Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18
आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फा,
फा,
सुलेखा कोण? तिला यांच्याकडे येऊन कधी चक्कर आली?
तिच्या पुढे संजना अरूंधती वाटेल इतकी ती ओव्हर द टॉप होती.
मस्त..
सुलेखा म्हणजे त्या आजी ना?
सुलेखा म्हणजे त्या आजी ना? वरती एक दोन ठिकाणी नाव वाचून मी लिहीले
सुलेखा म्हणजे अरुंधतीची सासू
सुलेखा म्हणजे अरुंधतीची सासू क्र.२
म्हणजे तिच्या सासर्याची दुसरी बायको नव्हे, तिच्या दुसर्या नवर्याची आई.
हो.
हो.

फा, तुला कदाचित कांचन बद्दल म्हणायचे असावे.
ती कूकिंग स्पर्धा त्यांनी बरीच चांगली डिझाईन केलेली आहे पण!!
तो अँकर किती कृत्रिम आहे..अगदी खऱ्या अँकरांसारखा...
या मालिकेच्या आधीच्या संवाद
या मालिकेच्या आधीच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले यांचं ',मालिका' विषयावरचं पहिलं पुस्तक
https://www.facebook.com/100044224684341/posts/pfbid02o2vfQFUt1Khh1L5NHa...
म्हणजे तिच्या सासर्याची
म्हणजे तिच्या सासर्याची दुसरी बायको नव्हे, तिच्या दुसर्या नवर्याची आई.
>>>>
मराठी मालिकांचे विश्व अमेरिकन मालिकांच्या पुढे गेले आहे.
खूप दिवसांनी इथे आले.
खूप दिवसांनी इथे आले.
तो ऋषी सक्सेना आलाय का यात. मध्ये वाचलेलं कुठेतरी, त्याने या सिरीयलमध्ये येतो हे लिहिल्यावर, त्याला लोकांनी लिहिलं, की त्या अरुंधतीचा तिसरा नवरा होऊ नकोस.
मी कमेंट्स न वाचता लिहितेय, हा बाफ वरती आला म्हणून आठवलं.
म्हणजे तिच्या सासर्याची
फा, तुला कदाचित कांचन बद्दल म्हणायचे असावे. >>> हो हो कांचन! बर्याच दिवसांत ही मालिका नीट पाहिलेली नाही. त्यामुळे नावे विसरलो.
म्हणजे तिच्या सासर्याची दुसरी बायको नव्हे, तिच्या दुसर्या नवर्याची आई. >>>
मराठी मालिकांचे विश्व अमेरिकन मालिकांच्या पुढे गेले आहे. >>>
या रेटने उद्या हाफ ब्रदर, सेकंड कझिन वन्स रिमूव्ड वगैरे येईल
अरूंधतीच्या रेस्टॉ मधे एका
अरूंधतीच्या रेस्टॉ मधे एका पदार्थात झुरळ सापडले म्हणून पेपर मधे फ्रंट पेज मधे बातमी येणार होती. आली का माहीत नाही.
एकदम रेस्टॉरंटवर बंदी का आली माहीत नाही. प्रत्यक्षात असे काही झाले तर तेवढी एक डिश परत देऊन फुकट देतात. अरूंधतीने साधारण एक दोन दिवसात छडा लावला. कारण याच्याशी संबंधित सगळे लोक त्या रेस्टॉ च्या अर्धा किमीच्या परिसरातच फिरत होते. ज्याने ते झुरळ टाकले त्याने वडापावची गाडी तेथेच जवळ लावली यांना सहज दिसेल अशी, इतकेच नव्हे तर अरूंधती जनरल फिरायला बाहेर पडली तेव्हाच ते ही सगळे या प्रकाराशी संबंधित हालचाली करत होते.
आणि मग घरी येउन ते सगळे बोलणे होईपर्यंत बहुधा सरकारचे पत्रही आले की बंदी उठली आहे. हे लगेच झाले की एपिसोडच्या शेवटी पुढच्या भागाचा टीझर असतो त्यात झाले लक्षात नाही.
तिचा डॉक्टर मुलगा तेथे का काम करत होता ते समजले नाही. पण अरूंधती यापुढे गुन्ह्यांच्या शोध लावण्याचेही काम करेल असे दिसते.
फारेण्ड, मराठी मालिकांतील
फारेण्ड, मराठी मालिकांतील कामाच्या जागा, व्यवसाय यांच्या अभ्यासाची व्याप्ती वाढवायला तुम्हांला इथे भरपूर वाव आहे.
अरुंधती अचानक एका रेस्टॉरंटची मालकीण कशी झाली? तिच्या हॉटेलमध्ये फूड क्रिटिक कशी आली? ती सकाळीच यांचा भटारखाना सुरू व्हायच्याच काय, मालकीण बाई पोचायच्या आधी हजर झाली. मालकीण बाईंनी स्वतः पदर खोचून पदार्थ रांधले. तसंच यांच्या रेस्टॉरंटमध्ये रोजचा बदलणारा पण ठरावीक मेन्यु असतो, तोही एका लहान बोर्डावर मावेल इतका. मेन्यु कार्ड नसतं. एखाद्या फ्लॅटचं असावं तसं रेस्टॉरंटचं दार. समोर घरात असतं तेवढं. पण ओपन किचन. वर एसी सेक्शन. आणि स्टाफ किती तर एक मॅनेजर, एक शेफ आणि दोन वेटर.
ते झुरळ प्लांट केलेलं असतं. फुड क्रिटिक या सगळ्याचं व्हिडियो शूटिंगसुद्धा करते, त्यामुळे हे लगेच व्हायरल होतं आणि टीव्ही चॅनेल्सवर येतं , पेपरात फ्रंट पेजला येतं. फुड क्रिटिक फूड कॉर्पोरेशनला(!) रिपोर्ट करते.
अरुंधती आधुनिक धर्मराज असल्याने ती एकदा संशय घेते, मग संशय कसा घ्यायचा, ते असं का करतील असं म्हणते. सीसीटीव्हीतलं फूटेज बघण्याचा सीन तर एपिक आहे.
शेवटी तो तिच्याच रेस्टॉरंटमधला त्या सीसीटीव्हीत दिसलेला वेटर अचानक गायब होऊन त्याने वडापावचा स्टॉल टाकलेला कळतो आणि दिसतो, तरी ती त्याच्यावर संशय घ्यायला तयार नसते. पण मग तिथे संजना आलेली दिसल्यावर तिचा अगदीच नाईलाज होतो.
वडापावच्या स्टॉलवर चहा, कॉफी, दूध हे सुद्धा मिळतात आणि त्याला रातोरात लायसन्सही मिळतं आणि सगळा सेट अप तयार होतो, तोही रेस्टॉरंटच्या जवळच.
मास्टरशेफ महाराष्ट्र मध्ये संजना अरुंधतीच्या चटणीत बचकाभर मीठ घालते. ढवळत बिवळत नाही. तरीही चटणी अर्थातच भयंकर खारट होते. अरुंधती स्पर्धेतून बाद होते. पण प्रेक्षकांच्या मागणीवरून तिला परत बोलवतात आणि ती जिंकते.
आता स्पर्धेत एवढ्या कॅमेरामन , जजेस, प्रेक्षक असताना संजनाने काय केलं ते यश शूटिंग पाहून शोधून काढतो.
गुन्ह्यांचा शोध घेणं हे काम नितीन करतो. म्हणजे आधीपासून करत आला आहे. घडला गुन्हा की तोच छडा लावतो. हे सगळं तो आता स्वर्गवासी
आशुबाळाचे अनेक बिझिनेस आणि स्वतःची आजारी बायको यांना सांभाळून करतो.
भरत गुन्ह्यांचा शोध घेणं हे
भरत

गुन्ह्यांचा शोध घेणं हे काम नितीन करतो...!!
आशुला मारून यांनी एक मोठाच
आशुला मारून यांनी एक मोठाच प्रश्न सोडवला ... केमिस्ट्री नाही, तेलकट दिसतो, बुळ्या आहे इ इ बोलायला आपल्याला काही चान्सच नाही आता!
अरुंधती अती चांगुलपणा दाखवते. अभिला घ्यायची काय गरज होती?
पब्लिक त्या रेस्टॉरंटमध्ये
पब्लिक त्या रेस्टॉरंटमध्ये घुसून तोडफोड करतं हे आणखी एक.
अरुंधतीच्या अतीचांगुलपणाला बावळटपणा हा शब्द जास्त योग्य आहे.
Letter is issued by food
Letter is issued by food corporation of india. Which buys food from farmers and stores in large silos. Whereas food safety is checked by FSSI and bmc food safety.
आम्हाला साधी घरपट्टी नावावर
आम्हाला साधी घरपट्टी नावावर घ्यायला पूर्ण एक महिना लागला. इथे सगळं इन्स्टंट हातात मिळतंय. बाकी पोलिस केस, तपास वगैरे फालतू गोष्टींवर मालिकाकारांचा विश्वासच नाही. सगळं अरूंधती एकटी मॅनेज करते. नितीनची ओळख कुठे नाही असं नाहीच.
भरत जबरी निरीक्षणे आहेत.
भरत
जबरी निरीक्षणे आहेत. यातले काही सीन्स तुकड्यातुकड्यात पाहिले आहेत.
त्याने वडापावचा स्टॉल टाकलेला कळतो आणि दिसतो, तरी ती त्याच्यावर संशय घ्यायला तयार नसते. पण मग तिथे संजना आलेली दिसल्यावर तिचा अगदीच नाईलाज होतो. >>>
हो. कहानी की माँग असेल तरी ती संशय घेत नाही. तिच्या कम्पल्सिव्ह चांगुलपणापुढे गांधीजी, मदर टेरेसा वगैरे निगेटेव्ह शेड वाले हीरो वाटतील.
सीसीटीव्हीतलं फूटेज बघण्याचा सीन तर एपिक आहे. >>> पाहायला पाहिजे.
आणि इतके सगळे होऊनही संजनाला तिचा खुनशीपणा दाखवायला, तिला डॉयलॉग मारायला चान्स मिळावा म्हणून सगळे गप्प ऐकून घेत असतात.
. बाकी पोलिस केस, तपास वगैरे फालतू गोष्टींवर मालिकाकारांचा विश्वासच नाही >>> एक्झॅक्टली!
विक्टिमलेस क्राइम वगैरे म्हणतात तसा क्रिमिनललेस क्राइम होता की काय? यांनी अहो आमच्याच घरातून हा उद्योग केला गेला असा खुलासा केला (असावा) आणि बंदी उठली? पण रेस्टॉ च्या पदार्थात आवर्जून झुरळ घालणे हा किमान पोलिस स्टेशनवर बोलावून वॉर्निंग देण्याइतका तरी गुन्हा नक्कीच आहे. लोकांच्या जीवाशी खेळ वगैरे. पण संजनाला तसे काही करावे लागले नाही असे दिसते. अर्थात तो सीन साधारण असा झाला असेल.
फूड कॉर्पोरेशन आयबीच्या अध्यक्षांना फोन लावतात. अरूंधतीबद्दलच्या गोष्टी देशातील सर्वोच्च संस्था थेट मॅनेज करतात.
"त्या संजना मॅडमना स्थानिक पोलिस ठाण्यात बोलावून समज द्या"
"अहो त्यांनी हवालदार पाठवला होता. तेथे त्या अरूंधती मॅडम संजना मॅडमना लेक्चर देत होत्या"
"ओके. मग तेवढी शिक्षा पुरेशी आहे"
फुड क्रिटिक फूड कॉर्पोरेशनला(!) रिपोर्ट करते. >>>>
मला तो संवाद ऐकतानाच हसायला आले होते. कारण मला शंका आलीच पण म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या विभागाचे नाव लक्षात नव्हते. अशी मोठी नावे फेकली की काहीतरी भारी इमेज तयार होते. जसे एखाद्या गुन्ह्यासंबंधी सगळे तपास "फॉरेन्सिक" लॅब मधे केले जातात.
Letter is issued by food corporation of india >>>
थेट एफसीआय? आणि ते एमएसपी,
थेट एफसीआय? आणि ते एमएसपी, एपीएमसी वगैरे मॅनेज करायचे सोडून झुरळ कुणी टाकले तपास करतात? आता अरुंधतीविरोधात संजनाने डब्ल्यूटीओमध्ये तक्रार केलीय आणि युनोने त्याची दखल घेतलीय असं दाखवा आणि सुडोमि (माझे नाही मालिकेचे)
रेल्वे ट्रॅक घ्या बाजूला
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बोरिवली कांदिवलीच्या मध्ये FCI ची गोडाउन्स आहेत. FCI म्हटल्यावर तेच आठवले.
आणि मग FCI godowns मध्ये उंदरांमुळे होणारी धान्याची नासाडी.
अरे पण ती अरुंधती पार्श्वगायन
अरे पण ती अरुंधती पार्श्वगायन करुन भरपुर पैसे मिळवायची ना? तिच्या सकट सगळे हे विसरलेले दिसतात. अप्पांच्या डिमेंशिया संसर्गजन्य आहे! आता हे विसरली तर डिग्री पुर्ण करण्याचे स्वप्न पण विसरलीस असेल.
त्या एफसीआयच्या गोडाऊन्सच्या
त्या एफसीआयच्या गोडाऊन्सच्या जवळ आल्या की सगळ्या लोकल रखवडतात, अगदी विरार फास्ट पण. आजकाल त्या जागेला थांबिवली म्हणतो.
फूड कॉर्पोरेशनचे पत्र आले.
फूड कॉर्पोरेशनचे पत्र आले. तेव्हा कोणत्यातरी सिनीयर होम्स ची जाहिरात होऊ घातली होती. पण तो सीन अर्धाच राहिला. एफसीआयने म्हणे "सगळे आरोप रद्द केले आहेत". कसले आरोप? झुरळ तर उघडपणे सापडले होते ना? हलगर्जीपणा किंवा स्वच्छता नसणे यात "आरोप" काय आहे. आणि हे तपासणार्या संस्था व ग्राहक लोकही "अरे ते झुरळ अरूंधतीने नव्हते टाकले, संजनाने टाकले होते. मग ठीक आहे. आता पुन्हा रेस्टॉ सेफ झाले" असे समजलेले दिसतात.
ग्राहकाच्या प्लेट मधे झुरळ आले हे फूड इन्स्पेक्शनकरता रिलेव्हंट आहे. ते कोणी टाकले हे नाही. त्यांनी खरे तर अरूंधतीला जाब विचारायला हवा. "तुम्ही अशी सिरीयल सत्कृत्ये करत सुटलात तर तुमच्या सिरीज मधल्या स्लीवलेस घालणार्या किंवा संजना/मायरा ई नावे असणार्या स्त्रियाच काय, इतरही चांगले लोक असले घातपात करतील. पण रेस्टॉ मधे ते होऊ नये म्हणून तुम्ही काय करत आहात".
त्यात रेस्टॉ मधले कर्मचारी अरूंधतीलाच म्हणत आहेत की मॅडम तुम्ही असले काही करणार नाही यावर आमचा विश्वास आहे. अरे? म्हणजे इतके दिवस हे लोक अरूंधतीने ते झुरळ टाकले असे समजत होते की काय? पदार्थामधे झुरळ कोणी आवर्जून टाकले तरच निघू शकते असा यांचा समज दिसतो.
बाकी या सगळ्या सिरीज मधे मुख्य कलाकार सोडून इतर पात्रे असतात ते इतके प्रचंड बाळबोध संवाद म्हणतात. ते ऐकताना नेहमी हसू येते. मास्तर, पोलिस, चोर, पाटील, साहेब, शिपाई कोणीही पात्र असो, सगळे एकाच पुस्तकी भाषेत बोलतात.
अशी सिरीयल सत्कृत्ये करत
अशी सिरीयल सत्कृत्ये करत सुटलात तर तुमच्या सिरीज मधल्या स्लीवलेस घालणार्या किंवा संजना/मायरा ई नावे असणार्या स्त्रियाच काय, इतरही चांगले लोक असले घातपात करतील. >>>>>>
दिग्दर्शक, संवादलेखकाच्या अंगावर झुरळ सोडावे का असे विचार मनात येताहेत.
भरत ,मस्त
भरत ,मस्त
. डेडली आत्यांना वाऱ्यावर सोडले का? काय समाजावे त्यांच्या डेडली चाहत्यांनी ?
फा,
पदार्थामधे झुरळ कोणी आवर्जून टाकले तरच निघू शकते असा यांचा समज दिसतो.>>>>
अरुंधतीचा पारितोषिकाने सन्मानित शिळ्या भाताचा अश्लील पदार्थ अविस्मरणीय होऊन बसला आहे, तसेच पदार्थ या रेस्टॉरंटमधे वाढत असतील तर त्यावर झुरळ स्वतःहून तरी का बसेल हा विचार माझ्या मनातही येत आहे. त्यामुळे त्यांनाही तसेच वाटले असावे.
शिळ्या भाताचा अश्लील पदार्थ
शिळ्या भाताचा अश्लील पदार्थ अविस्मरणीय होऊन बसला आहे.

तसेच पदार्थ या रेस्टॉरंटमधे वाढत असतील तर त्यावर झुरळ स्वतःहून तरी का बसेल हा विचार माझ्या मनातही येत आहे
शिळ्या भाताचा अश्लील पदार्थ
शिळ्या भाताचा अश्लील पदार्थ
मुळात एक झुरळ मिळालं तर तेवढ्यावरून रेस्टॉरंटचं लायसन्स रद्द करतात का?
खारट चटणी आणि झुरळ - दोन्ही वेळा अरुंधती भक्तांची (यांची संख्या वाढतेच आहे - वेटर आणि शेफ ही लेटेस्ट भर) टेप काय - तर अरुंधती इतकी वर्षे (२६ बहुतेक - हा आकडा वाढवत न्यायला हवाना?_) स्वयंपाक करतेय, तिच्याकडून कधीही मीठ जास्त पडलेलं नाही / खाण्यात कधी केसही आलेला नाही, तिच्या हातून असं होणं शक्यच नाही.
मी खूप गॅपनंतर मालिका पुन्हा पाहतोय. नियमित पाहणार्यांनी सांगा की देशमुखांचं घर कसं चालतंय? म्हणजे घरखर्च कोण करतंय? अनिरुद्ध, संजना, अभिषेक घरी बसलेत. अनघा पार्ट टाइम . यशचा व्यवसाय बिनभरोशाचा. त्यासाठी तो आत्ता मूल नको, परवडणार नाही, असंही म्हणाला. ईशाने लाखांत पैसे बुडवलेत. राहता राहिले अप्पा आणि अरुंधती. अरुंधती आधीही घरखर्चात वाटा उचलायची, तेच सुरू आहे का?
काल अथश्रीची प्रॉडक्ट प्लेसमेंट करतात की काय असं वाटलं. आशुबाळ वृद्धांसाठी डे केअर सेंटर किंवा असंच काही चालू करणार होता ना?
डेव्हलपर समृद्धी बंगल्याच्या मागे लागलेत, तसे शेजारच्या - जिथे आधी संजना आणि गौरी , मग आरोही राहायच्या आणि आता अरुंधती राहते - तेही भाड्याने. मालक नितीनच्या बायकोसारखा अदृश्य. तर त्या बंगल्याचं रिडेव्हलपमेंट का होत नाही? आणि दोन्ही बंगले एकाच कंपाउंडच्या आत आहेत बहुतेक,
अरुंधती इतकी वर्षे (२६ बहुतेक
अरुंधती इतकी वर्षे (२६ बहुतेक - हा आकडा वाढवत न्यायला हवाना?_) स्वयंपाक करतेय, तिच्याकडून कधीही मीठ जास्त पडलेलं नाही >>>>
काहीही. ५०-५० वर्षं हातखंडा स्वयंपाक करणाऱ्या बायकांकडूनही कधीमधी मीठ-तिखट-मसाले कमीजास्त होऊ शकतात. अंधभक्त ही पदवी खरंतर अरुंधती भक्तांना दिली पाहिजे.
फारएंड, ग्राहकाच्या प्लेट
फारएंड,
ग्राहकाच्या प्लेट मधे झुरळ आले हे फूड इन्स्पेक्शनकरता रिलेव्हंट आहे. ते कोणी टाकले हे नाही.
खूप हसले.
साध्या साध्या वाक्यांतूनही हसू फुलवायचे तुझे कसब वादातीत आहे...
थँक्यू फॉर धिस जॉय!
अरुला मिळालेलं हॉटेल आशु
अरुला मिळालेलं हॉटेल आशु बाळाच्या घरात थाटलेलं आहे. जरा म्हणून बदल केलेला नाहीये घराच्या रचनेत.
मी मालिका बघणं सोडलेलं आहे, युट्युबवर २० सेकंद बघून अर्धा तास वाचवते दिवसातला :ड
अभिषेक आणि ईशा आप्पांशी
अभिषेक आणि ईशा आप्पांशी अचानक खुनशीपणे बोलू लागले. नेहमी ठाम , कॉन्फिडंट असणारे अप्पा अचानक रडकुंडीला आले.
कोणतं सिरप दिलं ती बाटली घेऊन यायची ना हॉस्पिटलमध्ये. ते न बघता सिरपमुळे काही झालं असं डॉक्टर अभिषेकला वाटतंय. तेही त्यानेच द्या म्हणून सांगितलं.
बाळांची डॉक्टर स्त्री होती, तर यश म्हणतो, डॉक्टर काय म्हणाले ऐकलंत ना?
त्याच्या मित्राच्या आजारी आईची मला काळजी वाटू लागली.
अरुंधतीने संजनाला कानफटवल्याला बरेच दिवस झाले. अभिषेक आणि ईशाच्या गालांना खाज येते आहे, हे तिला कळत नाही का ?
आता अप्पांना घराबाहेर काढून त्यांचा बेलवकलकर करणार. पण त्यांची सरकार त्यांच्या विरोधात जाईल.
अरुंधतीने संजनाला
अरुंधतीने संजनाला कानफटवल्याला बरेच दिवस झाले. अभिषेक आणि ईशाच्या गालांना खाज येते आहे, हे तिला कळत नाही का ?
मुळात एका डोसने तब्येत पार बिघडून जाईल अशी औषधं लहान मुल असलेल्या घरात कोण ठेवेल? ते पण अशी टेबलावर आणि डॉक्टरच्या खोलीत?
Pages