वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Hijacking of Flight 601 - Netflix वर आहे. सत्तर च्या दशकाच्या सुरूवातीला घडलेल्या घटनेवर आधारलेली गोष्ट आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर उत्कंठा शेवटपर्यंत ताणून ठेवली आहे.
Murder in Maheem - Jiocinema. विजय राझ, आशुतोष राणा, शिवाजी साटम अशी तगडी स्टार कास्ट आहे. अभिनयाची बाजू ह्या तिघांनी चांगली सांभाळली आहे. कथा ठिकठाक. LGBTQ angle आहे.

गुल्लक इथे संपला तरी चालेल.
छान होता हा पण सिझन. मुलं मोठी झाली Happy
मिश्राजी एकदम फिट झालेत रोल मधे. अनु पण छान काम करतो. घरचा होतकरू हाताशी येणारा मुलगा एकदम परफेक्ट दाखवलाय.

मला पण आवडला बरं का पंचायत-३ सिझन. सगळंच गोड वाटलं. सर्वांनी लिहिलं आहेच त्यामुळे नवा मुद्दा नाही. सिझन-२ पहायचा राहिलाय. त्यात माझी पंचाईत झालेली म्हणुन पहायचा राहिला. मिष्टर सुनिधींनी तो सिझन गपचिप पाहुन टाकला. त्यामुळे मी लावला तेव्हा पॉईंटर शेवटच्या भागावर होता जे मला कळलंच नाही. आणि डायरेक्ट रडारडच सुरु झाली. २-२ वर्षांनी सिझन आणले ही असं होतं. मागे काय झालं ते विसरतं माणुस. त्यामुळे वाटलं हा पुढचा भाग असेल किंवा आत्ता जे चाललंय त्याचा प्लॅशबॅक नंतर दाखवतील. पण कसचं काय. तो शेवटचा भाग आहे हे संपल्यावरच कळलं. तेव्हा आता सिझन२ पहाण्यात येईल.

ललिताप्रिती, आता मी ‘हाऊ टु गेटवे’ पाहु शकेन कारण मायबोलीकरांनी कामपिपासुचा अर्थच बदलुन टाकलाय Proud आणि तु कापि वर विनोदी लेख पाडु शकशील इतका ऐवज तुला ‘हाऊ टु‘ मधुन मिळाला असावा अशी मला अंधुक शंका येत आहे Proud

झाला पाहून पंचायत ३ सीझन. मलाही सुरुवातीला स्लो वाटला. नंतर मजा आली. शेवटी मारामारी वगैरेच्या भागापासून लॉजिक जरा हरवले आहे पण चलता है, मजेशीर होते तेही भाग. यातले एकेक अ‍ॅक्टर्स असले भारी आहेत, कुठून आणले असतील हे लोक असे वाटते! भूषण सोबत चे दोघे, ( विधायकजी, आपको बिपी है पानी पिजिये वगौरे भलत्याच वेळी म्हणणे!) , तो जावई, विधायक ने पाठ्वलेले गुंड, तो बम्बहादूर तर फारच आवडला Happy
यातले निगेटिव कॅरेक्टर्स पण माफकच निगेटिव आहेत. आखडू जावई गरजेला सासरच्या गावासाठी उभा राहतो, भूषण आणि त्याची माणसे विधायक ला गावत खून खराबा नको म्हणुन गयावया करतात, विधायक पण बम बहादूर ला ठार वगैरे न मारता फक्त पाय मोडायला सांगतो, अन ते काम न जमलेल्या त्या दोन लोकांना पण मारत बिरत नाही फक्त ओरडतो आणि हाकलून देतो. शिवाय घोड्याला विकताना रडतो वगैरे. सगळ्यांना सॉफ्ट साइड आहे!

ते दोघे महान येडे आहेत.मागच्या वेळी पण मारामारी आधी कोणाच्या पट्ट्याने मारायचं याची डिटेल चर्चा करत बसली होती.यावेळी ज्याचे पाय तोडायचेत त्याच्याचबरोबर बिड्या फुंकत प्रोजेक्ट प्लॅन ठरवतायत Happy

द मा मिरासदारांची कॅरेक्टर्स जर हिंदीत आणली तर पंचायत सारखी मस्त वेबसिरीज होईल.
गणा मास्तर, नाना चेंगट, शिवा जमदाडे, बाबू पैलवान. धमाल येईल.

कोणी Bridgerton सीझन ३ पाहतंय का? त्यात बहुधा तिसऱ्या भागात, राणीची केशरचना एकदम उल्लेखनीय आहे. केसांच्या उंच टोपात एक गुहा आहे. टोपाच्या मागील बाजूस काही चांदीच्या तारांच्या वेली आहेत. गुहेच्या आतमध्ये जंगल असावं तशी चांदीची झाडं आहेत. बहुधा तळे सुद्धा असावे. कारण आपल्याला काचेचे हंस पोहताना दिसतात. गुहेत मंद उजेड आहे.
राणीची केशरचना आहे की चाळीतल्या गणपतीची आरास?

राणीची केशरचना आहे की चाळीतल्या गणपतीची आरास? >>>> Lol Lol

द मा मिरासदारांची कॅरेक्टर्स जर हिंदीत आणली तर पंचायत सारखी मस्त वेबसिरीज होईल. >>> अगदी अगदी. ते आपल्या माबोवरचे एक लेखक पण अगदी मिरासदारी किंवा शंकर पाटील शैलीत लिहायचे. एक दोन कथा वाचल्यात.

त्यात बहुधा तिसऱ्या भागात, राणीची केशरचना एकदम उल्लेखनीय आहे>> Lol हो. बघता बघता एकदम मागे काहीतरी हलल्यासारखं वाटलं, म्हणून परत बघितलं तर उच्च दर्जाच्या क्रिएटिविटीला मी मुकले होते.
खरं तर ह्या वेळी कथानकापेक्षा राणीच्या केश रचनेतच जास्त नावीन्य आहे.

ही हेअरस्टाइल व्हायरल झाली होती Happy बहुधा चर्चा व्हावी म्हणूनच केली असावी!
queen.jpg
ते आतले हंस दिसताहेत ते हलत होते.
माझा बघून झाला हा सीझन. यावेळी बर्‍याच लव स्टोर्‍या एका सीझन मधे घातल्या आहेत!

आई आई आई गं. ती कीचेन असते लांबलचक गोल गोल, टू व्हीलरला वगैरे ते आठवलं. त्या असंख्य एकत्र करून मुकुट केलाय Lol

मैत्रेयी राणी मुकुट दर्शनासाठी धन्यवाद. धमाल एकदम.

बघितला Bridgerton S3. हा season खूपच dramatic आहे.
Part 1 बघून माझी excitement वाढलेली. Part 1 मस्त आहे.
पण part 2 मध्ये बऱ्याच गोष्टी एकत्र दाखवल्यात. Francessca - Kilmartin, Violet - Anderson, मग परत Lady Whistledown च सत्य बाहेर आल्यावर थोडं serious होतं सगळंच. ह्या side stories मुळे Polin romance बाजूलाच राहिला. Polin च्या बाबतीत खूप घाई घाई केल्यासारखी वाटली... Interviews नुसार s4 मध्ये दोघं असणार आहेत, नशीब!
Pen आणि Colin एकत्र किती गोड दिसतात! Favourite Bridgerton couple!!

ब्रिजरटन ची तुलना हीरामंडी शी करता येईल. Happy फार ऑथेन्टिक, फार डीप काही बघायला मिळेल अशी अपेक्षा करायची नाही पण व्हिजुअली सुंदर, आणि जास्त डोके नाही लावले तर टिपी करमणूक होईल. यावेळच्या डेब्युटन्ट्स मधे फ्रॅन्चेस्का फार गोड आहे. केट आणि अ‍ॅन्थनी ला लोकाग्रहास्तव आणले पण करण्यासारखे काहीच नव्हते. नंतर शेवटी रँडमली इंडियाला गेले असे जाहीर करून टाकले. एलॉइस ला कशाला स्कॉटलंड ला पाठवलं कळले नाही, मला ती फार आवडते, बेनेडिक्ट ऐवजी तिची स्टोरी बघायला आवडेल मला. पेन- कॉलिन ची स्टोरी एकदमच रश्ड वाटली.
बेनेडिक्ट ची सध्याची स्टोरी क्रिन्ज वाटते आहे. दाखवले तरी कशाला असे वाटले.

शेवटी रँडमली इंडियाला गेले असे जाहीर करून टाकले >>> केट पीएनजी कडून सोन्याचा सेट घेऊन आलेली आहे बहुतेक तिकडून Proud अगदी ओळखीचं वाटतंय डिझाईन.

बेनेडिक्ट ची सध्याची स्टोरी क्रिन्ज वाटते आहे. दाखवले तरी कशाला असे वाटले. >>> + 1

एलॉइस ला कशाला स्कॉटलंड ला पाठवलं कळले नाही, मला ती फार आवडते, >>> हो खूप मस्त आहे ते character. तिची आणि पेनची मैत्री पण खूप सुंदर आहे.
SPOILER ALERT
पुढे तिचं लग्न Philip Crane सोबत होतं. (Marina thompson चा नवरा, Marina च्या death नंतर दुसरं लग्न)

हे कोणी आधी लिहीलंय का ते माहित नाही पण Bridgerton भावंडांची नावं ABC... क्रमाने आहेत.

Anthony, Benedict, Colin, Daphne, Eloise, Francesca, Gregory, Hyacinth.

पुस्तकात कसे आहे ते माहिती नाही पण पेन आणि कोलिन ची लव्ह स्टोरी जास्ती चालली असती. तिने पत्रात काय लिहिले आहे वगैरे भाग पण आवडला असता.

Game of Thrones मी अजुनही पाहिलेली नाही. त्याकरता २-४ महिन्याचे HBO चे सभासदत्व घेऊन पहायच्या योग्यतेची आहे का? त्यावर अजुन काही पहाण्यासारख्या मालिका आहेत का?

Yes, HBO वर बऱ्याच चांगल्या वेब सिरीज आहेत. एक Sharp Objects सोडता, Surprisingly आता तरी फक्त हिंदी आठवत आहेत. (. सगळे OTT platform पहात असल्याने कुठे काय पाहिलं आठवत नाही)
हिंदी सिरीज -
Spl ops
Human
आर्या
आणि पाहण्यालायक अजुन भरपूर आहेत.

खरं तर केवळ GOT साठी subscribe केलं तरी देखील पैसा वसुल आहे.

Yes, HBO वर बऱ्याच चांगल्या वेब सिरीज आहेत. एक Sharp Objects सोडता, Surprisingly आता तरी फक्त हिंदी आठवत आहेत. (. सगळे OTT platform पहात असल्याने कुठे काय पाहिलं आठवत नाही)
हिंदी सिरीज -
Spl ops
Human
आर्या
आणि पाहण्यालायक अजुन भरपूर आहेत.

खरं तर केवळ GOT साठी subscribe केलं तरी देखील पैसा वसुल आहे.

Pages