दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol र आ
बघितला हनुमान.. ठिक ठिक सिनेमा..

Por Thozhil: सायकॉलॉजिकल suspense Thriller. दोन CID Officers, एक मुरलेला जुनाजाणता आणि दुसरा नवशिक्या, एका psycho च्या मागावर असतात.

नेहेमीप्रमाणे climax +added Climax असला तरी मला आवडला. नाहीतर Ghazani (south चा) अणि Ratsasan प्रमाणे पाणी घालून वाढवला नाही, हे आवडले.

हनुमान नवऱ्याने लावलेला, तो दोन तीन दिवस थोडा थोडा करत पिक्चर बघतो. मला संपता संपेना वाटला, अर्थात मी फार कमी बघितला पण हे काय अजून हनुमानच सुरू, असं वाटलं. काही सीन्स आवडले, बाकी जे बघितलं ते काहीच्या काही टिपिकल साऊथ.

सध्या तो कुठला मुवि बघतोय बरं, तो ही काहीच्या काही आहे पण साऊथचा नाही. सैफ, अर्जुन कपूर, यामी, जावेद जाफरी दिसले.

हो बहुतेक, तोच असावा.

तो अजून त्याचा बघून पूर्ण व्हायचा आहे, मगाशीच विचारलं, सैफ, अर्जुन कपूर, जावेद जाफरी बघत होतास तो बघून झाला का, तर नाही म्हणाला.

मुरूगन नावाचा चित्रपट रोस्ट करता येईल म्हणून सुरू केला. पण एकदम वेगळा निघाला.
दक्षिणेला जातव्यवस्स्था बिनदिक्कत मांडतात. यातही आहे. पण क्लास घेतलेला नाही.

निव्वळ मनोरंजन + वास्तवाची फोडणी अशी हुषार ट्रीटमेंट.
बाकी सगळा साऊथचे नियम पाळणाराच आहे. ओळखीचा कुणी स्टार दिसत नाही.
नायकाच्या लहानपणीचा फ्लॅशबॅक सुरू झाल्यावर बोअर झालं आणि बंद केला.

The family star तेलुगू प्राईमवर सबटायटल्स
नायक, एक मध्यमवर्गीय नोकरदार माणूस, घरातल्या सगळ्या गरजा काटकसरीने भागवणारा..कहानीमें आता है ट्वीस्ट जेव्हा नायिका, त्याच्या घरी भाडेकरू म्हणून राहायला येते..आणि हा ट्विस्ट पण एकदम फालतू निघालाय..काय ताणलाय सिनेमा उगाचच..बरी स्टारकास्ट घेतली म्हणजे प्रेक्षक काहीही पाहू शकतात असं यांना वाटतं...बोअर फैमिली सिनेमा.. नाही बघितला तरी चालेल.

Manjummal Boys मल्याळम, हिंदीत हॉटस्टारवर.
केरळहून दहा मित्र कारने कोडाईकनाल ला फिरायला जातात...तीथं एका restricted area असलेल्या गुहेत एक मित्र जीवघेण्या संकटात सापडतो..त्याला वाचवायला इतरजण प्रयत्नांची शिकस्त करतात...ग्रीपींग सिनेमा.. कुठेही पकड ढिली होऊ देत नाही.. थ्रीलींग,सर्वायवल सिनेमा...नेहमीप्रमाणे सुंदर निसर्गद्रुश्य..पावसाची पार्श्वभूमी मस्त...

मृणालीचा प्रतिसाद वाचल्यावर मंजुमेल बॉईज बघायला घेतला, नाव आधीपासूनच ऐकत होते बरंच.ग्रीपिंग आहे.कथा म्हणावी तर 3 ओळींची.पण सत्यकथा आहे हे सर्वात भीतीदायक.It is like someone's worst fears coming true.
ग्रीपिंग आहे.

Premalu मल्याळम, हॉटस्टारवर, हिंदीत.
सचिन एक मल्याळम मुलगा, हैदराबाद मधे मित्रासोबत राहत असतो..इंजिनिअरिंग पूर्ण करून आयुष्यात अजून सेटल झालेला नसतो. यु के विझा साठी ट्राय करत असतो, ..तिथेच आयटि प्रोफेशन असलेल्या रेणुच्या प्रेमात पडतो..रेणू एक भविष्याचे सगळे प्लान्स क्लीअर असलेली कमावती तरूणी...रेणुचे ऑफिस, कलीग्ज,रूममेट्स आणि मज्जा,छोटे छोटे पंचेस..सचिनचे रेणूला इंप्रेस करायचे फेल जाणारे प्रयत्न..
म्हटलं तर कथा अशी विशेष नाही पण गोड आहे सिनेमा हलकाफुलका, विनोदी, फैमिली सोबत बघता येईल असा..आवडला मला..

टिल्लू स्क्वेअर बघायला घेतला, अर्ध्या तासानंतर फोन तोंडावर पडून झोपले.मग परत उठून थोडा पहिला.भंपक वाटला.काहीही कथा आहे.नायिका घाऊक बाजारातून अर्धा डझन एकाच फॅशन चे उचलून आणल्या सारखे एकाच गळ्याचे एकाच स्टाईल चे वेगवेगळे ड्रेस घालते.त्यात त्या केसांचं छप्पर असलेल्या छपरी हिरोचं नाव बालागंगाधर टिळक असल्याने अजूनच डोकं भडकलं आणि 'नॉट फॉर मी ' वाला अधोगामी अंगठा देऊन हिस्टरीतुन उडवला.

आवेशम बघायला घेतला.मनात मिश्र भावनांचा कल्लोळ आहे.
1. हल्ली इंजिनिअरिंग कॉलेज च्या मुलांना 'तो अमका खडूस टीचर सबमिशन वर सही देईल का' पेक्षा मोठे प्रश्न 'रोज दारू प्यायला मिळेल का,सिगारेट चा रतीब अबाधित राहील का' हे
पडले आहेत.
2. बारावी मध्ये कोणतीही ट्युशन न लावता स्वतः घरी अभ्यास न करणारी मुलं जशी ऍह(हात झटकून तोंड वाकडं करून) समजली जायची तसं प्रत्येक कॉलेज च्या मुलाने एक गॅंग चा सदस्य होणं बंधनकारक आहे.
3. मुख्य पात्रं दिसायला नॉर्मल आहेत(सिक्स पॅक किंवा छान चेहरे वाली नाहीत.)
4. फहाद फासील बघून पुण्यातले बरीच फ्लेक्स उत्सवमूर्ती आठवले.
5. जसं माणूस नोकरीत सिनियर झाल्यावर त्याने स्वतः काम न करता फक्त कामावर देखरेख करणे अपेक्षित असते तसं गुंड कामात सिनियर झाल्यावर तो इतरांना नुसता मेंटर करेल, स्वतः मारामारी करणार नाही.
6. किमान 10 जेंटस युरिनल मध्ये कार्यक्रम करताना गप्पा मारल्याचे सीन दाखवले नाहीत तर दोस्ती, चित्रपटात असलेली नैतिक मूल्ये सिद्ध होत नाहीत.
7. कोणीही कधीही अभ्यास केला नाही तरी चालतं.आपोआप दुसऱ्या वर्षात ढकललं जात असावं.
8 ऑल सेड, फाहाद फासिल जबरदस्त अभिनेता आहे.(तो असं म्हणाला नाहीये बरं का मी हे सर्व आहे म्हणून) सायकोपाथ, डिप्रेशन मधला, मूडी, शो ऑफ ची आवड असलेला गँगस्टर सॉलिड रंगवलाय. आणि काहीही केलंय(टॉवेल नृत्य काय,किस केल्यासारखे सिगारेट पेटवून देणे काय), त्याला बहुतेक खुल्या सांडासारखं 'जा, काय वाट्टेल ते मुक्तपणे कर' म्हणून या पिक्चर मध्ये सोडून दिलं असावं.
पाचूचा जादुई दिवा मध्ये चांगला होता.इथेही सॉलिड स्वॅग आहे.

Pages