Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी कित्ती दिवसांत बघितलंच
मी कित्ती दिवसांत बघितलंच नाहीये, छोटे प्रोमोज बघते आणि योगिता फाईट बघितली. मला connect होता येत नाहीये. जान्हवीच्या नवऱ्याची पोस्ट मला तिच्या बाजूनेच लिहिलेली जास्त वाटली. ती तर मला उथळ पाण्याला खळखळाट फार अशी वाटते. निक्कीपेक्षाही डोक्यात जाते पण फायनल 5 मध्ये नक्की असणार ती.
विकेंड वार बघेन आता.
हुश्शार निकीला कळले की सूरज
हुश्शार निकीला कळले की सूरज बाहेर लोकप्रिय दिसतोय . लग्गेच आज त्याला राखी बांधायचा ड्रामा केलेला दिसतोय. मी तुझे काळजी घेईन इथे आणि बाहेर इ . इ. तो बिचारा भोळा आहे. विश्वास ठेवायचा तिच्यावर.
खरं आहे, प्रोमो बघितला.
आता ती जान्हवी पॅडीला नक्की काय बोलली आहे, कलाकार सर्व निंदा करतायेत तिची.
बिग बॉस ने च सांगितलं आहे का हिला, कुठल्याही थराला जा पण चर्चेत रहा. बिनधास्त आहे एकदम, सर्वांना वाटेल तसं बोलतेय.
पॅडीला त्याचं अख्खं करिअर
पॅडीला त्याचं अख्खं करिअर ओव्हरअॅक्टिंग केलस आता इथेही तेच करतोयेस , असं म्हणाली जान्हवी, सेम ओल्ड पॅटर्न.. आधी वाट्टेल ते बोलून मग माफीचं नाटक.. विकेन्डला दरवाजा उघडून बाहेर काढायला हवय रितेशने, जसे सिझन २ मधे शिवानी सुर्वे, किंवा प्रियंका जग्गा स्वामी ओम लोकांना काढले हिन्दीत !
सूरजला निकीने राखी बांधणे ड्रामा किती फेक आहे, सूरजला टिम ए मधे टाकायचा का अट्टाहास बिबॉला ? अख्खा गेम खराब होईल त्याचा आणि विनिंग रेसमधून मागे जाणार !
निक्कीपेक्षाही डोक्यात जाते
निक्कीपेक्षाही डोक्यात जाते पण फायनल 5 मध्ये नक्की असणार ती.
<<<
नाही , इतकी हेट घेऊन नाही जाणार ती फिनालेत.
अभिजीत, निक्की, सूरज हे तिघे फिक्स आहेत टॉप ५ मधे उरलेले २ कोण हे बघायचे, जान्हवीचा नंबर लागणे शक्यच नाही, अन्किताचा लागेल नंबर !
कलर्स फेस वगैरे काही महत्त्व नाही राहिलं आता.
आता इरिना आणि वैभव झालेत
आता इरिना आणि वैभव झालेत नॉमिनेट म्हणजे इरिनाला घरी पाठवतील बहुतेक. जाऊ द्यात तिला.
निक्कीला पॉवर देतील कॅप्टन
निक्कीला पॉवर देतील कॅप्टन म्हणून वैभ्याला वाचवायला !
जाऊदे इरिना
जाऊदे इरिना.
Btw तो पुढारी निक्कीला निकूताई म्हणायचा ना, आता नुसतं निक्कू, निक्की का म्हणतो.
किती लहान एपिसोड , फक्त ३७
किती लहान एपिसोड , फक्त ३७ मिनिटाचा होता आज !
ठरकी बिगबॉसची जान्हवी लाडकी आहे, पॅडी प्रकरणाचा मोठा इश्यु झाल्यामुळे नक्कीच बिबॉने सांगितले असणार माफीचा ड्रामा करायला !
निक्कीने बर्थडेला कॅप्टन्सी मागितली आणि बिबॉने ती गिफ्ट देऊन टाकली विदाउट टास्क, निक्की व्हिलन वाटु नये म्हणून तिच्या पेक्षा जास्तं निगेटिव टॉक्सिक बाई तिच्या बरोबर ठेवली आहे , बिबीच्या प्लॅन प्रमाणे चाल्लय सगळं !
हळुहळु निक्की पॉझिटिव वाटली पाहिजे हे ठरलेले वाटते.
मला तर आत्ताच अरबाझ पॉझिटिव वाटायला लागलाय या सगळ्या चांडाळ चौकटीत्ल्या इतर व्हिलन्सच्या कंपॅरीझनमुळे !
सिझन अगदीच बोअर व्हायला लागला
सिझन अगदीच बोअर व्हायला लागला आहे,गुरुवारपर्यंत नॉमिनेशन्स नाहीत.कखहीही चालू आहे.
काल तर डिलेमि रुममध्ये अरबाज काय डिसिजन घेणार हे जस प्रेक्षकांना माहित होत तसच आतल्या लोकांनाही माहित होत,पँडी आणि डीपीने तस सांगितलही।
टास्कमध्येपण काही अर्थ नाही.तो सूरज दिसतच नाही.
जान्हवीची नाटक काही थांबत नाहीत.
काल पँडीची माफी मागितली यात काही नवल नाही,पण पँडीनेही अगदी लगेच माफ केल,मग आता धक्क्यावर येऊन भाऊ काय करणार?
तो धक्काच काही दिवसांनी पिकनिक स्पॉट नाही झाला म्हणजे मिळवल.
अभिजित,निक्की,सूरज ,अरबाज हे जवळजवळ फायनलिस्ट आता फिक्स आहेत.वाईल्ड कार्ड पैकी एखादा,जान्हवी अगदीच नाईलाज असेल तर,हे येऊ शकतात.अंकिता असू शकते.जान्हवीऐवजी.
बाकी युट्यूब ,इंन्फ्लुएंजर्सवाल्यांना काही पडलेली नाही,ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये खुश आहेत. त्यांना एखाददुसर प्रोजेक्ट मिळाल तर ठीक नाहीतर "गड्या आपुला गाव बरा" हा प्रकार आहे.
एकंदरीत इंटरेस्ट कमी होत आहे.
युपी धक्का पिकनिक स्पॉट होणार
युपी धक्का पिकनिक स्पॉट होणार ही भविष्यवाणी सही आहे, तसंच होईल बहुतेक.
बोअर झालेलं आहे हे प्रकरणं
बोअर झालेलं आहे हे प्रकरणं अगदीच. मी उडती खबर ऐकली की वाईल्डकार्ड मध्ये राखी सावंत येतेय म्हणून? हे झालं तर ब्बाब्बौ !
मग येइल जरा मजा असं सध्या तरी वाटतंय.
कालचा एपिसोड अगदी बंडल.
कालचा एपिसोड अगदी बंडल. अरबाजची कॅप्टनशिप काढली ते ठीक होतं पण ती दुसऱ्या कोणाला देण्याचा ऑपशन द्यायला नको होता. काही दिवस घरात कॅप्टन नसता तर मजा आली असती. बरं अरबाजने वैभवला कॅप्टन बनवायला हवे होते तर त्याने नक्कीला बनवले. वस्तू विकत घेतांनाही यांनी बिबॉ चा प्लॅन फिस्कटवला, बाथरूम आणि बेड घेतले नाहीत. हे नसण्याचा कोणालाच फरक पडला नाही कारण सगळ्यांना माहिती आहे कि कुठल्यातरी मार्गाने किंवा धक्क्यावर या गोष्टी आपसूक दिल्या जातील. गुरुवार आलाय अजून नॉमिनेशन नाही. यंदा बोअरिंग टीम प्रमाणेच शो कर्ते हि बोअरिंग आहेत. नुसती चालढकल सुरु आहे यांची.
आता इरिना आणि वैभव झालेत
आता इरिना आणि वैभव झालेत नॉमिनेट म्हणजे इरिनाला घरी पाठवतील बहुतेक :- हे कुठे आणि कधी दाखवले. इरिना घरी गेली तर बरं होईल. काहीच करत नाहीये ती.
काल जवळपास एका आठवड्याने
काल जवळपास एका आठवड्याने बघितले बिग बॉस!! काही फरक पडला नाहिये एकूणातच
>>अरबाजची कॅप्टनशिप काढली ते ठीक होतं पण ती दुसऱ्या कोणाला देण्याचा ऑपशन द्यायला नको होता.
उलट बिग बॉसने ती फक्त आर्याला द्यायचा ऑप्शन द्यायला पाहिजे होता मग मजा आली असती
हो, दुसरे काहीही चालले असते
हो, दुसरे काहीही चालले असते
मी आजही बघत नाहीये, नवऱ्याने
मी आजही बघत नाहीये, नवऱ्याने शाजाम का कुठला पिक्चर लावलाय. बिग बॉस रिपीट बघू का नको विचार करतेय.
नको बघूस
नका बघू
म्हणजे नाही बघितले तरी चालेल ..... फार काही विशेष नव्हते!!
थँक्स, नाही बघितलं .
कलर्स मराठीच्या fb पेजवर
कलर्स मराठीच्या fb पेजवर लिहिलंय कोणीतरी, जान्हवी पॅडी बद्दल जे बोलली त्यावरून बाहेर कलाकार आणि सामान्य माणसांचा संताप झाला आणि कलर्स मराठीचे हेड केदार शिंदे यांना बिग बॉसच्या घरात जावं लागलं, परिस्थिती सांगावी लागली त्यामुळे जान्हवीला मगरीचे अश्रू ढाळत धाय मोकलून रडत पॅडी दादांची माफी मागावी लागली .
कलर्स मराठी आणि बिग बॉसला वाटलं असेल यामुळे तिला सहानुभूती मिळेल पण लोकं तिच्या नाटकीपणाबद्दल अजून ट्रोल करतायेत तिला.
हात दाखवून अवलक्षण केलं
हात दाखवून अवलक्षण केलं जान्हवी ने . कालचा एपिसोड जाम म्हणजे जामच बोर .
पण सुरज म्हटला आर्या करते ते बरोबर करते . किती ठाम होता तो बोलताना .
निकी पण किती रंग बदलते . आधी दुसऱ्या टीम चा कॅप्टन असताना बिनदिक्कत नियम मोडत होती .
पण आता सगळे नियम पाळा म्हणते .
आणि ती इतके असुविधा असलेले ड्रेस का घालते ? तिचं अर्धं लक्ष त्यातच असतं . इकडून वर कर तिकडून वर कर .
जाह्नवी खूप खोटी आहे, तिचं
जाह्नवी खूप खोटी आहे, तिचं काही खरं नाही. ती एकदम टिपिकल खलनायिका आहे आणि तिच्यामुळेच निक्की आणि अरबाज चांगले व्यक्ती वाटत आहेत.
अरे काय तो अभिजीत कसला
अरे काय तो अभिजीत कसला स्पाइनलेस , कसला फट्टु, डबल ढोलकी, लुजर माणुस आहे आणि ती अन्किताही तसलीच फालतु !
आर्या एकटी इतकी मस्तं नडतेय , तिचा गेम खेळयेय तर तिला मागे खेचतायेत हे लुजर्स !
टिम बी ची स्तुति करण्यात काही अर्थ नाही, आर्या आणि सूरजने इन्डिव्हिज्युअल खेळले पाहिजे ,त्यांची बाकीची टिम कधीही पलटेल, निकीपुढे बोलायची एकाची हिंमत नाही. नुसता मागेमागे बोलतो अभिजीत !
टास्क मधे सुद्धा किती बावळट्ट पणा करत रडत होता अभिजीत, शब्दं पाळ म्हणून गायावया करत होता अरबाझकडे !
आज एक क्लिअर झालय मला, अरबाझ जिंकला तरी चालेल पण अभिजीत सावन्त अजिबात जिंकता कामा नये , लुजर कुठला !
बिगबॉससुद्धा जान्हवी बरोबर आर्यालाही धमकी देतात, धक्काबुक्की फक्तं जान्हवी करत होती पण उगीच आर्याला बोलले !
जान्हवी आणि बिबॉचे नक्कीच काहीतरी आहे !
शुक्रवार आला तरीही,वाईल्ड
शुक्रवार आला तरीही,वाईल्ड काल्ड नाहीत,वोटिंग चालू आहे,म्हणजे बहुतेक एरिना जाणार.घरात बारा लोकच राहणार.
वाईल्ड कार्ड घेणार आहेत की सिझन 2सारख कोणीही यायला तयार नाही.
कालचा नॉमिनेशन्स टा्क पण किती फालतू होता.पहिल्यांदाच बहुमत वगैरे प्रकार नव्हता,ज्याला नॉमिनेट करायच त्याला करा ना नॉमिनेट, टीम ए नॉमिनेशनला मात्र सॉलिड घाबरते.मग करायच ना जान्हवीला नॉमिनेट. हे डील करत बसले.
अभिजित तर उघडउघड गेम खेळत आहे.तो ,निक्की, तर आहेतच फायनल मध्ये.
वरच्या अपडेटनुसार जर खरच केदार शिंदेला घरात जाव लागल असेल आणि तरीही बिबॉस जान्हवीला वाचवणार असतील तर हा सिझन मरतमरतच 14आठवडे चालेल
मी तर असही ऐकल होत की मुळात केदार शिंदे चँनेल हेड झाल्यावर या शोसाठी तयारच नव्हते.खरखोट माहित नाही.ः
एकंदरीत मराठी बिबॉसच काय खर नसां.
एकंदरीत मराठी बिबॉसच काय खर
एकंदरीत मराठी बिबॉसच काय खर नसां.
<<<
नाही या सिझनने छप्परतोड टी आर पी घेतली आहे म्हणे , विकेन्डला ३.९ !!
हिन्दी बिबॉला २ सुद्धा येत नाही टी आर पी.
पण बाकी इमेजची जी वाट लागते ते बघून वाइल्डकार्ड तयार होत नाही हे ही खरच आहे !
मला पण अभिजीत आणि अंकिताचा
मला पण अभिजीत आणि अंकिताचा राग आला. अभिजीत ची कदाचित स्ट्रॅटेजी असेल की निकीच्या ग्रुप सोबत कॉर्डियल रहायचे आणि वेगळे दिसायचे. अंकिता अति शहाणी आहे. ती सगळ्यांबद्दल उच्चासनावरून तक्रारी करण्याच्या मोड मधे जाते सारखी. ग्रुप बिप चे तिला काही पडलेले नाही. तसे अभिजीत ला आधी बझर दाबू देण्याबद्दल तिचा मुद्दा बरोबर होता पण तरी आर्या निकीला नडत होती ते मस्त वाटले. तिने व्यवस्थित क्लीयर केले की निकीने त्रास दिला होता आता मीही देणार. ते भारी होते
अरबाज आणि वैभव ला तिला समजावायला गेले होते त्यांना पण जेरीस आणले काल
अरबाज परत आला तेव्हा रागाने थरथरत होता. कोणावर राग काढू असं झालं त्याला.
हो,ऑनलाइन टीआरपी सॉलिड आहे.पण
हो,ऑनलाइन टीआरपी सॉलिड आहे.पण आता ऑफलाईन कमी होत आहे.सुरु झाल तेव्हा पहिल्या.दहामध्ये होता शो.आता वीसात शेवटीशेवटी आहे.
त्यातल्या त्यात धक्क्याला टीआरपी आहे,बाकीच्या दिवसात जर काही रंगत आणली नाही तर याचाही सिझन चार होईल.
छोटा पुढारी अश्लील कार्टा आहे
छोटा पुढारी अश्लील कार्टा आहे.
नाही. तसे अभिजीत ला आधी बझर
नाही. तसे अभिजीत ला आधी बझर दाबू देण्याबद्दल तिचा मुद्दा बरोबर होता
<<<
नाही, आर्या स्वतः नॉमिनेट झाली होती त्यामुळे तिला स्वतःपेक्षा वीक कॉन्टेस्टन्टला नॉमिनेट करणे जास्तं महत्त्वाचे वाटले असेल, अभिजीतने वैभवला केले असते नॉमिनेट पण तो कलर्स फेस आहे, त्याला वाचवतील असे वाटु शकते तिला, सध्या इरीनाच आहे विकेस्ट !
आज बघतेय तर जान्हवी चक्क
आज बघतेय तर जान्हवी चक्क positive वागतेय आणि निक्की भांड भांड भांडतेय. जान्हवीला फीडबॅक मिळतोय हाच अर्थ निघतोय.
Pages