आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि अनुपमा कायम त्या एकाच बेज रंगाच्या स्वेटर मध्ये का असते? कुठल्याही साडीवर, घरी - दारी, रात्री दिवसा...तेच एक स्वेटर!

म्हातारी माणसे हास्य क्लब/पेन्शनर ग्रुप/लायब्ररी काही काही नाही. >>>>> निदान अप्पा लाफ्टर क्लबला तरी जातात. कान्चन ला तर काही सोशल लाईफच नाही.

अप्पांना सोयीस्कररीत्या मैत्रीणी उत्पन्न होतात. >>>>>>> ऑ, हे कधी झल?

अनिशचं उत्पन्न माहीत नाही, पण लग्न मात्र झालेलं आहे. >>>>> उगाच नाही इशा बिझनेस करायच्या मागे लागलीये, हा तर रिकामटेकडाच असतो.

हि माया आशुतोषला गालावर किस देतेय हा मात्र पुतळयासारखा ढिम्म उभा.

माया आणि तिच्या नवरयाने मारल असेल आशुतोषला. तसही तो मनूला सहजासहजी देणार नव्हता त्यान्ना.

कांचनला अरुंधती समृद्धीमध्ये पुन्हा राबायला यायला हवी होती. तिची इच्छा पूर्ण होणार.
कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है ·

मला तर वाटलं पिकनिकला गेलेले असतानाच मारतात की काय आशुला. अभिच्या प्रकरणात नाहक बळी जाईल का आशुचा ? सुलेखा अरुवर डाफरते प्रोमोत म्हणून वाटलं.

अप्पांना सोयीस्कररीत्या मैत्रीणी उत्पन्न होतात. >>>>>>> ऑ, हे कधी झल? >>>>> उर्सेकरीण उत्पन्न होते मधेमधे - फिलर टाकायचे असतात तेव्हा. का मला हे नावही आठवतं आहे ??? डोकं आपटणारी बाहुली Sad

अभि परत आला तर माफी का मागतो आहे ? ठीक आहे, नाही जमलं परदेशात, एवढं काय ?

हो आशु गेल्याचं स्वप्नही असू शकतं. पण आता सुलेखाही आशुला अरुविरुद्ध भडकावते आहे.

पण मला हे कळलं नाही...यश आणि नितीनलाही न्यायचे ना सोबत...!
आणि एअरपोर्ट वर जाणारा रस्ता कोणता एव्हढा जंगलातून आणि निर्मनुष्य झाडीतून जातो?
काही...!

ह्या सगळ्यात मूळ चूक आहे सुलेखाची. तिनेच मनूला घरी आणलं.
दत्तकचं घ्यायचं होतं तर आरोही होती की, आशु-अरु निदान ५०-५५ असणार. इतक्या लहान मुलीला कसे सांभाळू शकणार होते ? पुन्हा कायदेशीर दत्तकही घेणार नाहीत.

माया एका दिवसात पैसेवाली झाली का ? मनू आश्रमात असताना तिने काही हालचाल केली नाही - आधीच्या आश्रमात मनू खूप आजारी होती असा उल्लेख होता , तेव्हाही माया मनूला घेऊन गेली नाही.

खरे आहे प्राजक्ता.
आरोहीला तर उगीचच अनाथ दाखविली आहे. यांना दत्तक दिली असती तर काही पॉईंट होता.... !
तिला एखादी आई वगैरे जरी दाखवली असती...तर आपल्याला तिच्या उदर निर्वाहाचा इतका प्रश्न पडतो तो पडला नसता.
तशी ही ती आता देशमुखांकडेच पडीक असते.
आशुचे मनुवरचे प्रेम हे ऑब्सेशन वाटते.

मराठी सिरियल ओरिजनल बन्गाली सिरियलला follow करतेय. बन्गाली सिरियल आशुतोष कॅन्सरमुळे वारल्यानन्तर सम्पली होती. (हा शेवट खरतर आवडला नव्हता मला. ) अरु एकटीच राहते अस दाखवल होत.

नविन लेखक आल्यापासुन कथा अशरशः लॉजिक सोडुन रानोमाळ पळत होती...कशाचा कशाला ताळमेळ नाही...मुळात अस फॉस्टरिन्ग साठी मुल घरी आणता येत का?जरी सुलेखा ताइ आश्रम चालवत असल्या तरी सगळे निर्णय याचे हेच घेणार? माया मनुला घेवुन अमेरिकेला चालली?आणी ती आइ आहे हे लिगली कोर्टात कधी सिद्ध झाल?मनुचा पासपोर्ट्,व्हिसा?
टिआरपी जाम घसरल्यानेच दुपारचा स्लॉट दिलाय त्यात तरी प्रेक्षक टिकावे म्हणून आशुला मारायचा केकताने हजारो वेळा घासुन वापरलेला प्लॉट आणलाय...पण बात जमी नही!

आज तर गंमत - आधी अन्या गेला हॉस्पिटलला, दुसर्या मिनिटाला यश-अभि पण तिथेच जातो म्हणाले. एकत्र जा असं कोणाच्याही मनात आलं नाही.

कधी नव्हे ते अरुच्या आईची आठवण आली कांचनला.

काय चाललंय ते कुतूहल स्वस्थ बसू देईना म्हणून काल आणि परवाचे असे दोन भाग पाहिले.
संजना आणि अरुंधती समृद्धीच्या दारात रांगोळ्या काढताहेत. यश आणि दुसरं कोणीतरी कंदिलासारखं किंवा कागदी पिंपासारखं काहीतरी घेऊन बसलेत. म्हटलं यांचा गुढीपाडवा लवकर कसा आला, तर होळीची तयारी सुरू आहे. मग त्यात रांगोळी स्पर्धा. अनिरुद्ध जज. अरुंधती विजेती.

आशुबाळ इतक्यातच गेलाय , आपण शोकात आहोत म्हणून धुळवड करायची नाही - इति यश.
त्याचं लग्न दहा दिवसांवर आलंय, तोवर तरी आई तू इथे रहा.
अरुंधती समृद्धीत परत आल्याने संजना इन्सेक्युअर. अरुंधतीची मुलं तिला विचारतात. एवढ्या मोठ्या घोड्यांचं तिच्याशिवाय अडतं. संजनाच्या मुलाला - निखिलला नवी आई मिळाली आणि आवडलेली दिसते.

सण असला की म्हातार्‍यांचा रोमान्स हवाच.

संजनाकडून अरुंधतीची रांगोळी बिघडली ( हाउ सिम्बॉलिक) .कांचनने संजनाला एक ठेवून देऊ का तुला? असं विचारलं. हे 'तेव्हाच' विचारलं असतं, तर आज संजना इथे नसती.

अन्घाची तब्येत छान झालेली दिसते.

केळकर सदन न दाखवल्याने आगाऊ मनु, तिची ती आई, बाप यांचे अपडेट्स कळले नाहीत. आधीच्या दोघी - आशुची बालमैत्रीण चिंगी आणि बहीण वीणा गायब झाल्या तशी हीही झाली असावी.

आशुने विल बनवलं होतं वाटतं. अरुंधतीला फक्त पन्नास लाख दिलेत असं संजनाच्या बोलण्यावरून वाटतंय.

पैसे का चक्कर बाबू भैय्या >>>>>>>>>>>>>>>

अचानक सुलेखा अरुच्या विरोधात गेली आहे.

नवीन Submitted by प्राजक्ता_शिरीन on 5 April, 2024 - 05:53

मी ओटिटी वर महत्प्रयासाने आता ४०० व्या एपिसोडवर आलोय... आता अरु तिच्या माहेरी परत गेली आहे व ऑन लाइन क्लासेस साठी मांडी संगणक शोधत आहे.... आता कुठल्या एपिसोड पर्यंत फास्ट फॉर्वर्ड करू?????

Hi review if you login into Disney hotstar by 6.30 am early morning new episodes of anupama and akkk are uploaded. My suggestion is watch the latest episodes and then fill backlog wherever you feel el like. Today there is one maha episode!!!

Pages