Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जाई / अनु, बघू की नको ते
जाई / अनु, बघू की नको ते सांगा.
माधव , बघा .
माधव , बघा .
एकवार बघण्यासारखी नक्कीच आहे .
बघा.सर्वांचा अभिनय संयत आहे
बघा.सर्वांचा अभिनय संयत आहे.कुठेही हिरोगीरी नाही.घटनेत मुळातच ब्युरोक्रसी बरीच असल्यानं इथे पण मध्येमध्ये रेंगाळते सिरीज.पण बघण्यायोग्य.
सक्विड गेम(लिहिता येत नाहीये गुगल इंडिक वर) मध्ये असलेला अली उर्फ अनुपम त्रिपाठी इथे थोड्या मोठ्या आणि चांगल्या भूमिकेत आहे.
मी काल पहिली...एकदा
मी काल पहिली...एकदा पाहण्यासारखी नक्कीच आहे...विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, कुमूद मिश्रा, आदित्य श्रीवास्तव, मनोज पाहवा , अरविंद स्वामी असे एक से एक सरस कलाकार आहेत सो अभिनय एक नंबर...अपहरण कर्त्यांपैकी चीफ जो आहे तो कॉमेडी स्किट करणारा राजीव ठाकूर आहे का? तोच असेल तर गंभीर भूमिका चांगली केलीय. शेवटचा नेगोसिएशन पार्ट छानच..
डार्क वेबसेरीज 3 सिजन पाहिले.
डार्क वेबसेरीज 3 सिजन पाहिले.
इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे.
Time travel, समांतर विश्व.
मूळ जर्मन मालिका, इंग्रजी डब पाहिली.
छान वाटली.
इतकी सगळी पात्रे, त्यात त्यांची नावं लक्षात रहात नाहीत ( आपली कशी जय, प्रेम, विजय अशी सोप्पी नावं, त्यांची खंग्री नावं सगळी ) , त्यात लहानपणीची, मोठे असताना, म्हातारे असतानाचे , असे लक्षात ठेवताना बुद्धी परीक्षा झाली माझी.
काही ठिकाणी अति रोमँटिक love सिन्स ( समजून घ्या )
त्यामुळे तो एक विचार राहूदे बघताना.
तिसऱ्या सिजन मध्ये सुरवातीला वाटले की अजून पाणी घालतात की काय, पण शेवट केलाय नीट.
तुम्ही बऱ्याच जणांनी आधीच पाहिली असेल म्हणा.
Ic814 मध्ये शेवटून दुसऱ्या
Ic814 मध्ये शेवटून दुसऱ्या भागात फक्त सफाईचा एक सीन इतक्या तपशीलात दाखवायला नको होता.जनरली असं काही असलं तर ब्लर करून दाखवण्याचा प्रघात आहे.
एमिली मी १ च सीझन पाहिला
एमिली मी १ च सीझन पाहिला त्यामुळे बिलीव्हेबल वाटला
प्रभावित होणे वगैरे.
(अलगॉरिदम) म्हणुन स्किप च करते.
उर्फी च्या सिरिज ला पहिल्या ७-८ मिन मधे बंद केले.. तिचे रील्स पाहिले तर माझी ही बौद्धिक लेव्हल आहे असे समजून मला ते/तसे रील्स येत राहण्याची भिती वाटते
किंवा तिच्या वेबसीरीज ला व्ह्यु दिला तर अजून अजून राखी सावंत, उर्फी जावेद, पुनम पांडे धिंचाक पूजा बाह्या सरसाऊन पुढे येतील अशी ही भीती वाटते..
तेही खरं
तेही खरं
पुढे त्या आय टू आय वाल्यावर सिरीज यायची एखादी.तो परीचे ड्रेस घालून गाणी बनवायचा तो गायक.
अपहरण कर्त्यांपैकी चीफ जो आहे
अपहरण कर्त्यांपैकी चीफ जो आहे तो कॉमेडी स्किट करणारा राजीव ठाकूर आहे का? तोच असेल तर गंभीर भूमिका चांगली केलीय. >> हो तोच आहे.
चान्गली केलिये सिरिज..सगळ्याच्या भुमिका चान्गल्या झाल्या आहेत..
आय टू आय वाल्यावर सिरीज यायची
आय टू आय वाल्यावर सिरीज यायची एखादी.तो परीचे ड्रेस घालून गाणी बनवायचा तो गायक>>>
जांभळा ड्रेस्स, दाsssssट केशसंभार गोजिरवाणं रुपडं ..
निदान हसू यायचं त्याला पाहून.
IC814 शनिवारी बघितली,
IC814 शनिवारी बघितली, त्याकाळी मी बी. एस्सी. तृतीय वर्षात होतो, बातमी वाहिन्यांवर (बोटावर मोजता येणाऱ्या), अखंडपणे माहितीचा भडीमार सुरु होता. नंतर वर्तमानपत्रात वाचलेल्या बातम्या आणि लेखांमुळे काही घडामोडी उशिराने कळल्या.
नोकरशाहीची उदासीनता, हा गंभीर विषय आहे. खरेतर कोणीही अपयशाचा मानकरी न होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो, त्यामध्ये नोकरशाही आणि राजकारणीही येतात. त्यावेळच्या परिस्थितीनुसार आपल्याकडे आपद्कालीन कार्यवाहीसाठी यंत्रणा उभारलेली नव्हती, आणि अतिरेक्यांसोबत वाटाघाटी करणारी टीम असावी लागते, अश्या व्यक्तीदेखील आपण तयार केलेल्या नव्हत्या.
ठळकपणे तत्कालीन सरकारचे अपयश दिसते, परंतु आघाडी सरकार असल्यामुळे वेळकाढूपणा झाला की पंतप्रधानांना सर्व घटनाक्रमांची व्यवस्थित माहिती वेळेवर उपलब्ध न करून देण्यात आली किंवा त्याचे परिणाम सौम्य करून सांगण्यात आले यात संशय घ्यायला वाव आहे. तत्कालीक प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्यावर संशयाची सुई जास्त रेंगाळत राहते. तसेच अपह्रत नातेवाईकांनी विरोधी पक्षांच्या चिथावणीवर घातलेला गोंधळ चीड आणणारा होता. कदाचित त्यांचा आक्रोश किंवा भावना योग्यही असतीलही परंतु सार्वजनिक प्रदर्शन मात्र आक्रस्ताळी होते.
या सिरीजमध्ये त्यावेळचे पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा व्हिडिओ दाखविला परंतु बाकी कोणत्याही राजनैतिक व्यक्तींचा व्हिडिओ नाही दाखविला. तसेच तात्कालिक पंजाबचे मुख्यमंत्री यांच्यामुळे भारताच्या हद्दीत कारवाई करता आली नाही असा तद्दन खोटा अपप्रचार केला आहे. वाटाघाटींमध्ये आपण फक्त अतिरेकीच सोडले नाहीत तर डॉलरमध्ये भरपाईही केली होती.
जर सत्यघटनेपासून प्रेरीत असणारी सिरीज म्हणणार, तर मग सर्वांगीण बाजूने अभ्यास करून आणि सर्व घटनांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. फक्त आपल्याला सोयीचे तेवढे प्रकाशझोतात (Glorify) आणून इतर बाबींवर कानाडोळा केला जातो. त्यामुळे अशा सर्व गोष्टीची झाडाझडती घेणे आवश्यक ठरते.
छान लिहिले आहे सच्चा. ही
@सच्चा >>>> शब्द न शब्द पटला.
@सच्चा >>>> शब्द न शब्द पटला. विशेषतः नातेवाईकांचा गोंधळ, पंतप्रधानांच्या घराजवळ घेराव घालणे हे नागरीक म्हणून आपण बिगरीत असल्याचे लक्षण आहे हेच दाखवतं. नातेवाईकांची काळजी वाटणे स्वाभाविक होते. पण असा आक्रस्ताळेपणा करून आपण भारताची त्याक्षणी बार्गेनिंग पॉवर घटवली आणि अतिरेक्यांना हवा तो डाव खेळलो.
कुठलंही सरकार असतं तरी सिच्युएशनमध्ये फार फरक पडला असता असं वाटत नाही. कारण अशा सिच्युएशनसाठी एसओपी वगैरे होती असं ऐकिवात नाही. आणि दगडाखाली हात असलेल्या सरकारकडून वेगळ्या अपेक्षा बाळगणं हे ही कठीण.
त्यातून आपण धडा घेतला का हे महत्वाचं. पण सय्यद सलाहुद्दिनच्या मुलांना अगदी आतापर्यंत काश्मिरमध्ये राज्य सरकारच्या नोकरीत ठेवून आपण काहीच शिकलेलो नाही हे सिद्ध केलंय.
जसवंत सिंह हे पॉईंट मॅन (सरकारतर्फे ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची ऑथॉरिटी असलेले जेणे करून बॅक एँड फोर्थ चर्चांमध्ये वेळ जाऊ नये) होते हे लक्षात न घेता ते अतिरेक्यांसोबत एका विमानातून गेले यावरही त्याकाळी गहजब झाला होता.
आता तर अजित डोवल यांचा अतिरेक्यांसोबतचा तेव्हाचा फोटो प्रसारित करून डोवलनी जणू काय पर्सनल कपॅसिटीमध्ये अतिरेक्यांना सोडले असं नॅरेटीव्ह भारतात होतं आहे. नावावरून व इतर राजकारण तर बोलायलाच नको.
अमेरीकेत अपहरणासंबंधी नॉन निगोसिएशन हा नॉर्म आहे असं ऐकिवात आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
बाय द वे, फ्रेडरिक फोर्सिथची ‘द निगोशिएटर’ ही कादंबरी इंटरेस्टींग आहे.
IC814 बघायला सुरुवात केली.
IC814 बघायला सुरुवात केली. इथले वाचून 'एक हारी हुइ बाजी' असणार आहे असं वाटतय त्यामुळे उत्साह थोडा कमी आहे.
बरेच अतिरथी, महारथी आहेत पण त्यामानाने पहिल्या भागाने फारशी पकड घेतली नाही. अर्थात पहिल्या भागापासूनच पकड घेणार्या मालिका तशा कमीच असतात.
फ्रेडरिक फोर्सिथची ‘द निगोशिएटर’ ही कादंबरी इंटरेस्टींग आहे. >>> त्या कादंबरीवर आहे का ते माहीत नाही पंण Kevin Sapcey आणि Samuel Jackson यांचा त्याच नावाचा सिनेमा पण खिळवून ठेवणारा आहे.
आपल्या मराठीत एक आहे,
आपल्या मराठीत एक आहे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. त्याप्रमाणे या वेबसिरीज बद्दल काही आक्षेप आहेत. दुर्दैवाने आजच्या आणि पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, त्यामुळे दृक श्राव्य माध्यमांतील माहिती त्यांना अधिक सापेक्ष वाटते. या पिढीला चित्रपट आणि वेब सीरिजमधील दाखविलेल्या घटना म्हणजेच सत्य किंवा ईतिहास आहे असा विश्वास दृढ होत जातो.
अनुभव सिन्हा हा एक कसलेला डावा खेळाडू असून त्याच्या चित्रपट आणि वेब सिरीजमधील सादरीकरण उच्च निर्मितीमूल्य असते. परंतु हा मूळ कथेच्या गाभ्याला पूर्णपणे १८० कोनातून वळवुन आपली विचारसरणी (narrative set) लादण्याचा कार्यक्रम करतो. हे अगदी सूक्ष्म (Subtle) पातळीवर असते की आपण अंतर्मनात त्यालाच सत्य समजायला लागतो (Article 15). IC814 मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांना एक आयात सांगतो कि एका व्यक्तीची हत्या हि सर्व मानवजातीची हत्या आहे. ही आयत शांतताकाळातील आहे. अतिरेक्यांनी काही महिला, मुले आणि काही जखमी प्रवाशांना दुबईमध्ये उतरवले ते तेथील राज्यकर्त्यांच्या दबावामुळे. नंतर मुलाखत घेण्यात आलेल्या मुलाखतीत प्रवासी महिलेने (पूजा कटारिया) सांगितले कि अतिरेकी (Doctor) त्यांना ३-४ वेळा प्रवचन देत होता आणि प्रवाशांवर दबाव आणत होते, परंतु यात तर अपहरणकर्ते आणि प्रवाशी अंताक्षरी खेळताना दाखविले आहे, अपहरणकर्ता आणि हवाईसुंदरी यांच्यातला प्रणयचा दाखवायचा बाकी राहिला होता.
https://www.hindustantimes.com/trending/ic814-survivor-pooja-kataria-rel...
२६/११ मुंबईवरील हल्ल्यावर जर वेबसिरीज काढली, तर त्यात कसाबचे नाव समीर चौधरी दाखवणार का ?
हे सर्व कश्याप्रकारे आतापर्यंत बॉलीवूड द्वारे रोपीत (implant) केले गेले आहे त्याचे व्यवस्थित विश्लेषण खालील संकेतस्थळावर बघू शकतात
https://gemsofbollywood.com/
ओके मग?
ओके मग?
वाचन संस्कृती लोप पावत असेल तर तुम्ही मुलांबरोबर वाचा. उगा याला आणि त्याला दोष देऊन करमणूक डिप्रार्व्हड करून.. आता काहीच करायला नाही तर वेळ कसा घालवू... वाचन!!! जोपासली संस्कृती!
कालचक्र उलटं फिरत नाही.
सच्चा यांनी जी लिंक दिली ,
सच्चा यांनी जी लिंक दिली , तो पूजा कटारिया यांनी ए एन आय ला दिलेल्या मुलाखतीचा वृत्तान्त आहे.
https://x.com/ANI/status/1831209497790214162
त्या मुलाखतीत इतर अनेक गोष्टींसोबत त्या सांगताहेत, एका दहशतवाद्याने अंताक्षरी खेळायला सांगितलं. (याचा अर्थ दहशतवादी चांगले होते, असं मी म्हणत नाही. मालिकेत दाखवलंय, तसं घड्लं होतं एवढंच). जसं प्रत्यक्षात घडलं तसंच मालिकेत दाखवलं आहे, काही कमी नाही, काही जास्त नाही, असंही त्या म्हणाल्या.
तसंच दहशतवादी अपहरणादरम्यान ज्या नावाने एकमेकांना संबोधत होते, ती नावे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या स्टेटमेंटमध्येही नोंदलेली आहेत.
https://www.mea.gov.in/Speeches-Statements.htm?dtl/5481/
To the passengers of the hijacked place these hijackers came to be known respectively as (1) Chief, (2) Doctor, (3) Burger, (4) Bhola and (5) Shankar, the names by which the hijackers invariably addressed one another.
जेम्स ऑफ बॉलीवुडचं ट्विटर हँडल पाहिलं आहे. त्यामुळे तो काय लिहितो त्याची कल्पना आहे. ही मालिका आय एस आय ने फायनान्स केली असं राइट विंगर्स म्हणताहेत. यावेळी सोरोस वाचला.
वाचनसंस्कृतीचं म्हणाल तर 'IC 814' is a dramatic representation of the 1999 hijacking of an Indian Airlines flight IC-814. It is based on the book 'Flight into Fear: The Captain's Story', written by journalist Srinjoy Chowdhury and Devi Sharan, the captain of the hijacked flight. आता मालिका पुस्तकाशी किती प्रामाणिक आहे, हे दोन्ही एकाच चष्म्याने वाचून आणि पाहून ठरवावं लागेल.
त्या मुलाखतीत इतर अनेक
त्या मुलाखतीत इतर अनेक गोष्टींसोबत त्या सांगताहेत, एका दहशतवाद्याने अंताक्षरी खेळायला सांगितलं. (याचा अर्थ दहशतवादी चांगले होते, असं मी म्हणत नाही. मालिकेत दाखवलंय, तसं घड्लं होतं एवढंच). जसं प्रत्यक्षात घडलं तसंच मालिकेत दाखवलं आहे, काही कमी नाही, काही जास्त नाही, असंही त्या म्हणाल्या. >>
फक्त आपल्याला सोयीचे तेवढे प्रकाशझोतात आणून इतर बाबींवर कानाडोळा केला जातो. अतिरेकी (Doctor) प्रवाशांना ३-४ वेळा प्रवचन देत होता आणि प्रवाशांवर धार्मिक दबाव आणत होते, हा भाग सोयीस्कर टाळला आहे. दहशतवाद्याने अंताक्षरी खेळायला सांगितलं परंतु यात मात्र दहशतवादी आणि अपहृत प्रवासी संगनमताने अंताक्षरी खेळताना दाखविले आहे. ISI चा यातील सहभाग यावर संपूर्णपणे मौन पाळले आहे, तसेच D गँगचाही यातील सहभाग यावर कुठेही voice over नाही. निदान voice over मधेतरी अतिरेक्यांची खरी नावे सांगायला हवी होती, आणि इतर पात्रांची नावेही का बदलल्या गेलीत? पायलटचे नावही का बदलण्यात आले?
जर पुस्तकावर आधारित मालिका असेल तर मग विनाकारण मूळ Video Clips टाकण्याची काही गरज नव्हती, सत्य आणि आपल्या कल्पना यांची सरमिसळ करणे यावर माझा आक्षेप आहे.
वीर सांघवी काय म्हणतोय ते बघा
Netflix’s ‘IC 814’ is an expensive PR job for the ISI—shows R&AW torturing civilians
https://theprint.in/opinion/sharp-edge/netflixs-ic-814-is-an-expensive-p...
(No subject)
IC-814 Documentory on
IC-814 Documentory on National Geographic the real -
https://www.youtube.com/watch?v=7mIUOZsrIUc&list=PL6F7B64BEC26D195F
IC814 बघितली. आवडली.
IC814 बघितली. आवडली.
सरकारची निर्णय घेण्याबाबतची दिरंगाई, नोकरशहांची आपापला पृष्ठभाग वाचवायची चाललेली धडपड, दोन डिपार्टमेंटमध्ये असलेले राजकारण, पुरुष हे मरण्याकरताच असतात ही सरकारी वृत्ती, झटून (कधीकधी जीवाची बाजी लाउन) प्रयत्न करणार्याला बळीचा बकरा बनवले जाणे, अतिरेक्यांमधे असलेले भेदभाव आणि प्रत्येक गटाचा स्वतःचा अजेंडा हे सर्व खूप प्रभावीपणे मांडले आहे.
राज्यसरकारने कमांडो द्यायला दिलेला नकार आणि त्याचे खापर पायलट्च्या डोक्यावर फोडणे हे खूपच चीड आणणारे होते. पायलट ४५ मिनीटांपेक्षा जास्तवेळ थांबला असता तरी काय झाले असते? ना राज्य सरकार कमांडो पाठवायला तयार होते ना पोलीस अधिकार्याकडे (पद आता आठवत नाहीये) आपल्या अखत्यारीत कारवाई करायची इच्छा होती.
विमानात दोन पुरुषांचे गळे कापले असताना, एक पुरुष वृद्ध अत्यवस्थ असताना सरकारने फक्त मुले आणि स्त्रीयांची सुटका करायची विनंती करणे खूप अंगावर आले. भलेही बाहेर आतले काही माहीत नसेल तरी 'मुले आणि वृद्ध यांची सुटका करावी' अशी विनंती योग्य असती.
सैनीक आपले प्राण देऊन अतीरेक्यांना पकडत असतात. सामान्य माणसानेसुद्धा कठोर मनाने काही किंमत मोजायलाच हवी हे दाखवणारा परिषदेचा सीन छोटा असला तरी नक्कीच काही सांगणारा आहे.
पण....
ते फाइल शॉट्स दाखवून उगाच राजकीय रंग दिला आहे. कुठल्याही पक्षाचे सरकार असते तरी त्यावेळच्या घटनाक्रमात आणि परिस्थीतीत फारसा फरक पडला नसता.
एमिलीचा उरलेला सीझन आला आणि
एमिलीचा उरलेला सीझन आला आणि लगेच पाहिला. हा सीझन एकूण बोअर झाला. सगळेच तेच ते तेच ते वाटले.
त्याचे आणि कमिल चे आणि त्याचे अन एमिली चे इक्वेशन्स गोल गोल फिरून तिथेच येतात पुन्हा पुन्हा त्यामुळे नाविन्य नाही वाटत. एमिलीला पण लगेच एक से एक मॅच भेटत रहातात आणि तिच्या प्रेमात पडतात. पॅरीस फिरून झाले आता रोम. त्यात नव्याने काही रोमॅन्टिक वाटले नाही. बास करावे आता त्यांनी. नविन सीझन नका आणू .
यावेळी गॅब्रिएल चा चार्म पार गेलेला आहे. पोट बिट सुटलेय असे पण वाटले
मैं+१
मै+१
शॉपिंग, गाणी, नाच, मुके, एमिलीचे केसांचे चपटे वळण... दॅट्स दॅट. गॅब्रियलचे कपाळावरचे केस Dumb and dumber ची आठवण करून देतात.
एमिली नव्या रतिबातला पहिला
एमिली नव्या रतिबातला पहिला एपिसोड कसाबसा पूर्ण केला. उरलेली बघण्यात अगदीच इंटरेस्ट उरला नाही. बंद केली.
पोट बिट सुटलेय असे पण वाटले
पोट बिट सुटलेय असे पण वाटले >>> हो गॅब्रिएल आता ढोला होणार असं वाटलं हा सिझन बघून ! आणि एमिली अॅनिमिक होणार असं वाटतय.
त्याचे आणि कमिल चे आणि त्याचे अन एमिली चे इक्वेशन्स गोल गोल फिरून तिथेच येतात पुन्हा पुन्हा त्यामुळे नाविन्य नाही वाटत >>> हो, एकंदरीत स्टोरी तिथल्या तिथे घुटमळत रहाते आहे. सिल्वीची सावत्र मुलगी, मिंडीची स्टोरी सगळे उगीच आलेले ट्र्विस्ट वाटले.
पुढचा भाग आला तर सुंदर रोम दाखवा म्हणं !
Call me bae for the young and
Call me bae for the young and hip in the house. Older folks will not get any references of today's India.
कॉल मी बे- वन टाईम वॉच, तशी
कॉल मी बे- वन टाईम वॉच, तशी बरी आहे.
अनन्या ने विट्टी, रिची रिच वरून जमिनीवर आलेल्या मुलीचा रोल चांगला केलाय. एमिली चीच कॉपी वाटतेय- विशेष करून कोइंसीडंसेस तिच्याच बाजूने घडत राहतात तेंव्हा. बाळबोध आहे अगदीच- नुस्त्या एका व्हायरल व्हिडीओ वरून पत्रकारीतेचा ईंटर्न जॉब मिळणे, शॉप थेफ्ट ला कुणीतरी हजर असून तिला वाचवणे, प्रत्येक दुसरा पुरूष बरोब्बर हिच्याच प्रेमात असणे, लोकांच्या घरात लिलया जाऊन लॅपटॉप उघडून फाईल डिलिट प्रयत्न वगैरे..
वीर दास ला नीगेटिव रोल मधे
वीर दास ला नीगेटिव रोल मधे बघून मस्त वाटले.
डिस्नी हॉटस्टारवर ‘द नाईट
डिस्नी हॉटस्टारवर ‘द नाईट मॅनेजर’ बघतेय. जुनीच आहे. मला मुहूर्त मिळाला नव्हता. अजूनतरी चांगली पकड आहे. अर्थात जॉन ल’कारच्या पुस्तकावर आधारित आहे म्हणे. पुस्तक शोधून वाचणं आलं आता. आदित्य रॉय कपूर चांगला दिसतो. अनिल कपूर श्रीमंत बिझनेसमनच्या त्याच्या हातखंडा भुमिकेत आहे. त्याचा व्हिलनीश ऍंगल येईल तेव्हा मजा येईल असं वाटतं. सफीनाचं काम करणारी मुलगी चांगलीच इंप्रेसिव्ह होती.
हो, कॉल मी बे म्हणजे एमिलीच
हो, कॉल मी बे म्हणजे एमिलीच आहे भारतीय अवतारात.
डोकं बाजूला ठेवून बघायला ओके आहे.
खूप क्युट क्युट श्रीमंत प्रॉब्लेम्स आहेत सर्वांचे.
(मला ती ब्लॅकमेल होणारी बाई आणि तिचा प्रियकर यात मलायका आणि अर्जुन कपूर उगीचच दिसत होते.कॉल मी बे मधल्या गोष्टी, पात्रं खऱ्यावरून घेतलेली असावी.पण फार काही कळले नाही.तो वीर दास पात्र अर्णब गोस्वामी सारखे वाटले.)
Pages