आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
भरत,
यशने ब्रश ब्रिश न करता पोहे खाल्ले. या मालिकेतला कोणत्याही जोडप्याचा रोमान्स फार खोटा खोटा ओढून ताणून वाटतो..... हो ना..अगदी यक्क वाटत होते!!!!
घरी नवीन आलेल्या मुलीने काही खायला केलं की तिला पैसे बक्षीस द्यायची पद्धत आपल्यात (मराठी लोकांत ) आहे का?
नाही !. मी तरी नाही पाहिलेलं....! आणि तिचे अजून लग्न ही नाही झालेले...
आणि मी तर उलटं ऑफेंसिवली घेतलं असतं...मला जर कुणी असे पैसे दिले तर!!!!
काही दाखवतात.
आणि यश आरोही चा रोमांस अगदीच पाणी कम चाय...निव्वळ फीलर!!!!

त्या कसल्या पुजेला आधी एकच मुहूर्त होता. आता दोन दिवसांनंतरचा दुसरा मुहूर्त मिळाला. >>> त्या बाबतीत कांचनचा त्रागा एकदम पटला.
तिने सगळ्यांना तयारी ला लावलं आणि अरूने परस्पर गुरुजींशी बोलून दुसरा मुहूर्त काढला.अरूला स्वतःला यायला जमणार नाही म्हणून खटाटोप.
संजनाचे टोमणे चुकीचे नव्हते.

ईशा एका एकदम गुंड दिसणार्‍या, मवाली, रानवट माणसाशी 'बिझीनेस डील्स' करताना दाखवली!
कैच्याकै !!

असे कोण मायाला परस्पर घरी रहायला वगैरे बोलावते घरी? तिला मुलीची इतकी माया आहे तर आधी कशी काय अनाथश्रमात सोडली?

तिला मुलीची इतकी माया आहे तर आधी कशी काय अनाथश्रमात सोडली?>>> हा प्रश्न कुणालाही विचारावासा वाटला नाही. बाकी फालतू स्टंटबाजी बरोबर जमते सगळ्यांना.

इशाने १० लाख उधळले आणि काहीच झालं नाही असा आव ...त्यात 1 आठवड्यात पैसे दुप्पट स्किम मध्ये बुडवले, ही बया खरंच मूर्ख आहे.

पुढच्या महिन्यात साडेसातच्या स्लॉटला नवी मालिका येते आहे.

अप्पा कांचनच्या साखरपुड्याचा किस्सा किती फेक. एक वेळ पत्रिकेवर चुकीची नावं छापली हे समजून घेऊ. पण अशा चुकीच्या पत्रिका वाटायला हे लोक निरक्षर होते का?

माया आता एकता कपूरच्या मालिका बघून तिथल्या व्हँपकडून ट्रेनिंग घेते आहे.
अन्घाचा काही तरी नवा ट्रॅक सुरू होतो आहे. दोनदा चक्कर आली. बातमी? की आजारपण?

अनिरुद्ध अचानक चक्क पूर्ण सुधारला आहे. किती दिवस?

अनघा त्या माणसाला अभि समजत होती का?
माझ्यासाठी थांब म्हणाली.
की तो तिचा एक्स नवरा आहे? मला आठवत नाही कोण दाखवला होते ते!
माया फारच कनिंग आहे !
पण आशुतोष कसा काय इतका बदलला?
म्हणजे त्याचे मूळचे दाखवलेले मार्दव, तर्कशुद्ध आचरण, प्रेम, अतिशय उच्च व्यावसायिक यश..म्हणजे चारपाच कंपन्या, प्रोजेक्ट्स, संगीत...
यापैकी काहीच आता दिसत नाही!!!!

मनुच्या दप्तरात सहलीचं माहीतीपत्रक मिळालं म्हणजे ते अरुनेच ठेवलं हे अनुमान काढायला ती काय घरातली तिजोरी आहे का बँकेचा लॉकर की फक्त अरुला अ‍ॅक्सेस असेल ? कसा काय मोठा (बिझनेस्मन) झाला हा आशु कोण जाणे.

कोणी बघतं आहे की नाही ? आशुला भानगड करायला मिळावी म्हणून बिचार्या अनघाला हार्ट अटॅक.

काल का परवा अनघा झोपलेली असताना यश - आरोही संवाद -
आता कामाला बाई ठेवायची टाईप बोलत होते. अनघा आजारी म्हणून कामवाली ? एक कामवाली होती ते विसरलेले दिसत आहेत.

नाही, ती विमल कधीच सोडून गेली !
(सीरियल आणि देशमुखांचे काम..दोन्ही! :-))
जानकी बदलली! आधीचीच गोड होती.
आरोहीला गृहीत धरतहेत as usual!
आणि आशुतोष एकदम रागावला आहे अरुंधती वर....!
ईशा थोडी समजूतदार झाली आहे का हल्ली?

आता ही मालिका दुपारच्या स्लॉटमध्ये दाखवली जाईल. साडेसातला कहानी घर घर की चं रिमेक येणार असं वाचलंय.

जानकी बदलली! अधीचीच गोड होती. >>>>>> हो.

अभिचा काम करणारा एक्टर बदलला वाटत. परवा दाखविला होता तो कोणी भलताच दिसता होता.

अभि कॅनडाला गेलाच नाहीये, खोट बोलतोय, अस दिसतय.

अभि बदलूनसुद्धा अन्घाने त्याला ओळखलं. कमालच आहे.

अरुंधतीने आशुतोषला फोन न करणं, त्यांचे फोन‌ न घेणं हे किती वेळा. एक मेसेज करायला किती वेळ लागतो? होऊन जाऊ द्या घटस्फोट.

नुकताच झोपेतून उठलेला आशुबाळ पिकनिकला जायला पाच मिनिटांत तयार होतो. घाणेरडा.

एकदम हायफाय प्रिस्कूल आहे. पोरं आपापल्या कारने पिकनिकला जातात. बस शिवाय शाळेची पिकनिक?

Biggrin हो ना..
आपापल्या कार ने काय?
त्यापेक्षा...ते कसे गेले हे दाखवायचंच नाही ना..
जरा वेगळ्या पद्धतीने लिहायचे ते सीन्स!
असं कुठे असतं का... मुलीला तयार करून गाडीत बसवून आले आहे म्हणे मी !

अन्घाला ट्रीट करणारी डॉक्टर कार्डियोलॉजिस्ट आहे, असं दिसतं. अँजियोग्राफी, ब्लॉकेजेस असे शब्द वापरले. फार तर जनरल फिजिशियन.

ती कॅनडात भूलतज्ज्ञ अभिषेक देशमुखची जागा घेणार.

Lol
बापरे..किती बारीक निरीक्षण !!
पण...असे मुळात असे एकाच्या जागी दुसरा..नगाला नग...देता येतो का..मेडिकल क्षेत्रात?
ते पुन्हा टेस्ट घेतील, इंटरव्ह्यू घेतील...असे नसते का?

आज अनघा हार्ट एटेक मधुन उठून घरी आली पण. चार दिवस सर्वांचे कपडे एकच आहेत. एकाच दिवशी चार भाग शूट केले असतील. घरी पेशंट परत येतो तेव्हा कपड्याची बॅग, औषधे, डबा, साबण तेल कंगवा पाण्याची बाटली , रिपोर्ट ची फाइल लाम्बडे फोल्ड न करता येणा रे रिपोर्ट असा पसारा येतो. मागे एक जण हे सर्व सांभाळत असतो. पेशंटच्या हाताला कोपराला इंजेक्षन टो चून झाल्याच्या कापूस व्हाइट चिकट पट्टी असतात. मुळात तिथे त्यांचा गाउन घालावा ला ग तो व घरी नेताना फ्रेश कपडे घालतात. पण इथे अनघाने पिन अप केलेली ओढणी पण तशीच.

ती नवी जानव्ही ची बॉडी लँग्वेज एकदम करेक्ट होती. मला हात लावु नका, आई कडे बघुन हसली पण नाही. झेपावणे दूरची गोष्ट. आरोही लगेच बेबी सिटर होउन हसत हसत बसली आहे. काही दिवसांनी हिचे पण होईल. मग अर्धा भाग. अनघाला हसवणे व अर्धा आसुतोस व मायाचे कोर्टिन्ग कम पिकनिक. नवा खवा मिळाल्याने आशु ओठ मुडपून हसत आहे. अरु ने नवर्‍याला लिफ्ट न दिल्याने त्याने माया मार्ग पकड्ला तर!!! बरे होईल. हिने समरुद्धीवरच झाडू पोछा, स्वैपाक करायला हवा. खरेतर इतक्या श्रीमंत मुंबई करांकडे कमीत कमी तीन मेड असतात. एक स्वै पाकात मदत किंवा फुल स्वैपाक एक वर कामाला व एक झाडू पोच्छा. साफ सफाईला. पण हे कंजूस आहेत.

सगळ्याच tv सिरिअल्स मध्ये श्रीमंत घरात सुरवातीला ढीगभर नोकर चाकर , मदतनीस , कारखानीस ,सबनीस दाखवतात तरी त्यांच्यात मध्ये मध्ये लुडुबुडू करणारी घरातील एकतरी व्यक्ती असतेच, कालांतराने ते ढीगभर नोकर चाकर गायब होऊन ती लुडबुडी व्यक्ती तेवढी १ लिटर कढईत ७/८ जणांसाठी काहीतरी खरवडताना दाखवतात। हा मात्र आतापर्यंत चा अपवाद एक मराठी सिरीयल होती जिच्यात ढीगभर माणसे होती कोण कुणाचं काय लागत होत ते लेखकाला माहित बाकी तिथे मात्र मोठं मोठी भांडी दाखवली होती ज्यात चहा व इतर स्वयंपाक बनतो असे प्रोमो मध्ये दाखवले होते । पुढे सिरीयल पहिली न्हवती .

कोणती इतकी रिअलिस्टीक सिरीअल ही अजनबी? Happy

प्रपंच का?
अरु ने नवर्‍याला लिफ्ट न दिल्याने त्याने माया मार्ग पकड्ला तर!!! ..... हे थोडे खरे आहे. अरु नेहमी त्याच्याशी मोठ्या बहिणीसारखी पोक्त पणे वागते. नो रोमँटिक रिस्पॉन्स अ‍ॅट ऑल !!

या सीरिअलचे अपडेट्स वाचून वाटते की अरुचे दुसरे लग्न कशाला केले. एकदा लग्न केल्यावर त्याला आल्मोस्ट वाळीतच टाकलेय तिने त्याला. इतर नसत्याच भानगडी फार.

नवऱ्याने फसवून अपमानित केलेल्या स्त्रीने दुसरे लग्न केले आणि दे (म्हणजे नवीन कपल) लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर हा नॅरेटिव्ह दाखवणे झेपत नाही का सीरिअलवाल्यांना?

कोणती इतकी रिअलिस्टीक सिरीअल ही अजनबी? Happy
सिरीयल च नाव खरच आठवत नाही पण मी एक प्रोमो पहिला होता त्यामध्ये मुलगी IPS ला बसल्यासारखी हिरोच्या सर्व नातेवाईकांची तिच्याशी लागणारी नाती व नावे आठवत असते .

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' सिरियल होती ती. हिरोचं खूप मोठं एकत्र कुटुंब आणि त्यात ॲडजस्ट करणारी संयुक्त हाय-फाय कुटुंबातली हिरोईन. त्यात पण शेवटी शेवटी बरीच पात्रं गाळून गेली.

ती गायिका व सुंदर मराठे मुलगी आशु टॉस ला बरोब्बर फिट होती. वयाने लहान तिने त्याचे ऐकले असते सर्व. गर्भवति होउन मूल झाले असते. म्हणजे शक्यता होती. परफेक्ट श्रीमंताची बायको लुक्स होते तिचे. व वागणॅ सुद्धा. सुखाचा संसार झाला असता. स्वतः गाडी चालवत त्याला हनिमून ला नेले असते तिने. ते तर अरु ने पण नेले पण मध्येच कपाळ मोक्ष केला.

अनघा व वृद्ध कपल ला खरेतर खालीच बेडरुम हवी. पण इतका विचार कोण करतो.

Pages