वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुबलीक वगैरे रोल मधे निशिगंधा वाड आहे >>
कोहली तरूण>>>> Lol

सिरीज बघत नसाल तरी तुमचं बरंच चाललं आहे. मी अनंत अंबानींच्या लग्नात किम कार्डेशिअनने जे काही घातले होते, त्यावरच्या 'बाई, चोळी जssरा मोठी घालायची असती' वगैरे कमेंट वर हसते आहे. Lol

बाई, चोळी जssरा मोठी घालायची असती >>> Rofl हे कुठाय? ( या वाक्यापेक्षा तिला पाहून कोणी 'बाई वाड्यावर चला' कसं म्हटलं नाही? Wink )

हा इयत्ता तिसरीत असताना " ये रे ये रे पावसा " गाण्यावर बसवलेला डान्स, पहिलीच्या मुलांना शिकवला पाहीजे.
https://www.instagram.com/reel/C9K9D_PyTmr/

झरीना चं खरं नाव अनंगशा घोष आहे.

याचं पहिलीच्या पुस्तकात पहिली कविता अग्गोबाई ढग्गोबाई आहे. पाडगावकरांचीही एक कविता आहे.
पूर्वी भावेंची कविता बालभारतीवाल्यांना कशी मिळाली याबाबत कुतूहल आहे.

सध्या नवीन वेबसिरीज बघायला नाही घेतली, फ्रीलान्सर दुसरा सिझन बघायचा आहे.

पुढच्या आठवड्यात मराठी बिग बॉस सुरू होतंय. बरं वाटलं तर बघेन.

यावेळी गरिबांचा भाईजान म्हणजे रितेश देशमुख होस्ट करणार आहे! कोण सेलेब्रिटीज आहेत ते समजले नाही अजून पण सुरुवातीला तरी बघेन मराठी बिबॉ असल्यामुळे Happy

यंदा होस्ट रितेश देशमुख.

वर्षा उसगावकर नाव पुढे येतंय, खरं असावं कारण स्टार प्रवाहच्या एका सिरियलमध्ये त्यासाठी तिचा खून झालेला दाखवलाय, त्यामुळे exit घेतली तिथून तिने.

मागे एक सिरीयल संपली त्यातला विवेक सांगळे किंवा तन्वी मुंडले असतील कदाचित, कलर्सचा चेहेरा म्हणून.

पूर्वी भावेंची कविता बालभारतीवाल्यांना कशी मिळाली याबाबत कुतूहल आहे.>>>>>
मलाही कुतुहल आहे. मुलांच्या रसिकतेचा लसावि किती लघू धरावा? या असल्या टुकार कविता वाचून कोणत्या मुलांना कविता म्हणाविशी वाटेल?

"खरं असावं कारण स्टार प्रवाहच्या एका सिरियलमध्ये तिचा खून झालेला दाखवलाय "
हे फारच भारी आहे Happy एखाद्याला सिरीयल मध्ये अचानक कुठेतरी गेलेलं दाखवून टपकवलं की मीही 'पगारावरून फिसकटलं, माणसाने नोटीस न देता सोडलं, चांगली फिल्म मिळाली त्यामुळे कल्टी मारली' असे अंदाज काढते.

{स्टार प्रवाहच्या एका सिरियलमध्ये त्यासाठी तिचा खून झालेला दाखवलाय, त्यामुळे exit घेतली तिथून तिने.}
सुख म्हणजे नक्की काय असतं - का?
त्या मालिकेत तिच्या, तिच्या सुनेच्या - जी पुढे तिची मुलगी असल्याचं कळतं खुनाचे शंभर तरी प्रयत्न झाले असतील.
मी मालिका बघायची सोडल्याला दोन वर्षे तरी झाली.

*सून मुलगी असल्याचं कळतं, तसंच मुलगा तिचा कोणीच नाही हेही कळतं .

*सून मुलगी असल्याचं कळतं, तसंच मुलगा तिचा कोणीच नाही हेही कळतं .
>>>> बरं झालं लिहिलेत ते...टेन्शन आलं ना मला मराठीत आता अजून काय दाखवतात म्हणून

.वर्षा उसगावकर नाव पुढे येतंय, खरं असावं कारण स्टार प्रवाहच्या एका सिरियलमध्ये त्यासाठी तिचा खून झालेला दाखवलाय, त्यामुळे exit घेतली तिथून तिने.>>> तिने नाकारलय की ती बिग बॉस मधे जाणार आहे...तिच्या पात्राला वाव नाही पुढे त्यामुळे म्युचअली बोलुन सोडली म्हणे...हे मी वाचल नेटवरच कुठेतरी पण तिला बोलताना नाही एकल....मला पहिल्यापासुनच फार आवडत नाही ती!! शिष्ठ वाटते..

वर्षा उसगावकर नाव पुढे येतंय, खरं असावं कारण स्टार प्रवाहच्या एका सिरियलमध्ये त्यासाठी तिचा खून झालेला दाखवलाय, त्यामुळे exit घेतली तिथून तिने.>> हे वाचून खूप हसू आलं. Happy
मला पहिल्यापासुनच फार आवडत नाही ती!! शिष्ठ वाटते..> +१११ त्या काळी नाटक रंगमंचावर शॉर्ट्स घालून धुमाकूळ माजवणारी & त्यासाठीच पहिल्या रांगांसाठी झुम्बड उडायची म्हणे Wink Wink असे माझे पप्पांकडून ऐकले होते.

सुख म्हणजे नक्की काय असतं - का? >>> हो हो. ही मालिका मीही फार पुर्वीच (हाहाहा) सोडली होती बघायची. पुनर्जन्म झालाय म्हणून काही एपिसोडस बघितले. माई मेल्यावर मारे मी त्यांच्या फेसबुकवर लिहून आले की काय उपयोग शेखर आणि माईंना मारलंत, शालीनीचं मरण बघणं हा त्यांचा हक्क होता आणि नंतर मला समजलं की बिग बॉस संभाव्य यादीत माई म्हणजे वर्षा उसगावकर येणार आहेत, कंटाळली बिचारी सिरीयल करुन करुन.

मलाही पुर्वी भावे येईल की काय बिग बॉसमधे वाटतंय. कारण कविता कधीच समाविष्ट केली असेल तर आत्ता उशीरा चर्चा होतेय, त्याचं कारण हे असेल की काय वाटलं.

तिने नाकारलय की ती बिग बॉस मधे जाणार आहे...तिच्या पात्राला वाव नाही पुढे त्यामुळे म्युचअली बोलुन सोडली म्हणे...हे मी वाचल नेटवरच कुठेतरी पण तिला बोलताना नाही एकल....मला पहिल्यापासुनच फार आवडत नाही ती!! शिष्ठ वाटते.. >>> हो का. मलाही ती शिष्ठच वाटते पण तो रोल चांगला केलेला तिने.

>>कारण स्टार प्रवाहच्या एका सिरियलमध्ये त्यासाठी तिचा खून झालेला दाखवलाय,
अशीच हवा मागच्या वर्षी त्या सुंदरा मनामध्ये भरली च्या हिरोबद्दल झाली होती..... येणार येणार म्हणत नाहीच आला तो!!
शहाणी असेल तर वर्षा उस्गावकर नाही येणार बिग बॉसमध्ये..... नावाजलेल्या लोकांनी खरेतर येऊच नये त्या शोमध्ये!!
बाकी यंदा मांजरेकरांनाऐवजी रितेश आहे म्हंटल्यावर निम्मा इंटरेस्ट गेलाय.....मांजरेकरांसाठी वीकेंडची चावडी तरी बघायचो..... आता नुसते इकडे अपडेट्स वाचावे!!

कुलवधू खूप जूनी सिरियल आहे ना? दहा बारा वर्षांपूर्वीची?
'माझी डोली चालली गं' टायटल साँग.
आणि फ्रिलान्सर चा दुसरा सिजन कुठे आहे? कधी आला?

माझी डोली चालली गं' ही सुरुवात आहे टायटल साँगची
माझी डोली चालली गं दूर देशी नव्या गावा
जिथे सोबतीला आहे माझ्या स्वप्नांचा रावा '

ओह! असेल असेल. बहुतेक यूट्यूबवर त्यांनी पूर्ण टायटल टाकलं नाहीये किंवा मलाच आठवत नसेल Proud

मिर्झापूर तिसरा सीजन पाहिला.
गुड्डू कॅरॅक्टर पहील्या सीजनपासूनच आवडतं नाही.

काही विशेष नाही या सीझनमध्ये.
शेवटच्या १० मिनिटात कालीन भैया छा गये !

कुणीतरी माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या ना
मिर्झापूर मध्ये मला एकदम शेवटच्या सीनला एक कळले नाही , गुड्डू गोलू ला भेटायला येतो..एका नावेत.
तर बाहेर उभी राहिलेली मुलगीच प्रथम गोलू वाटलेली. पण गोलू दारातून बाहेर येते. बाहेर पहाऱ्या वर सेम गोलू आणि गुड्डू सारखे दोघेजण ठेवण्याचं प्रयोजन कळलं नाही!

तसेच..
गुड्डू आणि गोलू मध्ये प्रेम केव्हा झाले?

अमेरिकेत पीकॉक चॅनेलवर Those About To Die सिरीज पाहात आहे. रोमन साम्राज्याच्या (बहुधा) अखेरच्या काळातील कथा आहे. गॉट मधला रॅमसे बोल्टनचा काम केलेला तो कलाकार इथे लीड रोल मधे आहे. इथेही त्याचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे. अँथनी हॉपकिन्सही आहे. पहिला भाग खूप एंगेजिंग होता. पुढे बघू.

प्रेझेण्टेशन वर गॉटची छाप आहे. मात्र यात दाखवलेल्या माहितीवरून रोमन साम्राज्याबद्दल वाचायची/बघायची उत्सुकता वाढली आहे.

फारेण्ड, कितना और ना जाने क्या क्या देखत हो.
हॅटस ऑफ. मला थोडाही वेगळा कलाकार, विषय बघायचे धाडस आता होत नाही. त्यामुळे अनेक दर्जेदार कलाकृतींना मुकतो..

कालच नेट्फ्लिक्सवर '3 Body Problem' नावाच्या मालिकेचा सीझन १ पाहून संपवला. सुरूवातीचे ४ भाग मालिका प्रचंड पकड घेते, मधे जराशी संथ होते आणि शेवटी शेवटी पुन्हा इंटरेस्टिंग होत जाते. साय-फाय आहे. एक सायंटिस्ट लोकांचा ग्रूप आहे ज्यांच्या अवतीभवती विचित्र घटना घडायला लागतात, अनेक ठिकाणी अनेक सायंटिस्ट आत्महत्या वगैरे करायला लागतात म्हणून या ग्रूपमधले काहीजण याचा शोध घ्यायला जातात आणि त्यांना अकल्पित अश्या गोष्टी त्या शोधातून बाहेर येतात. या सगळ्याचं मूळ कुठेतरी भूतकाळात असतं त्याबद्दलही हळुहळू समजत जातं. त्यांच्यापुढे उभे राहणारे प्रश्न, आव्हानं आणि ते या सगळ्यावर मात करू शकतात का? - हे उलगडणारी ही गोष्ट. मला ही मालिका आवडली. अजून कोणी पाहिली आहे का?
बर्‍याच प्रश्नांची उकल झाली नाहीये. होपफुली पुढच्या सीझन्स मधे होईल.

Pages