिला , सिक्रेट रुम वगैई प्लॅन केली असेल तर तिला जिंकूनही देणार मग !
निकी बाहेर गेली तर शो बंद
निकी बाहेर गेली तर शो बंद पडेल… बाकी सगळे फुसके आहेत…
>>निकी इतकी फेक आहे. तिला
>>निकी इतकी फेक आहे. तिला कोणी सिरियसली कसे घेतात याचे नवल वाटते.
निक्कीच काय मला तर यावर्षी सगळेच फेक वाटतायत..... ग्रूपचे बॉंडींग फेक, लफडी फेक, फ्रेंडशिप फेक आणि सगळी भांडणेही फेक!!
काल अरबाझशी भांडताना अभिजीत चक्क हसत होता
मला कालचे भांडण बघताना जुने लैला मजनू टाइप्स पिक्चर आठवत होते....... एका प्रेमी युगुलाला एकमेकांपासून वेगळे करणारा जालिम समाज!! फालतूचा टाईमपास आणि उगाचच आरडाओरड!!
अरबाझला शिक्षा दिली, जान्हवीला जेलबाहेर पडली म्हणून झापले पण पण बेल्ट सोडून फिरणाऱ्या निक्कीचे काय?
एकाशीही जरापण कनेक्ट तयार झालेला नाहिये अजुन!!
अभिजित इतका स्पाइनलेस माणूस
अभिजित इतका स्पाइनलेस माणूस आहे . मला अजिबात त्याचं वागणं नाही आवडत . निकी परस्पर त्याच्या वतीने भांडतेय आणि त्याचे फावतेय.
अरबाज चा मुद्दा बरोबर आहे पण तो निकी ला आपल्यापासून लांब करू शकत नाहीये . किती बालिश सुरु होतं सगळं . आर्या ला तर स्वर्ग हातात आल्यासारखं वाटतंय . अरबाजला तिने फार चिकटू नये , नंतर तो आणि निकी एकत्र झाले कि त्रास हिलाच होईल खूप .
पॅडी उगीच कमीपणा का घेतायत
पॅडी उगीच कमीपणा का घेतायत जान्हवीच्या जेल मध्ये असण्याबद्दल ? स्वतःला कारणीभूत ठरवतायत . पण तिने हे मान्य केलं कि ती तिच्या चुकीने गेली आहे आत ते . कालच्या भागात ती जरा माणसात आल्यासारखी वाटली मला .
आणि कधी नव्हे ते क्षणार्धासाठी आवडून गेली .
अरबाज ने चहाचं भांडं उधळून लावलं ते फार आवडलं मला :हाहा :
निक्कीला फक्त तो जेरीस आणू शकतो असं वाटतं मला . फक्त त्याने घरात तोडफोड करू नये आणि निक्कीच्या बाबतीत धोरण थोडं शहाणपणाचं बाळगावं. बास .
आता घरात एकी दिसतेय ते पण छान वाटलं , वर्षा उसगावकर पण बोलल्या ठामपणे निकीला कि तू त्याला भरीस घातलंस हे सगळं करायला म्हणून .
या सिझनमध्ये टास्क कमी आणि
या सिझनमध्ये टास्क कमी आणि शाब्दिक बडबड जास्त आहे.सगळ घर त्यि निक्कि अरबाजभोवती घुटयळतय.
फिजिकल टास्कमध्ये अरबाज आणि वैभव शिवाय तिथे दुसर कोणी नसेल पण निदान इंडिव्युजल तर देऊ शकता ना.
खुनाचा टास्क आहे,सिझन 2मध्ये वीणा आणी मधव लटकले होते आणि त्यांना खाली पाण्यात पाडायच होत ,तो टास्क आहे,कँप्टन्सीमध्ये सिझन 1मध्ये मेघा आणि सईमध्ये तो रिंग टास्क होता,काय मस्त केला होता त्यांनी,असे काहीतरी इनोवेटिव्ह ,बौध्दिक टास्क का नाही देत,जेणेकरून प्रत्येकाच्या बुध्दिचा कस लागेल.
नुसती भांडण,आरडाओरडा चालू आहे.
सगळा फेक ड्रामा होता निकी
सगळा फेक ड्रामा होता निकी अरबाझचा !


संभाजीनगरचा कबीरसिंग अॅक्शन म्हंटल्यावर तोडफोड करत होता
निकी तर टॉप टु टो फेक , अरबाझ कमिटेड आहे हे माहित असून कशाला रडायचा ड्रामा !
वर्षाताई ओव्हर अॅक्टिंग कि दुकान, तिची या भांडणाची कॉमेन्ट्री ऐकून हहपुवा झाली , कॅमेरा बघून स्वगतं म्हणत होती..अरबाझला बिचारा म्हणली वर्षा "तो बिचारा शान्तच होता, तू त्याला प्रवृत्त केलस"
विकेन्डला अख्खं घर बोलणी खाणर आहे अरबाझची तोफफोड जस्टिफाय केल्या बद्दल !
टिम बी ने खुर्ची पॉपकॉत्न घेऊन धिंगाणा बघायचा सोडून भाग कशाला घेतला , किती तो अरबाझचा पुळका.. येडे दिसत होते सगळे!
आज वैभवने शेवटी अरबाझचा चेहरा पकडून डोळ्यात डोळे घालून बघायचा सीन
Pages