वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू अमितव.
दोन धागेच सापडले. एक वेबसिरीजवर आणि दुसरा ओरिजिनल पुस्तकांवर.
मला पडलेले प्रश्न थोडेफार इतरांना पण पडलेत हे बघून बरं वाटलं. आता पुस्तकं वाचावीशी वाटायला लागली Proud

फारेण्ड, कितना और ना जाने क्या क्या देखत हो. >>> Happy बघतो बरेच हे खरे आहे. पण तुम्ही व इथले इतर दर्दी लोकही तितकेच बघत असावेत. इतर एक दोन धाग्यांवर बघितलेत तर मी बरेच काही आधी बघितलेल्या पिक्चर्/सिरीज बद्दल लिहीले आहे Happy गेल्या ४-५ दिवसांत नवीन असे हेच बघितले आहे.

११.११ क्राईम इन्वेस्टिगेशन + सायन्स फिक्शन ( खरे तर सुपर नॅचरल) अशा फॉरमॅट मधली उत्कंठावर्धक मालिका आहे.

एका २०१६ सालातल्या तरूण अधिकार्‍याला १९९० सालातल्या एका बंडखोर पण प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याचा अकरा वाजून अकरा वाजता एका बंद पडलेल्या वॉकी टॉकी वर कॉल येत असतो. त्यातून ९० च्या अधिकार्‍याला केसचं भविष्य तर २०१६ तल्या अधिकार्‍याला भूतकाळातल्या घटना समजत असतात.

फा Lol

११.११ क्राईम इन्वेस्टिगेशन >>> थोडीशी 'दोबारा (२.१२)' सारखी आहे का?

नाही तर रॉस म्हणेल रेचेल येत आहे >>> Happy
तो फार मेसी रोमॅंटिक एपिसोड होता. तरीही ती एमिली प्रयत्न करते बिचारी.

दोबारा आता बिल्कुल लक्षात नाही.
यात जुन्या केसेस पाहणारे एक युनिट असते. त्या विशिष्ट वेळी फक्त एक मिनिटांसाठी दोघांमधे कम्युनिकेशन होत असते.
सुरूवातीला दोघांनाही माहिती नसते कि ते वेगवेगळ्या टाईमफ्रेममधे आहेत. ते दोघेही एकमेकांना आपापल्या कालखंडात शोधत असतात.

फा Lol
ती एमिली पण चांगली होती.मला तिचे केस आणि हेअरकट खूप आवडायचा.

ती दुसरी ग्फ्रे. थोडा चायनिज लूक वाली ती तर परफेक्ट होती रॉस साठी. एमिली आधी परफेक्ट होती मग चुकीचे नाव घेतल्या नंतर जरा जास्त झाला डॉमिनंस..असो.

एमिली इन पॅरीस बघणेत येईल Happy

एमिली आधी परफेक्ट होती मग चुकीचे नाव घेतल्या नंतर जरा जास्त झाला डॉमिनंस..असो. >> तेवढेच नाही - नंतर ती हनीमून ट्रिपकरताही आलेली असते एअरपोर्टवर पण रॉस तिच्याशिवायच निघालेला तिला दिसतो (रेचेल पुढे विमानात ऑलरेडी बसलेली असते) Happy

ज्यूली, हो ज्यूली पण चांगली होती.मोना पण.पण काय करणार.दिल का मामला.ज्यूली ला रस मिळालाच. सेम बारगेन.
मला रेचेल ला मार्क सोबत आणि रॉस ला ज्यूली किंवा मोना सोबत बघायला आवडलं असतं, या दोघांचं जुळलं नसतं तर.

सीए टॉपर बघायचा प्रयत्न केला, ए च्या निकषात बसणाऱ्या आणि नुकत्याच 18 पूर्ण कुटुंबलोकांबरोबर.मला खरं तर ए साठी पण जास्त वाटला.आम्ही 25 मिनिटात बंद केला.अजून एखादी अल्ट्रा ए वगैरे सेन्सर रेटिंग श्रेणी काढावी.विषय मजेशीर आहे, पण फॅमिली बरोबर बघायला जरा जास्तच रोखठोक झालं.
विद्या बालन चा सुलू पण कॉल्स बद्दल होता.पण तो युए आणि अतिशय व्यवस्थित चित्रित केलेला होता.(जाऊदे आपण आपलं एकटं बसून किम्स आणि फ्रेंड्स बघत राहावं.)

नंतर ती हनीमून ट्रिपकरताही आलेली असते एअरपोर्टवर पण रॉस तिच्याशिवायच निघालेला तिला दिसतो (रेचेल पुढे विमानात ऑलरेडी बसलेली असते>>>> हो +१ किती सहन करेल ती पण..
विषय भरकटतोय, गप्प बसते

मला एमिली इन पॅरीस मधला गॅब्रिएल फार फार आवडतो.
S3 मधील शेवटचा एपिसोड - शराड ... फारच मस्त होता.

Zee 5

एमिली इन पॅरीस मधला आल्फी सोडून सगळेच चांगले आहेत. सिल्वी आणि एमिली मधले पहिल्या सिझन मधले संवाद भारी होते! मिंडी पण मस्त आहे एकदम. तिचं ते गाणं पण मला खूप आवडतं.

आल्फी आउट ऑफ प्लेस वाटतो एकदम, दुसर्‍याच एखाद्या सेरीज मधले कॅरेक्टर पाहुणा म्हणून यावं तसा.
एमिली इन पॅरीस आवडते. ग्लॅम + गुड वाइब सीरीज! एमिली सगळे सगळे पी आर इश्यूज चुटकीसरशी सॉल्व करते ते जरा फार कन्विनियन्ट वाटतं पण ठीके. बघायला मजा येते .
सीरीज मधे मी काय किंचित मिस केले असेल तर एक मेक ओवर पार्ट. एक वेल नोन स्टिरिओटाइप आहे ( तो खराही आहे) की अमेरिकन्सचे फार कॅजुअल ड्रेसिंग असते याउलट फ्रेन्च जनरली फॅशन कॉन्शस आणि वेल ड्रेस्ड असतात. डेविल वेअर्स प्राडा मधे अ‍ॅन हॅथवे चा कसा मेक ओवर दाखवला आहे तसा यात बघायला आवडला असता. पण यात एमिली आधीपासून फार वेल ड्रेस्ड आहे.

११/११ सहा एपिसोडस संपले.
सुरूवातीला १५ वर्षे होऊन ज्या केसेस मधे प्रगती झालेली नाही त्या केसेस बंद करण्याचा कायदा संसदेने पास केलेला आहे. १५ वर्षांपूर्वी गायब झालेल्या आणि नंतर तिचा खून झाला हे उघड झालेल्या अदितीच्या आईच्या धरणे आणि उपोषणाने पोलीस खात्याची इज्जत वेशीवर टांगलेली आहे. ही केस नव्या कायद्यानुसार बंद व्हायलाआता ७२ तास असतात, तिकडे सोशल मीडीयातून आदितीच्या आईला मोठा सपोर्ट मिळत आहे.
पोलीस महानिरीक्षकांचं म्हणणं आहे कि ज्या केसचा तपास १५ वर्षात लागला नाही तो ७२ तासात कसा लागेल ? हा कायदा इंटरेस्टिंग आहे. टाईमलिमिट आहे आणि टाईम ट्रॅव्हल पण आहे. या टाईम ट्रॅव्हलला कुठलेच एक्स्प्लेनेशन दिलेले नाही. तसे संवादात म्हटले आहे. हे पटले. पण सहाव्या एपिसोडमधे समय एक भ्रम आहे , अद्वैताचे अध्यात्म वगैरे आल्यावर शेकडो युट्यूब व्हिडीओज फेर धरून नाचू लागले. पण हा उल्लेख चपातीला तेलाचा हात लावावा इतकाच असल्याने क्षम्य आहे. सायन्स फिक्शन म्हणून न पाहता सुपरनॅचरल म्हणूनच बघत आहे.

लॉजिक (किंवा डोकं) बाजूला काढून ठेवता येत असेल (साऊथच्या सिनेमांची सवय असेल तर) एंगेजिंग आहे.
दोन केसेस संपल्या. भूतकाळातल्या प्रत्येक केसचा इन्व्हेस्टिगेशन ऑफीसर शौर्यच असतो हा योगायोग पचवावा लागतो. मग काही प्रॉब्लेम नाही.

प्रत्येक केसचा इन्व्हेस्टिगेशन ऑफीसर शौर्यच असतो >>> असल्या गोष्टींची सवय आहे. Monk मधे सगळ्या केसेस Stottlemeyer कडेच येतात किंवा अदालत मधे सगळ्या केसेस दवे कडेच येतात हे अंगवळणी पडलंय Proud

सुपरनॅचरल म्हणूनच बघत आहे >>> केवळ या गोष्टीसाठीच बघेन बहुधा.

अदालत मधे सगळ्या केसेस दवे कडेच येतात >>> Lol
बरोब्बर Proud

आठवा आणि शेवटचा भाग संपला. पुढच्या सीझनसाठी म्हणून हा असा रासवट, तुसडा शेवट का केला ? (अनपेक्षित शब्द सौम्य वाटला म्हणून).
कुठे संपवावा सीझन याचे नियम बनवावे लागतील.

क्लिफहँगर वर सीझन संपवणार्‍या सिरीअल्सची मला भीती वाटते. सीझन २ नाही आला तर बेकार लटकतो आपण. नेटफ्लिक्सने अश्या अनेक करामती करून ठेवल्या आहेत.

Treason - Netflix

ब्रिटीश हेर खात्याच्या (MI6) प्रमुखावर विषप्रयोग होतो. तो मरत नाही पण त्याला हॉस्पिटलमध्ये रहावे लागते. त्याच्या गैरहजेरीत MI6 च्या उपप्रमुखावर (अ‍ॅडम) त्या पदाची जबाबदारी येते. ऑफिस सांभाळल्याबरोबर तो एका व्यक्तीला भेटतो - ती असते एक रशीयन हेर (कारा) आणि तिनेच MI6 च्या प्रमुखावर विषप्रयोग केलेला असतो. अ‍ॅडम कधी काळी अझरबैजान मध्ये पोस्टेड असतो तेंव्हाची त्याची ती प्रेमिका असते. तिने दिलेल्या टिप्समुळेच तो सगळ्यात यंग उपप्रमुख झालेला असतो आणि आता काराला त्याच्याकडून काही तरी हवे असते.

त्याच वेळेला CIA चे एक पथक UK मध्ये लँड होते. त्यांना अ‍ॅडमच्या इतक्या लहान वयात उपप्रमुख बनण्यामागे काही काळेबेरे असल्याचा संशय असतो. त्या पथकाची प्रमुख अ‍ॅडमच्या बायकोची (मॅडी) मैत्रीण असते. ती तिच्यामार्फत अ‍ॅडमवर पाळत ठेवायला लागते.

तीन देशांची तीन हेरखाती, त्यातल्या माणसांचे हेवेदावे, त्यांची रहस्ये, प्रत्येकाचा स्वार्थ अशा अनेक कंगोर्‍यांतून मालिका रंगत जाते. वेगवान असल्यामुळे जराही कंटाळा येत नाही. पाच भागांत पहिला सिझन आटोपला आहे. दुसर्‍या सिझनला फुल स्कोप आहे पण पहिल्या सिझनमध्ये व्यवस्थीत क्लोजर दिलेले आहे त्यामुळे आपण लटकल्याची भावना उरत नाही. पात्रनिवड, त्यांचा अभिनय एकदम योग्य आहे.

जास्त काही लिहिले तर कथेतले रहस्यच उलगडल्यासारखे होइल, म्हणून इतकेच.

माधव, नोटेड.
तुझे रेको नेहमी छान असतात.

मालिकेचे नाव - मनोरथंगल.
लेखक - एम टी वासुदेवन नायर (वेगवेगळ्या कथा)
एपिसोड १ - ओलवम थिरूवम - दिग्दर्शक प्रियदर्शन - कलाकार मोहनलाल
निवेदन - कमल हसन
अन्य भागात (कथेत) मामुट्टी, फहद फजल, दुर्गा कृष्णा, अनुमोल, अपर्णा बालमुरली, पार्वती , मधू असे दक्षिणेचे ख्यातनाम कलाकार आहेत.

अन्य दिग्दर्शक - संतोष सिवन, पा रंजीथ, महेश नारायणम, जयराज, शामाप्रसाद ,अस्वथी हे आहेत.
https://www.thehindu.com/entertainment/movies/manorathangal-series-revie...

Those About to Die पुढे बघत आहे (पीकॉक). खूप एंगेजिंग आहे. ५-६ भाग झाले.

अ‍ॅपल टीव्ही+ वर विन्स वॉनची एक नवीन सिरीज आली आहे. ट्रेलर मजेदार वाटत आहे. विन्स वॉन कॉमिक रोल मधे सुपर धमाल असतो ("वेडिंग क्रॅशर्स")

Pages