आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायाच्या डे केअरमधल्या मुलांसाठी मायानेच पिकनिक arrange केली आणि आलेले पालक मायालाच ओळखत नाहीत.

Lol भरत, अगदी हेच लिहायला आले होते..
काही स्त्रिया तिलाच विचारत होत्या..तुम्ही कोण म्हणून.
कमाले!
लेखक भांग पिऊन एपिसोड्स लिहितात असे वाटते!

त्या बावळट आशुने त्या पालकांना सांगितलं की मायाच मनुची खरी आई आहे आणि हे मनुला कळू देऊ नका.

त्याचा आधीच मर्कट , त्यात मद्य प्याला मग त्याला विंचू चावला असं झालंय.

बाळा, आतापर्यंत तू माया मनुची आई आहे हे मान्य करत नव्हतास. आज जगाला सांगतो आहेस. तिला ते सांगायचंय की नाही, याचा विचार नाही. आणि आता जर तुला ती मनुची आई आहे हे मान्य आहे, तर तू कोणत्या तोंडाने मनुवर हक्क सांगतोस.

अन्घाचे आईवडील कुठे गायब झाले? एवढी उ लथापालथ होतेय आणि त्यांना पत्ता नाही? ते आले असते आणि येताना दोनचार नोकर सोडून गेले असते.

पण रोज मुलांना सोडायला , न्यायला येतच असतील ना? त्यात कधी भेट झाली नसेल? पिकनिकला हे लोक त्या डे केअर पासून निघाले, तिथे त्यांच्याशी बोलली नसेल?

लेखकां बद्दल माझ्या मनात हिंस्र विचार येत आहेत. काल त्या बाईला स्वतःच्या पोटच्या पोरीला सांभाळणं आर्थिक दृष्ट्या शक्य नव्हतं. आज ती डे केअर सेंटर्सची चेन चालवते . त्यातही एकाच मुलीच्या मागे दिवसभर करते. आधी डे केअर सेंटर्सची चेन, फॉस्टर पॅरंट्स असल्या कल्पना भारतात दाखवतात कशा? दुपारच्या स्लॉटला डिमोशन होऊनही यांना अक्कल येत नाही की मालिका बंदच पाडायची सुपारी घेतली आहे?

मी या धाग्यासाठी ती मालिका बघतो. हे लिहिताना माझीच मला कीव येते आहे. करायला इतर चांगले अनेक उद्योग आहेत. पण अर्धा तास वाया घालवायचाच आहे. दुपारच्या स्लॉटला गेली की बघणं आपसूक बंद होईल.

अभिषेक हरवलाय आणि हे लोक नाचगाणी करताहेत.
आता अरु केळकरांकडे आली की सगळं रामायण सांगेल. मग आशुबाळ नितीनला सांगून अभिबाळाचा शोध घेईल.

आशुबाळ माया के लिए हानीकारक है. तो समोर असला की ती धडपडते आणि तिला लागतं. लेखक चमुचं कल्पनादारिद्र्य ओथंबून वाहतंय.

आशू बाळाचं एकूणच....व्यक्तिमत्त्व मला अजिबातच आवडत नाही.
एकतर जाड आहे. ! तेलकट चेहेरा, चष्मा न लावल्यास विचित्र दिसणारे डोळे, गेंगाणा स्वर, थपथप चालणे....

कालच्या भागात कांचनने उधळलेली मुक्ताफळं ऐकलीत का लोक्स? अनिरुद्धच्या मागे लागलीय अरूंधतीला परत घरात आणायचं म्हणून. त्यासाठी मुलांना मधे घाल, त्यांच्या आणाभाका घाल वै वै मार्ग सुचवलेत वर तुला जे हवं ते कर मी तुझ्या बरोबर आहे हे ही सांगितलं. हिला घरात फुकट राबायला माणूस हवं आहे कायमचं वर तुझंच घर, तुझीच माणसंचा मुलामा आहेच तयार.

ती नेहमीच तसं बोलते, त्यामुळे त्यात नवल वाटलं नाही. आरोहीला सुद्धा घरकाम येतं हे बघूनच तिने होकार दिला आहे.

अप्प्या म्हणे रात्रीचा स्वैपाक आपण दोघे करू. नोकर ठेवा हे सुचणार नाहीच. डबे तरी लावा. पैशाची कडकी असावी. सध्या संजना सोडली तर कोणीच कमवत नाही.
(केळकरांकडे पण कोणी काम करताना दिसत नाही. तरी भरपूर पैसा आहे. ईडी / इनकम टॅक्सने रेड मारावी.)

इतक्या खोल्या असलेल्या घराची स्वच्छता, आवराआवर, इतक्या लोकांच्या खाण्यापिण्याचे चोचले , त्यावर रोज उठून कसले ना कसले सण समारंभ एका व्यक्तीने करणे मानवी शक्तीच्या पलीकडे आहे. मी सुरुवातीचे भाग पाहिले नाहीत. इतकी कामं करताना आतासारखंच अरुंधतीच्या साडीची इस्त्री, केस नीटनेटके असत का? घाम यायचं नावच नको.

इतक्या खोल्या असलेल्या घराची स्वच्छता, आवराआवर, इतक्या लोकांच्या खाण्यापिण्याचे चोचले , त्यावर रोज उठून कसले ना कसले सण समारंभ एका व्यक्तीने करणे मानवी शक्तीच्या पलीकडे आहे. मी सुरुवातीचे भाग पाहिले नाहीत. इतकी कामं करताना आतासारखंच अरुंधतीच्या साडीची इस्त्री, केस नीटनेटके असत का? घाम यायचं नावच नको.

म्हणूनच तर तिला दमा लागला........... हा हा हा हा

हो. हल्ली उसासत बोलणं कमी झालं. केळकरांकडे घरकामाचं फक्त नाटक करते.

संजनाचं पार्सल कांचनने उघडल्यावर ती चिडली होती. पर्सनल स्पेस आणि काय काय. आज तिने अरुंधतीचा फोन हिसकावून त्यातले फोटो पाहिले.

अरुंधतीचा प्रवास पुन्हा समृद्धीकडे झाला तर हिला तिच्या नवर्‍याकडे जायचा काही स्कोप नाही. म्हणजे हिचं तेल गेलं , तूप गेलं....

काही दाखवतात ए! आशुतोष ला त्या मायाचा मुळात इतका पुळका का म्हणते मी!
इतकं सरळ धडधडीत अनैतिक आचरण आशुतोष ने चालवून कसं घेतलं? का?
त्या हट्टी मनुपायी पूर्ण संसाराची वाट लावणारे!
अनुपमा मध्ये तर सगळेच यू एस ला निघालेत !
आणि अनुज अजूनही पागल आहे तिच्यासाठी...आणि अजून एक जण तिच्यावर आता फिदा आहे!
काय आहे तिच्यात एवढं कोण जाणें!

युट्युबवर दिसला. हार घातलेला फोटोला.

कुठलं पाळणाघर रेंज नसलेल्या ठिकाणी नेतं मुलांना आणि पालकांना तेही २ दिवस ? मायाला कोणी मदतनीसही नाही दिसली. माया सतत आशुवर डोरे डालण्यात बिझी होती. व्यवस्था कोण बघत होतं कोण जाणे. म्हणूनच तिचा नवरा येऊ शकला असावा.

माया सतत आशुवर डोरे डालण्यात बिझी होती.
>>>
इतकी वर्षे अरुसाठी थांबलेल्या आशूला (ज्याच्यावर वेळोवेळी ऑलरेडी इतरांनी डोऱे घातले आहेत) हे समजत नाही? किमान चाळीशीचा तरी असेल ना तो?

यांना आयुष्यात प्रेम, लग्न, संसार, सण, समारंभ यापलीकडे काही इच्छा/आकांक्षा/छंद आहेत का नाहीत? एखादा ट्रेक, सुंदर नाटक/सिनेमा/पुस्तक/जिम/योगा, गेला बाजार माबोवर गाजलेल्या मुलाखती याविषयी कुण्णी काही बोलत नाही. अगदी तरुण पिढी पण मित्र मैत्रिणींबरोबर फ्रिक आउट, करीअरसंबंधी चर्चा काही काही नाही. प्रसंगाची गरज म्हणून चुकून गेलेच तर एखाद्या शेडी मित्राबरोबर रिझॉर्टला जाऊन अनावस्था प्रसंग ओढवून घेणे बास. म्हातारी माणसे हास्य क्लब/पेन्शनर ग्रुप/लायब्ररी काही काही नाही. अरु वर्ल्ड फेमस गायिका होती ना? कधी पेटी/तंबोरा घेऊन रियाझ करायला बसत नाही? किमान सकाळी/संध्याकाळी चालायला जातो असेही कुणी म्हणत नाही.
ये जिना भी कोई जिना है लल्लू?

Happy अरुंधती ला दाखवतात कधी कधी रियाझ करताना!
बाकी सगळा आनंदी आनंद्च आहे.
संजना पण कधी नोकरीवर जाताना दिसत नाही.
आरोही काय करते काम धंदा? यश?

अप्पांना सोयीस्कररीत्या मैत्रीणी उत्पन्न होतात.
आरोहीला तर अमेरिकेच्या युनिवर्सिटीमधून बोलावणं आलं होतं.
अरु तोंडी लावायला रियाझ करते.
अनिशचं उत्पन्न माहीत नाही, पण लग्न मात्र झालेलं आहे.

हे आशुतोष चे जाणे म्हणजे जरा जास्तीच ट्विस्ट घेतला....!
अनुपमा वाले इतके ड्रामेबाज असून त्यांनीही हे धाडस केले नाही !
अरुंधती ला बिचारी दाखविण्याच्या नादात बाकीच्या सगळ्या कॅरेक्टर्स वर किती अन्याय!

आता आशुतोष जातोच आहे तर दुसरा एखादा डॅशिंग हिरो आणावा. परत तेलकट तुपकट नको. हे चाळीशी पार केलेले लोक आणि यांचे गैरसमज पार कॉलेजमधल्या पोरापोरींसारखे कसे. कांचन, अनिरुद्ध मूर्तीमंत उदाहरण आहेत न बदलणार्या टॉक्सिक मेंटालिटीचे.
तिकडे अनुपमा तर कायम केस पिंजारून फिरत असते. तिथेही गैरसमज अगदी टीनएजरसारखेच. स्वतः आकांडतांडव करून अनुपमाला घराबाहेर काढणारा अनुज आता तिच्या मागे दीवाना बनून फिरतोय. म्हणे मला सोडून का गेलीस. त्याची पोरगी तर डोक्यातच जाते.
जेमतेम एखादा महिना अमेरिकेत राहून भारतापेक्षा जास्त पापड मोडलेले आहेत अनुपमाने तिकडे.

Pages