वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Trial - Netflix

एका १७ वर्षाच्या मुलीचा खून होतो. खूनाची केस लढणारी सरकारी वकिल त्या मुलीचीच जन्मदात्री आई असते. आरोपी असते एका उद्योगपती आणि राजकारण्याची मुलगी.

सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे दोन्ही बाजूंना आणि दोन्ही वकिलांना एकाच पातळीवर आणून ठेवलं आहे. एक बाजू खूप उजळ आणि दुसरी काळी असला प्रकार नाही. दोन्ही वकिलांची पात्र पण एकाच पातळीवर. त्यामुळे कोर्टरूम ड्रामा नीटपणे अनुभवता येतो.

सरकारी वकिल झालेली अभिनेत्री अगदी मख्ख चेहर्‍याने वावरते पण बाकी सगळ्या कलाकारांची कामे मस्त आहेत. शेवटी एक ट्वीस्ट आहे पण एक आख्खा एपिसोड बाकी असतानाच खटल्याचा निकाल लागतो त्यामुळे पुढे काही तरी ट्वीस्ट असणारच हे आधीच समजते त्यामुळे त्यातली मजा थोडी कमी होते.

कोर्टरुम ड्रामा आवडत असेल तर नक्की बघा.

संपवली मिर्झापूर. शेवटचे ४ भाग आधीच्या मानाने एन्गेजिंग होते.
-रॉबिन ला अगदी रागाने बेभान होऊन इम्पल्सिवली मारले त्या मानाने त्याने विशेष धक्कादायक काही केलेले नसते. जे केलेले असते ते अपेक्षितच असते की.
- कालीन भैया ने शेवटी जे केले ते स्वतःच्या उलट्या डोक्याने केले असते तर मजा आली असती. माधुरीने करायला लावले म्हणून केले ते कालीन भैया इमेज ला साजेसे नव्हते!
- त्यागीज ना पुन्हा लटकवले. ना इधर के ना उधर के.

Happy मिर्झापूर मध्ये मला एकदम शेवटच्या सीनला एक कळले नाही , गुड्डू गोलू ला भेटायला येतो..एका नावेत.
तर बाहेर उभी राहिलेली मुलगीच प्रथम गोलू वाटलेली. पण गोलू दारातून बाहेर येते. बाहेर पहाऱ्या वर सेम गोलू आणि गुड्डू सारखे दोघेजण ठेवण्याचं प्रयोजन कळलं नाही!
आणि ती झरीना खरेच धन्यवाद आहे. उगीच लाऊड .
बडे हा खरेतर छोटे असल्याचा संशय प्रेक्षकांना येत राहील असे खुबीने रंगवले आहे! Happy
ठीके ओव्हरॉल.
गुड्डू गोलू बद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटते हे खरे यश. त्या रॉबिन ला मारले का पण?
( तो आतून शरद ला सामील असतो का?)
गुड्डू चे वडील बेस्ट काम!
आणि बाहुबलींच्या मीटिंगा फारच विनोदी! Happy

मानव कौल ची नवीन सिरीज त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर बघितली का कोणी. नेटफ्लिक्स्वर आली आहे. सोबत ती सर मुव्ही मधली नोकराणी झालेली हिरॉईन आहे. नाव आठवत नाही. मस्त अ‍ॅक्ट्रेस आहे.
अजून बघायला सुरू केली नाहीये. पण दोघे कलाकार चांगले असल्याने होप सो चांगली असावी. एक मध्यमवर्गीय अकाऊंटंट काही परिस्थितीमुळे पुरूष वेश्या बनतो आणि सिचुएशन्स मधे अडकत जातो अशी कॉमेडी/केऑस स्टोरीलाईन आहे.

अंजली, माहिती नाही पण बघेन. मानव कौल फार आवडतो. तो सुंदर कविताही करतो. त्याचे कवितांचे अभिवाचनही सुरेख असते. अभिनयही छान असतोच. फरहानचे अभिवाचन नाहीच ऐकायला मिळाले तर मानव कौलचे असा 'बॅक अप' प्लॅन आहे. वेगळेच सुरू झाले...

बाई, बघताय ना? Wink फरहान अलर्ट.....

फरहान चा आवाज फाटलेल्या ड्रम सारखा आहे Wink
मानव कौल सिरीज काही मैत्रिणींनी बघायला घेतली पण आवडली नाही.. बिभत्स का कायतरी वाटली म्हणे.

टोटल फिदा. आवाजाचा एक स्वतंत्र फॅन क्लब हवा मला.>> फरहान अख्तर फॅन क्लब आहे ना इथे.

सोबत ती सर मुव्ही मधली नोकराणी झालेली हिरॉईन आहे. नाव आठवत नाही. >> तिलोत्तमा शोम

माधव - द ट्रायल - हिंदी आहे ?

मानव कौल सिरीज एक भाग कसाबसा पाहिला. सोडुन दिली. चांगली असेलही पण माझ्या प्रकारातली नाही. ती शोम अभिनय मस्त करते. यात ती फार क्रिपी वाटली. हे तिच्या अभिनयाचे व मेकप, कपड्यांचे, डायरेक्टरचे यश आहे. पण अंहं , पहावीशी वाटेना पुढे (अजुन तरी).

हो.फारच वीअर्ड आहे ती.फक्त मनोज वाजपेयी आणो कोंकणा सारख्या कलाकारांनी चांगलं काम केलंय म्हणून एकदा पाहिली.

असिता हो मी पण मानव कौल च्या फॅन गटात. त्याच्यासाठी म्हणून बघेन.
सी ए टॉपर ट्रेलर बघून किलर सूपसारखीच विअर्ड असेल असं वाटत होतं.

टोटल फिदा >>> अस्मिता फरहानच्या आवाजावर फिदा आहे, मानव कौलच्या नाही हे इंटरप्रिटेशन गृहीत धरून - मग तू जिंनामिदो मधले "...तो जिंदा हो तुम" अनेकदा ऐकत असशील ना?

फरहान बाफ ऑलरेडी आहे. पण तुझी फिदा लेव्हल किती आहे त्यावरून त्यावरच लिहायचे की त्याहून वेगळा सुपरफिदा बाफ काढायचा ते बघ. म्हणजे ९०ज मधे राजकुमार हा नुसता "राजा" नसे, तो "राजाओंका राजा" असे, तसे काहीतरी Happy

मानव कौल सिरीज काही मैत्रिणींनी बघायला घेतली पण आवडली नाही >>> काही इतर बाफवर "एका मित्राने" किंवा "एका मैत्रिणीने" चा प्रत्यक्षात अर्थ "मी" असा असतो. या बाफवर अजून तसा नसावा Happy

फा Lol
मी यातली कुठलीच सिरीज बघत नाहीये खरंतर पण या चर्चा वाचायला मजा येते आहे.
मी सध्या नेटफ्लिक्सवर Exploding kittens पाहते आहे. जाम धमाल सिरीज आहे ही. देव कामचुकारपणा करतो म्हणून त्याला शिक्षा म्हणून मांजररूपात पृथ्वीवर पाठवतात अशी स्टोरीलाईन आहे. काही पंचेस अगदी जबराट आहेत.

तू जिंनामिदो मधले "...तो जिंदा हो तुम" अनेकदा ऐकत असशील ना?
>>> ते मिलियन्स ॲन्ड मिलियन्स व्ह्यूज माझेच आहेत. Happy

राजाओंका राजा" असे, तसे काहीतरी >>> Lol बहुतेक हेच आहे.

ते मिलियन्स ॲन्ड मिलियन्स व्ह्यूज माझेच आहेत >>> Lol

मी यातली कुठलीच सिरीज बघत नाहीये खरंतर पण या चर्चा वाचायला मजा येते आहे. >>> र्म्द, डेडली आत्या सुद्धा? Happy

र्म्द, डेडली आत्या सुद्धा? >>> डेडली आत्या पहायचा योग नाही म्हणून नाही पहात आहे Happy मला सापडली नाही.

पण मी मध्यंतरी 'कुलवधू' पहायचा प्रयत्न केला होता. हे चालेल का पापांचं परिमार्जन म्हणून Proud

हो टोटली. शेवटी सगळ्या सिरीज सारख्याच. एक खाष्ट किंवा प्रेमळ सिनीयर व्यक्ती. एक अलका कुबल प्लस आशा काळे. एक दोन कोणत्याही प्रसंगी अकारण खत्रुट रिअ‍ॅक्शन देणार्‍या स्त्रिया, तर एक दोन कोणत्याही प्रसंगी अकारण माना डोलावणारे लोक. एक दोन दाढीवाले गरिबांचे कोहली तरूण. ते चांगले किंवा वाईट असले तरी त्यांच्या अवतीभोवती नाचणारे कुटुंब. मोठे घर, मोठे किचन. मोठे आडनाव. टोटल सरंजामी डौल. Happy

आजकाल ओपन ऑफिस प्लॅन्स असतात तसे ओपन बेडरूम प्लॅन्स असतात यांच्या घरांचे. कोणी कधीही कोणत्याही प्रसंगात बिनधास्त घुसतात.

फा Rofl हल्लीच्या सिरिअल्ससाठी ते कोहली तरूण अगदीच रिलेट झाले. पण कुलवधू मधे मात्र गुळगुळीत दाढी केलेला सुभा आहे Wink आणि सरंजामी डौल तर जाऊचदे, इथे आख्खे रणवीर राजे आहेत Proud त्यांचा दरबार भरवत असतात ते फुलटू! सोशिक, कुबलीक वगैरे रोल मधे निशिगंधा वाड आहे. हिरोईनला खाष्ट काकू आणि चुलतबहीण आहे. शिवाय तळ्याशी बोलणारी बहिण आहे. ती तळ्याला 'तळोबा' अशी हाक मारत असते. बहिणीला एक नक्षलवादी बॉफ्रे आहे. आणि उसुलोंका पालन करनेवाला आजोबा म्हणून साक्षात सदाशिव अमरापूरकर आहे Lol

थोडीशी आधी आलेली सिरिअल असल्याने स्टारकास्ट तगडी आहे. पण मी जेमतेम सुभा आणि पूर्वा गोखलेच्या लग्नापर्यंत पाहू शकले कुलवधू. जाम पकाऊ आहे. शिवाय दर थोड्या वेळाने त्यात टँटँटँ टँटँटँ टँटँटँटँटँटँ अशी सनई वाजते टायटल साँगच्या चालीवर.

कुबलीक वगैरे रोल मधे निशिगंधा वाड आहे >>> Lol

त्यांचा दरबार भरवत असतात ते फुलटू! >>> सही! याच्या तुलनेत सरंजामी डौल म्हणजे खासदारापुढे नगरसेवक.

मी विचारणारच होतो की जुनी आहे का. कारण नाव आधीही ऐकल्यासारखे वाटले.

आता खरे म्हणजे कुलवधू पेक्षा कूल वधू असलेल्या व्यक्तिरेखांची गरज आहे Happy

कुलवधू पेक्षा कूल वधू असलेल्या व्यक्तिरेखांची गरज आहे >> Lol
कुबलीक वगैरे रोल मधे निशिगंधा वाड आहे >> Rofl

rmd >> राजकारणी इला भाटे राहिली ना कुलवधू स्टारकास्टमध्ये Happy

पायस Rofl हो रे! खरंतर मला त्या चुलत बहिणीबद्दल पण दोन शब्द लिहायला आवडले असते. पण ते असोच Proud याशिवाय खवट सासूच्या भूमिकेत आशालता आहे आणि एक गरीब गाय (पन इंटेंडेड) काका पण आहे.

राजाओंका राजा" असे, तसे काहीतरी >>> Lol

एका मैत्रिणीने" चा प्रत्यक्षात अर्थ "मी" असा असतो. या बाफवर अजून तसा नसावा >>> ते गृहशोभिका मधले माझी समस्या कॉलम ला लागू होतय. मी तर प्राऊडली सांगते की मी मुझसे दोस्ती करोगे थेटरात पाहिलाय Sad

मिर्झापूर बघायची राहिली होती.... एकदम तिनही सीझन बिंज वॉच केले Wink
काही (म्हणजे तश्या बऱ्याच) गोष्टी अ आणि अ आहेत पण तरीही एकामागून एक एपिसोड बघायला लावण्याइतकी उत्सुकता टिकवून ठेवतात..... त्यात बराच वाटा कलाकारांच्या अभिनयाचा पण आहे!!
तिसऱ्या सीझनचा शेवट बघता चौथा सीझन नक्की येणार Wink

Pages