बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर.आहे,केदार शिंदे जर खरच घरात जाऊन आले असतील तर त्यांनी सागितल असेल तिला की बाई ग,ती निक्की निघून जाईल हिंदीमध्ये,तुला इथेच राहायच आहे,तेव्हा जरा दमान घे.
निक्कीला पण फीडबँक येत असेल की कोणी कितीही गोगलगाय झाल तरी तुला मात्र भांडायचच आहे नाहीतर शो चालवण कठीण होईल.

मला आर्या आवडते...मस्त बिनधास्त खेळते,बोलते...पण अति जास्त emotional आहे ती...ती strong राहिली तरंच तिचा निभाव लागेल...week end ला तरी तिला positive feedback मिळायला हवा...अंकिता आज मस्त नडली निक्कीला...ती खूप हुशार आहे...बरोब्बर मुद्दे पकडून बोलते...निकि आणि अभिजीत totally emotionless वाटले आज....DP पण आर्यासाठी आणलेले ताट घेऊन गेला ते अज्जिबात आवडलं नाही...

मला आजचा एपिसोड एन्टरटेनिंग वाटला Happy भरपूर भांडणे आणि अनलाइअक्ली लोकांचे बाँडिंग. सगळे ग्रुप्स आणि फ्रेन्डशिप्स ची इक्वेशन्स बदलून कोणीही कोणाहीसोबत गॉसिप्स करत होते Lol निकीच बहुतेक सर्व कन्टेन्ट पुरवत होती. निकी - अभिजीत अँगल मुळे ही मस्त करमणूक झाली.
फॉर अ चेन्ज आर्यासाठी सगळे निकी विरुद्ध उभे राहिले तेही चांगले वाटले. वर्षा मात्र फनी आहे जाम!अचानक काहीही स्टँड घेते ती Happy किंवा एकदम इतके धडधडीत खोटे एमोशनल डायलॉग मारते की हसू येते.
एकूण हा आठवडा टीम बी ने गाजवला म्हणायला हरकत नाही

जान्हवीच्या खोट्या रडण्याची कलाकारांनीही खिल्ली उडवली आहे.

निक्कीने पायाने ताटल्या उडवल्या यावरही टीका होतेय.

वर्षा उसगावकरचे आर्या बरोबर रडणे बघून खरच हहपुवा झाली, काय तो फिल्मी सीन क्रिएट केला Biggrin
आज सगळे गृप फुटलेत बिचिंग करायला , बिबॉने आज टास्क दिले होते का अभि निक्की मैत्रीवर बोलयचे ?
जान्हवी काय मधेच पॉझिटिव वागायला लागली कि संपलं व्हॅम्पचं अ‍ॅक्टिंग ? Proud
अन्किता शेवटी छान नडली निकीशी.
हा सिझन किती अनप्रेडिक्टेबल आहे , कोण कधी कुठल्या गृप मधे घुसून कसं वागेल काहीच सांगता येत नाही !
निक्की बाकी कित्ती स्क्रीन टाइम घेते, 3/4th episode तिनेच व्यापलेला असतो !

तो फक्त प्रोमो. तिला कसलं बाहेर काढतायेत. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. टी आर पी खूप आहे ना बिग बॉसला तो ह्या लोकांमुळे असणार, चर्चा होते ना बाहेर. हे असं दाखवलं कारण कलाकार चिडलेत तिच्यावर आणि मनसेचे चित्रपट सेनावाले अमेय खोपकरही भडकलेत आणि केदार शिंदे कलर्स मराठी हेड मनसेवाले आहेत (किंवा होते). त्यामुळे तिचा अपमान केलेला दाखवतील पण बाहेर काढणार नाहीत. सीक्रेट रूममध्ये ठेऊन डोक्यावर बसवू नका म्हणजे झालं. थोडीफार उगाच शिक्षा देतील.

निक्की, बस नाम ही काफी है. कशात ही काही नसताना फुटेज कसे खायचे हे फक्त हिलाच माहिती. हिने अरबाजला सोबत घेऊन पूर्ण एपिसोड खाल्ला की राव आणि ब टीमला पुन्हा एकदा बावळट बनवले. वाढदिवस अगदी धमाकेदार साजरा केला तिने. नॉमिनेट आलेल्या दोन विक हाऊसमेट्स कधी सरळ (इरिना) तर कधी छुपा (आर्या) हल्ला चढवला आणि त्यांच्या पायाखालची जमीन हलवली.

धनंजयने आर्याचे जेवण काढले तेव्हा कोणालाच गेम कळला नव्हता त्यामुळे आणि त्यात तो त्यांच्याच ग्रुप मधील असल्याने त्यांना फुटेज घेता आले नाही पण निक्कीने गैरसमजातून विषय काढला तर यांना वाटले आपण निक्की वर भारी पडू पण ती सगळ्यांना पुरून उरली. शेवटी मग बावळट टीमने माघार घेतली.

आज धक्क्यावर बरेच विषय निघतील, त्यात पॅडी काका आणि जान्हवीचा विषय चघळला जाईल. पुन्हा तीच रडरड, पुन्हा तेच खोटेनाटे रुसवेफुगवे. असो, नॉमिनेट सदस्यांपैकी इरिना बाहेर जाईल असे वाटते.

वर्षा आजी आणि आर्याचा सीन कमालीचा बनावट/नकली/नाटकी होता. बाकी आर्या नंतर जेवली की उपाशी राहिली हे दाखवले नाही. त्यामुळे निक्की वाईट आणि आर्याला सहानुभूती मिळवून देण्याचा बिबॉचा प्रयत्न दिसतोय. तरी धनंजयने पुन्हा एकदा तिचे जेवण काढले (यावेळी तिच्या समोरील ताट काढले).

काल किती सगळ्यांची जान्हवीला सहानुभूती. रितेशला झोडायला लागलंच, बाहेर सर्व पब्लिक, कलाकार भडकलेले. नंतर जेलमध्ये बसूनही सुरू होतं नाटक.

एकंदरीत रितेशने सर्व मुद्दे घेतले असावेत आठवडाभराचे, मी एकच दिवस बघितलेलं त्यामुळे फार माहिती नव्हतं मला.

बॅडली मिसिंग मांजरेकर & सलमान खान!!

आता धक्क्यावर इतके झोडल्यावर निक्की आणि जान्हवी परत पुढच्या आठवड्यात निक्की आणि जान्हवीसारख्याच खेळल्या तर काय राहिली राव? आणि निक्की, जान्हवी सुतासारख्या सरळ झाल्या तर शो चालवणार कोण? लोकांना डिलेमा देतादेता मेकर्ससमोरच डिलेमा आलेला दिसतोय की या स्पर्धकांचे करायचे काय?

होस्टने इतक्या सरळसरळ हिंट्स देऊन आतल्या लोकांना शहाणे करुन सोडायची काही गरज नसते; सटली हिंट्स द्या; सर्काझम वापरा, जे थोडेफार शहाणे असतील ते घेतील हिंट्स आणि होतील शहाणे नाही तर ते असेही बाहेर पडतील आणि तेंव्हा कळतीलच त्यांना त्यांच्या चुका!! इतके स्पून फिडींग कशाला करायचे आतल्या लोकांना? त्यापेक्षा कलर्स मराठीचे FB पेजच्या द्या की त्यांना वाचायला!!

त्या वैभवला किती हिंट्स देऊन झाल्या की अरबाझ किंवा निक्कीविरुद्ध उभा राहिल्याशिवाय तू हिरो बनणार नाहीस पण तो काही ढिम्म हलत नाही.

पुढारी आणि डीपीला अनुल्लेखाने मारले ते बरे केले.... अश्या हिंट्स गेल्या पाहिजेत आत!!

आता इतक्या उघड क्ल्यूनंतर पण आतली इक्वेशन बदलली नाहीत तर मग काय बरे करेल रितेश?

बाकी ते जेल वगैरे अगदीच हास्यास्पद!!

आर्याला आणि पॅडीला काल डोक्यावर चढवले खरे पण दोघेही विनिंग मटेरिअल नाहीत
आर्याला टशन देता येते पण ती तितकाच माठपणा पण करते, पॅडीची त्याची त्याची लिमिटेशन्स आहेत; अंकिता मुद्दे चांगले मांडते पण अजूनही फ्रंट फूटवर येऊन खेळत नाहिये; डीपी बी ग्रूपची स्ट्रॅटेजी करतो म्हणे पण ऐनवेळी नमते घेतो आणि कायम तहाच्या तयारीत असतो, अभिजीत तर पक्का लूझर आहे, सूरजला ना गेम कळतो ना मुद्दे मांडता येतात, पुढारी फक्त निक्की आणि अरबाझचे पपेट होऊन राहिलाय!! बाकी उरतात चार व्हिलन
आता आणायचा कुठून या सीझनचा विनर??

टीम बी मधले एकतर सगळे खरच पिकनिकला आले आहेत.नुसत्या गप्पा.
शो चालवण्यासाठी जो काही धिंगाणामय कंटेंट लागतो तो फक्त आणि फक्त निक्कीच देत आहे.जान्हवी कॉपी कँट आहे.फिजिकल टासँक आला की टीम बी हरणारच,हे नक्की,बुध्दि वापरायचा टास्क आला की टीम बी एकमेकांचे पाय खेचणार.
सगळी मजाच गेली आहे.सगळ्यांचीच नाटक चालू आहेत.
धक्का काय तो प्रचंड टीआरपी घेत आहे कारण भाऊ पब्लिकला जे हव ते पुरवत आहेत,पण हे अस किती दिवस चालणार?अजून आठ आठवडे बाकी आहेत.
आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे नवीन चेहरे येणार आहेत.अर्थात त्यांना पढवूनच पाठवल असणार.बघू आता तज काय करतात?

तो प्रचंड trp पहिला कमी व्हायला हवा, त्याच्या जीवावर चाललंय सर्व. मग मेकर्स ताळ्यावर येतील, मागच्या आठवड्यात माझ्याकडून trp मिळाला नाही Lol

यावेळी जान्हवीला एवढं बोलले त्याचं कारण पब्लिक पेक्षा, मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना जातं, तिच्या विरोधात प्रचंड रोष होता, तिला नाटकीही म्हटलं गेलं.

Trp नसला तरी यापेक्षा मागचा सिझन नक्कीच बरा होता.

मला आवडला आजचा धक्का, ऑडियन्सचे सोशल मिडिया फिडबॅक घेऊन बरोबर भावना पोचवल्या रितेशने !
जान्हवी डिझर्व्ड ऑल द ह्युमिलेशन , उत्तम झालं तिला जेलमधे टाकून !
निकीला बोलल गेलं पण ती सोयीनुसार फिडबॅक घेणार, आपण क्वीन बी आहित हे ठळक झालय परत तिला !
त्या काही सुतासारख्या सरळ होणारच नाहीयेत पण इतर लोकां समोर जे बुलिंग करतायेत त्याची लेव्हल कमी झाली तरी पुष्कळ !
अभिजीत चॅनलचा फेवरेट आहे आणि महारष्ट्राच्या नाही पण बिबॉ टिमच्या नक्कीच आपेक्षा दिसतायेत त्याच्याकडून !
आर्याला कॉन्फिडन्स मिळालेला तिने घालवु नये आता, सूरज गायब झालेला परत दिसायची गरज आहे !

तेजुला द्या वाईल्ड कार्ड एन्ट्री आणि मीनललाही द्या, बी टीमतर्फे फिजिकल टास्कस खेळतील. त्या बिचुकलेला नका आणू.

मला हा सीझन आवडतोय. Happy अनप्रेडीक्टेबल आहे, ड्रामा भरपूर आहे, कन्टेन्ट आहे. बाकी ठराविक नेहमीसारखे आवडता ग्रुप /हिरो असे नाहीये हे खरे. पण इन्डिविजुअल कॅरेक्टर्स इन्टरेस्टिंग आहेत. मागचा सीझन महा बोरिंग होता. हा सीझन तसा नाही.
काल धक्क्यावर जान्हवीला भरपूर झापडले जात असताना ती तिचे नेहमीचे एक्सप्रेशन घेऊन बसली होती. डोळ्यात दोनच पाण्याचे थेंब आणि दोन च बोटे ओठावर अलगद, लिपस्टिक बिघडू कये इतपत. आधीच तयारी केली असावी.
स्पेसिफिकली अभिजीत चा मला फार राग नाही येत. डोके आहे त्याला. एक तर तिथे ग्रुप बी चा असा काही स्ट्रोंग बाँड नाही. कधी सूरज कधी आर्या कधी अंकिता कधी पॅडी असे एकेक जण कुठे कुठे शाइन करतात किंवा मातीही खातात. आर्या सोडक्ल्यास कोणी निकीशी पंगा घेत नाहीत. प्रत्येकच जण आपापले बघतोय किंवा कम्फर्ट प्रमाणे वागतोय.

मला मांजरेकरांपेक्षा रितेशचं होस्टिंग आवडतंय... मांजरेकर कधीकधी महत्त्वाचे मुद्दे सोडून द्यायचे आणि बरेचदा biased वागून वरुन माझी बॅट ,माझा बाॅल वाला डायलॉग...अस्सा राग यायचा तेव्हा...पण रितेश कुठेच biased वाटत नाही...मध्ये दोन week ends जरा boar झालं...पण यावेळी मजा आली...आर्याला अजून boost up करायला पाहिजे होतं ...पण ती हुशार आहे..तेवढीच hint घेऊन कदाचित छान खेळेल...अंकिता पण पुढे जाईल...आता ईरिना,वैभव आणि असाच शांत राहिला तर घनश्याम असे जातील बहुतेक घरी...मला सध्यातरी अंकिता,आर्या,अरबाज, निकि हे top 4 वाटतात...पाचवा DP किंवा सूरज असावा अशी ईच्छा आहे...

आई गं आज तो लाफिंग गॅस इन्हेल करून डायलॉग्ज बोलायचा टास्क होता तो फार फनी होता. वैभव च्या डायलॉग्ज ना मी हसून मेले Lol अभिजीत चे गाणे पण हहपुवा.
बाकी बिबॉनी एकदमच मोठी काडी टाकली आहे निकीला सगळे व्हिडिओज दाखवून.
जान्हवीने तेवढ्यात पुन्हा चक्कर आल्याचे नाटक करून फुटेज घेतलेच.

जान्हवीने मला नॉमीनेट करा, मला जायचंय करत चक्कर नाटक केलंच. खरं असलं तर हिला कोणी बोललं की त्रास होतो आणि ही हायपर होऊन सर्वांना वाटेल तसं बोलते action करत तेव्हा हिला चक्कर येत नाही, हा अटॅक तेव्हाही यायला हवा ना, त्यामुळे नाटकच जास्त वाटतं.

निक्कीला बिग बॉस ने सर्व व्हिडीओज दाखवले, मजा आली बघताना.

इरिना गेली बाबा एकदाची.

आज घनय्श्याम वर एकदम का बरसला रितेश ? इतकं काही झालं नव्हतं पण लुक्स लाइक हिज टाइम इज ओव्हर, पुढचा नंबर त्याचाच ! पॅडीने मस्त टोमणे हाणले त्याला आणि रितेशला इन्स्टिगेट केलं !
आज त्या हिलियम बलुन टास्कला हहपुवा झाली , वैभवचा आवाज :हहपुवा:
बाकी बिबॉ इज ऑल सेट टु शफल टिम्स , निकीला बरोब्बर सगळ्या चहाड्या ऐकवल्या , निकी आता यावर तुफान कन्टेन्ट देणार .. ती काही वैभव सारखी स्पाइनलेस नाही , बिबॉने हिन्ट देऊनही गप्प बसायला, ती आता अजुन एक्स्ट्रॉ तडका मारणार, अभिजीत बरोबर राहून पॉझिटिव वाट पकडायची शक्यताही नाकारता येत नाही !
आर्याला बुस्ट केलय , ऑडियन्सला ती या आठवड्यात आवडली आहे ,टॉप व्होट्स मिळाली असे सांगून, गुड फॉर हर, काय करते बघुया, तिलाही पेटवलय पण तिला काही आश्चर्य वाटल नाही चुगली बघून !
अजुनही कन्टेन्ट क्वीन निकीच आहे या सिझनची , हिरो कोण हे दर आठवड्यात बदलतय आणि इक्वेशन्स पण, उद्याच्या प्रोमोत आर्या जान्हवीला जाऊन मिळाली आहे आणि निकीविरुद्ध प्लॅनिंग करतेय जेलबाहेर तिच्यासोबत झोपून Uhoh
अभिजीतचा गेम मला काही केल्या आवडत नाहीये पण आता निकी आल्यावर बघु काय बदलतय !
इन्स्टाग्रॅम वर पाहिल कि मेघा आणि पुष्कर जाणारेत आत , नक्की कशाला जाणारेत, कितीवेळ असणारेत बघायला मजा येईल !

जान्हवी इतकी फेक स्पर्धक पहिल्यांदाच पाहिली बिबॉ मधे. बाहेर काढणार्/सीक्रेट रुम मधे टाकणार अशा सगळ्या अफवा निघाल्या आणि जेल मधे पाठवुन फुसका बार केला बिबॉ ने.
आर्या ने योग्य मुव्ह घेउन ईरीना ला घालवलं.. आर्या ने बरोबर नॉमिनेशन केलेलं हे आतातरी टीम बी ला कळायला हवं.. अभिजीत, अंकिता त्या दिवशी उग्गीच तिच्यावर चिडले होते. स्वतः नॉमिनेट झाल्यावर आपल्यापेक्षा वीक स्पर्धक म्हणुन ईरीना ला नॉमिनेट करण्याचा निर्णय योग्य होता.
ईरीना गेली बाबा एकदाची.. बरं वाटलं... एकदम मिस्फिट होती.
आर्या हुषार आहे आणि तिच्याकडे बरेचदा मुद्दे पण असतात तिला योग्य मराठी शब्द वापरुन बोलता येत नाही त्यामुळे समोरचा कन्फ्युज होतो असे मला वाटते.
पुढारी वर रितेश चिडला तो सीन बहुतेक आपल्याला पुर्ण दाखवला नाही. कट केला असे वाटले. अजुन काहीतरी पुढारी बोलला असेल रितेश ला.
आता पुढारी जाउदेत...
निक्की ला उचकवलंय...
आता निक्की, अभिजीत, अंकिता, पॅडी, डीपी असा ग्रुप होउ नये म्हणजे मिळवली Happy

वैभव ला किती हिंट दिल्या टीम बी लीड करायला.. काय हे..
पण एकंदर आठवडा बोअर झाला असला तरी धक्का चांगला झाला...

अभिजीतचा गेम हास्यास्पद झाला आहे पूर्ण . इकडे एक बोलतो तिकडे एक बोलतो . त्याला अंगाला काही लावून घ्यायचे नाहीये . आर्या मला पण आवडली . अक्कल नाही अक्कल नाही म्हणतात पण विकेंडच्या वार ला तिचे व्यवस्थित लक्ष असते . वर्षा उसगावकरला अभिनयातून जेव्हा जान्हवी बोलली होती तेव्हा कोणी जाऊन का भिडलं नाही असा प्रश्न रितेश ने विचारला होता ते बरोबर लक्षात ठेवून पॅडी च्या वेळी ती कोणाकडूनही सपोर्ट ची अपेक्षा न ठेवता तिला भिडली ते आवडलं मला . निकी तिला जेवणावरून बोलली पण तिथे हि तिने तमाशा न करता स्वाभिमान दाखवला ते आवडले मला .

मी जिओ सिनेमा अँप वर बघते बीबॉ त्यामुळे मला वोट कस करायचं कळत नाही . कोणी सांगेल का ?

आता इरिना गेली तर वैभव ने इंडिविज्युअल गेम दाखवावा . काड्या तर बीबॉ नि टाकल्या आहेत निकी ला व्हिडीओ दाखवून आता ती त्याचं फुल भांडवल करेल आणि भरपूर कन्टेन्ट देईल पब्लिक ला .

आर्या जान्हवी एकत्र आल्या तर पब्लिक votes आर्याला मिळतील की नाही शंका आहे. निक्की परवडली जान्हवीपेक्षा.

वैभवला पहिल्या आठवड्यापासून बिग बॉस indirectlly सांगत होतं अरबाझ निक्की ला सोडून दुसरीकडे लीड घे, मूर्ख तो मुर्खच राहिला, शेवटी काल टास्क मध्ये विचारलं तरी त्याने अरबाझला चुज केलं. धन्य आहे तो.

नॉमिनेट सदस्यांपैकी इरिना बाहेर जाईल असे वाटले होते, झालेही तसेच. बरे झाले, ती तशीही काही कंटेंट देत नव्हती. या आठवड्यात धनंजय नॉमिनेट झाला तर तो बाहेर जाईल असे वाटते.

जान्हवीची शिक्षा म्हणजे मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर. भुतिया प्रोमोत बाहेर आलेली दिसली. धक्क्यावर जे काही डोस दिल्या जातात त्याच्या कोणालाही फरक पडत नाहीये. बावळट ग्रुप काही करत नाहीये तर अग्रेसिव ग्रुपचे अग्रेशन कमी होत नाहीये. पॅडी काका, वर्षा आजी काही जागे होत नाहीये. निक्की जान्हवीची आरडाओरड कमी होत नाही. वैभव, अभिजित लीड घेत नाही. अंकिता फक्त शाब्दिकच्या बाहेर येत नाही. सूरज पुन्हा हरवला तर पुढारी पुन्हा माघारी गेला. बळच यांच्यापैकी 5 लोकांना फायनलला न्यावे लागणार म्हणून धडपड सुरू आहे.

सत्याच्या पंचनामा सारखे बकवास टास्क न आणता चांगले टास्क आणा आणि सोबतीला एक दोन तडकफडक वाइल्ड कार्ड.

काल धक्क्यावरच्या एकाही टास्कमध्ये सूरज नव्हता,त्या रुमानीने तो सोडून सगळ्यांना प्रश्न विचारले आणि सूरजला फक्त तिच्या सिरियलच्या हीरोसोबत गुलीगत नाचायला बोलावल,फुग्याच्या टास्कमध्ये होता फक्त बहुतेक.
रितेशने सांगितल पण त्याला की तुम्ही फक्त बोलता,क्रुती करत नाही.एवढ होऊनही आर्थिक परिस्थिती आणि तो रिअल आहे म्हणून वोट्स असतील आणि पाचात असेल तर मग निक्की आणि जान्हवीने खरच शो सोडून जाव.
बिबॉस किती म्हणजे किती काड्या घालत आहे.अरे,पाचवा आठवडा.सुरू झाला की,अजून वाईल्ड कार्ड नाही,ग्रुप फि क्स नाहीत, खुर्चीसम्राट टास्क नाही.
तोडा फोडा राजकारण इथेही करत आहे बिबॉस.
पण मला वाटत ,याचा फार काही फायदा होणार नाही,
टीम ए टीम एच राहिल,थोडा वेळ भांडतील आणि परत एकत्र येतील.
टीम बी तर माझ्यामते कागाळ्या करणारी टीम होणार आहे.
आर्यामध्ये होप्स दिसत आहेत,पण तरीही कुछ कमी है.
बिबॉसने तेल तर टाकल आहे,भबका उडाला त्याला हवा तसा तर ठीक ,नाहीतर लगेच गार पडायचा.
खुर्चीसम्राट टास्कसाठी हीच योग्य वेळ आहे.
निक्की/जान्हवी,अरबाज/वैभव,आर्या/अंकिता बघायला मजा येईल.

बायदवे कालच्या त्या टास्क मधे सरळच अरबाज ला विचारले गेले की तुम्ही सिंगल आहात का, तर त्याने न हेजिटेट करता कमिटेड रिलेशनशिप मधे आहे हे सांगितले तेव्हा आता निकी - अरबाज हे इक्वेशन संपले असेच धरायचे का/ बहुतेक. आर्या ला सुरुवातीपासून वैभव आणि अरबाज वर क्रश आहे. ती आता ए ग्रुप ( मायनस निकी) मधे जाते आहे असे दिसते. पब्लिक ला ते कितपत आवडेल शंका आहे. जान्हवी ने डोके चालवलेय की आता (इतक्या शिव्या खाऊन )ती निकी विरुध उभी राहणार. हे खरेच आहे की आवाज करण्याची कपॅसिटी आहे तिच्यात पण लोकांना निकीपेक्षा तिचा जास्त राग आहे. त्यामुळे आताही ए टीम च व्हिलन राहणार.

Pages