वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोटा फॅक्टरीचा नवा सिझन बघून संपवला. मस्त आहे मला आवडला.
शेवट तसा अपेक्षित, तसा अनपेक्षित होता. शेवट बघून रुखरुख वाटली. जितू भय्या आणि बाकी सगळ्यांचीच अ‍ॅक्टींग मस्त! त्या मीनाच्या तोंडी असलेली हिंदी भाषा मस्त आहे एकदम!
ह्या सिझनचा शेवट बघून पुढचा येणार नाही असं वाटतं आहे. अर्थात कथा फिरवायचीच म्हंटली तर कशीही फिरवता येते, पण असा शेवटच चांगला आहे.

हो.सिझन हलका फुलका नाही, पण एकदम रिअलिस्टीक आहे.बहुतेक सिझन 4 आणतील म्हणतात.पण सांगता येत नाही.
जीतू भैय्या चा आंतरिक स्ट्रगल, मीना ची लढाई, उदय चं पात्र सर्व खूप चांगलं घेतलं आहे.गगन सरांना फार वाव दिलेला नाही पण डोळ्यातून अभिनय छान करतो.रोसेश च्या अगदी विरुद्ध पात्र.

The Freelancer hot star वर बघितली आज..चांगली आहे..मोहित रैना आणि अनुपम खेर सोडला तर फार कोणी ओळखीचे नाहीयेत..सीरिया मध्ये फसवून नेलेल्या एका मुलीला तिथून सोडवून आणतात अशी storyline आहे... कुटुंबासोबत आरामात बघू शकता...शिव्या नाहीत... बेड सीन्स नाहीत...माझ्यासाठी सरप्राइज पॅकेज म्हणजे मेन लीड ती मुलगी..कश्मिरा परदेशी म्हणून आहे...गोड आहे..काम पण छान केलय...साऊथ मध्ये बरच काम केलय अस विकी वर वाचलं.. थ्रिलर सिरीज आवडत असतील तर बघायला हरकत नाही.

चूना (वेब सिरीज, नेटफ्लिक्स)
ट्रेलरमध्ये जिमी शेरगिल दिसला म्हणून केवळ बघायला सुरुवात केली.
टाइमपास आहे, 'डेल्ही बेली'टाइप ट्रीटमेन्ट आहे.
एक भ्रष्ट मंत्री, आमदारांच्या घोडेबाजारात त्याला प्रचंड पैसा मिळतो, पण दरम्यान त्याच्यामुळे नाडले गेलेले ४-५ सर्वसामान्य लोक योगायोगाने एकत्र येतात आणि त्याला 'चूना' लावायचं ठरवतात.
पण ते सराईत गुन्हेगार नसतात. त्यामुळे चोरीचा प्लॅन करतात, त्यात भरपूर चुका करतात, घोळ घालतात, आपांपसांत भांडतात. त्यातल्या बारीकसारीक गमतीजमती छान घेतल्या आहेत.

पात्रं खूप आहेत. काही चेहरे माहिती होते, काही माहिती नव्हते. सगळ्यांची कामं चांगली आहेत.
अन्सारीचं काम करणारा (अशीम/अमीश गुलाटी) आवडला.

सीझन-२ चं सूतोवाच आहे. पण दुसर्‍या सीझनची आतुरतेने वाट बघावी असं काही वाटलं नाही. पहिला सीझन पुरेसा आहे.

मी फ्रीलांसर बघायला सुरुवात केली. मोहित रैना किती वेगळा दिसतो, महादेव म्हणून गाजलेला पूर्वी, मी तोच हा ओळखलं नाही. अनुपम खेर आणि मंजिरी फडणीस ला ओळखलं. कश्मिरा गोड आहे, पहिल्यांदाच बघतेय तिला. मुंबईतली आहे, मराठी असावी पण साऊथ मध्ये काम केलंय असं वाचलं, मराठीतही केलंय असं वाचलं पण डिटेल्स कळले नाहीत.

पुण्याची आहे ती .BMCC मध्ये शिकली आहे आणि saint Anne's मधे शालेय शिक्षण अस लिहिलय. चेहऱ्याभोवती गोल बुरखा बांधलेली दाखवली आहे तेव्हा ती सायली संजीव सारखी दिसते.

हो काय, मला मुंबई आलेलं. मी ते सिरीज खालची नावं येतात तो फोटो हायलाईट केल्यावर साईडला डीटेल्स आलेले.

KF3 आवडली. एका बैठकीत उडवली. जितू भैय्या यावेळी फार चटका लावतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत... असा शेवट नको मला. अजून एक सीजन आला पाहिजे. आणि चांगले काहीतरी घडले पाहिजे.

नेटफ्लिक्स वरची" the 8 show" ही वेबसेरीज पहिली.डार्क कॉमेडी आहे पाहताना स्क्विड गेम ची आठवण येते .हा पण मनी गेमच आहे पण जरा वेगळा इथे शेवटपर्यंत सर्वाना राहायचं आहे, मरण यातना देणारे खेळ खेळू शकता ,पण मरण नाही. एकमेकांना जगवतानाच दिसतात खेळाडू शेवटपर्यंत .कारण रुल्स वेगळे आहेत .कसंही एंटरटेन करा कारण इथे वेळेशी खेळ आहे .
आठ भाग आहेत पहिला भाग सोडला तर सगळे भाग उत्कंठावर्धक आहेत .शेवट ठीक ठाक आहे स्क्विड गेम प्रमाणेच, पण एकदा बघायला सुरुवात केली की शेवट पर्यंत सिरीज खिळवून ठेवते. टायटल सोंग नक्की बघा कुठेतरी ऐकल्या सारखे वाटेल.
हिची रील रेको https://youtube.com/shorts/HDSTej81r6I?si=LnKzJGyy79ZzFfBu बघून मी बघितली ही जरा जास्तच कौतुक करते पण बघण्यालायक गुल्लक, पंचायत नंतर काहीच नव्हतं म्हणून बघितली.

मुंबईत जन्म, वाढली पुण्यात, काम साउथ मधे करते, नाव काश्मिरा Happy फक्त पूर्व भारत राहिला. मेरा जूता है जापानी ची देशांतर्गत व्हर्जन Happy

सहीच, अगदी खरं Lol

ती केवढीशी दिसतेय सिरीजमध्ये, एवढं काम केलं कधी तिने, बाल कलाकार होती की काय कुठे.

Freelancer noted.

कश्मिरा कोण? गोविंदाची भाचेसून?

मिर्झापूर -३ चा पहिला एपिसोड पाहिला. कथानक पुढे व्यवस्थित नेले आहे. अजून एकदम ते फेमस ठॅण ठॅण पार्श्वसंगीत चपखल ठरेल असा सीन आला नाही पण पुढे येईल. ग्रिपिंग आहेच. दुसर्‍या सीझनचे शेवटचे काही एपिसोड्स एकदम ड्रामा वर गेला होता. आता नवीन सीझन असल्याने आणि कथेतही पॉवर शिफ्ट झाल्याने पुन्हा बिल्ड अप होतोय.

मी बिन्चवॉच केली मिर्झापुर ! मागच्या सिझनला बरेच नविन चेहरे अ‍ॅड झाले त्यामुळे अजुन वाढलेले थ्रेड,स्टोरिज पॅरलली चालत राहतात...शेवटपर्यत नेवुन त्याची मोट निट बान्धुन क्लोजर दिलाय...दिव्येन्दु शर्मा उर्फ मुन्ना भय्या ची कमतरता सतत जाणवते...तो असल्याने एक ह्युमर एलिमेन्ट होता तो मिसिन्ग वाटतो...कालच आल्याने अजुन काही लिहल तर स्पॉयलर होइल सगळ्याचा जरा बघुन होत आला की चर्चा करु..
सगळ्याच कलाकारानी बरच वेट लॉस केलय..

र आ, कश्मिरा परदेशी ही फ्रीलांसर सिझन 1 ची नायिका. गोड आहे फार, आवडली मला. त्यात 21 वर्षाची दाखवली आहे.

मिर्झापूर काही भाग एंगेजिंग आहे. नंतर कंटाळा येऊ लागतो. इतक्यात सगळ्या समांतर चाललेल्या घडामोडी एकत्र येऊन क्लायमॅक्स जवळ येतो. पंकज त्रिपाठीचा वावर सफाईदार. नेहा तलवार मागच्या सीझनला चर्चेत आली होती ती कॅटरिनाशी असलेल्या चेहर्‍याच्या साधर्म्यामुळे. मोठा रोल आहे. पण महत्वाकांक्षी स्त्री अशी इमेज वाटत नाही. रसिक दु ग्गलचं पात्र या भागात जास्त उलगडतं. गेल्या दोन सीझनचे तिचे बोल्ड सीन्स गाजले. पण या भागात त्या सगळ्याची टोटल लागते.
अली फजल ला बिनडोक पहिलवानाच्या भूमिकेत पाहताना वाईट वाटतं. मिलन टॉकीज आणि थ्री इडियट मधला त्याचा संवेदनशील रोल आठवतो. त्या इमेजमधून बाहेर पडून गुड्डू बनणे जास्त आव्हानात्मक होतं.
इतकं सध्या पुरे. यावर कुणी वेगळा धागा काढत असेल तर स्वागतार्ह असेल.

@अन्जू - धन्यवाद.
ती कश्मिरा शाह आहे. तेच म्हटलं आता चाळिशीत असायला पाहीजे ती.

मला फ्रीलांसरबाबत प्रश्न पडलाय, उत्तर द्या कोणीतरी. एपिसोडस किती बघायला जावं तर शेजारी शॉर्ट स्टोरी समजते, त्यावरून पहिल्या सिझन मध्ये मिशन अर्धवट राहतं, हे लक्षात आलं. ते सिझन 2 मध्ये तरी पूर्ण होतं का, नाहीतर नुसतं बघत बसा, ज्यासाठी बघायचं आहे ते इतकं लांबवणे बरोबर नाहीना.

माझे चार एपिसोडस बघून झालेत आणि नेमकं मी ते वाचलं. सिरीज एंगेजिंग आहे तरी वाचल्यामुळे प्रश्न पडलाय.

नेहा तलवार मागच्या सीझनला चर्चेत आली होती >>> र.आ. "ईशा" तलवार Happy या उल्लेखामुळे गूगल करावे लागले व आता पुढचे २-३ दिवस दुनियाभरच्या नेहा तलवार मला दिसणार आहेत Happy

वरती कोणीतरी लिहीले आहे तसे सगळेच एकदम वजन उतरवून आल्यासारखे दिसत आहेत. पहिल्या सीझनमधला सिम्पलटन अली फजल मस्त होता. त्याचे ते फार विचार न करता बोलणे व अ‍ॅक्शन घेणे मला एकदम मजेदार वाटायचे. "८३" मधला कपिल आठवतो. आधी हा कप आम्ही जिंकायला आलो आहोत म्हंटल्यावर पत्रकार खुर्चीतून पडायचे बाकी असतात. पण त्यावर खुलासा विचारल्यावर "What else (are) we here for" असे साधे उत्तर देणारा. दुसर्‍या सीझन मधला सूडाने पेटलेला इन्टेन्स रोलही भारी होता. आता तिसर्‍या सीझनला त्याला नक्की कसे दाखवायचे आहे ते कळाले नाही. तरी अधूनमधून "चाय मिलेगी, या अंदर आके अद्रक कूट दूँ?" वगैरे ओरडणे पूर्वीची आठवण करून देते Happy

"दिमाग कम है तो उसका प्रयोग भी मत करो" - असा काहीतरी त्या पंकज त्रिपाठीचा पहिल्या सीझनमधला डॉयलॉग भारी होता त्याला उद्देशून.

यावेळच्या आवडलेल्या संवादांमधे कालीन भैय्या वाचायचे चान्सेस १०% आहेत ऐकल्यावर तो दद्दा म्हणतो "बाहुबलीयोंके लिए काफी है. बच जायेंगे" Happy पण दद्दाच्या "होता है, होता है, इस उमर मे हर्मोनवा पे कंट्रोल नही रहता" ला तोड नाही Happy

मला पुर्ण सिझन खुप पात्र निर्माण केलियेत आता या सगळ्याला क्लोजर मिळाला पाहिजे म्हणून केला सारखा वाटला...सरद विरुद्ध गुड्डू सघर्ष एकदम मेन पात्र म्हणून जमत नाहित..त्यातही सरद शुक्लाचा प्रभाव तेवढा पडत नाही आणी गुडूच पात्र तेवढ हुशार नाही त्यामुळे सगळी लढाई उगाचच चाललिये अस वाटत...खुप गभिर झालाय सिझन.
तिनहि सिझन मधे दुसरा सिझन सगळ्यात बेस्ट आहे.

वाईट शब्दप्रयोग>>>. ते असतातच
व सीन हे पण आहेत का सोबत?>>> इन्टिमसी वाले...रक्तरजित सीन आहेत पण कमी आहेत
बोअर वाटला सिझन एगेजिन्ग नाहिये फारसा..

"बाहुबलीयोंके लिए काफी है. बच जायेंगे" Happy पण दद्दाच्या "होता है, होता है, इस उमर मे हर्मोनवा पे कंट्रोल नही रहता" ला तोड नाही Happy >> सहीच.
थोडक्यात तिसरा सीझन चौथ्या सीझनची पायाभरणी आहे.
बाहुबलीचं लक्षण म्हणजे गोळ्या लागल्या तरी ते एकदम ठणठणीत होतात. स्त्री असोत कि पुरूष, मृत्यू त्यांना हात लावू शकत नाही.

सारख सारखं adventures ऑफ lleo चे शॉर्ट रेकॉमेंड होतं होते म्हणून पाहीली आणि आवडली, धमाल आहे लक्ष्मण लाल इबोटे उर्फ lleo.
पर्मनंट roommates मधलं हे पात्र तेव्हा एवढं लक्षात राहील नव्हतं पण आत्ता या series मध्ये धमाल काम केलंय त्याने. छोटी आहे, दीड तासात संपली पण. छान आहे पण.

Pages