Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोहरा (नेटफ्लिक्स)
कोहरा (नेटफ्लिक्स)
सिनॉप्सिस आणि सहा(च) एपिसोड्स यामुळे बघायला सुरुवात केली.
मर्डर मिस्ट्री आहे, पुढे नरेटिव्ह वेगळाच (चांगला) ट्रॅक पकडतं.
खुनाच्या तपासातले बारकावे, रेड हेरिंग्ज आवडले. शेवटपर्यंत सस्पेन्स चांगला राखलाय. पोलिसांचा रिलेन्टलेस तपास बघायला मला आवडतो.
पंजाबमधल्या निमशहरी भागातली स्टोरी आहे. ते वातावरण, लोकेशन्स, बोली भाषा यामुळे वेगळेपणा आहे.
तपास करणार्या दोन्ही पोलिसांची कामं झकास. (एक वरुण सोबती आहे, दुसरा अनोळखी आहे.)
इतरही बारीकसारीक कलाकारांची कामं चांगली आहेत. (लगानमधली इंग्लीस मेम सुद्धा आहे.)
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
मिर्झापूर अ तिरेक हिंसा असल्याने दुसर्या भागातले पहिले काही एपि बघितल्या वर सोडून दिली होती. सासरा-सून पण किळस वाणे प्रसंग अंगावर येतात, नुसते खोलीत जाऊन दरवाजा बंद करते इतकंच सूचक दाखवून भागतंय, अगदीच डीटेलींग ची काय गरज
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
..
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
..
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
..
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
..
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
.
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
.
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
.
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
.
मिर्झापूर अ तिरेक हिंसा
स्वारी माऊस बिघडला
प्रायम वर फेडरर डॉक्युमेंटरी
प्रायम वर फेडरर डॉक्युमेंटरी फार सुरेख आहे नक्की बघा. साधारण दीड तासाची सिनेमा सारखीच आहे.
सध्या जिओ वर हाउस ओफ ड्रॅगन्स सीझन वन बघत आहे. हे पण छान आहे. एक एक एपिसोड लक्षपूर्वक बनवला आहे. फार लोक बघत असतील तर धागा काढू.
"ईशा" तलवार Happy या
"ईशा" तलवार Happy या उल्लेखामुळे गूगल करावे लागले व आता पुढचे २-३ दिवस दुनियाभरच्या नेहा तलवार मला दिसणार आहेत >>> बरोब्बर.सध्या नेहा या नावाच्या इतक्या रील्स स्टार्स, हिरविनी दिसताहेत कि सर्वांचे नाव नेहाच असते असा समज झालाय.
र.आ मग इथे २५व्या सेकंदाला
र.आ मग इथे २५व्या सेकंदाला एअरलाइनच्या क्रू च्या नावाची पाटी येते ती बघा
https://www.youtube.com/watch?v=4fOaW6A4j5E&t=21s
(No subject)
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C7oJKPZSbYg/?igsh=czh3YmEzcGw4MG9q
ही कुठली सिरीज आहे?
ती झरीना झालेली नटी कोण आहे ?
ती झरीना झालेली नटी कोण आहे ?
काय (काहीच्या काही) सोंग आहे. ती वेणी तर चायनीज प्लास्टीक वेली सारखी चिकटवलेली वाटली.
डान्स पण कसला. हे असं सोंग सजवून असला " ये रे ये रे पावसा" गाण्यावरचा डान्स..
हिच्यावर राज्यातले प्रभावी नेते लट्टू होत असतात. ते बहुतेक धृतराष्ट्राचे वंशज असावेत.
डान्स पण कसला. हे असं सोंग
डान्स पण कसला. हे असं सोंग सजवून असला " ये रे ये रे पावसा" गाण्यावरचा डान्स.. >>>
मलाही ती आवडत नाही. अभिनय चांगला करते पण त्याकरता तिला घेतलेले दिसत नाही.
तिसर्या सीझन मधे थक्क करून सोडेल असे काहीच सापडले नाही. दहावा एपिसोड जस्ट सुरू केलाय. त्या एका कवीच्या आचरट कविता मात्र धमाल होत्या.
कोहरा बद्दल इथे पूर्वी चर्चा झाली होती. एंगेजिंग आहे पण खूपच ग्रिम आहे.
त्या एका कवीच्या आचरट कविता
त्या एका कवीच्या आचरट कविता मात्र धमाल होत्या. >> त्यानेच धमाल उडवून दिली आहे.
हो माझा अजून पूर्ण बघून झाला
हो माझा अजून पूर्ण बघून झाला नाही सीझन , ६ भाग झालेत पण मजा नाही येत आहे या सीझन ला. पहिले २ सीझन फारच हॅपनिंग होते .

मुन्ना ला मिस केले. आणि कालीन भय्याला पण काही स्क्रीन टाइम नाहीये आतापर्यन्त. पार त्याचा नखे , दात, आयाळ काढलेला सिंह झालेला आहे
गुड्डू आणि गोलू दोघांना बराच टाइम आहे पण अनफॉर्चुनेटली दोघांकडेही तो एक्स फॅक्टर , तो करिस्मा नाही. गुड्डु तर चक्क बोअर होतोय. त्याचे उच्चार सदोष वाटले का कुणाला? मला कधी कधी चक्क बोबडा वाटतो तो. तो कवी चांगला आहे
विजय वर्माच्या स्टोरीत पोटेन्शियल होते पण वापर करता आलेला दिसत नाही.
मी पण लळतलोंबत तीन एपिसोड
मी पण लळतलोंबत तीन एपिसोड बघितले. पण काय मजा नाही राहिली वाटलं.
स्टोरीत/ संवादातच दम वाटला नाही अजुन. अॅक्टिंग दूरची गोष्ट असं सध्यातरी वाटलं.
मी येताजाता बघतेय मिर्झापूर.
मी येताजाता बघतेय मिर्झापूर. मला गोलू विशेष आवडत नाही. गुड्डू गरम डोक्याचा, मधेच एकदम हळवा होणारा पैलवान म्हणून आवडला होता. गोलू मात्र फार petite आहे आणि आविर्भाव पूर्ण स्क्रीन व्यापल्याचा करते. शरीराने/देहबोलीने किंवा स्क्रीन प्रेझेंसने दोन्हीनेही लो-एनर्जी वाटते. मला गुड्डूची बहिण, 'ये भी सही है' वाला तिचा गूळ घालून वरण करणारा गोंडस मित्र आणि भावनिक तरीही वास्तवात रहाणारी आई व तडफड करणारे बाबा जास्त आवडले. अजून नीट बघायची आहे. मुन्ना नाही आणि कालीन भैय्या अर्धा सिझन कोमात. शिवाय विजय वर्माचा/ डबल रोल/ वैनी /लिलीपुट ट्रॅकच आवडला नव्हता. त्यामुळे त्याचाही कंटाळा येईल अशी भीती आहे.
डान्स पण कसला. हे असं सोंग
डान्स पण कसला. हे असं सोंग सजवून असला " ये रे ये रे पावसा" गाण्यावरचा डान्स.. >>
कुठे आहे ?
फ्रीलांसर सिझन वन झाला बघून,
फ्रीलांसर सिझन वन झाला बघून, शेवटचा एपिसोड सॉलिड होता. छान एंगेजिंग होती. थँक्स अश्विनी. मिशन पूर्ण होईपर्यंत पोटात गोळा आला.
दुसरा सिझन याचाच पुढचा भाग असावा असं वाटतंय, शेवटच्या सीनवरून. कोणी बघितला असेल तर लिहा.
जर आधी चर्चा झाली असेल मागे कधीतरी, तर मी वाचून विसरले असेन.
मिर्झापुर-३ म्हणजे नुसताच
मिर्झापुर-३ म्हणजे नुसताच सापशिडीचा खेळ केलाय.....
सापशिडीच्या खेळात कसं ९८ ला पोचलं की नेमकं १ चं दान पडतं आणि ९९ वरचा साप गिळुन परत पहिल्या घरात पाठवतो तसा हा सिझन आहे...मुन्ना मेल्यावर कथा पुढे जायच्या ऐवजी रिव्हर्स टर्न घेउन शेवटच्या एपिसोड ला परत पहिल्या पानावर आलेली आहे.
गुड्डु आणि गोलु परत रस्त्यावर आणि कालिन भैया त्रिपाठी हवेलीत....
मुन्ना भैया नाही, कालिन भैया थेट शेवटी उठतात... ..
सरद आणि माधुरी एकदम सपक आहेत... नो चार्म....नो स्पार्क....
आणि कहर म्हणजे... ज्या रमाकांत पंडीत मुळे हा सगळा राडा झाला ते आता जेलमधे बसुन बसुन बहुतेक वैतागल्यामुळे, गेली अनेक वर्षे ज्या सिस्टीम वर त्याना भरोसा होता त्या सिस्टीम वरचा विश्वास उडाला वगैरे वगैरे म्हणत आहेत.. हे म्हणजे.. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को....
मुन्ना भैया ची केस घ्यायची हौस होती त्यांना...भोगा म्हणाव आता आपल्या कर्माची फळं.. गप राहिले असते.. मोठा मुलगा बॉडी बिल्डर झाला असता, धाकटा लखनौ मधे जाउन शिकुन कुठे नीट पोटापाण्याला लागला असता... सगळेच मिर्झापुर मधुन सुटले असते.. जौदेत झालं....
गप राहिले असते.. मोठा मुलगा
गप राहिले असते.. मोठा मुलगा बॉडी बिल्डर झाला असता, धाकटा लखनौ मधे जाउन शिकुन कुठे नीट पोटापाण्याला लागला असता...

>>
सरद आणि माधुरी एकदम सपक आहेत.
सरद आणि माधुरी एकदम सपक आहेत... नो चार्म....नो स्पार्क....>>> अगदी अगदी! दोघही ग्रॅड्युएट आहेत, लग्नाच नाव नोदवलय पण नेमका पत्रिकेत मन्गळ आहे टाइप वाटतात...सरद शुक्ला तर कुठल्याच अॅन्गलने बाहुबली वाटत नाही.
सलोनी आणि त्यागी च काय होत...
सलोनी आणि त्यागी च काय होत... तेही सस्पेन्स ठेवलंय..
पुढील भागात दाखवतील..
ह्या सिजन मध्ये विशेष काही आवडलं नाही..
सगळ्यात किळसवाण.. गुड्डू रॉबिन लां मारतो..तो सीन बघून धस्स झालं एकदम.!
सगळ्यात किळसवाण.. गुड्डू
सगळ्यात किळसवाण.. गुड्डू रॉबिन लां मारतो..तो सीन बघून धस्स झालं एकदम.!>>> खरतर रॉबिनला मारायची काय गरज होती हेच कळत नाही..गुड्डू बैलबुद्धी आहे हे पहिल्या सिझन पासुन माहिती आहे की सगळ्याना!!
सिझन २ला आणलेली जास्तिची पात्र सपवायची ह्यासाठिच सिझन ३ काढल्यासारखा वाटतोय.
हो ना.. बिचारा रॉबिन.!
हो ना.. बिचारा रॉबिन.!
पण मग त्याला नसता मारला तर.. रमाकांत च्य केसला वेगळं वळण लागेल... बहुतेक.. म्हणून मारला असावा..असा माझा अंदाज..
Pages