Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाईल्ड कार्डवरून आठवल,सोमिवर
वाईल्ड कार्डवरून आठवल,सोमिवर नेटकरी निक्कीला पर्याय म्हणून राखीला पाठवा अशी मागणी करत आहेत,आणि दुसरीकडे बिचुकलेंना आणणार असल्याची चर्चा आहे.तो कोण भाऊ का कोण ,त्याचीही चर्चा आहे.पहिल्या दोन
दोन्ही अफवाच ठरू देत नाहीतर जेवढा बघितला जात आहे,तेवढाही बघावासा वाटणार नाही.
राखी सावंत बहुदा बिमार आहे,
राखी सावंत बहुदा बिमार आहे, राज्यात निवडणूक डोक्यावर असताना बिचकुले येण्याची शक्यता कमी. भाऊ म्हणजे कोण, ते माहिती नाही.
बिग बॉस रविवारचं तसं बोअर
बिग बॉस रविवारचं तसं बोअर असतं. अबिर गुलाल टीम येणार आहे, मागच्या वेळेचा विजेता अक्षय केळकर हिरो आहे त्यात, गायत्री दातार व्हिलन. हिरॉईनला ओळखत नाही मी, पण ती चांगली आहे. मालिका बघत नाही, प्रोमोज बघते आणि बिग बॉस दोन मिनिटं आधी लावलं गेलं तर ह्याचा शेवटचा सीन सुरू असतो.
केळकर मागच्यावेळी आधी व्हिलन आणि नंतर हिरो होऊन ट्रॉफी घेऊन गेलेला. तो मुलींच्या बाबतीत जे वागायचा ते आवडत नव्हतं. टास्क चांगला खेळायचा मात्र. तेजस्वीनीही टास्क मस्त खेळायची, ती आणि अमृता आवडायच्या त्या वेळी. तेजू जिंकावी असं वाटायचं. नंतर मात्र पाच उरलेले त्यात केळकर जास्त योग्य होता जिंकण्यासाठी भले त्याला पब्लिक सपोर्ट नव्हता. पब्लिक सपोर्ट तुफान असलेला प्रसाद काही मला आवडलाच नव्हता.
भाऊ म्हणजे आपला हिंदुस्तानी
भाऊ म्हणजे आपला हिंदुस्तानी भाऊ.
कलर्सचा एकच चेहेरा राहिला, तो
कलर्सचा एकच चेहेरा राहिला, तो रनर अप होईल कारण व्हिलन आहे.
आधीच तो बावळट ग्रुप काही करत
आधीच तो बावळट ग्रुप काही करत नाही आहे,त्यात त्यांच्यातल्याच चुगल्या दाखवून तो ग्रुप तोडायला कशाला निघाला आहे बिबॉस?
बाकी,एलिमिनेशन योग्यच होता,एक काही करतच नव्हता आणि एकीला घरी जायच होत.
याचा अर्थ ,दोन वाईल्ड कार्ड एंट्रीज नक्की.
उद्याच्या भागात ,तो पुढारी पेटणार आहे निकुताईविरोधात.पण मला ते सगळ खोटच वाटत आहे.
आज पुन्हा एकदा वैभवला अरबाजविरुध्द चुगली दाखवून उकसावल, तो जर नडला अरबाजला, तर मात्र खरी मजा येईल.
उसगावकरांना आता नारळ द्यायला हरकत नाही.
आहेत. ती सुद्धा मोस्टली लीड
आहेत. ती सुद्धा मोस्टली लीड रोल. सूरज बाबतीत तसे काही होईल असे सध्यातरी वाटत नाहीये. सूरज ऐवजी विजेता कोणाला करायचा हा मोठा प्रश्न बिग बॉस टीम समोर असणार आहे.
<<<<
नाही , जमाना बदल गया है, हिन्दी बिबॉ मधे गेले काही सिझन्स फक्तं आणि फक्तं सोशल मिडीया इन्फ्लुनर्स विनर होत आहेत, जे बझ क्रिएट करतात ज्यांची हवा होते ते जिंकतात, शो मधे कॉन्ट्रिब्युशन असो नसो !
यावेळी मराठीत तेच होईल असे वाटतय , सूरज किंवा अन्किता हेच पोटेन्शिल विनर्स आहेत विथ ह्युज सोशल मिडिया प्रेझेन्स.. इन्स्टाग्राम रिल स्टार वि. युट्युबर !
इतर कोणाचा चान्स नाहीये.
युपी exactlly त्यांच्यातल्या
युपी exactlly त्यांच्यातल्या चुगल्या नको होत्या दाखवायला. मागच्यावेळेची जान्हवीची नाही दाखवली, रितेश खरं बोलला तर केवढी नाटकं केली तिने.
वैभवला पहिल्यापासून सांगायचा प्रयत्न करतायेत, अरबाजची सावली नको होऊस तो ऐकत नाहीये, आता ठरवलं तरी समोरचा गृप विश्वास का ठेवेल त्याच्यावर.
पुढारी गुलामच झालाय निक्की आणि grp चा, तर एवढं रडायला का आलं त्याला.
मागच्या आठवड्यात योगिताला घरी पाठवावे वाटत होतं पण सॉलिड खेळली ती त्यामुळे तिने जाऊ नये असं वाटलं, आता समोरून कोणी लेडीज प्लेअर नाही .
योगिता आणि निखिल ला घरी
योगिता आणि निखिल ला घरी पाठवले उत्तम केले. आता पुढचा नंबर त्या इरिनाचा लावा. तिला काहीही समजत नाहीये. आज आणि काल जे खेळ, चुगल्या, बोलणे काय चालू होते तिला काहीही एक कळत नव्हते. मख्ख बसलेली होती. केवळ त्या वैभ्याच्या एक फेक लव अँगल साठी एखाद्या गोरीला ठेवणे क्रिन्ज वाटते आहे.
वैभ्याला जाम थोबडवले पूर्ण वीकेन्ड. बरे वाटले. तरीही त्याला वेगळे काही डावपेच सुचतील असे वाटत नाही. तो मैत्री मैत्री करत बसलाय. पुढार्याची आणि त्याच्या चुरचुर बडबडीची मजाच वाटते मला.
सूरज ने पुन्हा गाजवले अतरंगी डायलॉग्ज आणि तुफान डान्स ने.
वैभ्याला किती स्पुनफिडिंग करत
वैभ्याला किती स्पुनफिडिंग करत आहेत बिबॉ, किती त्या हिन्ट्स .. नो निर्लज्जा सारखा हसत होता, काही फरक पडणार नाही असं वाटतय पण बिबी ने काही एम्जी दिली असेल म्हणून ट्राय मारतायेत !
सूरज इज रुलिंग , झोम्ब्यानी मारली उडी वर काय नाचला…मज्जाच मज्जा आणि तो काहीही बोलला तरी येतं ,एन्टरटेनही करतोय सिंपथी नाही नुसतीच !
पुढारीही भारी कॉन्टेस्टन्ट आहे, वाजवली त्यानी अन्किता डीपी पॅडीला व्हरच्युअली !.
वर्षाने इरीनाची बरोबर पारख केली त्या फालतु टास्कच्या निमित्ताने !
काय बेकार स्क्रीन प्रेझेन्स आहे गायत्री आणि अक्शय केळकरचे, हे कसले टी.व्ही स्टार्स
त्या गायत्री आणि केळकरपुढे ती
त्या गायत्री आणि केळकरपुढे ती तिसरी उठून दिसत होती, ती अभिनयही सहज करते. गायत्री सगळीकडेच फेक वाटते, केळकर इथे आवडला नाही मला तरी सिरीयलमध्ये अभिनय चांगला करतो. हल्लीच दोन मिनिटं बिग बॉस आधी बघितली जाते ती सिरीयल.
कालच एक एपिसोड बघितला. कसलाच
कालच एक एपिसोड बघितला. कसलाच बोरिंग आहे हा सिझन. जे लोकं पाहून इथे चर्चा करताहेत त्यांना कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय जोडून साष्टांग नमस्कार. बावळट ग्रुप हुशार आहे त्यांना खेळायचे पैसे मिळतात म्हणून तिथे आहेत. पण बघणारे काय म्हणून पाहतात. मला तर हा कार्यक्रम बघणारेच बावळट ग्रुपचे सदस्य वाटायला लागलेत.
बिबॉ काय ठरकी आहेत, जान्हवीवर
बिबॉ काय ठरकी आहेत, जान्हवीवर लाइन मारतात सतत , पब्लिकने व्लिमिनेट केले तरी बिबॉ नाही जाऊ देणार !
बाकी आज पुढारी छा गया, काय बोलतो तो.. निक्कीची बोलती बन्द केली , टास्क पण त्यालाच समजल् , आर्याने घोळ घातला !
किती लहान एपिसोड होता आज
हो आर्याने घोळ घातला . .
हो आर्याने घोळ घातला . . प्रश्न ट्रिकी होता . तिने विचार करून उत्तर द्यायला हवं होतं .
निकी सगळ्यांना इतकी डॉमिनेट का करत होती ? अरबाज ने वैभव ने किंवा तिच्या टीम मधला कोणीही इतर टीम मध्ये कोणाशी बोललं कि हिचं डोकं फिरतं. असं होऊन कस चालेल ? सगळे एका घरात राहतात म्हणजे बोलणार ना एकमेकांशी ? काल सेम कारणावरून त्या पुढारीवर जाळ काढला हिने . का तर योगितला काहीतरी इमोशनल बोलला .
बिबॉस निक्की आणि जान्हवा
बिबॉस निक्की आणि जान्हवा,अरबाज या त्रिकुटाला घालवणार नाही,त्यामुळे या आठवड्यात जरी अरबाज सोडून कोणीही नॉमिनेट झाले तर वाईल्ड कार्डना पाठवून कदाचित वोटिंग बंद ठेवतील किंवा एलिमिनेशन करणार नाहीत.
हे आता बहुतेक सगळ्यांना कळून चुकले आहे,इतके कोणी मंद नसावेत.
मराठी इंडस्ट्री ने दखल घ्यावी म्हणून अभिजित शोमध्ये आला आहे हे कारण जरा पटत नाही,2004 मध्ये पहिला आयडॉल सिझन आला आणि हा विनर होता,तेव्हापासून 20वर्ष याची मराठी इंडस्ट्रीने दखल घेतली नाही,याच आश्चर्य वाटत.
बाकी,आज पण टास्कमध्ये आरडाओरडा ,गोंधळ अपेक्षित आहेच.
टीम्स जरा बदलल्या असत्या तर खरघ मजा होती,म्हणजे जान्हवी/निक्की,भिजित/अंकिता,वैभव/एरिना.वगैरै.
फेअर गेम ते काय कळल असत.पण ते बिबॉसला नकोच आहे.
पुढार्याला खरतर डीपीने पेटवल आहे,तो योगिताशी बोलला असेल पण तू गेलीस तर माया कोण लावणिर ,हे जर मी बोललो नाही हे निक्षछन सांगत आहे,तर याचा खुलासा धक्क्यावर नक्की होणार कारण बिबॉस धक्क्यावर टीम बी ला जास्त एक्स्पोज करत आहे.
निखिल आणि योगिताच्या एकत्र
निखिल आणि योगिताच्या एकत्र एलिमिनेशनने पुन्हा एकदा सिद्ध केले कि बिग बॉस टीम वोटिंग लक्षात न घेता त्यांच्या मनाला येईल तसे एलिमिनेशन करतात. हे दोघे तसेही जाणारच होते पण दोघे एकत्र गेल्याने पिकनिक गॅंग थोडी हलली आहे. त्यात अभिजितची चुगली दाखवली आणि त्यांच्यात फूट पाडली. त्या उलट घनश्यामला पॅडी काका, अंकिता इत्यादीची चुगली दाखवून ए टीमच्या अजून जवळ नेले आणि वैभवला अरबाज जान्हवीची चुगली दाखवली जी त्याला आधीच माहिती होती, त्यावर त्यांचे बोलणे झाले होते. त्यामुळे एकूणच पिकनिक गॅंग अशक्त होणार आणि ए टीम सशक्त.
नॉमिनेशन उर्फ करन्सी टास्क मध्ये पुन्हा काहीच दम नाही, पिकनिक गॅंग मधील आर्याने करायचा तो गोंधळ केलाच आणि घनश्यामच्या वेळी पिकनिक गॅंग ढळढळ खोटे खेळत होती हे दिसले. या वीक मध्ये घनश्याम, आर्या, पॅडीकाका, वर्षा आजी, वैभव नॉमिनेट होतील असे वाटते. बघूया आज काय होतंय ते.
निकी सगळ्यांना इतकी डॉमिनेट
निकी सगळ्यांना इतकी डॉमिनेट का करत होती ?
यात नवे काहीच नाही. उलट टास्क मध्ये इरिना आणि सुरज फार गप्प दिसले. जस्टिफिकेशन देण्याच्या वेळी हि दोघे सगळ्यात बाजूला उभे होते. पण जेव्हा या दोघांना प्रश्न विचारले जातील तेव्हा यांचे उत्तर आणि पिकनिक गॅंगचे उत्तर सहमत होईल असे वाटते.
सध्यातरी इंटरेस्ट कमी झालाय..
सध्यातरी इंटरेस्ट कमी झालाय..... गेल्या आठवड्यात फारसे बघितले नाही आणि भाऊचा धक्काही नाही बघितला!!
योगिता आणि निखिल बाहेर गेल्याचे कळले...... गुड फॉर देम ॲंड गुड फॉर गेम!!
काल दिसले की फायनली बी टीम ला
काल दिसले की फायनली बी टीम ला गेम समजू लागलाय जरा जरा. गुड फॉर देम. पॅडी , अभिजीत, डिपी यांच्या डोक्यात प्रकाश पडून आणि अंकिताने अॅक्टिव होऊन एकत्रित स्ट्रॅटेजी करणे वगैरे बघून चांगले वाटले. असे चालू राहिले तर जरा मजा येईल. निकी अनप्रेडिइक्टेबल आहे. तिला फक्त स्वतःच्या गेम ची पर्वा आहे. त्यासाठी ज्यांचा उपयोग करता येईल तो ती करणार. अरबाज, वैभव, जान्हवी वगैरे ना हे कळले तरी त्यांना काही पर्याय नसेल. कालच्या टास्क चा नॉमिनेशन साठी उपयोग करणार की कसे ते समजले नाही. त्या इरिना ला करा आता नॉमिनेट . बी ग्रुप मधून पॅडी चांगले खेळतोय त्यामुळे त्याला लगेच बळीचा बकरा करून घालवू नये. ए टीम आणि अरबाज बोलत होते की आपल्याला फीडबॅक निगेटिव आला असला तरी आपण समोअरचे ३ प्लेयर्स घरी पाठवलेत. खरे तर नॉमिनेशन्स बिबॉ च मॅनेज करतात. त्यांना जो हवाय तोच व्यक्ती त्या त्या आठवड्यात नॉमिनेशन मधे येतील असे ते बघतात.
अभिजित पण आता गेम खेळत आहे,अस
अभिजित पण आता गेम खेळत आहे,अस वाटत आहे.ःपण आज टीम बी छान खेळली.
जान्हवी जे करते,बोलते,ते मुद्दाम कसातरी कंटेंट मिळून निक्कीपेक्षा आपण वरचढ ठरायला पाहिजे, धक्क्यावर पण आपलीच
चर्चा झाली पाहिजे, हे पण आता कळल
आहे आज पँडीने जवळजवळ धमकी दिल्यासारख विधान केल की भविष्यात मी ही अट घालू शकतो,की ही असेल तर मी काम करणार नाही.हिंदीमध्ये हे सर्रास चालत,पण मराठी इंडस्ट्री आधीच लहान आहे,तिथेही अस होत असेल हे कळल..टीम बी फॉर्ममध्ये येत आहू,पण अभिजितमुळे फुटू शकते.
अभिजित हळूहळू रंग दाखवत आहे.ः
एरिना एलियन वाटायला लागली आहे,तिला पाठवा आता.
उसगावकरवा पण गेम कळत नाही का,तस असेल तर केवळ निक्की आणि जान्हवीबरोबर शाब्दिक चकमकींसाठी ठेवायची गरज नाही.
टीम बी मधे या वीकेंडपासून
टीम बी मधे या वीकेंडपासून बरीच सुधारणा दिसतीये. मुख्यतः पॅडी आणि अभिजीत जोमात आहेत.
जान्हवी सगळ्यात डोक्यात जाणारी व्यक्ती आहे, पण आज बी टीम वाले तिच्या चिडचिडीची खिल्ली उडवत होते, त्यावर ती अजूनच सैरभैर होत होती. मजा आली पहायला. तिला कोणत्या गोष्टीचा माज आहे कळत नाही, बरं खेळाच्या बाबतीत तर ती निकीची चमची आहे. थोडा जशास तसा गेम बी टीम खेळू लागल्यावर ए टीम सदस्य गांगारुन गेले.
बाकी सगळ्यात रिअल सूरज असला तरी त्याची गेमची समज पाहता विनर व्ह्यायची शक्यता कमीच वाटते. B टीम अॅक्टीव झाली तर काहीतरी मजा येईल नाहीतर त्या माजोरड्या टीमचा माज पाहत रहावे लागेल.
मी सध्या बघतच नाहीये. डी पी
मी सध्या बघतच नाहीये. डी पी ने निक्कीला भडकवले तो प्रोमो बघितला. एकटी जान्हवी कलर्स चेहेरा राहिल्याने बिग बॉस डोक्यावर घेणार तिला. योगिता राहिली असती, जाऊद्या ना घरी म्हणाली नसती तर तिला प्रेफरन्स दिला असता.
हल्ली कलर्स फेस , मालिकांमधे
हल्ली कलर्स फेस , मालिकांमधे रोल्स चे डील वगैरे काही राहिलेले नाही. इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबर्स चा ट्रेन्ड आल्यापासून चॅनल च्या फेस चे तेवढे महत्त्व राहिले नसावे असे वाटते. हिंदीत पण तसेच आहे. कलर्स च्या मोठ्या हिरॉइन्स असल्या तरी जिंकत नाहीत.
तसं असेल तर खरंच चांगलं होईल
तसं असेल तर खरंच चांगलंच होईल मैत्रेयी. नाहीतर ती जान्हवी दादागिरी करत बसेल आणि बिग बॉस डोक्यावर बसवेल. ती जिंकणार नाही पण उगाच रनर अप होईल.
योगीताच्या बाबतीत ती रडूबाई
योगीताच्या बाबतीत ती रडूबाई आहे असं दिसलं आपल्याला पण कारण लपवले गेलं बिग बॉसकडून, तिचा ड्रेस अरबाजने खेचला, टास्क मध्ये असेल पण त्याची वाच्यता करू नका असं सांगितलं.
निक्की, जान्हवीही अति करणाऱ्या आहेत.
अभिजीत आणि निक्की १००%
अभिजीत आणि निक्की १००% बाहेरून गेम ठरवून आलेत कि एकमेकांच्या ऑपॉझिट जायचे नाही किंवा अर्ध्यात गेम आला कि एकत्रं येऊन खेळायचे !
आजच्या टास्कला काहीही अर्थ नव्हता , सिक्रेट रुम मधे त्यांनी काय उत्तर दिले ते दाखवायची गरज नव्हती, त्यामुळे मजा गेली सगळी !
अरबाज निक्की यांनी आपला
अरबाज निक्की यांनी आपला बुद्ध्यांक किती कमी आहे हे पुरेपूर दाखवून दिले काल.
कालच्या टास्कमध्ये काही दम
कालच्या टास्कमध्ये काही दम नव्हता, पूर्ण टास्क फेल गेला. कुठलीही टीम हि विरोधी टीम सोबत सहमत होणे शक्य नव्हते. एखाद्या मेंबरने बंडखोरी करून समोरच्या टीम मधील एक किंवा दोघांना करन्सी जिंकण्यासाठी मदत करून लॉन्ग रन मध्ये त्यांच्या छुपा पाठिंबा घेता आला असता किंवा समोरील टीममध्ये फूट पाडता आली असती. टास्कमध्ये एकमेकांना पटवणे त्यांची मनधरणी करण्यापेक्षा हे सगळे भांडत होते. जर टास्क यशस्वी झाला असता तर हरलेल्या टीम पैकी सगळ्यांना किंवा ज्यांना करन्सी जिंकता आली नाही त्यांना नॉमिनेट करता आले असते पण बिबॉचे सगळे प्लांनिंग पाण्यात गेले आणि टास्क फ्लॉप झाला. मंगळवार झाला तरी यांचे नॉमिनेशन झाले नाही. त्यामुळे जे काही एलिमिनेशन होईल ते पुन्हा एकदा प्रेक्षकांनी केलेल्या वोटिंग मुळे न होता बिबॉ टीमच्या मर्जीने होणार.
सगळे भाग इतके बोअर चाल्लेत कि
सगळे भाग इतके बोअर चाल्लेत कि इथे येउन काही लिहावसं पण वाटेना..
कालची सगळी भांडणं प्लॅन्ड वाटली चक्क... इतकं फसवतात का प्रेक्षकांना
काय राव बिबॉ... कसलं बोअर करताय... काहीतरी भारी आणा की....
मला पण तेच वाटले की त्या
मला पण तेच वाटले की त्या लोकांनी आत काय उत्तरे दिली आणि कोणी किती करन्सी जिंकली ते सर्वात शेवटी अनाउन्स करायला हवे होते मग मज्जा आली असती. आता हे असे केल्यामुळे नुसतीच भांडणे झाली. बाकी काही अर्थ नाही.
काल निकी अरबाज चे भांडण पण खोटेच वाटत होते. अभिजीत आणि तिचे इक्वेशन वेगळे आहे असे दिसते. अभिजीत आता चांगलाच मुरलेला प्लेयर दिसतोय. अंकिता, पॅडी पण चांगले जागे झालेत आता. टास्क लुटुपुटू चे असले तरी यांना जरा आता काही लक्षात येऊ लागलेय असे वाटते.
जान्हवीच्या बडबडीने पब्लिक चिडलेत अन आता तिच्या घरच्यांना त्रास होतो आहे वाटते. तिच्या नवर्याने पोस्ट केलेली दिसली एक.
Pages